MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कलम 324 ते 367 भारतीय संविधान


भाग xv : निवडणुका
 ( कलम 324-329)

३२४. निवडणुकांबाबतचे अधिक्षण (superintendence), निदेशन (direction) व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित करणे.(1मुख्य +2सहाय्यक आयुक्त )

३२५. कोणतीही व्यक्ती धर्म(religion ), वंश, जात (caste) Or  लिंग (Gender) यावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्यावरून तिला विशेष मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही. 

३२६. लोकसभा -Loksabha व राज्यांच्या विधानसभा (State Assembly) यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे .(Election Voting Age - वय 21 वरून 18 yrs  करण्यात आले -61 वी घटना दुरुस्ती -1988)

३२७. विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार.

३२८. राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार.

३२९. निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास मनाई.

३२९A. (रद्द)

भाग XVI - विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतुदी (कलम 330-342)

 ३३०. लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे. (लोकसभेत )

३३१. लोकसभेत अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व.(लोकसभेत )

 ३३२. राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे.(राज्यसभेत )

३३३. राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व.(राज्यसभेत )

३३४. राखीव जागा ( Reserves ) & Special Representation -विशेष प्रतिनिधित्व सत्तर वर्षांनंतर समाप्त होणे.

३३५. सेवा वे पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क.(मार्गदर्शक तत्व )

३३६. विवक्षित सेवांमध्ये अँग्लो-इंडियन समाजाकरता विशेष तरतूद.

३३७. अँग्लो-इंडियन समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानकरिता विशेष तरतूद.

३३८. अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग.

३३८A. अनुसूचित जमातींचे राष्ट्रीय आयोग.

३३९. अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन आणि अनुसूचित कल्याणकार्य यांवर संघराज्याचे नियंत्रण.

३४०. मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती.

३४१. अनुसूचित जाती.

३४२. अनुसूचित जमाती.

भाग XVII: राजभाषा (कलम 343-351)

प्रकरण एकः संघराज्याची भाषा (कलम 343-344)

३४३. संघराज्याची राजभाषा.(देवनागरितील हिंदी राजभाषा असेल, अंकाचे स्वरूप -आंतरराष्ट्रीय, संसदिय कामकाज -इंग्रजी )

३४४. आयोग व संसदीय समिती - 

कार्यालयीन भाषा Act -1963 - कामकाज हिंदी(Hindi ) & इंग्रजी (English) मध्ये.

प्रकरण दोनः प्रादेशिक भाषा (कलम 345-347)

३४५. राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा.

३४६. राज्या-राज्यांमधील Or राज्य व संघराज्यमधील व्यवहाराची राजभाषा.(English-इंग्रजी असावी )

३४७. राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद.(अधिकृत भाषा Act-1963)

प्रकरण तीनः सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इत्यादींची भाषा (कलम 348-349)

३४८. सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि कायदे, विधेयके, इत्यादींकरिता वापरावयाची भाषा.(इंग्रजी )

३४९. भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती.

प्रकरण चारः विशेष मार्गदर्शक तत्वे (कलम 350-351)

३५०.तक्रारींच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये -Representations वापरावयाची भाषा.(कोणतीही भाषा  )

३५०A. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.(मार्गदर्शक तत्व-7वी घटना दुरुस्ती -1956)

 ३५०B. भाषिक अल्पसंख्यांक समाजांकरिता विशेष अधिकारी.(राष्ट्रपती द्वारे नेमणूक) -(7वी घटना दुरुस्ती -1956)

३५१. हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व.


भाग XVIII आणीबाणीसंबंधी तरतुदी (कलम 352-360)

३५२. आणीबाणीची उद्घोषणा. (राष्ट्रपती द्वारे )

बाह्य आणीबाणी - युद्ध किंवा परकीय आक्रमण

अंतर्गत आणीबाणी -सशस्त्र उठाव (44वी घटना दुरुस्ती,1978)

केंद्रीय कॅबिनेट च्या लेखी  निर्णया शिवाय लागू करता येत नाही -(44वी घटना दुरुस्ती,1978)

एकटा पंतप्रधान आणीबाणी ची शिफारस करू शकत  नाही. (44वी घटना दुरुस्ती,1978)

संसदेने(Parliment) संमती दिली नाही तर एक महिना and संसदेने (parliment )संमती दिली तर 6 महिने वाढविता येते (असे कितीही वेळा करता येते - 44वी घटना दुरुस्ती,1978)

न्यायिक पूनर्विलोकनच्या बाहेर (38 वी घटना दुरुस्ती-1975)

३५३. आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम - पुर्ण अधिकार केंद्र सरकार -Central Govt.कडे 

३५४.आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असतांना महसुलाच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे.

(राष्ट्रपती आदेशाद्वारे कलम 268-279 पर्यंत means Central Govt राज्याचा महसूल कमी / बंद करू शकते.)

३५५. परकीय आक्रमण & अंतर्गत अशांततापासून राज्याचे संरक्षण करणे - संघराज्याचे कर्तव्य.

३५६. राज्यांतील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास .(राष्ट्रपती राजवट लागू करू शकते )

३५७.कलम ३५६ अन्वये प्रसृत केलेल्या उद्घोषणेनुसार कायदेकारी अधिकारांचा वापर.(राष्ट्रपती विधानसभा निलंबित / विसर्जित करू शकतात. संसद राज्याच्या कायदा करण्याचा अधिकार  राष्ट्रपतीला देऊ शकते )

३५८. आणीबाणीच्या कालावधीत कलम १९ च्या तरतुदी निलंबित असणे. 

In बाह्य आणीबाणी  -मूलभूत हक्कावर बंदी.

 In अंतर्गत आणीबाणी - मूलभूत हक्क रद्द होणार नाही 

३५९. आणीबाणीच्या कालावधीत भाग तीन अन्वये प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे.(अपवाद -कलम 20 आणि 21)

३५९A. (रद्द) 

३६०. आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी.(फक्त राष्ट्रपती घोषणा करू शकतात.)

भाग XIX : संकीर्ण (कलम 361-368)

३६१. राष्ट्रपती, राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण.

३६१A. संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण.

३६१B. लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता.

 ३६२. (रद्द)

३६३. विवक्षित तह, करार, इत्यादींतून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मनाई.

३६३A. भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे (privy purses) नष्ट करणे.

३६४. मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी.

३६५. संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम.

३६६. व्याख्या.

३६७. अर्थ लावणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा