MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, ५ जून, २०२२

Bharat Ratna awardess भारतरत्न पुरस्कार (1954-2022) Interesting facts.

भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Awardees)

भारताचे माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची सुरुवात केली.

* भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 

* वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रासाठी अपवादात्मक सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो.

* पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रपतींना केलेल्या शिफारसींवर दरवर्षी जास्तीत जास्त तीन भारतरत्न पुरस्कार दिले जाऊ शकतात. 

* पुरस्कार प्रदान केल्यावर, प्राप्तकर्त्यास राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले सनद (प्रमाणपत्र) आणि एक पदक प्राप्त केले जाते. 

* पुरस्काराशी कोणतेही आर्थिक अनुदान संबंधित नाही.

* भारतीय राज्यघटनेच्या कलम 18(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, प्राप्तकर्ते भारतरत्न त्यांच्या नावाचा उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून वापरू शकत नाहीत. तथापि, प्राप्तकर्ता त्यांच्या बायोडेटा, लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड इ. मध्ये खाली नमूद केलेली अभिव्यक्ती वापरू शकतो

 

 

 

 1.

चक्रवर्ती राजगोपालाचारी- 1954


 * स्वातंत्र्य सेनानी व स्वतंत्र भारताचे एकमेव गव्हर्नर जनरल.

*  भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते.

 2.

सर्वपल्ली राधाकृष्णन्-1954


 *  भारताचे प्रथम उपराष्ट्रपती (१९५२-१९६२) आणि द्वितीय राष्ट्रपती (१९६२-१९६७) 

*  भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते.

3. 

सी. व्ही. रमण-1954

 * नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३०).

*  भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते.

 4.

भगवानदास - 1955 


 * भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 

* तत्वज्ञ आणि स्वातंत्र्य सेनानी .

 5.

मोक्षगुंडम विश्वेश्वरया- 1955


 * मोक्षगुडम, विश्वेश्वरय्या-म्हैसूरचे दिवान (१९१२-१९१८).

* पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' चे संस्थापक.

 6.

जवाहरलाल नेहरू -1955


 * भारताचे पहिले प्रधानमंत्री (१९४७-१९६४), स्वातंत्र्य सेनानी व लेखक.

 7.

गोविंद वल्लभ पंत -1957

 * उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री.

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

 8.

धोंडो केशव कर्वे -1958 

 सामाजिक कार्यकर्ता.

 9.

बिधनचंद्र रॉय-1961 


 * भौतिक शास्त्रज्ञ .

* पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक .

 10.

पुरूषोत्तम दास टंडन-1961


 * भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

 11.

राजेन्द्र प्रसाद -1962


 स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले राष्ट्रपती (१९५०-१९६२). 

 12.

झाकिर हुसेन-1963


 स्वातंत्र्यसेनानी, संशोधक व भारताचे तिसरे राष्ट्रपती (१९६७-१९६९) 

 13.

पांडुरंग वामन काणे -1963

 इंडोलॉजिस्ट व संस्कृत पंडित.

 14.

लालबहादुर शास्त्री (मरणोत्तर)-1966


 * स्वातंत्र्य सेनानी व भारताचे 2रे प्रधानमंत्री (१९६४-१९६६). 

15. 

 इंदिरा गांधी-1971


 * भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (१९६६-१९७७) व (१९८०-१९८४).

 16.

वराहगिरी व्यंकटगिरी-1975


 * भारताचे ४ थे राष्ट्रपती (१९६९-१९७४).

* कामगार युनियन पुढारी.

 17.

के. कामराज (मरणोत्तर) -1976


 * स्वातंत्र्य सेनानी व तामिळनाडूचे भूतपूर्व मुख्यमंत्री (१९५४-१९५५, १९५७-१९६२ आणि १९६२-१९६३).

 18.

मदर टेरेसा-1980


 * ख्रिश्चन मिशनरीची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक.

* कॅथॉलिक नन व नोबेल :पुरस्काराने सन्मानित (१९७९).

 19.

विनोबा भावे (मरणोत्तर) -1983 

 स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्ता

 20.

खान अब्दुल गफारखान-1987 


 * स्वातंत्र्य सेनानी .

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते.

 21.

 एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) -1988

 तामीळनाडूचे भूतपूर्व मुख्यमंत्री (१९७७ -१९८०, १९८०-१९८४, १९८५-१९८७) व अभिनेता.

 22.

भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) -1990

 * भारताची घटना तयार करणारे व सामाजिक परिवर्तक

 23.

नेल्सन मंडेला -1990

 * दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती.

* वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते.

* द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष.

 24.

राजीव गांधी -1991

 * भारताचे 6 वे प्रधानमंत्री (१९८४-१९८९). 

 25.

सरदार वल्लभभाई पटेल(मरणोत्तर) -1991

 * स्वातंत्र्य सेनानी, लोहपुरूष, भारताचे पहिले गृहमंत्री. 

 26.

मोरारजी देसाई -1991 

 * स्वातंत्र्य सेनानी व भारताचे 5 वे प्रधानमंत्री (१९७७-१९७९) 

 27.

मौलाना अब्दूल कलाम आझाद (मरणोत्तर)-1992 

 * स्वातंत्र्य सेनानी व शिक्षक.

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री .

 28.

जे. आर. डी. टाटा -1992 

 उद्योगपती.

 29.

सत्यजीत रे -1992

 फिल्मनिदेशक -बंगाली चित्रपट निर्माते

 30.

गुलजारीलाल नंदा -1997

  * स्वातंत्र्य सेनानी, माजी प्रधानमंत्री 

* २ रे व ४ थे भारतीय पंतप्रधान (कार्यवाहु).

 31.

अरुणा असफ अली (मरणोत्तर)-1997

 स्वातंत्र्य सेनानी.

 32.

ए.पी. जे. अब्दुल कलाम -1997

 वैज्ञानिक व भारताचे ११ वे राष्ट्रपती (२००२-२००७).

 33.

एम. एस. शुभलक्ष्मी -1998.

 * कर्नाटक शैलीतील शास्त्रीय गायिका

 34.

सी. सुब्रम्हण्यम् -1998

 * स्वातंत्र्य सेनानी व हरितक्रांतीचे उद्गाता (१९६४-१९६६).

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री .

 35.

जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) -1999

 स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक परिवर्तक

 36.

रविशंकर -1999

 सुप्रसिद्ध सतारवादक. 

 37.

अमर्त्य सेन -1999

 अर्थशास्त्रज्ञ व नोबेल विजेता (१९९८)

 38.

गोपीनाथ बार्डोलोइ (मरणोत्तर) -1999


 *  आसामचे स्वातंत्र्य सेनानी.

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री 

 39.

लता मंगेशकर -2001

 सुप्रसिद्ध गायिका.

 40.

बिस्मिल्ला खान -2001

  भारतीय शहनाईवादक. 

 41.

भीमसेन जोशी-2009

 भारतीय शास्त्रीय गायक

42. 

सी. एन. आर. राव -2014

 वैज्ञानिक

 43.

सचिन तेंडुलकर -2014 

 * क्रिकेट खेळाडू.

* पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतरत्न प्राप्तकर्ता.

 44.

अटल बिहारी वाजपेयी -2015

 * भारताचे माजी प्रधानमंत्री (१९९६, १९९८, १९९९-२००४) 

45. 

कवि मदनमोहन मालविय(मरणोत्तर) -2015 

 * शिक्षणतज्ञ  व राजनीतिज्ञ, काँग्रेस अध्यक्ष (१९०९, १९१८)

* भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, 

* बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक .

 46.

 नानाजी देशमुख(मरणोत्तर) (2019)

 सामाजिक कार्यकर्ता.

 47.

भूपेन हजारिका (मरणोत्तर) ( 2019)

 गायक.

 48.

प्रणव मुखर्जी (2019)

 * भारताचे १३वे राष्ट्रपती.


General Knowledge India








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा