गोवा राज्याचा सांस्कृतिक वारसा:Cultural Heritage of Goa State:
धार्मिक स्थळे :
गोव्यातील चर्च व मठ :
*गोव्यातील चर्च व मठ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहेत.
*गोव्यातील चर्चनिर्मितीचा उद्देश लोकांवर प्रभाव पाडून व युरोपियनांचे धार्मिक (ख्रिश्चन) श्रेष्ठत्व सिद्ध करणे हा होता.
बोम जिजसचे चर्च (Church of Bom Jesus) :
*या चर्चमध्ये संत फ्रांसिस जेवियर यांची कबर आहे.
• शांतदुर्गा मंदिर :
*हे मंदिर पार्वती देवीला समर्पित आहे.
*१७३८ मध्ये हे मंदिर साताऱ्याच्या शाहूने बनवले.
*हे गोव्यातील सर्वात मोठे व प्रसिद्ध मंदीर आहे.
२) कला व हस्तशिल्प (Arts and crafts)
• क्रोशेट नक्षीकाम (Crochet Embroidary work) :
*यामध्ये तारांचे एकमेकात गुंतलेले जाळे असते.
• अझूले जोस (Azulejos) :
*हे हस्तचित्रकलेने चमकवलेले सेरॅमिकचे भांडे असते.
*ही कला पोर्तुगिजांनी प्रथम आणली.
सण/उत्सव (Festivals) :
यामध्ये साओ-जावो, सांगोड, चिखलकला, शिमगोत्सव समाविष्ट आहे.
ड) लोकनृत्य (Folk dance) :
•दशावतार (Dashavatara) :
*दशावतार या नृत्याचा उगम कुचिपुडी किंवा यक्षगानपासून मानला जातो.
*हे नृत्य आख्यान नावाच्या नाट्यकृतीतून जे पौराणिक महाकाव्य आहे याला धरून असते.
*मध्यरात्री सुरू होवून याचा शिष्कर्ष दुसऱ्या दिवशी सकाळी होतो
देखणी (Dekhni) :
*हे लोकनृत्य कोकणी व पाश्चिमात्य यांचे मिश्रण आहे. यातील हावभाव हे भरतनाट्यम् किंवा कथ्थक मधून घेतल्यासारखे वाटतात. यातून देवदासींची जीवनकहाणी रंगभूमीवर साकारली जाते.
• ढालो (Dhalo) :
*हे नृत्य महिलांकडून पौष पौर्णिमेला केले जाते. कुटुंबाच्या संरक्षणासाठी देवतांना साद घातली जाते. यामध्ये महिला गोल वर्तुळात फुगडी खेळतात.
• घोडेमोडनी (Ghodemodni)
*हे मराठा शासकांचे विजयी नृत्य आहे.
*पोर्तुगीजांवर मराठ्यांनी मिळवलेल्या विजयाच्या प्रसंगाची आठवण म्हणून केले जाते.
• गोफ :
*शेतकरी वर्गाकडून शिमगा सणानिमित्त हे नृत्य केले जाते.
• दिवानृत्य (Lamp dance) :
*डोक्यावर दिवा ठेवून तालामध्ये तोल सांभाळत हे नृत्य केले जाते.
• तिअतर (Tiatr) :
*हे कोकणी नाटक आहे.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा