MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

Indian Economy Characteristics - भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

 भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये

•भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था.

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार.

 १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू .

* दर डोई उत्पनाचा कमी स्तर (Low per capita income)

देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्वाचे निर्देशक आहे.

 दरडोई उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणात वाढ घडवणे हे भारतीय नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, मात्र त्याचा दर हा नेहमीच कमी राहिला.

2020-21 च्या तात्पुरत्या अंदाजांनुसार चालू किंमतींना मोजलेले दर डोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (Per Capita Net I National Income) 1,28.829 रूपये प्रति वर्ष इतके. 

 ही केवळ सरासरी असल्यामुळे याचे  भारतातील लोकांमध्ये असलेले वितरण हे खूप विषम आहे

*उत्पन्नाच्या व दर डोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी (Low growth rate of income and per capita income)

भारताचे दर डोई उत्पन्न कमी आहेच, मात्र त्याबरोबच त्याच्या वाढीचा दरही कमीच आहे.

१९५०- १९८० - जी.डी.पी.च्या  दर- सरासरी ३.५ %

 व दर डोई उत्पन्न वाढीचा दर १.३ %

अशा प्रकारे झालेल्या या दरला 'हिंदू वृद्धी दर' म्हटले गेले Hindu Growth Rate 

१९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून या दरात वाढ झाली,मात्र अपेक्षित वाढ होऊ शकली नाही.

* कृषि क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव (Dominance of agriculture)

•लोकसंख्येचा मोठा गट कृषि व संलग्न कार्यांमध्ये गुंतलेला, मात्र कृषि क्षेत्राचे जी.डी.पी.मधील योगदान कमी.

•भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषिधारित

*आर्थिक विषमता (Economic inequality)

भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता

देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी ३९ टक्के कुटुंबे देशातील एकुण, ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त ५ टक्के मालमत्तेचे मालक आहेत. तर त्यांच्यापैकी ८ टक्के उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी ४६ टक्के मालमत्तेची मालक आहेत.

उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेझ वक्र व त्यावरून काढलेला गिनी गुणांक यांचा वापर केला जातो.

गिनी गुणांक जेवढा जास्त असतो तेवढ्याच जास्त प्रमाणात  विषमता  आहे असे समजले जाते.

India's Gini Index -82.3 IN 2021.

* लोकसंख्या विस्फोट (Overpopulation)

२०११ च्या जनगणनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७.५ टक्के एवढी मात्र भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या फक्त २.४२ टक्के एवढेच आहे

भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या १५ वर्षांखालील, ५०% हून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील, तर ६५% हून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील . 

तरूण लोकसंख्येस शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्यवान बनविल्यास ही प्रचंड मोठी लोकसंख्या भारतासाठी जबाबदारी न बनता आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेली एक मोठी मालमत्ता किंवा भांडवल बनेल.

*गरीबी व बेरोजगारी (Poverty and Unemployment) 

•स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६५ वर्षांहून अधिक काळातही भारतातील गरीबी व बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले नाही.

* भांडवल निर्मितीचा दर कमी (Low rate of capital formation)

प्रकल्प व मशिनरीमध्ये गुंतवणूक होऊन स्थिर उत्पादक मालमत्ता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती,असे म्हणतात.

भारतात बचत दर कमी असल्याने गुंतवणूक दर ही कमी , त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर कमी 

 त्याचे पर्यवसन कमी राष्ट्रीय उत्पन्न व कमी दरडोई उत्पन्नात होते.

* औद्योगिकीकरणाचा अभाव (Lack of industrialization)

* पायाभूत सुविधांची कमतरता (Infrastructural infirmities)

रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकींग व विमा सेवा व इतर पायाभूत सुविधांची कमतरता हा भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील महत्वाचा अडसर

उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राहिल्याने कृषीची प्रति हेक्टरी उत्पादकता तसेच, उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता कमी.

* मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा (Poor quality of human capital)

मानवी संसाधन साक्षरता, अंगीकृत कौशल्ये, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान इ बाबींवर आधारित असते. मात्र  भारतात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने मानवी संसाधानाचा दर्जा निकृष्ट

* तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा (Low level of technology)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा