महाराष्ट्रातील लेणी:
१) भाजे:
विसापूर किल्ल्याजवळ पुणे जिल्ह्यात ही लेणी आहे.
यामध्ये सुमारे २२ लेण्या आहेत.
या २२ लेण्यांपैकी मध्यभागी असणारे एक चैत्यगृह असून उर्वरीत २१ विहार आहेत.
येथे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो.
खडकावर कोरीव काम करून युगुले व यक्षिणी कोरल्या आहेत.
•इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. सहावे शतकापर्यंत या लेणीच्या निर्मितीचे कार्य आठशेवर्ष चालू होते.
२) मागाठाणे
मुंबईत बोरीवली स्थानकाच्या जवळच.
कान्हेरी लेण्यातील २१व्या लेणींमधील शिलालेखात या लेणीचा उल्लेख आढळतो.
या बुद्ध लेणी असून भ्रमंती करणाऱ्या बुद्ध भिक्खूना आश्रय देण्यासाठी स्थापन केल्या होत्या.
• पूर्वी ह्या परीसरास मागाठाणे म्हणत, म्हणून या लेण्यांना हे नाव पडले.
ह्या लेण्या उंचावर स्थित असून शेजारील जमीन खचलेली आहे.
३) ठाणाळ:
• रायगड जिल्ह्यातील पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीपासून जवळच या लेण्या स्थित आहेत. • या लेण्यांना नाडसूर (नाद्सूर) असेही म्हणतात.
ठाण या शब्दाचा अर्थ 'स्थान' म्हणजे पुजास्थान होय.
येथून जवळच 'खडसमाला लेण्या' आहेत ज्या ‘नेणावली' या नावाने ओळखल्या जातात.
• ठाणाळ लेण्यांमध्ये ब्राम्ही शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी याने जिंकून घेतलेल्या प्रदेशांचे वर्णन केले आहे.
• इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली असून येथे एका चैत्यागृहास धरून २३ लेण्याआहेत.
४)लोणाड:
• मुंबईमधील भिवंडी जवळ.
• इतर लेण्यांच्या तुलनेत या लेण्याचे काम निकृष्ट वाटते.
दगडात अनेक कोरीव शिल्पे असून दुसरा खुश्रु राजाने पुलकेशीच्या दरबारास भेट दिल्यावेळीचे शिल्पसुद्धा येथे रेखाटले आहे.
५) चित्रशाळा:
• अमरावती जवळच्या सातपुडा पर्वतात १५ ते २० हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन गुहाचित्रांचा यात समावेश आहे.
• येथे अनेक वन्यजीवांची चित्रे रेखाटली असून गिधाड या एकमेव पक्षाचे चित्र गेरू रंगात चित्रीले आहे.
येथे झाडाच्या फांदीवर झोके घेणाऱ्या आदिमानवाचे चित्र रेखाटले असून त्याचे पाय वानरासारखे दाखविले आहेत.
• याच प्रकारच्या गुहाशैली मध्यप्रदेशातील ‘भीमबेटका' येथे आढळल्या आहेत.
६) वेरूळ:
औरंगाबाद, महाराष्ट्र UNESCO ने यांना 'जागतिक वारसास्थळाचा' दर्जा दिला आहे.
१७ हिंदू, १२ बौद्ध, ५ जैन अशा एकूण ३४ लेण्या आहेत.
शिवरायांच्या भोसले घराण्याचे मुळ गाव वेरुळ आहे.
हिंदू लेण्यामधील सोळाव्या लेणीतले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे बहुमजली कोरीव मंदिर असून याची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे.
यालाच कैलाश मंदिर म्हणतात.
याची रचना राष्ट्रकुट राजा कृष्ण -२ याने केली आहे.
या शिवमंदिराच्या निर्मितीसाठी अंदाजे दोन लाख टनांचा अखंड खडक वापरला असून त्याची निर्मिती शिखरापासून पायापर्यंत केली आहे.
• बौद्ध लेण्यांमध्ये विश्वकर्मा लेणी सर्वात प्रसिद्ध आहे.
लाकडात कोरीवकाम केल्याप्रमाणे वाटावे एवढे ते शिल्प सुबकपणे कोरले आहे.
येथील जैन लेण्यांच्या शिल्पांमध्ये वैराग्याची भावना अधिक दिसते.
७) कार्ले:
• लोणावळ्याजनीक कार्ले येथे बेसॉल्ट खडकामध्ये कोरलेल्या या बौद्ध लेण्या आहेत.
इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. पाचवे शतक या काळात या लेण्या विकसित केल्याचे पुरावे आहेत.
पूर्वीच्या अरबी समुद्र आणि दख्खनचे पठार यांना जोडणाऱ्या व्यापारी रस्त्यावर या लेण्या कोरल्या आहेत.
• बौद्ध भिक्खूनी व्यापाऱ्यांच्या मदतीने यांचा विकास घडवून आणला.
यांचा वापर व्यापारी विसाव्याचे ठिकाण म्हणूनही करत असीत.
बौद्ध धर्माच्या महासंगिक या पंथाचा व नंतर हिंदू धर्माचा या लेण्यांच्या शैलीवर परिणाम झालेला दिसतो.
८) शेलारवाडी पुणे
• पुणे येथील देहु रोड गावानजीक येथे सहा बौद्ध लेण्याचा समुह आहे.
• इ.स. पूर्व प्रथम शतकात या लेण्या कोरल्याचे पुरावे मिळतात. येथील चैत्याचे शंकराच्या मंदिरात रूपांतर केले गेले आहे.
या लेण्या अजिंठा लेण्यांपेक्षाही जुन्या आहेत.
९).पांडव लेणी :
• या बौद्ध लेण्या इ.स. पूर्व २५० ते इ.स. ६०० पर्यंत बांधल्या गेल्या असून त्यांचे दक्षिण व नैऋत्य दिशेने सज्जे या लेण्यांचे सूर्यप्रकाश व पर्जन्यापासून रक्षण करतात म्हणून त्यांचे कोरीव काम आजही जसेचे तसे वाढते.
• या लेण्यांमध्ये बुद्धांचे व जैन तिर्थकरांचे भव्य अशी मोठी शिल्पे कोरली आहेत.
१०) पितळखोरे :
औरंगाबाद जिल्ह्यातील या १३ लेण्यांच्या समुहामध्ये कोरीव शिल्पे आहेत.
या बौद्धकालीन लेणी इ.स. पूर्व दुसऱ्या-तिसऱ्या शतकात कोरल्या असून भारतातील सर्वात प्राचीन लेणी समजल्या जातात.
११) अजिंठा:
औरंगाबाद जिल्ह्यातील या जागतिक वारसास्थळ दर्जा लाभलेल्या लेण्या आहेत.या लेण्या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून इ.स.सातव्या शतकापर्यंत कोरल्या गेल्या असून वाकाटक, सातवाहन, चालुक्य व गुप्त अशा अनेक राजसंस्थांचा राजाश्रय या गुहांना मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा