MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कलम 36 ते 51 पर्यंत (भारतीय संविधान)Indian constitution


भाग IV : राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे-(DPSP-Directive principles of state Policy) (कलम 36-51)

३६. व्याख्या.(राज्यसंस्थेची व्याख्या )

३७. या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे. (मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ठ नसतील )

३८. i).राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. ii) उत्पन्नाची विषमता कमी करणे. (44वी घटना दुरुस्ती-1978)

३९. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे I -स्त्री -पुरुष समानता -रोजगार संधी.

II - साधनसंपत्ती ची योग्य विभागणी.       

III - साधनसंपत्ती केंद्रीकरण टाळणे.                    

IV - स्त्री -पुरुष समान वेतन.                                 

V -आरोग्य -ताकद नुसार कामाचे वाटप (महिला -बालक

VI -बाल युवकांचे शोषणापासून संरक्षण. या बाबी साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.

39A. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सल्ला.(42वी घटना दुरुस्ती -1976)

४०. ग्रामपंचायतींचे संघटन.

 ४१. कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोक सहाय्याचा हक्क

४२. कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद.

४३. कामगारांना निर्वाह वेतन.

४३A. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. (42वी घटना दुरुस्ती -1976)

४३B. सहकारी संस्थांचे प्रवर्तन. (97वी घटना दुरुस्ती -2011)

 ४४. नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता. (Uniform Civil Code-गोवा हे एकमेव राज्य )

४५. ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद.

४६. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. ( SC-ST लोकांची जमीन इतरांना देण्यास कायद्याने प्रतिबंधित.)

४७. पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य.(अमली पदार्थ बंदी -दारू बंदी )

48.कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. (गोहत्या बंदी -beaf ban)

४८ A. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे.(42वी घटना दुरुस्ती -1976)

४९. राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण.

 ५०. कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था अलग ठेवणे .

५१. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन.

भाग IVA : मूलभूत कर्तव्ये (कलम 51A)

सरदार स्वर्णसिंह समिती -(42वी घटना दुरुस्ती -1976)

५१A.मूलभूत कर्तव्ये हे एकुण 11 आहेत.सोव्हिएत रशिया घटनेतून घेतले.

I. राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर.                

II. ज्यामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाले अशा आदर्श यांची जोपासना -अनुसरण करणे.                                      

III. सार्वभौमत्व, एकता, उन्नत ठेवणे.                         

IV. देश रक्षण, राष्ट्रीय सेवा बजावणे.                            

V. अनिष्ट प्रथा चा त्याग करणे, सामंजस्य बंधुभाव वाढविणे

VI. समिश्र संस्कृती चे जतन.      

VII. पर्यावरण संरक्षण, भूतदया.                            

VIII. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, सुधारणावाद, शोधकबुद्धी.                                                          

IX. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण - हिंसाचाराचा त्याग.

X. राष्ट्र उपक्रम -सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत राहील यासाठी वैयक्तिक तसेच सामूहिक प्रयत्न करणे.            

XI. जन्मादात्यांनी पाल्यास (6-14वर्ष )शिक्षण संधी उपलब्ध करून देणे (86 वी घटना दुरुस्ती -2002) 11 वे मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये सामील )       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा