MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

National income accounting - राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप MPSC-UPSC

 राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप (National Income Accounting)

'राष्ट्रीय उत्पन्न' या शब्दोल्लेखात दोन शब्द आहेतः 'राष्ट्रीय' आणि 'उत्पन्न'. अर्थशास्त्रात दोन्ही शब्दांना विशिष्ट अर्थ आहेत.

'उत्पन्न' म्हणजे काय? (Meaning of Income)

 उत्पन्नाचे दोन प्रकार

१.घटक उत्पन्न (Factor incomes)

1.भूमी, 2.श्रम, 3.भांडवल 4.उद्योजकता -उत्पादनाचे घटक

 उत्पादन संस्था घटकांच्या साहाय्याने वस्तू व सेवांचे उत्पादन करतात व या घटकांच्या मालकांना त्याची किंमत अदा करतात.

उदा. मजुरी/ पगार, व्याज उत्पन्न, इतरांकडून मिळालेल्या देणग्या इत्यादी. काही प्रकारचे उत्पन्न मिळविण्यासाठी आपल्याला काम करावे लागते (उदा.मजुरी,पगार), तर इतर काही प्रकारचे उत्पन्न काम न करताही मिळते (उदा. देणग्या)

• गैर-घटक उत्पन्न (Non-factor incomes)

कोणत्याही प्रकारचे काम/त्याग न करता प्राप्त उत्पन्न .

उदा. भेट, देणग्या, डोनेशन, धर्मदायिक देणग्या, कर, दंड इ. 

'हस्तांतरित उत्पन्न' (Transfer Incomes) , कारण यात केवळ पैशाचे हस्तांतरण होत असते उत्पन्नाच्या मोबदल्यात कोणत्याही वस्तू- -सेवेची निर्मिती होत नाही.

राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, गैर-घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही.

राष्ट्रीय म्हणजे काय? (Meaning of national) 

राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात 'राष्ट्रीय' या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी  दोन संकल्पनांचा अर्थ समजणे गरजेचे

१.आर्थिक (देशांतर्गत) प्रक्षेत्र ( Economic (Domestic) Territory)

आर्थिक/देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे देशाच्या सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा असा सर्व भौगोलिक प्रदेश ज्यात व्यक्ती, वस्तू व भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो

भारताचे आर्थिक प्रक्षेत्र -

 भारताचे भौगोलिक क्षेत्र + भारताची परदेशातील दुतावास (embassies) व संबंधित सरकारी कार्यालये - भारतातील सर्व परदेशी दुतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये.

भारताचा भूप्रादेशिक सागरीप्रदेश (territorial waters), ii)भारतीय निवासींच्या मालकीची व इतर दोन किंवा अधिक देशांदरम्यान वापरली जाणारी जहाजे व विमाने.

भारतीय निवासींच्या मालकीची आंतरराष्ट्रीय सागरीप्रदेशात कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेल व वायू उत्खनन जहाजे इत्यादी.

निवासी प्रक्षेत्र (Residents)

देशात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती व संस्था ज्यांचे आर्थिक हितसंबंध (उत्पन्न, खर्च इत्यादी) त्या देशात आहेत त्यांना त्या देशाचे निवासी असे संबोधले जाते.

 कशाचा समावेश..

व्यक्ती तसेच संस्थां.

देशाच्या निवासींमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीय (एक वर्षापेक्षा अधिक वास्तव्य असलेले) यांचा समावेश

भारतात कार्यरत असलेले परदेशी दुतावास तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये त्यांमध्ये काम करणारी परकीय तसेच भारतीय व्यक्ती.

जे कामगार सकाळी सीमा पार करून दुसऱ्या देशात कामासाठी जातात मात्र संध्याकाळी परत 

मध्यमवर्ती वस्तू Vs अंतिम वस्तू (Intermediate Products vs. Final Products)

मध्यमवर्ती वस्तू (Intermediate products)

•एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूं.

उदा. पीठ विक्री करणाऱ्या गिरणीने विकत घेतलेला गहू गिरणीसाठी मध्यमवर्ती वस्तू असेल. गिरणीमध्ये गहू दळून पिठाच्या स्वरूपात ते पुन्हा विकले जाईल. तसेच गिरणीने विकत घेतलेल्या इतर बाबी (eg. electricity, packing material) सुद्धा मध्यमवर्ती वस्तू ठरतील.

अंतिम वस्तू (Final Product)

 सर्व वस्तू व सेवा ज्याची खरेदी उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते, मात्र पुनर्विक्रीसाठी नाही.

घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा तसेच उत्पादन संस्थांनी खरेदी केलेल्या यंत्रे, उपकरणे, फर्निचर, वाहतुकीसाठी वाहने यांसारख्या भांडवली वस्तूंचा समावेश .

  राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ अंतिम वस्तूंच्या किंमतींचीच गणना केली जाते.

'मूल्यवर्धित' ची संकल्पना (Concept of Value Added )

मूल्यवर्धितची संकल्पना समजण्यासाठी आधीचे पिठाच्या गिरणीचे उदाहरण ध्यानात घ्या. समजा, 1000रू.किंमतीचा गहू विकत घेतला. हा गिरणीचा मध्यमवती खर्च असेल. समजा गहू हा गिरणीचा एकमेव खर्च आहे. जर गिरणीने गहू दळून तयार केलेले पीठ 1200 रूपयांना विकले तर 1200 रू. हे गिरणीचे प्रदान मूल्य.गिरणीचे मूल्यवर्धित रू. २,००० असेल. ते प्रदान मूल्यातून मध्यमवर्ती खर्च वजा करून काढले जाते. यावरून,

 बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित (Gross Value Added at Market Price-GVAmp )

मूल्यवर्धित = प्रदान मूल्य - मध्यमवर्ती खर्च

स्थूल विरूद्ध निव्वळ (Gross Vs Net measures)

 •वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी यंत्रे, उपकरणे, इमारती यांसारख्या भांडवली मालमत्तेचा जीवनकाल मर्यादित असतो.

 उदा. कारखान्यातील मशिन १० वर्षांसाठी चांगली चालू शकते,नंतर ती बदलावी लागते. म्हणजे वापरल्यामुळे मालमत्तेची झीज होते. means -"स्थिर भांडवलाचा उपभोग" /"घसारा " (depreciation) .

•घसारा वजा न करता मोजलेल्या मूल्यवर्धित -  स्थूल मूल्यवर्धित' (Gross Value Added).

 *स्थूल मूल्यवर्धितातून घसारा वजा केल्यास - 'निव्वळ मूल्यवर्धित' (Net Value Added) 

निव्वळ मूल्यवर्धित = स्थूल मूल्यवर्धित - घसारा.

बाजारभाव विरूद्ध घटक किंमत ( Market Price vs. Factor Cost)

बाजारभाव

खरेदीदार ज्या किंमतीला उत्पादन संस्थांकडून (विक्रेते) वस्तू किंवा सेवा विकत घेतो.

घटक किंमत

उत्पादन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या सर्व घटकांना होणारा प्राप्त एकूण परतावा  (खंड+मजुरी+व्याज+नफा).

 बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा केल्यास आणि अनुदाने मिळविल्यास येणाऱ्या किंमतीला 'घटक किंमत' (factor cost) असे म्हणतात. 

घटक किंमत = बाजारभाव -अप्रत्यक्ष कर + अनुदाने 

देशांतर्गत उत्पादाची  संकल्पना (Concept of Domestic Product)

देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात  कार्यरत असतात सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची म्हणजे देशांतर्गत उत्पाद (Domestic product) 

स्थूल देशांतर्गत उत्पाद-Gross Domestic Product at market price- GDP

एका वर्षात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज.

देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश. 

स्थूल देशांतर्गत उत्पाद बा.भा. =सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज.

निव्वळ देशांतर्गत उत्पाद (Net Domestic Product at mp- NDPmp)

देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धिताची बेरीज.

 निव्वळ देशांतर्गत उत्पाद बा.भा. = स्थूल देशांतर्गत उत्पाद  बा.भा. - घसारा.

स्थूल देशांतर्गत उत्पाद, घटक किंमतींना मोजलेले (Gross Domestic Product at fc: GDPfc)

देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किंमतींना मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज.

स्थूल देशांतर्गत उत्पाद घ.किं. = स्थूल देशांतर्गत उत्पाद बा.भा. - अप्रत्यक्ष कर + अनुदाने.

निव्वळ देशांतर्गत उत्पाद, घटक किंमतींना मोजलेले (Net Domestic Product at fc- NDPfc)

देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धिताची बेरीज.

निव्वळ देशांतर्गत उत्पादन घ.किं.= निव्वळ देशांतर्गत उत्पाद बा.भा. - अप्रत्यक्ष कर + अनुदाने.

 राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना (Concept of National Product) 

 राष्ट्रीय उत्पाद = देशांतर्गत उत्पाद +परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.

स्थूल राष्ट्रीय उत्पाद, बाजार भावाला (Gross National Product at market price: GNPmp):

स्थूल राष्ट्रीय उत्पाद बा.भा = स्थूल देशांतर्गत उत्पाद बा.भा. + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, बाजार भावाला (Net National Product at mp: NNPmp)

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बा.भा. = निव्वळ देशांतर्गत उत्पाद बा.भा. + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.

स्थूल राष्ट्रीय उत्पाद, घटक किंमतींना (Gross National Productat fc: GNPfc):

स्थूल राष्ट्रीय उत्पाद घ.किं. = स्थूल देशांतर्गत उत्पादन घ.किं. + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, घटक किंमतींना (Net National Product at fc: NNPfc)

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घ .किं. = निव्वळ देशांतर्गत उत्पादध.किं. + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. 

घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पाद - 'राष्ट्रीय उत्पन्न' (Real National Income).

 राष्ट्रीय उत्पन्नाचे पूर्ण सूत्र पुढीलप्रमाणे:

राष्ट्रीय उत्पन्न = स्थूल देशांतर्गत उत्पाद बा.भा. अप्रत्यक्ष कर + अनुदाने + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. घसारा

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती -Methods of measurement of national income

तीन पद्धती

1) उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत (Production method or Value Added Method)

या उत्पादन पद्धतीने करताना उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची (म्हणजेच सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची) बेरीज केली जाते 

उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.

उदा. GDPmp, NDPmp, GNPmp, NNPmp.

२)उत्पन्न/आय पद्धत (Income method)

 उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या Base वर 

 वस्तू-सेवांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक वापरल्याने मालकांना घटक उत्पन्न  प्राप्त .

 सर्व घटक उत्पन्नांची बेरीज means घटक किंमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न 

उदा. GDPfc, NDPfc, GNPfc, NNPfc.

उत्पाद (product )-बाजारभावाला तर उत्पन्न (Income )-घटक किंमतींना .

३)खर्च पद्धत. (Expenditure method)

 उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा यांची खरेदी  लोक उपभोगासाठी आणि गुंतवणुकीसाठी करतात.

खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च यांची बेरीज केली जाते.

उपभोग खर्च - खाजगी आणि सरकारी.

गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील.

 देशातील गुंतवणूक खर्च स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती आणि 

 परदेशातील गुंतवणूक खर्च निव्वळ निर्यात (निर्यात - आयात (Export -Import) ने दर्शविला जातो.

 खर्च पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP)= खाजगी अंतिम उपभोग खर्च (C)+ सरकारी अंतिम उपभोग खर्च (G)) + स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती (I) + निव्वळ निर्यात (X - M) 

GDP = C+G+I+(X - M).

भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप (1867-2022 पर्यंत )

दादाभाई नौरोजी 

 भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न - पहिले व्यक्ती .

१८६७-६८ - भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. ३४० कोटी तर दर डोई उत्पन्न रू. २० .

 Indian Economy divides into -कृषि क्षेत्र व गैरकृषि क्षेत्र.

विल्यम डिग्बी

 १८९७-९८ - भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. ३९० कोटी तर दर डोई उत्पन्न रू. १७.

फिंडले शिरास

१९११ -राष्ट्रीय उत्पन्न रू. १९४२ कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. ८०.

डॉ. व्ही.के.आर.व्ही.राव

राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक' -Father of national income accounting

यांच्या मते  १९२५-२९ - राष्ट्रीय उत्पन्न रू. २३०१ कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. ७८ इतके सांगितले. First time वैज्ञानिक पद्धतीने national income गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन.

आर . सी. देसाई

१९३०-३१ -राष्ट्रीय उत्पन्न रू. २८०९, - दर डोई उत्पन्न रू. ७२.

भारतीय सांख्यिकीय संस्था (Indian Statistical Institute: ISI)

स्थापना - १७ डिसेंबर, १९३१ (पी.सी. महालनोबिस) .

१९३३ पासून या संस्थेमार्फत ‘संख्या' नावाचे जरनल प्रकाशित

१९५९-  'राष्ट्रीय महत्वाची संस्था' म्हणून दर्जा.

 राष्ट्रीय उत्पन्न समिती (National Income Committee)

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरकारी मोजमापाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे 'राष्ट्रीय उत्पन्न समिती.

 स्थापना -  ४ ऑगस्ट, १९४९

पी.सी.महालनोबिस - अध्यक्ष

 डी.आर.गाडगीळ - सदस्य 

 व्ही.के.आर.व्ही.राव - सदस्य

 १९५१ मध्ये पहिल्या अहवालात समितीने १९४८-४९ या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्नाचे सरकारी आकडे जाहीर केले.

१९५४ मध्ये अंतिम अहवालात १९४८-४९, १९४९५० आणि १९५०-५१ साली चालू व स्थिर किंमतींवर (१९४८-४९ या आधारभूत वर्षावर) राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली.

समितीच्या शिफारशीनुसार

१९५० मध्ये 'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण',

१९५४ मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटन' ची स्थापना 


केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय (Central Statistical Office: CSO)

• Central Statistical  organisation -केंद्रीय सांख्यिकीय संघटना  

स्थापना -1954

 मुख्यालय - दिल्ली .

औद्योगिक सांख्यिकी विंग - कोलकाता

प्रमुख कार्य -  राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होय.

 संघटनेचे नाव बदलून 'केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय' Central Statistical Office.

राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे  -  'राष्ट्रीय लेखा सांख्यिकी' (National Account Statistics) नावाने प्रकाशित

CSO मार्फत संकलित व प्रकाशित केली जाणारी आकडेवारी

i)राष्ट्रीय उत्पन्न (National Accounts)

ii)वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण (Annual Survey of Industries)

ii)औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ( index of Industrial Production: IIP)

iv)ग्राहक किंमत निर्देशांक (ग्रामीण, शहरी व एकत्रित) (CPI Rural, Urban and Combine)

v)आर्थिक सांख्यिकी (Economic statistic)

vi) सामाजिक सांख्यिकी (Social statistices)

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (National Sample Survey Office: NSSO)

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS)- १९५०  स्थापना

 मार्च १९७० -  'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना' -National Sample Survey Organisation) 

 Recently -'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालया' (National Sample Survey Office) 

•NSSO चे प्रमुख चार सर्वेक्षण-

 1.घरगुती सर्वेक्षणे,

2.उपक्रम सर्वेक्षणे,

3.ग्राम सुविधा.

4.भूमी व पशुधन धारणा.


NSSO चे चार विभाग-

सर्व्ह डिझाईन व रिसर्च विभाग - कोलकाता

फिल्ड ऑपरेशन्स विभाग - New Delhi  व फरिदाबाद

 डाटा प्रोसेसिंग विभाग -कोलकत्ता 

समन्वय व प्रकाशन विभाग -  नवी दिल्ली

 NSSO -‘सर्वेक्षण' द्वैवार्षिक जरनल प्रकाशित करते.

राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग (National Statistical Commission: NSC)

•स्थापना  - जानेवारी २०००

 डॉ. सी. रंगराजन - अध्यक्ष

देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम आयोगाकडे . 

ऑगस्ट २००१अहवाल - सांख्यिकी घडामोडींचे सुसूत्रिकरण करण्यासाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापण्याची शिफारस.

१२ जुलै, २००६-'राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग  स्थापन

आयोगाचे अध्यक्ष हे तज्ज्ञ संख्याशास्त्रज्ञ किंवा समाज शास्त्रज्ञ असायला हवे. त्यांचे किमान वय ५५ वर्षे, पदावधी ३ वर्षे किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.

 Presidents of  NSC

 Duration

 प्रो. सुरेश तेंडुलकर (First President)


 डॉ. प्रणब सेन

 फेब्रुवारी 2013 - 2016 

  राधा विनोद बर्मन 

 4 मे, 2016 - 2019

  Bimal Kumar Roy

 15 July 2019 - Till Date

 

 

 भारतीय अर्थव्यवस्थेची उप-क्षेत्रे (Sub-sectors of Indian Economy)

• राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी CSO ने भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन पुढील ९ गट व त्यातील उप-क्षेत्रांमध्ये केले आहे:

  गट 

 उप-क्षेत्रे 

 क्षेत्र 

 १.कृषि, वनिकी आणि मत्स्यव्यवसाय 

 i.पीके.

ii.पशूधन.

iii.वनिकी आणि लाकूडतोड.

iv.मत्स्यव्यवसाय.

 कृषि व संलग्न क्षेत्र  

 २.खाणकाम.

 

 उद्योग क्षेत्र    

 ३.कारखानदारी.

 

 उद्योग क्षेत्र    

 ४.वीज, गॅस आणि पाणी पुरवठा.

 

 उद्योग क्षेत्र    

 ५.बांधकाम

 

उद्योग क्षेत्र    

 ६.व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स

 i.व्यापार

ii.हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स

सेवा क्षेत्र     

 ७.वाहतूक, साठवणूक आणि संचार

 i.रेल्वे

ii.इतर मार्गांनी वाहतूक .

iii.साठवणूक

iv.संचार

सेवा क्षेत्र     

 ८.वित्त पुरवठा, वीमा, रियल इस्टेट आणि व्यवसाय सेवा

 i.बँकिंग आणि वीमा

ii.रियल इस्टेट आणि व्यवसाय सेवा

 सेवा क्षेत्र     

 ९.सामुदायिक, समाज आणि वैयक्तिक सेवा

 i.लोक प्रशासन आणि संरक्षण

ii.इतर सेवा

 सेवा क्षेत्र     

 

 मौद्रिक जी.डी.पी. आणि वास्तविक जी.डी.पी. (Nominal GDP & Real GDP)

मौद्रिक जी.डी.पी. (Nominal GDP)

* बाजारभावाला मोजलेला जी.डी.पी.

मौद्रिक जी.डी.पी. = अंतिम वस्तू व सेवा त्यांच्या किंमती

 वास्तविक जी.डी.पी. (Real GDP)

स्थिर किंमतिला मोजलेला GDP.

वास्तविक जी.डी.पी. ची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष व स्थिर किंमतींची संकल्पना वापरली जाते.

चालू किंमती, स्थिर किंमती व आधारभूत वर्ष (Current prices, Constant prices and Base year)

चालू किंमती Current prices

 current - वर्षातील प्रचलित किंमत.

वर्षातील चालू किंमतींना मोजलेल्या जी.डी.पी. - मौद्रिक जी.डी. पी. 

आधारभूत वर्ष Base year

 वर्ष आधारभूत वर्ष म्हणून निवडले जाते जे किंमतींच्या दृष्टीने एक सामान्य वर्ष असते म्हणजे त्या वर्षातील किंमतींमध्ये मोठी चढउतार झालेली नसते. आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक १०० इतका मानला जातो.

भारतातील आधारभूत वर्षाच्या शृंखला (Series of base years in India)

 

 आधारभूत वर्ष 

 

  पहिले

  १९४८-४९ 

 

 दुसरे 

  १९६०-६१ 

 ऑगस्ट १९६७ पासून

  तिसरे

 १९७०-७१

 जानेवारी १९७८ पासून 

 चौथे

  १९८०-८१

 फेब्रुवारी १९८८ पासून 

 पाचवे

 १९९३-९४

 फेब्रुवारी १९९९ पासून 

  सहावे

 १९९९-२००० 

 जानेवारी २००६ पासून 

 सातवी

 २००४-०५(अभिजित सेनगुप्ता समिती)

 जानेवारी २०१० पासून

 आठवी 

 २०११-१२ (प्रोफेसर के. सुंदरम समिती)

 जानेवारी २०१५ पासून

 

 

 

जी.डी.पी. अवस्फितीक (GDP Deflator)

 जी.डी.पी. अवस्फितीक (GDP Deflator)= मौद्रिक जी.डी.पी.  / वास्तविक जी.डी.पी.

जी.डी.पी. अपस्फितीक हे किंमत वाढ/घट मोजण्याचे निर्देशक.

जी.डी.पी.च्या मोजमाप पद्धतीत बदल 

भारतात  जानेवारी २०१५ पासून 'स्थिर बाजार किंमतींना मोजलेल्या जी.डी.पी.'चा (GDP at constant market prices) वापर सुरू करण्यात आला.

२)स्थूल मूल्यवर्धीताचे (Gross Value Added: GVA) मोजमाप करण्यासाठी मूलभूत किंमतींचा (basic prices) स्विकार करण्यात आला

मूलभूत किंमतींमध्ये केवळ उत्पादन कर व अनुदानांचा (production taxes and subsidies) विचार केला जातो

क्रियशक्ती/खरेदीशक्ती समानता (Purchasing - Power Parity: PPP) 

दोन चलनांच्या खरेदीशक्तीची/क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी.

त्यासाठी कोणत्याही देशाच्या चलनाच्या खरेदीशक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या खरेदीशक्तीशी केली जाते.

 उदा. एक डॉलर अमेरिकेत जेवढ्या वस्तू व सेवा विकत घेऊ शकतो, तेवढ्याच वस्तू व सेवा भारतात विकत घेण्यासाठी जेवढे रूपये लागतील तेवढ्या रुपयांची व एका डॉलरची खरेदीशक्ती समान असेल. तेवढे रूपये बरोबर एक डॉलर असा जो दर येईल त्याला या दोन चलनांची 'क्रयशक्ती समानता' असे संबोधले जाते.  

जागतिक बँक दर वर्षी १ जुलै रोजी (जागतिक बँकेच्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला) जगातील देशांचे विविध उत्पन्न गटांमध्ये (कमी, मध्यम व उच्च उत्पन्न गट) वर्गीकरण करण्यासाठी निकष जाहीर करते. देशांचे वर्गीकरण ‘दर डोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्ना' च्या (per capita GNI) आधारे केले जाते. 

हरित जी.डी.पी. (Green GDP) 

आर्थिक वृद्धीबरोबरच पर्यावरणाची हानी घडून येऊ न देता शक्य असलेले जी.डी.पी. -हरित जी.डी.पी.

हरित जी.डी.पी. = पारंपरिक जी.डी.पी पर्यावरणीय - सर्वमान्य हानीचे मूल्य.

भारतात सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. 

समितीने एप्रिल २०१३ मध्ये 'Green National Accounts in India: A Framework'  अहवाल सादर

 ज्यात हरित जी.डी.पी. मोजण्याबद्दल काही शिफारसी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा