महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले
इतिहास काळात किल्ले हे आजुबाजुच्या क्षेत्रांवर नियंत्रण आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याची संरक्षित ठिकाणे होती.
बहुतांशी स्थानिक कारभार याच किल्ल्यांवरून चालायचा. राजसत्तांची केंद्रे, राजधान्यांची ठिकाणे, इतर महत्त्वाच्या घटनांची ठिकाणे किल्ले होती.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले
१)अजिंक्यतारा
सातारा जिल्हा
इ.स.११९० मध्ये शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला.
इ.स.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला.
• या किल्ल्याची नैसर्गिक तटबंदी आणि बुरूज आजही अस्तित्वात असून येथील तलावांचे पाणीही शुद्ध आहे.
२) विशालगड
कोल्हापूर जिल्ह्यात उंचावरील डोंगरावर हा किल्ला स्थित असून याची फार पडझड झाली आहे.
परंतु याचा मुख्य दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे.
स्मारके :बाजीप्रभू व फुलाजी यांच्या समाध्या, अहिल्याबाईंचे स्मारक, हजरत पीर मलिक रिहानयांचा दर्गा इ.
३) प्रतापगड
-सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ किल्ला वसला आहे.
-हा किल्ला अत्यंत घनदाट वनांनी वेढलेला असून या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखान व सय्यद बंडा यांच्या कबरी आहेत.
• या किल्ल्याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर उद्घाटन जवाहरलाल नेहरू यांनी केले होते.
४)सुवर्णदुर्ग
हा किल्ला हर्णे बंदरानजीक रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
• हा किल्ला खडक फोडून बनविलेला असून अतिशय भक्कम आहे.
• हा किल्ला शिवरायांनी इ.स.१६६० मध्ये जिंकून घेतला.पन्हाळगड इ.स.१८०२ मध्ये दुसरा बाजीरावाचे येथे वास्तव्य होते.
५) पन्हाळगड
• कोल्हापूर जिल्ह्यातील या ऐतिहासिक किल्ल्याच्या निर्मितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.
परंतु इ.स.१६५९ मध्ये शिवराय येथे वास्तव्यास असतांना सिद्धी जोहरने किल्ल्यास वेढा दिला होता.
परंतु शिवरायांनी त्यास चकमा देऊन विशाळगडाकडे प्रयाण केले.
• प्रसिद्ध जागा : सादोबाचा दर्गा, तबक उद्यान, गंगा-जमुनाचे धान्य कोठार, तीन दरवाजे ही प्रमुख आकर्षणे आहेत.
हे थंड हवेचे ठिकाणही असल्यामुळे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.
• या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांची स्मारके आहेत.
६) जंजिरा
अरबी समुद्रातील बेटावर रायगडच्या जिल्ह्याच्या किनाऱ्याला लागून हा किल्ला आहे.
• इ.स.१६९४ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम झाले असून तो सिद्धीच्या ताब्यात होता.
हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी कुणासही यश आले नाही.
७)रायगड
रायगड जिल्ह्यात अतिशय दुर्गम भागात हा किल्ला वसलेला असून तो हिरोजी इंदलका या वास्तुतज्ञाने बांधला आहे.
६ जून १६७४ मध्ये याच ठिकाणी शिवरायांनी स्वत:च्या राज्याभिषेक करून घेतला, त्यामुळे हा किल्ला महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.
• या किल्ल्याचे मूळ नाव गयरी असून येथील नगारखाना, बारुदखाना, बाजारपेट, टकमक टोक आणि हिरकणी बुरूज प्रसिद्ध आहेत.
८) शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे हा किल्ला असून हे शिवरायांचे जन्मस्थान आहे.
हा किला राष्ट्रकुट काळात बांधण्यात आला असून इ.स. १.४४३ मध्ये बहामनी सुलतानांनी यादवांकडून तो जिंकून घेतला.
बहामनी सलतनीच्या विभाजनानंतर तो निजामशाहीच्या ताब्यात आला.
इ.स. १६७० मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला.
प्रसिद्ध ठिकाणे : शिवराय जन्माची इमारत, गंगा-जमुना पाण्याची टाकी, मशिद, पीराचा दर्गा ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
९) दौलताबाद
• हा भुईकोट किल्ला असून औरंगाबादपासून २० कि.मी. अंतरावर स्थित आहे.
• इ.स. ११७५ मध्ये यादव वंशाच्या पंचम भिल्लमाने हा किल्ला बांधला असून याचे पूर्वीचे नाव देवगिरी होते.
मलिक काफूर या अल्लाउद्दिन खिल्जीच्या सेनानायकाने रामचंद्र देव यादवाच्या काळात या आक्रमण करून यादव सत्तेचा पाडाव केला.
• इ.स. १३२६-२७ मध्ये महंमद तुघलकाने राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने राजधानी दिल्लीवरून देवगिरी येथे हलविली. तसेच देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले.
• संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याभोवती खोल खंदक आहेत.
• कुतुबमिनाराच्या धर्तीवर बांधलेले चारमिनार, निजामशाही महाल, चिनी महाल इ. वास्तू प्रसिद्ध आहेत.
१०) हरिश्चंद्रगड
• अहमदनगर जिल्ह्यातील हा किल्ला पुणे-अहमदनगर व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.
• या किल्ल्यावर हरिश्चंद्रदेवाचे मंदिर असून येथे चांगदेवांनी तपश्चर्या केल्याची आख्ययिका प्रसिद्ध आहे.
• हा किल्ला पावसाळ्यात गर्द वनराईने वेढलेला असतो.
११) सिंहगड
पूर्वी या किल्ल्याचे नाव कोंढाणा होते. इ.स. १६७० मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले म्हणून शिवरायांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले.
• संभाजीराजांच्या निधनानंतर हा किल्ला मोघलांकडे गेला परंतु नंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकूनघेतला.
• इ.स. १७०५ ते १८१८ मध्ये या किल्ल्यावर मराठ्यांचे अधिपत्य होते. प्रमुख आकर्षणे : कल्याण व डोणजे दरवाजा, टेहळणी बुरूज, जवाहीर खाना, तानाजी, राजाराम, उदेभान यांच्या समाध्या.
१२) पुरंदर
•पुणे जिल्ह्यातील या किल्ल्यावर संभाजीराजे व सवाई माधवराव यांचा जन्म झाला आहे.
• इतिहासात शिवरायांनी मोघलांशी केलेल्या पुरंदर तहाच्या नावाने हा किल्ला प्रसिद्ध आहे.
. या किल्ल्यावर पेशव्यांचा वाडा आहे.
१३)तिकोने
• पवनमाळ प्रांतात लोहगड व विसापूरकिल्ल्यानजीक हा किल्ला असून पूर्वीच्या प्राचीन बंदरांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या आणि नजीकच्या कार्ले, भाजे, शेलारवाडी या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी हा किल्ला बांधला आहे.
• इ.स. १६८२ मध्ये याच किल्ल्यावर संभाजी व अकबर यांची भेट झाली.
• या गडावरून पूर्ण मावळप्रांत नजरेस येतो.
१४) नाणेघाट
• येथील घाट सुमारे सव्वादोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांची प्रतिष्ठान ही राजधानी कल्याण या बंदरयोग्य ठिकाणास जोडण्यासाठी खोदला होता.
• या घाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता.
या किल्ल्यावर जकात जमा केली जाई.
१५)राजमाची
• खंडाळ्याच्या घाटात घाट सुरू होताना हा किल्ला आहे. हा किल्ला उल्हास नदी खोऱ्यात येतो.
बोरघाटाद्वारे कल्याण, नालासोपारा या बंदरांना जोडणाऱ्या घाटमार्गाचे संरक्षण करणे आणि जकात गोळा करणे यासाठी निर्माण केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा