आंध्रप्रदेश राज्याचा सांस्कृतिक वारसा:
Cultural Heritage of the State of Andhra Pradesh
धार्मिक स्थळे:
तिरूपती मंदिर:
* जगप्रसिद्ध तिरूपती मंदिर हे तिरूमला पहाडीवर आहे. हे व्यंकटेश्वराचे मंदिर आहे.
*पद्मनाभस्वामी मंदिरानंतर (तिरूअनंतपुरम्) जगात सर्वाधिक भेट देणाऱ्या यात्रेकरूंचे हे मंदिर आहे (दररोज ५० हजार ते १ लाख).
*येथील मंदिर विमानाचे सोन्याचे आहे.
*गर्भगृहातील व्यंकटेश्वराची मूर्ती सोन्याचा मुकुट धारण केलेली आहे.
अमरावती महास्तूप
*पूर्वी अमरावतीला आंध्रनगरी म्हटले जायचे.
* २००० वर्षापूर्वी आचार्य नागार्जुनाने येथे भारतातील सर्वात मोठा स्तूप अमरावती महास्तूप बनवला.
*हे दक्षिण भारतातील बौद्ध धर्माचे प्रसिद्ध स्थळ आहे.
*सध्या या नगरीचा राजधानीचा शहर म्हणून विकास केला जात आहे.
कला व हस्तशिल्प :
नोंदणीकृत भौगोलिक संकेतस्थळे (जी.आय.)
*पोछमपल्ली इकात (Pochampalli Ikat, GI.Handicraft)
पोछमपल्ली (नालगोंडा) शहराला सिल्कसिटी सुद्धा म्हणतात. विणकामाची टाय आणि डाय शैलीसाठी हे (इकात) प्रसिद्ध आहे.
कोंडापल्ली बोम्मालू (Kondapalli Bommalu, GI. Handicraft) :
*या लाकडाच्या रंगीत खेळणी आहेत. यामध्ये प्रथम कोरड्या लाकडावर कोरून चित्र काढले जाते. नंतर हे चित्र वेगवेगळ्या रंगांनी भरले जाते.
उप्पदा जमदानी साडी (Uppada Jamdani sarees, GI.nandicraft) :
*ही विणकाम केलेली रेशमी साडी आहे.
श्रीकलाहस्ती कलमकारी (Kalamkari, G.I. Handicraft) :
*कलमकारी मध्ये पेन घेवून मुक्तहस्ताने वस्त्रावर रंगभरणी केली जाते.
* मच्छलीपटनम् कलमकारी मध्ये ब्लॉक प्रिंटींग व हँड पेंटींग या एकत्र केलेल्या असतात.
वेंकटगिरी साडी (Venkatgir Saree, G.I.Handicraft) :
*या दोन्ही प्रकारच्या म्हणजे सुती व रेशमी साडी आहेत.
*त्यांच्या हस्तविणकामासाठी त्या प्रसिद्ध .
सिद्धपेठ गोलाबामा (Sidhapetha Golabama, GI. as Handicraft)
हस्तकार्य व साधे रंगकाम आणि एक अद्वितीय डिझाईन म्हणजे नाचनारी मुलगी (गोलाबामा) यासाठी ही प्रसिद्ध आहे.
तिरूपती लाडू (Tirupati Laddu, G.I. as Food article) :
*प्रसाद म्हणून तिरूपती लाडू तिरूपती मंदिरात यात्रेकरूंना वाटला जातो.
* दररोज जवळपास १.५ लाख लाडू बनवले जातात
. *हा लाडू डाळीचे पीठ, साखर, तूप व ड्रायफ्रूटस् याच्या मिश्रणातून बनतो.
हैद्राबाद हलीम (Hyderabad haleem, GI. as food article) :
*हा मांसाहारी लोकांचा खाद्यपदार्थ आहे. अरब लोकांकडून हा भारतात आला.
*निजामकाळापासून त्याला प्रसिद्धी मिळाली.
सण/उत्सव (Festivals) :
• उदागी (Udagi- Telgu New year):
*उदागी सण हा तेलगू लोकांच्या नवीन वर्ष सुरू होण्याचे निर्देशक आहे.
* हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो.
नृत्य :
कुचीपुडी (Kuchipudi) :
*या नृत्याचा उगम कुचेलपुरी (कृष्णा) गावातून मानला जातो.
*हे फक्त नृत्य नसून नृत्य, हावभाव, संभाषण, गीत यांचे मिश्रण आहे.
*कार्नेटिक संगीतासोबत नृत्य सुरू होते.
*वाद्ययंत्र म्हणून मृदंग, तंबोरा, वायलीन यांचा उपयोग होतो.
*कलाकार हा हलक्या लाकडापासून बनवलेले अलंकार परिधान करतो.
बुट्टा बोमालू (Butta Bommalu) :
*हे एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे.
*कलाकार तोंडावर भिन्न-भिन्न मुखवटे (मास्क) परीधान करतात
वीरनाट्यम (Veer Natyam) : -
*वीरमुस्टी लोकांचे (जात) हे चैतन्यदायी नृत्य आहे. यामध्ये तंबोरा, ढोलताशा, वीरनाम वाद्यांचा वापर होतो.
कोलाट्टम (Kolattam):
*हे टिपरी नृत्य आहे. याला आंध्रप्रदेशाचा दांडीया म्हणतात.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा