MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कलम 52 ते 78 पर्यंत भारतीय संविधान


भाग v : संघराज्य (कलम 52- 151)

प्रकरण एकः कार्यकारी यंत्रणा (कलम 52-78)

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती (कलम 52-73)

५२. भारताचे राष्ट्रपती.

५३. संघराज्याचा कार्यकारी अधिकारी.

५४. राष्ट्रपतींची निवडणूक.

i-संसदेचे 2 सभागृह.        

ii-राज्याचा विधानसभा. iii) दिल्ली-पुद्दूचेरी विधानसभेचे निर्वाचित सदस्य (70वी घटना दुरुस्ती -1992-) MPSC-16

५५. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत.

५६. राष्ट्रपतींचा पदावधी.

५७. फेरनिवडणुकीस पात्रता.(कितीही वेळा बनता येते.)

५८. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता

५९.राष्ट्रपती पदाच्या शर्ती. 

६०. राष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.

६१. राष्ट्रपतींवरील महाभियोगाची कार्यपद्धती. (फक्त घटना भंग या कारणावरून )

६२. राष्ट्रपतींचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद (casual vacancy) भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी.

६३. भारताचे उपराष्ट्रपती

६४. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे.

६५. राष्ट्रपतींचे पदनिमित्तवशात् रिक्त होईल (casual vacancy) त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कार्ये पार पाडणे.

६६. उपराष्ट्रपतींची निवडणूक.

६७. उपराष्ट्रपतींचा पदावधी.

६८. उपराष्ट्रपतींचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी.

६९. उपराष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.

७०. इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींची कार्ये पार पाडणे.

७१. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी.(सर्वोच्च न्यायालयाला पुर्ण अधिकार )

७२. विशिष्ट प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार.(क्षमादान अधिकार )

७३. संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती.

मंत्रिपरिषद (कलम 74-75)

७४. राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद.

*पंतप्रधान - मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती कारभार सांभाळतील -(42 वी घटना दुरुस्ती -1976) *मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती वर बंधनकारक -(42 वी घटना दुरुस्ती -1976) *राष्ट्रपती सल्ला फेरविचारासाठी सांगू शकतात.(44 वी घटना दुरुस्ती -1978)

७५. मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. (पंतप्रधान ची नेमणूक राष्ट्रपती करतील- बहुमतातील पक्षातील नेत्यालाच बनवता येते.) * मंत्रिमंडळ ची संख्या एकुण सदस्याच्या 15%पेक्षा कमी असावी. (91 वी घटना दुरुस्ती -2003)

भारताचा महान्यायवादी (कलम 76)

७६. भारताचा महान्यायवादी. * भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी . पदावधी -राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून कार्य - राष्ट्रपतीस न्यायिक सल्ला देणे.

 सरकारी कामकाज चालवणे (कलम 77-78)

 ७७. भारत सरकारचे कामकाज चालवणे.

 ७८. राष्ट्रपतीस माहिती पुरवणे, इत्यादींबाबत पंतप्रधानांची कर्तव्ये.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा