|
|
सर्वांत लहान जिल्हा - क्षेत्रफळ १५७ किमी
• २००१-२०११ दशकात लोकसंख्येचा सर्वाधिक ऋण वृद्धिदर - ‘म्हणजे ७.६%' होता तर घनता १९६५२/Per square kilometer एवढी असून मुंबई उपनगर जिल्हानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
• सात बेटे - मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहिम यांपासून हा जिल्हा बनला आहे.
यामध्ये एकही तालुका तसेच जिल्हा परिषद नाही.
• जेराल्ड अंजिअर या इंजिनिअरने मुंबई बेटाची निर्मिती केली आहे.
त्यामुळे त्याला 'आधुनिक मुंबईचा शिल्पकार" म्हणतात.
विमानतळ :-
१. सांताक्रूझ - देशांतर्गत वाहतुक (Domestic Airport)
२. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
स्थळे :-
१८८१ : हँगिंग गार्डन (सध्याचे नाव फिरोजशहा मेहता उद्यान)
१९११ : गेट वे ऑफ इंडिया (राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी ) यांच्या स्वागतार्थ बांधले होते.
इटालीयन गॉथिक शैलीतील व्हिक्टोरिया टर्मिनस (आता CST ) हे एफ. डब्यु स्टिव्हन्स यांनी बांधले आहे.
राजाबाई टॉवर्स, पिन्स ऑफ वेल्स म्युझिअम
|
• साष्टी बेटावर स्थित असून याचे जिल्हा मुख्यालय वांद्रे येथे आहे.
तालुके ३ :- 1) बोरिवली 2) अंधेरी 3) कुर्ला
• २०११ सर्वाधिक घनतेचा जिल्हा (२०,९८०किमी)
डोंगर : 1)कान्हेरी 2)घाटकोपर 3)तुर्भे
नद्या : 1)दहिसर 2)पोईसर 3) मिठी,
तलाव: १. तुळशी २. विहार ३.पवई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्वी कृष्णगिरी उपवन)
ठिकाण कारखाने
१. कांदिवली जीप, ट्रॅक्टर
२. कुर्ला मोटारी
३. भांडूप स्कूटर्स
४.माहूल खनिजतेल शुद्धीकरण
* अंधेरी : चेंबूर- गोरेगाव येथे चित्रपट निर्मिती चालते.
* गोरेगाव येथे चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.
National Highway
1. Western Express Highway (बांद्रा - दहिसर) यालाच अलियावर जंग महामार्ग म्हणतात.
2. Eastern Express Highway (ठाणे-चेंबूर) यालाच वसंतराव नाईक महामार्ग म्हणतात.
|
२०११ च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा.
नदी-
उल्हास नदीचा उगम बोरघाटाजवळ होतो. साष्टी बेटामुळे नदीप्रवाहाचे दोन फाटे होतात.
उल्हास नदीच्या उपनदया-
1)बारवी 2) भातसा, 3)मुरबाडी 4)धस्यो 5)भातसा नदीवर -शहापूरमध्ये भातसा हे धरण
वैतरणा नदीवरील मोडकसागर फार कमी शेतीक्षेत्र उपलब्ध असून येथे भात, वरी, नाचणी ही पिके घेतली जातात.
प्रसिद्ध स्थळे : वसई येथील विड्यांची पाने प्रसिद्ध आहेत.
• विरार येथील अर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे.
|
• २०१५ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
• आदिवासी जमाती - ठाकूर, कातकरी, हुबळा, मल्हार कोळी, महादेव कोळी, भिल्ल काथोडी
• नद्या – वैतरणा ही नदी पालघर तालुक्यातून वाहते ती पुढे विरारच्या उत्तरेस अरबी समुद्रास मिळते.
वैतरणा नदीच्या मुखाशी दातिवरा खाडी आहे.
वैतरणेच्या उपनदया - 1)पिंजळ 2) दहरेजा 3)सूर्या 4) तानसा
• धरणे : सूर्या व बांद्री नदीवर बांधलेली धरणे.
प्रमुख स्थळे:-
सातपाटी :- हे मत्स्य व्यवसायाचे प्रसिद्ध केंद्र पालघर तालुक्यात आहे.
डहाणू :- येथील चिकू व गुलाब तसेच दापचरी दुग्ध प्रकल्प प्रसिद्ध आहे.
जव्हार:- हे ठिकाण पूर्वी ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध होते.
तारापूर :- येथे अणूऊर्जा प्रकल्प आहे.
वज्रेश्वरी - हे ठिकाण तानसा नदीकाठी असून येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
|
• आदिवासी : 1)कातकरी 2) ठाकर यापैकी कातकरी अतिमागास म्हणून केंद्राद्वारे घोषित.
बेटे : 1)खांदेरी-उंदेरी 2)घारापुरी, 3)करंजा, 4)कासी, 5)कुलाबा, 6)जंजिरा
सर्वाधिक पाऊस : माथेरान
सर्वात कमी पाऊस : अलिबाग
नदया:- 1)उल्हास, 2) पाताळगंगा, 3)भोगावती, 4)अंबा, 5) कुंडलिका, 6)काळ, 7)सावित्री
धरणे :
१. भिवपुरी (ता. कर्जत) विद्युतनिर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी अडवून ‘राजनाला' धरण बांधले आहे.
२. खोपोली जलविद्युत केंद्रातील पाण्यावर पाताळगंगा धरण आहे. ' बांधले आहे
३. भिरा जलविद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर ‘कोलाड धरण बांधले आहे.
• स्थळ वायशेत : खतप्रकल्प
• जिल्हा मुख्यालय : अलिबाग (हिराकोट किल्ला)
नागोडणे : पेट्रो केमिकल्स प्रकल्प
स्थळे :- घारापुरी (ता. उरण) येथील Elephanta लेण्या प्रसिद्ध आहेत. जंजिरा (ता. मुरुड ) किल्ला .
रायगड किल्ला (ता. महाड)
माथेरान - थंड हवेचे ठिकाण
कर्नाळा अभयारण्य पक्षी (ता. पनवेल), कर्नाळा येथे किल्लाही आहे.
पाली गणपती (ता. सुधागड) अष्टविनायक रेवदंडा बंदर,
आगरकोट- भुईकोट किल्ला - - -राजापूरी बंदर (मुरूड)- येथील मशीदही प्रसिद्ध आहे.
श्रीहरिहरेश्वर (श्रीवर्धन तालुका) पुळण (Beach)
न्हावा-शेवा बंदर
लोणेरे - बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विदयापीठ (BATU)
|
• उत्तरसीमा : सवित्री नदी
• दक्षिणसीमा : शुक नदी
आदिवासी : कातकरी जमात
खनिजे : कुरूंद दगड - धान्य दळण्याची जाती बनविण्यासाठी शिरगोळा दगड रांगोळी बनविणे .
बाॅक्साइट आढळ- मंडणगड , दापोली
इल्मेनाइट आढळतात -मालगुंड ते पुर्णगड
नर्मदा सिमट कारखाना : रत्नागिरी
एनान विदयुत प्रकल्प : दाभोळ
• बंदरे : 1)बाणकोट, 2) हर्णे, 3) दाभोळ, 4) भगवती बंदर
स्थळे :
१. भाट्ये नारळ संशोधन केंद्र
२. संगमेश्वर बाव व धारेश्वरगंगा नद्यांच्या संगमावर, संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे ठिकाण.
३. गणपतीपुळे, पावस, मार्लेश्वर
|
• जिल्हा मुख्यालय -ओरोस (बुद्रुक)
. उत्तरेस-शुक नदी
आदिवासी : वानरमारे जमात
आंबोली (ता. सावंतवाडी) :- राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण
नद्या :- 1)शुक, 2) देवगड, 3) आचरा, 4)गड, 5)कर्ली, 6)तेरेखोल, 7)कळणा, 8)तिल्लारी
धरणे:-
१. घोणसरी गड नदीवर (ता. कणकवली)
२. ताळंबा की नदीवर (ता. कुडाळ)
मृदा : जांभा खडकापासून तयार होणारी जांभी मृदा असून त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते.
खनिजे : १. लोह - रेड्डी (ता. वेंगुर्ला)
२. मँगनीज - सावंतवाडी, वेंगुर्ला
३. क्रोमाइट - कणकवली
४. बॉक्साईट - सावंतवाडी
५. अभ्रक - कणकवली, कुडाळ
किल्ले :
सिंधुदुर्ग : कुर्ते बेटावर'या किल्ल्याची स्थापना केली असून यावरूनच जिल्ह्यांस हे नाव मिळाले आहे.
१६६४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला बांधला असून येथे शिवरायांचे श्री शिवराजेश्वर मंदिर' आहे.
सिंधुदुर्ग व हा किल्ला मराठ्यांच्या नाविक श्रेष्ठत्वाचा जिवंत पुरावा आहेत.
२) विजयदुर्ग : इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर याचे 'ऑगस्टस' हे नाव ठेवले होते.
३) सर्जेकोट किल्ला : शिवरायांनी बांधलेला हा किल्ला मालवण तालुक्यातील तलाशिल खाडीच्या मुखाशी आहे हा तिन्ही बाजूंनी खंदकांनी वेढला असून अरबी समुद्राकडील बाजू खंदकरहीत आहे.
४) रंगणागड किल्ला : शिलाहार भोज राजाच्या काळात बांधलेला हा किला १६५९ मध्ये शिवरायांनी जिंकून घेतला. नंतर हा किल्ला त्यांचे आवडते आश्रयस्थान बनले. समुद्रसपाटीपासून २६०० फुट उंचीवर आहे. :
इतर :
सैतवडे धबधबा तालुका व महत्त्वाचा समुद्र किनारा
हिरण्यकेशी : भगवान शंकराचे स्थान असून महाशिवरात्रीला येथे जत्रा भरते. या डोंगरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होऊन ती अरबी समुद्राकडे वाहत जाते
आंबोली : डोंगररांगेत कार्वी या झाडावर सात वर्षांत एकदा येणारी फुले आकर्षणाचे केंद्र आहे.
सागरी किनरे:
तारकर्ली : मालवण तालुक्यातील या समुद्रकिनाऱ्यावर सिंधुदुर्ग, पदमगड हे सागरी किल्ले आहेत.
शिरोडा : वि. स. खांडेकरांचे प्रेरणास्थान असलेला हा किनारा पर्यटन, मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध असून सविनय कायदेभंग (१९३०) या लढ्यावेळी मीठ सत्याग्रह या ठिकाणी जोमात होता.
३. वेलागार : वेंगुर्ला तालुक्यातील या सागरी किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित असून याठिकाणी मानवी : २. हस्तक्षेप कमी आहे. सहज अनुभवता येतो.
भोगवे : या किनाऱ्यावरून कार्ली खाडीचा समुद्राशी होणारा मिलाप
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण
१. मीठबाव (देवगड)
२. तारकर्ली (मालवण) येथील ‘जामसंडे' हा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे.
|
पूर्वसीमा - कुकडी, घोड, भीमा नदी .
दक्षिणसीमा - नीरा नदी
लोकसंख्यामध्ये राज्यात दुसरा तर घनतेमध्ये राज्यात चौथा आहे.
धरणे :
१. भाटघर वेळवंडी नदी -येसाजी कंक जलाशय (ता. भोर)-(लॉईड धरण हे जुने नाव)
२. पानशेत - अंबी नदी (ता. वेल्हे) - तानाजीसागर जलाशय. पुण्यास पाणी पुरवठा करण्यासाठी
३. वरसगाव - मोसी नदी (ता. मुळशी) – वीर बाजी पासलकर जलाशय पुण्यास पाणी पुरवठा करण्यासाठी
४. खडकवासला -अंबी, मोसी, मुठा नदयांवर. याच्या नजीकच NDA, CWPRS या संस्था आहे.
५. पवना (ता. मावळ) पवना नदी याच्या नजीक तुंग किल्ला आहे.
६. मुळशी (ता. मुळशी) - टाटा कंपनीचे हे धरण मुळा नदीवर बांधले आहे. भिरा जलविद्युत केंद्रात वीज निर्मिती होते.
७. चासकमान (ता. खेड)- भीमा नदीवर बांधलेले हे धरण जलविदयुत निर्मिती व जलसिंचनासाठी महत्त्वपूर्ण आहे
८. पुष्पावती (ता. जुन्नर)
९. नाझरे (ता. पुरंदर) कहा नदीवर जेजुरीजवळ बांधलेल्या धरणास मल्हारसागर हे नाव दिले आहे
१०. टेमघर – मुळशी नदीवर बांधलेले हे Gravity प्रकारचे धरण आहे.
स्थळे :
१. भीमाशंकर (ता. आंबेगाव) अभयारण्य शेकरू खारीसाठी प्रसिद्ध आहे.
२. चाकण - कांदा बाजारपेठ (ता. खेड), भुईकोट किल्ला.
३. देहू - (इंद्रायणीकाठी) संत तुकारामांचे जन्मस्थळ
४. आळंदी (इंद्रायणीकाठी) - संत ज्ञानेश्वरांची समाधी
५. तळेगाव - काच कारखाना
६. सासवड (पुरंदर तालुका) सोपानदेव समाधी -
७.जेजूरी (ता. पुरंदर) - खंडोबा देवस्थान
८. आर्वी (ता. जुन्नर) - ‘विक्रम' उपग्रह दळणवळण केंद्र- Vikram Satellite Communication Centre
९. वढू - (ता. शिरूर) संभाजी महाराज यांची समाधी
|
- उत्तर सीमा. -नीरा नदी
नद्या : 1)कृष्णा, 2) कोयना, 3) वेण्णा, 4) उरमोडी,
धरणे :
१. शिवाजीसागर (कोयना नदी) (ता. पाटण) हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
२. धोम - कृष्णानदीवरील हे धरण मातीचे असून सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी याचा वापर होतो.
३. वीर येथे नीरा नदीवर धरण आहे.
४. कन्हेर येथे - वेण्णा नदीवर धरण आहे.
५. येरळावाडी(ता.खटाव)-मातीचे धरण असून याचा महत्त्वपूर्ण उद्देश दुष्काळी तालुक्यांना सिंचनासाठी पुरविणे आहे.
इतर:
• मायनी अभयारण्य पक्षी अभयारण्य .
कोयना अभयारण्य पाटण आणि जावळी तालुक्यात पसरले आहे.
. खरीप ज्वारी हिला 'जोंधळा' म्हणतात.
• रब्बी ज्वारी हिला 'शाळू' म्हणतात.
उदयोगः
१. घोंगडी विणणे खटाव, माण, फलटण -
२. तेल गाळणे - कोरेगाव
३. मधुमक्षिकापालन - महाबळेश्वर
४. वालचंदनगर - औदयोगिक केंद्रीकरण
स्थळे :
1)सज्जनगड, 2) पाचगणी, 3) महाबळेश्वर, 4)कास पठार, 5)शिखर शिंगणापूर, 6)क-हाड, 7)प्रतापगड, 8)वाई
|
• १ ऑगस्ट १९४९ मध्ये सातारा जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण झालेल्या 'दक्षिण सातारा जिल्ह्याचे १९६० मध्ये सांगली हे नामाधीकरण केले गेले.
सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत.
• सांगली मधील जत, आटपाडी, खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव हे तालुके अवर्षणप्रवण आहेत.
नद्या : माणगंगा, वारणा, येरळा, बोर, अग्रणी आणि कृष्णा
धरणे :
चांदोली (वारणा नदी)- ता. शिराळा
वज्रचौंडे (अग्रणी नदी)- तासगाव व कवठे- महांकाळ तालुक्याच्या सीमेवर
बलौडी (येरळा नदी)
सागरेश्वर अभयारण्य : देवराष्ट्रे (ता. खानापूर) हरणांसाठी प्रसिद्ध,
चांदोली अभयारण्य (शिराळा तालुका)
औदयोगिक : बॉक्साईट - शिराळा तालुका
• सांगली मिरज-कुपवाड हा औदयोगिक समुह (MIDC) प्रसिद्ध आहे.
• वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आशियातील सर्वात मोठा -सहकारी साखर कारखाना असून देशातील सर्वाधिक दैनिक गाळपक्षमता याच कारखान्याची आहे.
• सांगली मधीर हरिपूर येथील हळदीची बाजारपेठ आशियातील सर्वात मोठी आहे.
• अब्दुल करीम खान गायकाने या दऱ्यांच्या संगीत परंपरेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
स्थळे :
१. मिरज हजरत मिरासाहेब अवलिया दर्गा
२) ब्रम्हनाळ- कृष्णा-येरळा संगम
३. हरिपूर कृष्णा-वारणा नदी संगमावरील या ठिकाणी संगमेश्वराचे मंदीर आहे.
४. दंडोबा (भोसे) येथील गुहा मंदीर प्रसिद्ध असून हे मिरज तालुक्यात आहे.
|
* जिल्ह्यात आदिवासी जमाती नाहीत
माळशिरस वगळता सर्व तालुके अवर्षणप्रवण आहेत.
नद्या : 1) भीमा, 2)सीना, 3)माणगंगा, 4)नीरा, 5)भोगावती, 6)बोरी
धरणे : उजनी धरण भीमा नदीवर (ता. माढा)
• हा जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.
स्थळे :
१. पंढरपूर - चंद्रभागा (भीमा) काठी. वारकरीपंथीयांचे आराध्यदैवत भगवान विठ्ठलाचे स्थान आहे.
२. अक्कलकोट स्वामी समर्थांचे देवस्थान
३. माळढोक पक्षी अभयारण्य (नान्नज)
धार्मिक :
मंगळवेढा : येथे संत दामाजीपंत, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांच्या समाधी असून येथील गैबीपीर दर्गाह प्रसिद्ध आहे.
करमाळा : येथील करमाळा भवानी मंदीर १७२७ साली रावराजे निंबाळकर यांनी बांधले आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिरास ९६ पायऱ्या असून ९६ खांब आहेत तसेच मंदिराच्या शिखरावर ९६ शिल्पे आहेत.
बार्शी : येथील भगवंत मंदीर हे भारतातील एकमेव विष्णु मंदीर आहे जेथे विष्णुचे नाव भगवंत आहे. इ.स. १२४५साली बांधलेले हे मंदीर हेमाड पंथी शैलीमध्ये बांधले आहे.
१२) कोल्हापूर |
• दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीवर स्थापन
• या ठिकाणी शिलाहार, यादव, राष्ट्रकुट व चालुक्य वंशाच्या राजांचे राज्य होते.
• उत्तरसीमा वारणा नदी, पूर्व आणि ईशान्य सीमा
• सहकारी चळवळीमधील अग्रेसर जिल्हा असून जिल्ह्यात ९६२४ सहकारी संस्था आहेत.
नद्या :
पंचगंगा (कुंभी,कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती इ.नयांच्या संगमानंतरचे नाव), कृष्णा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी
धरणे :
१. भोगावती नदी - राधानगरी
२. दूधगंगा नदी काळम्मावाडी(आसनगाव) हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संयुक्त प्रकल्प आहे.
३. तुळशी (फेजीवडे, तालुका राधानगरी)- तुळशी नदी
पिके :
भात, ऊस, तंबाखू ही पिके असून हा राज्यातील दर हेक्टरी सर्वाधिक खत वापरणारा जिल्हा आहे.
खनिजे :
१. लोह - शाहूवाडी, राधानगरी
२. बॉक्साईट शाहूवाडी, राधानगरी,
३.सिलिका - राधानगरी
४. चिनिमाती भुदरगड
स्थळे :
१. खिद्रापूर - ता. शिरोळ येथील कोपेश्वर मंदिर व लेणी प्रसिद्ध आहेत.
इतर प्रसिद्ध :
कोल्हापुरी साज : हा नेकलेसचा प्रकार असून सोन्याच्या सर्व दागिन्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरी चप्पल : १००% गायी व बैलाच्या चमड्यापासून तयार केलेल्या या चप्पला जगप्रसिद्ध होत्या.
कोल्हापुर गुळ : कमी रंगीत, अधिक गोडवा ही या गुळाची वैशिष्ट्ये आहेत.
कोल्हापुरी कुस्ती : शाहु महाराजांनी रोम येथील 'कलोशिअम' मैदानाच्या रचनेवर आधारित कुस्तीचे खासबाग हे मैदान कोल्हापुर येथे बांधले. केवळ कुस्तीसाठी बांधलेले हे भारतातील एकमेव मैदान असून एकावेळी ६०,००० प्रेक्षक कुस्ती पाहु शकतीत एवढी याची क्षमता आहे.
|
• लोकसंख्येशी आदिवासी प्रमाण - २५.६% असून महादेव कोळी, वारली, ठाकर, पारधी, भिल्ल या प्रमुख जमाती आहे.
• खुप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे नाशिकला ‘पश्चिम भारताचे वाराणसी' म्हणले जाते.
नद्या : प्रमुख नदी गोदावरी
गोदावरीच्या उपनद्या -गिरणा, दारणा, बाणगंगा, कादवा
गिरणेच्या उपनदया -आरस, मोसम, पांझण
दारणेच्या उपनदया -वाकी, उंदुहोल, वालदेवी
धरणे:
१. गंगापूर- गोदावरी नदी
२.नांदूर माध्मेश्वर – गोदावरी नदी
पीक:
प्रमुख पीक बाजरी असून महाराष्ट्रात सर्वाधिक बाजरी उत्पादन या जिल्ह्यात होते.
प्रमुख स्थळे :
औष्णिक विदयुत केंद्र - एकलहरे
मिग विमान कारखाना ओझर
• इंडिया सिक्युरिटी प्रेस - नाशिक रोड
• करन्सी नोट प्रेस - नाशिक रोड
• विमानतळ - गांधीनगर
पांडवलेणी, MERI, महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी.
स्थळे :
१. मालेगाव - मोसन नदीकाठी- यात्रेसाठी प्रसिद्ध, भुईकोट किल्ला (सरदार नाशेशंकरांनी बांधाला) . -
२.येवले - शालू, पैठण्या, पीतांबरे प्रसिद्ध. तात्या टोपे यांचे जन्मगाव
३. वणी - सप्तश्रृंग देवी
४. मनमाड -(ता. नांदगाव) हे प्रसिद्ध रेल्वे जंक्शन आहे.
५. नांदूर- माध्मेश्वर - अभयारण्य.
६. सापुतारा थंड हवेचे ठिकाण
धार्मिक स्थळे :
१) पंचवटी : गोदावरीच्या पश्चिम तीरावर नाशिकमध्ये हे ठिकाण असून येथे पाच वडाची झाडे विकसित झाल्याचे दिसते म्हणून यास पंचवटी म्हणतात.
२) मुक्तीधाम मंदिर : नाशिक शहरातील या मंदिरात १२ ज्योतिलिंगाचे प्रतिलिंग ठेवले असून ते मुळ माक्राणा राजस्थान प्रकारच्या संगमरवरापासून बनले.
|
• क्षेत्रफळानुसार हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
आदिवासी : महादेवकोळी, ठाकर या जमाती अकोले तालुक्यात आढळतात.
उत्तर सीमा - गोदावरी नदी
दक्षिण सीमा- भीमा नदी वाहतो.
नदया :
गोदावरी, प्रवरा, ढोरा, भीमा, अदुला, महाळुगी, मुळा, घोड, सीना, कुकडी
धरणे : १. भंडारदरा - प्रवरानदी अकोले
• देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य (ता. कर्जत) काळवीटांसाठी राखीव आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आणि (NH-50) राष्ट्रीय
२. मुळा प्रकल्प बारागाव नांदूर, ता. राहुरी- मुळा नदी
पीके :
खरीप- बाजरी, भुईमूग, तूर
रब्बी - करडई, गहू, हरभरा
स्थळे :
१. शिर्डी (ता. राहता) साईबाबा मंदिर
२. नेवासे प्रवरा नदीकाठी - ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिण्याचे बोलले जाते.
३. राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ
४. चौंडी - जामखेड तालुका, अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे.
५. सिद्धटेक (ता. कर्जत) सिद्धिविनायक या अष्टविनायकापैकी एका गणपतीचे देवस्थान आहे.
६. श्रीरामपूर - मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
७. दायमाबाद- प्रवरा काढी ताम्रपाषाण युगाचे अवशेष -
पर्यटन :
१. रणगाडा संग्रहालय (Tank Museum) : अशा प्रकारचे हे संग्रहालय आशियातील एकमेव संग्रहालय असून प्रथम विश्व महायुद्धावेळी वापरलेल्या रणगाड्यापासून ते सध्याच्या अतिप्रगत रणगाड्यापर्यंत सर्व प्रकारचे रणगाडे येथे आहेत.
२. मुळा धरण (ता. राहुरी) : याला ज्ञानेश्वरसागर हे नाव असून हे मुळा नदीवर बांधले आहे.
३. भंडारदरा धरण (ता. अकोले) : प्रवरा नदीवर रंधा धबधब्यानजीक बांधलेले हे धरण आकर्षक स्थळ आहे.
४. कळसुबाई - हरिश्चचंद्र गड अभयारण्य (ता. अकोले)
५. राळेगण - सिद्धी अण्णा हजारेंच्या प्रयत्नातून साकारलेले आदर्श गाव
|
आदिवासी : भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड, बंजारी (भटकी जमात
नद्या: तापी
तापीच्या उपनदया : पूर्णा, पांझरा, भोकर, सुकी, मोर, गुळी, हडकी, अनेर
धरणे :
१. दहिगाव हे धरण जामदे येथे गिरणा नदीवर आहे.
२. तामसवाडी - बोरी नदीवर
३. गारबर्डी - सुकी नदीवर
४. मणपूर - अनेर नदीवर .
यावल अभयारण्यामध्ये नीलगायी, हरणे आढळतात.
• पाल येथे वनोयोग आधारीत रोजगार आहे.
• कापूस : केळीच्या उत्पादनामुळे जळगावला केळ्यांचे आगार म्हणतात.
स्थळे :
१. वरणगाव - युद्धसाहित्य निर्मिती कारखाना
पिके :
रब्बी ज्वारी हिला 'दादर' म्हणतात.
जळगाव उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे स्थान असून 'अजिंठ्याचे प्रवेशद्वार' असेही या जिल्हयाला म्हणतात.
३. फेकरी - येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
पर्यटन स्थळे :
१) श्री पद्मालय : भारतातील श्री गणेशाच्या अडीच तीर्थपिठापैकी हे अर्धे पिठ आहे.
२) फरकांडेचे झुलते मनोरे : उत्वादी नदीकिनारी फरकांडे येथील मनोरे हा वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
कारण या दोनपैकी एक मनोरा झुलण्यास सुरू झाल्यावर दुसरा मनोराही झुलु लागतो.
३) उनपदेव : येथे उष्ण पाण्याचा झरा असून हे ठिकाण चोपडा तालुक्यात येते.
उनपदेव, सुनपदेव व निझरदेव हे तिन्ही उष्ण पाऱ्याचे झरे रामायणात वर्तिले आहेत.
४) चांगदेव मंदिर : तापी व उत्तर पुर्णा नदीच्या संगमावर असलेल्या या ठिकाणास ASI ने संरक्षित क्षेत्राचा दर्जा दिला आहे.
५) परोळा किल्ला : हा किल्ला १७२७ मध्ये बांधला असून ऐतिहासिक पुराव्यानुसार हा किल्ला राणी लक्ष्मीबाईंच्या वडिलांचा होता.
त्यावरून लक्ष्मीबाई पारोळ्याच्या असाव्यात.
|
• आदिवासी - गावित, भिल्ल, कोकणा, पावरा, मावची, कातकरी,जमाती इ.(जिल्ह्याची ३१.६% लोकसंख्या आदिवासी)
• भटक्या जमाती - वंजारी, ठेलारी, फासेपारधी • उंचशिखर - हनुमान (गाळणा डोंगरात), बावाकुवर (सातपुडा रांगात)
संपूर्ण जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. तसेच येथील मृदा गाळाची आणि काळी आहे.
जिल्ह्याच्या बहुताश ठिकाणी लाव्हारसाच्या उद्रेकाचे तसेच डाईकचे अस्तित्व जाणवते. जिल्ह्याच्या उत्तरेस जातांना याचे प्रमाण वाढते.
कोंडाईवारी, लळिंगवारी हे लहान घाट तसेच बिजासन घाट प्रसिद्ध
नद्या :तापी
तापीच्या उपनदया अनेर, अरुणावती (उजवीकडील)
पांझरा, बुराई, अमरावती (डावीकडील)
धरणे :
१. करवंद- अरुणावती नदीवर
२. पुरमेपाडा - बोरी नदीवर
३. मालनगाव कान नदीवर
४. बोरकुंड - कानोली नदीवर
५. सय्यदनगर अक्कलपाडा- पांझरा
६. फोफर - बुराई नदीवर
७. अनेर अनेर नदीवर
• या जिल्ह्याला दुधा-तुपाचा जिल्हा म्हणतात. तसेच या जिल्ह्यातून ३ राष्ट्रीय महामार्ग जातात.
१. NH-6 (सुरत ते नागपूर)
२. NH-3 (मुंबई ते आग्रा)
३) NH-211 (धुळे ते सोलापूर)
स्थळे :
१. धुळे - पांझरा नदीकाठी
२. साक्री कान नदीकाठी
३. मुदावड - तापी पांझरा नदयांच्या संगमावर
४. शिरपूर - अरूणावती नदीकाठी असून येथील शेतीमालाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.
५. दौंडाई - येथील मिरचीचा बाजार प्रसिद्ध आहे भूईमूग उत्पादनात हा जिल्हा आघाडीवर आहे.
|
• आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण ६९.२८% पेक्षा अधिक असल्यामुळे यास 'आदिवासी जिल्हा' म्हणतात.
• जमाती : भिल्ल, गावित, कोकणा, पावरे, मावची, धनका
नद्या: तापी
• तापीच्या उपनदया : गोमती, वाकी (उजवीकडील)
नर्मदेच्या उपनद्या या शिवा, नेसू, रंगावली (डावीकडील)
• धरणे :
ससुरी धरण गोमती नदीवर
• स्थळे :
१. सारंगखेडा : येथील एकमुखी दत्त मंदिरात भरणाऱ्या जत्रेतील घोड्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. -
२. उनपदेव : गरम पाण्याचा झरा आणि सुंदर हिरवेगार डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात.
३. प्रकाशे : तापी गोमती नदीच्या संगमावर वसलेले हे ठिकाण ‘खानदेशची काशी' म्हणून ओळखले जाते.
उत्तर काशी एवढेच महत्त्व यालाही आहे.
४. तोरणमाळ : थंड हवेचे ठिकाण (अस्तंभा डोंगरात) असून यशवंत तलाव, सोता खायी दरी हे इतर निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
|
- • हा भारतातील एकमेव जिल्हा आहे. जेथे दोन जागतिक वारसास्थळे (World Heritege site) आहेत.
• दक्षिणसीमा - गोदावरी नदी
• आदिवासी - भिल्ल या जिल्ह्यातून जातो.
• भटकी जमात- बंजारा
• औरंगाबादच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ५.५१% क्षेत्र हे वन्यव्याप्त आहे.
• गोदावरीच्या उपनदया - पूर्णा, शिवना, येळगंगा, खाम
पूर्णेच्या उपनदया - खेळणा, गिरजा, दुधना, वाघूर
- धरणे - जायकवाडी (नाथसागर)- पैठण येथे गोदावरी नदीवर बांधले आहे.
• पीके - बाजरी, ज्वारी, करडई
विमानतळ - चिखलठाणा
स्थळे
१. औरंगाबाद - WALMI, पाणचक्की, डॉ. सलीम अली तलावासाठी प्रसिद्ध
२. खुलताबाद - औरंगजेबाची कबर
३. म्हैसमाळ - थंड हवेचे ठिकाण (ता. खुलताबाद
४. आपेगाव (ता. पैठण)- ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान
५. पितळखोरा (ता. कन्नड) भारतातील सर्वांत प्राचीन बौद्धलेणी
६. गौताळा - औटरमघाट अभयारण्य -
७. दौलताबाद - येथील सिताफळे प्रसिद्ध आहेत. तसेच दौलताबाद किल्ला यादव साम्राज्याच्या वैभवाचे दर्शन घडवून देतो. -
८. अजिंठा ता. सिल्लोड जगप्रसिद्ध लेण्या. UNESCO मार्फत World Heritage Site म्हणून घोषित.
९. वेरूळ - (ता. खुलताबाद) UNESCO मार्फत World Heritage Site म्हणून घोषित.
१०. पैठण - संत एकनाथांचे जन्मस्थान असून हे ठिकाण पूर्वी सातवाहनांची राजधानी होती व त्याकाळी प्रतिष्ठान नावाने ओळखले जात असे. येथील पैठणी साड्या देखील जगप्रसिद्ध आहेत. -
११. घटोत्कच : पश्चिम भारतातील सर्वप्रथम डोंगर कोरून तयार केलेले मंदिर.
१२. बाबी का मकबरा : बेगम राबीया या औरंगजेबाच्या पत्नीची कबर
|
आदिवासी -लमाण
उत्तरसीमा -गोदावरी
दक्षिणसीमा -मांजरा
गोदावरीच्या उपनदया - वाण, सिंदफणा, सरस्वती, बिंदुसरा, कुंडलिका
बीडचे ऐतिहासिक नाव चंपावती नगर होते बिंदूसरा नदीकिनारी वसलेले.
धरणे -
१. माजलगाव प्रकल्प सिंदफणा नदी
२. मांजरा प्रकल्प (मांजरा नदी)
शांतीवन वनप्रकल्प बिंदुसरा नदीकाठी, मनझरी येथे आहे.
नेकनूर येथील काला पहाड आंबे तर अंबेजोगाई येथील परळी पेवंदी आंबे प्रसिद्ध आहेत.
औष्णिक विद्युत केंद्र परळी
स्थळे -
१. बीड - बिंदुसरा नदीकाठी
२. परळी वैजनाथ - ज्योतिर्लिंग मंदिर
३. धबधबे - सौताडा, कपिलधार
४. चिंचोली थंड हवेचे ठिकाण
५. नायगाव मयुरोदयान
धार्मिक स्थळे
१. कंकालेश्वर : शहराच्या पूर्वेस असलेले हे महादेवाचे मंदीर म्हणजे शिल्पकलेचा अद्भूत नमुनाच असून मंदिराच्या भोवती असलेल्या कुंडात साठलेले पाणी याची शोभा वाढविते.
२. परळी वैजनाथ : १२ ज्योतिलींगापैकी एक असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला होता.
३. अंबेजोगाई : योगेश्वरी देवीचे मंदिर तसेच मराठीचे सर्वात आद्य कवी आणि ‘विवेकसिंधु' या आदय काव्यसंग्रहाचे लेखक 'मुकुंदराज' याचे ठिकाण.
|
भौगोलिक दृष्ट्या जालना राज्याच्या मध्यभागी येत असल्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र (Remote sensing station) येथे उभारले असून याद्वारे अवकाशातील उपग्रहांशी संपर्क साधने शक्य होते.
भौगोलिक रचनेनुसार जिल्ह्याचा बराचसा भाग बेसॉल्ट खडकांनी व्यापला असल्यामुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी असते व त्यामुळे भूजल उपलब्धता कमी जाणवते.
दुधना नदीवर मंठा तानुक्यात बांधलेले वाकडी धरण जालना व परभणी जिल्ह्यास वरदान ठरले. लोअर दुधना सिंचन प्रकल्प याचाच भाग आहे.
• जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून अंदाजे ६० किमी लांबीच्या क्षेत्रातून गोदावरी वाहते.
• दुधना नदीच्या कुंडलिका या उपनदीच्या काठावर जालना शहर वसलेले आहे.
• आदिवासी -लमाण (ता. परतूर, जालना), भिल्ल (अंबड), कैकाडी, पारधी
• नद्या– गोदावरी, पूर्णा व धामना, भुई, खेळणा, गिरजा, दुधना व कुंडलिका, कल्याण
• संकरित बियाणे उत्पादनात अग्रेसर असणारी ‘महिको बियाणे कंपनी' प्रसिद्ध आहेत.
• स्थळे
१. जालना कुंडलिका नदीकाठी
२. जांब - रामदासस्वामी जन्मस्थान
३. मंठा - जनावरांचा बाजार
४. बदनापूर- शेती विषयक संशोधन केंद्र
|
• जिल्ह्याची पश्चिम सीमा- सीना नदी
• जिल्ह्याची उत्तर सीमा - मांजरा नदी
• नया तेरणा- उगम ता. कळंब, बाणगंगा ही सीना नदीची उपनदी, बोरी ही भीमेची उपनदी -
• स्थळे
१. उस्मानाबाद भोगावती नदीकाठी, हजरत खाजा शमसुद्दीन दर्गा,
२. तुळजापूर - तुळजाभवानी मंदीर, जवळच नागझरी हे निसर्गरम्य ठिकाण
कळंब - मांजरा नदीकाठी
४. भूम - बाणगंगा नदीकाठी
५. नळदुर्ग किल्ला - येथील पाणी महाल प्रसिद्ध आहे. जवळुनच वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याची वापर दुर्ग रक्षणासाठी केला गेलेला आहे, तांदुळ संशोधन केंद्र
६. धाराशिव लेणी सातव्या शतकातील या लेणी व गुहा नील व महानील या विद्याधरांनी बांधला.
७. परांडा किल्ला - बहामनी सलतनतीचा प्रधान महमुद गवाना याने बांधला. -
|
नदया -मांजरा
• मांजरा नदीच्या उपनदया - तेरणा, मन्याड, धरणी,
• मृदा - गाळाची सुपीक 'कन्हार मृदा' प्रसिद्ध आहे.
• स्थळे
१. लातूर येथील ‘गंजगोलाई' येथे व्यापारी पेठ प्रसिद्ध असून लातूर हे मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर आहे.
२. खरोसा ता. औसा येथे हिंदू-बौद्ध लेणी आहेत.
३. रेणापूर- हलती दीपमाळ
४. देवणी येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे.
५. उदगीर - यादवकालीन भूईकोट किल्ला
• इतर वैशिष्ट्ये
बालाघाट पठारावर वसलेल
• तोरणा नदी मांजराची प्रमुख उपनदी औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते.
लेंडी नदी
उदगीर तालुक्यात उगम पावनारी नदी पुढे नांदेड जिल्हयात नीरू नदीस मिळते.
• तवरजा नदी मुरूड जवळ उगम पावणारी नदी पुढे मांजरा नदीस मिळते.
• ऐतिहासीक काळात लातूर राष्ट्रकुटांच्या राजधानी केंद्र होते तसेच हा जिल्हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता.
|
• जिल्ह्याची उत्तरसीमा -पैनगंगा नदी
• आदिवासी - आंध, परधाण, कोलाम
• मांजरा नदी उपनदया मन्याड, लेंडी
• नद्या गोदावरी नदीच्या मांजरा, आसना, सीता व सरस्वती या उपनद्या आहेत.
• धरणे.
१.मन्याड मन्याड नदी- वरवट (ता. कंधार)
२. कुंद्राळा - मन्याड नदी - मुखेड तालुका
• स्थळे
१. नांदेड - गोदावरी नदीकाठी गुरू गोविंदसिंह स्मरणार्थ गुरुद्वार -
२. कापूस संशोधन केंद्र
३. स्वामी रामानंद तीर्थमराठवाडा विदयापीठ .
किनवट अभयारण्य, किनवट तालुका
• उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. या झऱ्यातील स्नानानंतर त्वचारोग नाहीसे होतात.
• सहस्त्रकुंड धबधबा बाणगंगा नदीवर असलेला हा धबधबा वर्षभर वाहतो आणि याचा काळा दगड धातूप्रमाणे वाटतो.
• माहुर हे साडेतीन पिठापैकी एक शक्तीपीठ असून ते रेणूकादेवीचे स्थान आहे.
• शिऊर लेण्या हादगाव तालुक्यात शिऊर या ठिकाणी ३ वैष्णव पंथाच्या लेण्या आहेत.
. विष्णूपुरी- ही गोदावरी नदीवरील सर्वात मोठी उपसा सिंचन येजना आहे.
शंखतिर्थ येथे यादवकालीन हेमाड पंथी नृसिंह मंदिर असून त्याच्या आतील भिंतीवरील कोरीवकाम यादवांच्या सुक्षकालाची साक्ष देते.
होट्टान मौदिर देगलूर तालुक्यातील हे मदिर भगवान सिद्धेश्वराचे आहे.
चालुक्यांच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव वा मंदिराच्या शिल्पकलेवर जाणवतो.
माळेगाव यात्रा भगवान खडोबाच्या जनावाचा बाजार प्रसिद्ध आहे.
|
आदिवासी -लमाणी ( जिंतूर तालुका)
नद्या: गोदावरी, पुर्णा
धरणे -
कापरा नदीवर ता. जिंतूर,
मासळी नदीवर ता. गंगाखेड
• डोंगर - 1) जिंतूर टेकड्या, 2)निर्मल डोंगररांगा
• पिके - करडई, ज्वारी
• स्थळे
१. परभणी-मराठवाडा कृषी विद्यापीठ
२. गंगाखेडला संत जनाबाईची समाधी आहे.
३. चारगणा झुलता मनोरा
४. जिंतूर - गुहेतील जैन शिल्पकला कापसाची
५. मानवत कापसाची बाजारपेठ
|
आदिवासी जमाती - अंध, बंजारा, हाटकर, पारधी
उत्तरसीमा - पैनगंगा नदी
• नद्या- पैनगंगा, कयाधू, पूर्णा, आसना .
धरणे -
१. येलदरी येथे पूर्णा नदी ता. सेनगाव
२. सिद्धेश्वर - ता. औंढा नागनाथ
वने - येथील रोशा गवत प्रसिद्ध आहे
• स्थळे -
१. हिंगोली-कयाधू नदीकाठी
२. औंढा नागनाथ - बारा ज्योतिर्लिंगापैकी
३.येलदरी- जलविद्युतकेंद्र
प्रेक्षणीय स्थळे -
१) मल्लिनाथ दिगांबर जैन मंदिर : औंढा नागनाथ तालुक्यात शिरद शहापुर गावी असलेले हे मंदिर ३०० वर्षे जुने असून संपूर्ण भारतातील जैनांसाठी हे पवित्र ठिकाण आहे.
२) भाटेगाव- कळमनुटी तालुक्यात - मत्सबीज केंद्र -
संत नामदेव संस्थान : नामदेव दामाजी रेळेकर (उर्फ संत नामदेव) यांचा १२७० मध्ये नर्सी नामदेव या ठिकाणी जन्म झाला होता.
आता याठिकाणी नामदेवांचे मंदिर असून शिख समुदाय गुरुद्वाराही बांधत आहे.
३) भारतातील सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण लहरींच्या अभ्यासासाठीची प्रयोगशाळा (LIGO Laboratory) हिंगोलीत स्थापन होणार आहे.
|
• आदिवासी - कोरकू, बसोडे, गोंड, कोलाम (कोळंब)
• डोंगर - बैराट (गाविलगड डोंगर) पोहऱ्याचे, चिरोडीचे डोंगर
पूर्णा नदीच्या प्रदेशातील मैदानी भागास पयनघाट म्हणतात.
• नद्या- पूर्णा, तापी, वर्धा, पूर्णाच्या उपनदया, चंद्रभागा, शहानूर,पेढी. . तापीच्या उपनद्या कापरा, सिपना, गाडगा
वर्धेच्या उपनद्या चुडामण, माडू, चारघड,विदर्भा, बेंबळा
• धरणे
१. सीमोरा प्रकल्प वर्धा नदी ता. मोर्शी,
चंद्रभागा प्रकल्प चंद्रभागानदी-ता. अचलपूर • वने - येथील तिखाडी गवत प्रसिद्ध आहे.
मेळघाट अभयारण्य राज्यातील प्रथम व्याघ्र प्रकल्प आहे. (ता. चिखलदरा),
औद्योगिक वसाहती - १. अमरावती, २. तातुर्णे स्थळे
तपोवन (कुष्ठरोगी कल्याणासाठी बाबा आमटेंनी स्थापन केली,
२. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण
३. मोझरी - तुकडोजी महाराज समाधी
४. वरूड -संत्र्याची बाजारपेठ
५. यावली - तुकडोजी महाराज जन्म
|
• आदिवासी - कोरकू, आंध, गोंड
• नद्या – पूर्णाच्या उपनदया काटेपूर्णा, मोणी, मन, उमा सांगवी येथे-पूर्णा उमा संगम
• धरणे - १. वानप्रकल्प ता. तेल्हारा
पिके-
खरीप-ज्वारी, कापूस, मूग, तूर, रब्बी- गहू, कापसाखाली आहे.
औष्णिक विदयुत केंद्र-पारस (ता. बाळापूर)
स्थळे - १) नर्नाळा ता. अकोट, किल्ला
२) मुर्तिजापूर- संत गाडगेबाबा आश्रय
|
• नद्या – पैनगंगा, कास, चंद्रभागा
धरणे -१. अडाण प्रकल्प -ता. कारंजा
२. एकबुर्जी-ता. वाशिम
३. मोतसावंगी- ता. मंगरूळपीर
४. गिरोली ता. मानोरा
पिके - खरीप ज्वारी, कापूस स्थळे -
१. वाशिम याचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म आहे.
|
याला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणतात.
आदिवासी– कोरकू, पारधी, नीहाल, भिल्ल भटक्या जमाती-बंजारा
• नद्या- पूर्णेच्या डावीकडील उपनया पांडव, बेंबळा, निपाणी पूर्णेच्या उजवीकडील उपनद्या मास, बोडी, ज्ञानगंगा, केदार, विश्वगंगा,
धरणे
१. नळगंगा प्रकल्प-ता. मोताळा
२.ज्ञानगंगा प्रकल्प ता. खामगाव
३. कोराडीनाला प्रकल्प-नागझरी गाव
४. मनप्रकल्प-ता. खामगाव
वने -
गेरूमाटरगाव येथे-चंदन मिळतो -
आंबाबरवा येथे-बांबू मिळतो.
• मृदा -
पठारी भाग-मोरांड मृदा
डोंगराळ भाग-बरड मृदा
• स्थळे
१)शेगाव -गजानन महाराज समाधी
२. सिंदखेड राजा-जिजामाता जन्मस्थान, घोंगड्या बनविण्याचा लघुउद्योग
३. लोणार-खाऱ्या पाण्याचे सरोवर
४. अंबाबरवा, भिंगारा-थंड हवेची ठिकाण, जळगाव तालुक्यात
|
• यवतमाळ जिल्ह्याची उत्तर, ईशान्य व पूर्व सीमा वर्धा नदीने तर दक्षिण सीमा पैनगंगा नदीने निश्चित केली आहे.
• आदिवासी – गोंड, आंध, कोलाम, पारधी, (बंजारा/लमाण जमात)
• नद्या - वर्धा, पैनगंगा • जुगाद - हे ठिकाण वर्धा, पैनगंगा संगमावर स्थापन झाले आहे.
• वने - टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्ये
• धरणे
१. इसापूर-पैनगंगा नदी
२. गोखी-अडाण नदी
३. देवगाव-अरूणावती नदी
४. निगनुर व पुस-उमरखेड तालुका
वणी तालुक्यात गोंडवाना प्रकारचे खडक जमिनीवर आढळतात म्हणून येथे कोळशाचे साठे मिळतात.
हे साठे यवतमाळपासून वर्धा ते चंद्रपूर मधील वरोरा पर्यंत पसरले आहेत.
ज्या ठिकाणी ‘लामेटा प्रकारचे खडक' जमिनीवर आले आहेत तेथे चुनखडीचे साठेही आढळतात.
बहुतांश ठिकाणी बेसॉल्ट आढळते.
मृदा -बरड मृदा
स्थळे
१. आर्णी अरूणावती नदीकाठी
२. वणी-निरगुडा नदीकाठी असून येथील चुन्याची व्यापारी पेठ प्रसिद्ध आहे.
३. उनकेश्वर - गरम पाण्याचा झरा
४. कापेश्वर-गंधकमिश्रित पाणी झरा, पैनगंगा नदीच्या काठावर
५. लोहारा- औदयोगिक वसाहत
• पांढरे सोने (कापूस) पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे
• प्रेक्षणीय स्थळे
१) श्री चिंतामणी गणेश : कळंब येथील हे देवस्थान विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असून येथे गणेशकुंड आहे.
२) वणी : निर्गुडा नदीवर वसलेल्या या ठिकाणच्या कोळशाच्या खाणी प्रसिद्ध असून हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे.
३) आणी : अरुणावती नदीतीरावरील या ठिकाणी बाबा कंबलपोष यांची जमा भरते.
राष्ट्रीय एकात्मता व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रदर्शन येथील उर्सावेळी दिसून येते.
|
• नागपूरची पूर्वसीमा वैनगंगा नदीने, वायव्य सीमा वर्धा नदी तर ईशान्य सीमा बावनथडी नदीने निश्चित केली आहे.
• आदिवासी - गोंड, हळबी
• टेकड्या - गरमसूर, पिल्कापार, महादागड, चापेगडी, अंबागड, मनसळ, पिपरडोल, जांबगड
• नद्या- कन्हान-कोलार, चंद्रभागा, नाग, पेंच, सांड
• धरणे
१. रामसागर तलाव-सूरनदी-रामटेक
२. पारशिवनी तालुक्यात -पेंच नदी
• पर्यटन ठिकाणे -
१) लेक गार्डन (सक्करदरा) : या गार्डनमध्ये ५ मैदाने तसेच एक सरोवर आहे. येथे सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यास मजा येते.
२) सातपुडा बॉटनिकल गार्डन : नागपूरमधील ‘सेमिनरी हिल्स' भागातील हे उदयान पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
३) फुटाळा तलाव : हा नागपूरच्या भोसले राजांनी बांधलेला असून हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षीही यास भेट देतात.
४) गोरेवाडा तलाव : नागपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी हा तलाव निर्माण केला असून याच्या सर्व बाजूंना जंगल आहे.
मृदा
१. मोरांड मृदा-जिल्हयाचे सर्वाधिक क्षेत्र व्यापते
२. खरडी मृदा-रामटेक तालुका
३. बरडी मृदा-काटोल तालुका
• पिके - ज्वारी, सोयाबीन, कापूस, संत्री म्हणून बुटीबोरी-कापूस संकलन केंद्र प्रसिद्ध आहे.
• खनिजे
१) दगडी कोळसा-ता. उमरेड,
३)चुनखडी सारनेर, रामटेक, पारशिवनी तसेच कोट्रीजवळ देवळापार
२) मँगनीज -सावनेर व रामटेक जवळ मिळणारी चुनखडी उत्तम आहे. .
|
• उत्तर, पश्चिम, नैर्ऋत्य सीमा-वर्धा नदीने निश्चित केली (यवतमाळ व अमरावती जिल्ह्यासोबतच्या सीमारेषा वर्धा नदी ठरवते
धरणे -
• स्थळे
|
• यालाच काळ्या सोन्याचा (कोळसा) जिल्हा म्हणून ओळखले जाते.
• धरणे
स्थळे
|
• १९८२ मध्ये चंद्रपूरपासून वेगळा झालेल्या या जिल्ह्याचे ७५.९६% क्षेत्र वनव्याप्त आहे.
नदया
धरणे
स्थळे
|
• आदिवासी -गोंड
• खनिजे
१. मँगनीज-तुमसर
स्थळे -
|
आदिवासी - गोंड, गोवारी, हळबी
पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.
Very well explained . Useful for students
उत्तर द्याहटवा