MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

Religious and cultural tourism spots in Maharashtra -महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे

 महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे

१) शिखर-शिंगणापूर 

• शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेले हे जागृत देवस्थान.

• सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापर येथील उंच डोंगरावर हे स्थान वसले असून येथे चैत्र महिन्यात यात्रा भरते. 

 २)तुळजाभवानी देवी, तुळजापूर


 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी हे एक पूर्णपीठ आहे. 

• बालाघाटातील डोंगरमाथ्यावर हे मंदिर वसले आहे. 

या देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी अख्यायिका आहे. 

शिवाजी महाराजांनी देवी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. 

• ही देवी आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. 

३) महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर :

या देवीची मूर्ती प्राचीन दगडापासून बनलेली असून इ.स.३० मध्ये जेव्हा राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरास तेव्हा त्या काळी एका छोट्या मंदिरामध्ये ही मूर्ती स्थापना केली होती. 

या मंदिरात अयंबुली जत्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, गोकुळ अष्टमी इ. उत्सव प्रसंगी महाआरती असते. 

४) सुंदर नारायण मंदिर, नाशिक 

 इ.स. १७५६ साली हे मंदिर यशवंत चंद्रचूड यांनी बांधले.

 • या मंदिराची रचना भृगशिल्पानुसार आहे. यावर मोगल शैलीचा पगडा दिसून येतो.

 दरवर्षी २१ मार्च रोजी सूर्योदयासमयी सूर्यकिरणे प्रथम मूर्तीवर पडतात हा वास्तुशिल्पाचा चमत्कारच आहे.

५) भीमाशंकर मंदिर, ता. खेडे, जि. पुणे

 भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. 

• हेमाडपंथी येथील मंदिर असून १२०० ते १४०० वर्षापूर्वी बांधलेले आहे. 

• सभामंडपाबाहेरील ५ मण वजनाची लोखंडी घंटा चिमाजी अप्पा (बाजीराव पहिला यांचे बंधू) यांनी भेट दिल्याचे म्हटले जाते. 

. नाना फडणवीसांनी शिखरासह मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

 • प्रेक्षणीय स्थळे : गुप्त भीमाशंकर, सीतारामबाबा आश्रम, कोकणडा, नागफणी, डोंगर. 

६) (बाहुबली, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) 

दिगंंबर जैनांचे महान साधक बाहुबलींनी ३०० वर्षांपूर्वी या ठिकाणी तपाचरण केले होते.

 येथे भगवान बाहुबलींची ८५०सेंमी. उंचीची खड्गासनातील मूर्ती असून दिगंबर आणि श्वेतांबर पंथियांची दोन मंदिरेही आहेत.

 ७) भृशुंड गणेश, भंडारा

अखंड रक्ताश्म दगडात ही मूर्ती कोरलेली असून या मूर्तीत ऋषींच्या वास्तव्याचा भास होतो.

 • हे मंदीर हेमाडपंत्री असून मूर्तीची स्थापना स.स.११३० मध्ये झाली असावी.

• पौष संकष्ट चतुर्थी ते माघ चतुर्थी असा एक महिनाभर येथे महापूजा व उत्सव थाटात पार पडतो.

 ८) नृसिंहवाडी, कोल्हापूर

दत्ताच्या १६ अवतारांपैकी एक असणारे नरसिंह सरस्वती स्वामी यांनी येथे तपश्चर्या केली होती. 

कृष्णा पंचगंगेच्या संगमावरती असणाऱ्या या मंदिरास ५०० ते ६०० वर्षाची परंपरा लाभली आहे.

अदिलशहा या मंदिराचा भाविक होता. त्याने अनेक भू-भाग दान केल्याची माहिती मिळते.

 ९)चांदवड, मालेगाव, नाशिक येथे

 येथे रेणूका देवीचे मंदिर आहे. 

परशुरामाने आपली आई रेणुकाचा वध केल्यानंतर तिचे मुख चांदवड आणि धड माहूरला पडले अशी अख्यायिका सांगितली जाते.

• पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी येथे स्वतःसाठी बांधलेला महाल 'रंगमहाल' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ५ किमी अंतरावर केंद्राई माता मंदिरही आहे.

१०) त्र्यंबकेश्वर, नाशिक

 सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी इ.स.१७५५ ते १७८६ मध्ये बांधले. साधारणपणे ३१ वर्षे चाललेल्या या बांधकामास तत्कालीन १६ लाख रूपये लागल्याची नोंद आहे. 

• येथील शिवलिंग १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या लिंगाच्या शीर्षामध्ये सुपारीएवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत.

 • ही तीन लिंगे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या शक्तींची प्रतिके आहेत.

 महत्वाचे कार्यक्रम 

सिंहस्थ कुंभमेळा - दर १२ वर्षातून एकदा गोदावरी दिन, निवृत्तीनाथ उत्सव, त्र्यंबकेश्वराची 7 रथयात्रा, महाशिवरात्री.

'नारायण नागबळी पुजा करण्यासाठीचे भारतातील एकमेव ठिकाण. 

११) अंबरनाथ शिवमंदिर :

मुंबईच्या अंबरनाथ उपनगरात है मंदीर असून अमरनाथ या शिवशंकराच्या नावावरूनच या उपनगरास हे नाव मिळाले असावे. 

• येथील महादेवाचे मंदिर हळेबिड-बेलूरच्या मंदिराप्रमाणेच आहे.

• वढवाण या नदीच्या काठावर हे मंदिर वसले आहे. • संपूर्ण मंदीर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे.

 • मंदीर अतिशय कोरीव असून त्यावर विविध देवतांची आणि इतर शृंगारिक कामशिल्पे आढळतात.

१२) भुलेश्वर, माळशिरस, पुणे

मूलतः मंगलगड नाव असलेल्या ठिकाणी तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांनी हे हेमाडपंथी मंदीर बांधले आहे.

 • या मंदिरात स्त्री रूपात गणपतीची मूर्ती आहे.

 • या मंदिराची वास्तुशैली होयसळ मंदीराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश्य आहे. 

• हेमाडपंथी मंदिरापेक्षा याची वास्तुरचना सरस असून यास यवतेश्वर असेही म्हणतात. 

• माळवा भागात प्रसिद्ध असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील शिल्पावर आढळतो. 

पुणे जाळल्यानंतर पुणे प्रांताचा कारभार भुलेश्वर येथून चालत होता.

🟢भारतातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक वारसा बद्दल महत्त्वाची माहिती🟢

 🟡01-महाराष्ट्र            🟡02- आंध्रप्रदेश
🟡03- आसाम            🟡04- गोवा
🟡05- छत्तीसगड         🟡06- गुजरात
🟡07- हिमाचल प्रदेश   🟡08- हरियाणा
🟡09- उत्तराखंड          🟡10- बिहार
🟡11- मिझोराम           🟡12- उत्तरप्रदेश
🟡13- सिक्किम           🟡14- त्रिपुरा
🟡15- जम्मू काश्मीर     🟡16- तामिळनाडू
🟡17- राजस्थान         🟡18- पंजाब




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा