महाराष्ट्रातील अष्टविनायक :
१) मोरेश्वर :
मोरगाव गणेशाचे आद्यपीठ असून हे साडेतीन गणेश पीठांपैकी आद्यपीठ आहे.
• कन्हा नदीमध्ये हि मूर्ती आढळली होती.
मोरेश्वराचे दर्शन घेतांना समर्थ रामदासांनी 'सुखकर्ता-दुखहर्ता' ही आरती रचली
२) सिद्धेश्वर :
येथील दगडी घाट अहिल्या देवींनी बांधला आहे.
अष्टविनायकापैकी केवळ याच मुर्तीची सोंड उजवीकडे आहे.
३) बल्लाळेश्वर:
पाली • अंबा नदीच्या सानिध्यात रायगडमधील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे.
• माघ चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात या अख्यायिकेमुळेअसंख्य भाविक या समारंभासाठी येतात.
४) वरदविनायक :
महाड गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक गृत्समदऋषींनी येथे वरदविनायकाची स्थापना केली.
• भाविकांसाठी २४ तास खुले असणारे हे एकमेव अष्टविनायक मंदीर आहे.
येथेच गृत्समद ऋषींनी ॐ गं गणपतये' हा श्लोक लिहिला
• येथेच माधवरावांच्या मृत्युनंतर सती गेलेल्या रमाबाईंची समाधी आहे.
५)चिंतामणी :
थेऊर • श्री गणेशाने गणसूर या दैत्याचा अंत केल्यानंतर कपिल मुनींनी आपल्याजवळचा चिंतामणी रत्न येथील गणपतीस दिला म्हणून त्याला श्री चिंतामणी म्हणतात.
मुळा मुठा नद्यांनी वेढलेल्या या गावाला पूर्वी कदंबतीर्थ म्हणत.
६) गिरिजात्मक:
लेण्याद्री • जुन्नरच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मकाचे मंदीर आठव्या गुहेत असून तेथे जाण्यासाठी ३६७ पायऱ्या आहेत.
• एकाच दगडापासून हे मंदीर कोरले असून याच्या दालनास एकही खांब नाही.
• सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या मूर्तीवर उजेड पडतो.
७) विघ्नेश्वर:
ओझर • विघ्नसूर या राक्षसाचा वध करतांना स्वतः तेथेच राहण्याची विघ्नसुराची अंतिम इच्छा मान्य करून श्री गणेश येथे 'विघ्नेश्वर' या नावाने राहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा