MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कलम 1 ते 35 पर्यंत-Indian constitution(भारतीय संविधान)

 

भारतीय राज्यघटना व कलमांची यादी

 घटनेत  एक प्रास्ताविका, २५ भाग आणि १२ अनुसूची/परिशिष्टे .

भाग I ~ संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र (कलम १-४) 

१.संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र .

२.नवीन राज्ये -New State दाखल करून घेणे  Or नवीन राज्ये (State)स्थापन करणे 

३.नवीन राज्यांची निर्मिती & विद्यमान राज्यांची क्षेत्रे  - सीमा (border Or Name) नाव यांत फेरफार करणे 

४.पहिल्या अनुसूची (राज्य-केंद्रशासित प्रदेश यात Change- बदल)व चौथ्या अनुसूची (राज्य सभेतील जागा वाटप - Allocation of seats in Rajya Sabha ) च्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी article २ & article ३ खाली करण्यात आलेले  Acts.

भाग II : नागरिकत्व (कलम ५-११)

५.संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व.

६. पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.(19 जुलै १९४८ -पुर्वी) 

७. स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.Date-१ मार्च १९४७ नंतर 

८. मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या  व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.

९. परकीय नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे.

१०. नागरिकत्वाचे हक्क चालूच राहणे. 

११. संसदेला नागरिकत्व देण्याचा Or रद्द करण्याचा अधिकार  (नागरिकत्व Act -1955) 

फक्त ५ मार्गानी भारतीय नागरिक बनता येते.(MPSC-14)

1.भारतात जन्म 2. वारसा हक्क 3. नोंदणी द्वारे

4. भूमि अधिग्रहित केल्यास 5. स्वीकृती द्वारे 

भाग III : मूलभूत हक्क (कलम १२-३५)

१२. व्याख्या -Defination of राज्यसंस्थ -कलम 36 मध्ये सुद्धा 

१३. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले Or न्यूनीकरण करणारे कायदे .

समानतेचा हक्क (कलम १४-१८)

१४. कायद्यापुढे समानता.

१५. धर्म, वंश, जात, लिंग or जन्मस्थान कारणांवरून भेदभावस मनाई (Except - महिला, बालक, सामाजिक, शैक्षणिक-आर्थिक दुर्बल.)

16. सार्वजनिक रोजगाराच्या बाबीमध्ये समान संधी. (अपवाद -कलम 16(4)- आरक्षण )

१७. अस्पृश्यता नष्ट करणे.

१८. किताब नष्ट करणे.(Except-लष्करी व शैक्षणिक मानविशेष 'किताब )

स्वातंत्र्यचा हक्क (१९-२२)

१९. भाषणस्वातंत्र्य, शांत -विनाशस्त्र एकत्र जमणे, संघ स्थापना, राज्य क्षेत्रात मुक्त संचार- स्थायिक होणे - व्यवसाय करणे इ. हक्कांचे संरक्षण.

२०. अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण.

२१. जीवित व व्यक्तीगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.

२१A . शिक्षणाचा हक्क Right of Education.(6-14 yearsपर्यंत मोफत शिक्षण Free Education- 86वी घटना दुरुस्ती - 2002 )

२२. अटक व स्थानबद्धतापासून संरक्षण ( समावेश -संघसूची - राज्यसूची )

शोषणाविरूद्ध हक्क (कलम २३-२४)

२३. माणसांचा अपव्यापार- वेठबिगारी यांना मनाई .

(अनैतिक व्यापार Act (कायदा) - 1956   and  कामगार  Act (कायदा)  -1956

 (Except- राज्यसंस्था अनिवार्य लष्करी-समाजसेवा लादू शकते.)

२४. कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. (बाल कामगार कायदा -1956)

धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलम २५-२८)

२५. सदसदविवेकबुद्धीचे  स्वातंत्र्य ( Freedom of conscience) & धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण & प्रसार. Free expression, conduct & propagation of religion.

२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. (संस्था स्थापना आणि व्यवहार )

२७. विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. 

२८. शैक्षणिक संस्था Educational Institute मध्ये धार्मिक शिक्षण - उपासनाना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. 

सांस्कृतिक व शैक्षणिक हक (कलम २९-30) 

२९. अल्पसंख्यांक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण.

३०. शैक्षणिक संस्था Educational Institute स्थापण्याचा -प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गांचा हक्क.

३१.संपत्तीचा अधिकार - रद्द विवक्षित कायद्यांची बचाव.

३१A. संपदांचे संपादन तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती.(1ली घटना दुरुस्ती -1951)

३१B. कायद्यांची व विनियमनांची विधिग्राह्यता. ( 1ली घटना दुरुस्ती -1951)

३१C. निदेशक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती (25वी घटना दुरुस्ती -1971)

घटनात्मक उपायांचा हक्क(कलम३२-३५) 

32.भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना.

३३. भागाद्वारे प्रदान केलेले हक्क  सेना, इत्यादींना लागू करतांना  फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार.

३४. लष्करी कायदा अंमलात असतांना प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध.

35. भागाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान.(अधिकार फक्त संसदेला )

35A. जम्मू काश्मीर Special State -विशेष दर्जा राज्य संपुष्टात (On - 5 ऑगस्ट 2019 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा