MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

Types & Sectors of Economy - अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्रे

**Adam Smith- father of Economic ** 

अर्थव्यवस्था - An Economy 

उत्पादन (production), विभाजन (distribution), विनिमय (exchange) आणि उपभोग (consumption) या चार प्रकारच्या व्यवहारांना ‘आर्थिक व्यवहार' (economic activities) असे म्हटले जाते आणि चार व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला ‘अर्थव्यवस्था' म्हणतात.

अर्थव्यवस्थांचे प्रकार (Types of Economy)

उत्पादक साधनांच्या मालकीनुसार (तीन प्रकार )

१.भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy)

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची.

वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजारयंत्रणे करवी.

सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त म्हणून भांडवलशाहीला ‘मुक्त अर्थव्यवस्था' (free economy) , ‘बाजार अर्थव्यवस्था' (market economy) तसेच ‘Leissez faire' (non-intervention) म्हणजे 'हस्तक्षेपविरहीत अर्थव्यवस्था' म्हणतात.

२.समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy)

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी/सार्वजनिक.

वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत , साधनसामग्रीचा वापर समाजहितासाठी.

वस्तू-सेवांचे उत्पादन, उद्योग-उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किंमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादी सर्व निर्णय सरकार.

 सामाजिक न्याय' (social justice) प्रस्थापित करणे प्रमुख उद्दिष्ट.

 सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत 'आर्थिक नियोजना' च्या माध्यमातून घडवून आणले जाते. त्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करून राबविल्या जातात.

  ३.मिश्र / संमिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy)

 मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व.

 वस्तू-सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत.

काही वस्तू-सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी.

* विकासाच्या अवस्थेनुसार (दोन प्रकार )

१.विकसित अर्थव्यवस्था ( Developed economy) 

 

 दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण, 

मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकीकरण व शहरीकरण, 

साक्षरतेचे उच्च प्रमाण, 

घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी .

 २.विकसनशील अर्थव्यवस्था ( Developing Economy)

 दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, 

कमी औद्योगिकीकरण, 

कृषि क्षेत्राचे प्राबल्य, 

साक्षरतेचे कमी प्रमाण, 

लोकसंख्या वाढीचा उच्च दर

 * अर्थव्यवस्थेची क्षेत्रे ( Sectors of Economy )

व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेमध्ये ( पाच प्रकारची क्षेत्रे )

१.प्राथमिक क्षेत्र  ( Primary sector )

 कृषि व संलग्न क्षेत्र' (Agriculture and Allied Sector) असे संबोधले जाते.

 नैसर्गिक साधनसामुग्रीशी संबंधित कृषि व संलग्न व्यवसाय (पशू संवर्धन, मत्सव्यवसाय, रेशिम उत्पादन इ.), जंगलसंपत्ती, खाणी व खनिज उत्पादने (कोळसा, पेट्रोलियम, लोह खानिज इत्यादींचे उत्खनन) इत्यादी उपक्रमांचा समावे.

२. द्वितीयक क्षेत्र (Secondary Sector )

 उद्योग क्षेत्र' (Industry sector) असे संबोधले जाते.

प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात.

कारखानदारी/विनिर्माण, बांधकाम, वीजनिर्मिती, पाणी इत्यादी व्यवसायांचा समावेश.

 ३.तृतीयक क्षेत्र ( Tertiary sector)

 सेवा क्षेत्र' (service sector) असे म्हटले जाते.

 प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश . 

व्यापार, वाहतूक, दळणवळण, तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांबरोबर. विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश 

 ४.चतुर्थक क्षेत्र  ( Quaternary sector )

उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश 

संशोधन व विकास कार्ये (R&D), सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यांसारख्या उन्नत सेवांचा समावेश.

 ५ .पंचक क्षेत्र ( Quinary sector )

समाजातील व अर्थव्यवस्थेतील 'सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिये' चा (highest levels of decision making) समावेश.

सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश.

मालकीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये (चार क्षेत्रे ) 

१.सार्वजनिक क्षेत्र (Public sector)

 सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग-उपक्रमांचा समावेश.

सरकारमार्फत चालविले जाणारे सर्व उद्योग-उपक्रम  उदा.रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी.

२. खाजगी क्षेत्र (Private sector)

उद्योग-व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तीसमुहाची मालकी/नियंत्रण 

 वैयक्तिक लाभ मिळविणे हे  मूलभूत उद्दिष्ट उदा. कृषि व पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार इ. 

३.संयुक्त क्षेत्र (Joint sector)

उद्योग- व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तीसमुहाची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण.

४.सहकारी क्षेत्र ( Cooperative sector) 

सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा/उद्योगांचा समावेश .

सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समुहाची असते.

 भांडवलशाही व समाजवाद -अर्थप्रणालींचा सुवर्णमध्य -सहकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा