बिहारमध्ये मिळाली भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण,222 दशलक्ष टन सोन..!!
भारतात सर्वात मोठा सोन्याचा साठा बिहारच्या जमुई जिल्ह्यात सापडला आहे. या खाणीतील सोन्याचे प्रमाण उर्वरित भारतातील सोन्यापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय खाण,कोळसा आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची संपूर्ण माहिती संसदेत दिली आणि म्हटले आहे की,
देशात एकूण 501.83 टन प्राथमिक सुवर्ण धातूचा साठा आहे, ज्यामध्ये 654.74 टन सोन्याचा समावेश आहे.
भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४४ टक्के सोन्याचा साठा एकट्या बिहारमध्ये सापडला आहे.
बिहारच्या जमुई जिल्ह्यात 222.885 दशलक्ष टन सोने सापडले आहे ज्यात 37.6 टन सोन्याच्या धातू चा समावेश आहे.
बिहार पाठोपाठ राजस्थान 25 टक्के, कर्नाटक 21 टक्के, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश 3 टक्के आणि झारखंड 2 टक्के आहे.
भारतातील सर्वाधिक सोन्याचे साठे असलेले राज्य:-
1.बिहार - 44%
2. राजस्थान - 25%,
3.कर्नाटक - 21%,
4.पश्चिम बंगाल - 03%,
5.आंध्र प्रदेश -03%,
6.झारखंड - 02%
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने पश्चिम चंपारण आणि गया येथील काही भागांमध्ये सोन्याच्या साठ्याचे सर्वेक्षण केले आहे आणि ते गेल्या पाच वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क वर्गीकरणाच्या देखरेखीखाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा