♦️वातावरण (Atmosphere)
*पृथ्वीच्या पृष्ठभागावर हजारो किमी उंचीवर असणाऱ्या हवेच्या जाड आवरणास वातावरण म्हणतात. भूआवरण आणि जलावरण याप्रमाणेच वातावरणसुद्धा पृथ्वीचे महत्त्वपूर्ण अंग आहे.
• पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण बलामुळे हवेचे आवरण पृथ्वीच्या पृष्ठभागाशी धरून राहते.
• हे वातावरण जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वायुंनी समृद्ध आहे. तसेच या वायुंच्या अस्तित्वामुळे पृथ्वीचे तापमान सरासरी १५°C पर्यंत राहते. त्यामुळे सजीवसृष्टी वाढु शकते.
♦️पृथ्वीच्या वातावरणाचे कार्य (Role of atmosphere)
*पृथ्वीचे वातावरण हे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड इ. यासारख्या वायुंनी समृद्ध आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वत:चे अन्न तयार करतात.
*बहुतांश सजीवांना अस्तित्वासाठी आणि जैविक क्रियेकरिता तापमान विशिष्ट कक्षेत आणि सौर किरणांची वारंवारता वैशिष्ट्यपूर्ण कक्षेत असणे गरजेचे असते. यासाठी वातावरणातील काही वायु सौर किरणे शोषूण घेतात तर काही वायु सौर किरणांना जाऊ देतात.
• वातावरण पृथ्वीचे तापमान विशिष्ट कक्षेत ठेवण्यास मदत करते. वातावरणाच्या अनुपस्थितीमध्ये दैनिक तापमानाची कक्षा अधिक असली असती व त्यामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले असते.
• वातावरणातील ओझोनचा थर (O3 layer) सूर्यापासून येणाऱ्या जंबुपार किरणांना शोषून घेते.
♦️वातावरणातील घटक
i) ऑक्सिजन (Oxygen) : वातावरणात २०.९५% प्रमाणात असणारा हा वायु सजीवांच्या श्वसनासाठी महत्त्वाचा आहे. बहुतांश धातुंशी ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन ऑक्साईडस् खनिजे निर्माण होतात. ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
ii) नायट्रोजन (Nitrogen) : वातावरणात ७८.०८% प्रमाणात असणारा हा वायु निष्क्रिय असून वातावरणातील ऑक्सिजनची ज्वलनाची संहती कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे वातावरणात अधिक ऑक्सिजन असूनही आग पसरत नाही.
वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजन महत्त्वाच्या असतो आणि हे नायट्रेट वनस्पती, जीवाणूंकडून/ खताद्वारे मिळवितात.
ii) कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) : वातावरणातील आणखी महत्त्वाचा एक वायु म्हणजे CO, होय. हा वायु ज्वलनानंतर तयार होतो. वनस्पती स्वत:च्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी हा वायु वातावरणातून शोषूण घेतात. उभे राहिले आहे.
CO, वायु वातावरणातील उष्मा धरून ठेवतो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान सरासरी कक्षेमध्ये ठेवण्यास मदत होते. CO, वायु पृथ्वीचे Heat Budget स्थिर ठेवण्यासाठी मदत करतो.
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणातील CO, चे प्रमाण वाढत आहे. CO, हा महत्त्वाचा हरितगृह वायु (Green House Gas) आहे. वर्षानुवर्ष याचे प्रमाण वाढल्याने हरितगृह वायु परिणाम घडून येत आहे आणि हवामान बदलाचे संकटउभे राहिले आहे
iv) ओझोन (0) : ओझोन हे ऑक्सिजन वायुचे अस्थिर (Unstable) रासायनिक संरूपण असून याचे वातावरणातील प्रमाण ०.०००५% आहे.
• वातावरणात असमानरित्या पसरलेला हा वायु भूपृष्ठापासून २० किमी ते ४५ किमी पर्यंतच्या भागात मिळतो. हा वाय स्थितांबरात मिळतो तसेच तपांबरात मिळणारा O, प्रदूषक असून वनस्पती व सजीवसृष्टीस घातक असतो.
• स्थितांबरातील ओझोन थर 'UV rays type b' या अतिनील किरणांना थोपविण्याचे व शोषूण घेण्याचे कार्य करते.
v) बाष्प (Water Vapour) : वातावरणातील अनिश्चित वायु घटकांपैकी बाष्प हा महत्त्वाचा घटक आहे. याचे वातावरणातील प्रमाण ०.२% ते ४% पर्यंत बदलते. शीत आणि शुष्क प्रदेशात बाष्पाचे प्रमाण अत्यंत कमी असते तर उष्ण कटीबंधीय भागात हे प्रमाण सर्वाधिक असते.
♦️वातावरणाची रचना (Structure of Atmosphere)
*वातावरण हे अनेक स्थरांची रचना असणारा घटक असून येथील प्रत्येक स्थराची वैशिष्ट्ये भिन्न भिन्न असतात. या थरांची रचना व वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. .
*तपांबर (Troposphere) :
भूपृष्टापासून सरासरी १३ किमी उंचीपर्यंत असणाऱ्या वातावरणास तपांबर म्हणतात. वातावरणाच्या या थराची जाडी धुवानजीक ८ किमी असते तर विववृत्ताजवळ १८ किमी असते..
* उंचीवर जातांना वातावरणाचे तापमान एक किमी उंचीला ६.५°C ने कमी होते. त्यामुळे तपांबराच्या शेवटी विषुववृत्तावर तापमान -८०°C असते तर ध्रुवावरील तापमान -४५°C असते. उंचावर जाताना तापमान घटन्याच्या दरास 'Lapse rate' म्हणतात.
*विषुववृत्ताजवळ तपांबराची जाडी अधिक असण्याचे कारण म्हणजे वर्षभर सूर्यप्रकाशाचे प्रमाण अधिक असते. याठिकाणी (convectional current) वातावरणात अभिसरणाचे प्रवाह अधिक असतात.
*याउलट ध्रुवानजीक सूर्यप्रकाश कमी असल्याने अभिसरण प्रवाहाचे प्रमाण कमी असते तसेच हवा जड असल्याने येथे वातावरणाची जाडी कमी असते. सरासरी १३ किमी उंचीनंतर तपांबर संपते. तपांबराची ही सीमा रेषा नसून एक प्रदेश असतो. याला तापस्तब्धी (Tropopause) म्हणतात.
*तपांबर संपल्यानंतर काही उंचीसाठी तापमान घटण्याचे प्रमाण थांबते. या प्रदेशात 'तापस्तब्धी (Tropopause) म्हणतात. . तपांबरात वादळे निर्माण होणे, आवर्त येणे यांसारख्या घटना घडतात.
* हवामानाच्या घटकांचा विचार करता (पर्जन्य, धुके, गडगडाटी वादळे इ.) सर्व घटना तपांबरात होतात. याचे प्रमुख कारण म्हणजे तपांबरातील पाण्याची बाष्प होय.
*तापस्तब्धीवर ऋतु हंगाम आणि जेट स्ट्रीमचा परिणाम होतो.
*) तापस्तब्धी (Tropopause)
• या भागात तापमान स्थिर असून हा भाग तपांबर आणि स्थितांबर यांच्या दरम्यानचा संक्रमण पट्टा म्हणून कार्य करतो. हा भाग तपांबराचा सर्वोच्च थर म्हणून कार्य करतो.
♦️स्थितांबर (Stratosphere) :
• तपांबराच्या सीमेपासून ५० किमी उंचीपर्यंतच्या वातावरणाच्या थरास स्थितांबर म्हणतात.
• या भागात उंचावर जातांना तापमान वाढते आणि स्थितांबराच्या सर्वोच्च सीमेवर तापमान ०°C पर्यंत वाढलेले असते. या तापमान वाढण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी आढळणारा ओझोनचा थर होय. .
• स्थितांबर थर ढग, आवर्त आणि वादळे यांपासून मुक्त असल्यामुळे येथे विमाने वाहण्यासाठी आदर्श परिस्थिती असते.
बहुतांशवेळी स्थितांबराच्या खालच्या थरात ‘सिरस् (Cirrus) ढग' मिळतात.
• स्थितांबराच्या २० किमी ते ४५ किमी उंचीपर्यंतच्या थरामध्ये ओझोन वायुचा थर आढळतो.
• हा थर 'UV rays type b' जंबुपार किरणे शोषून घेतो.
• या थरात अनेक रासायनिक प्रक्रिया घडत असल्याने याना 'Chemosphere' असेही म्हणतात.
• या थरात उंचावर जातांना तापमान प्रत्येक किमीला ५°C या दराने वाढते.
a) ओझोनचा थर (Ozonosphere)
• स्थितांबर आणि मध्यांबर यादरम्यानच्या संक्रमण पट्ट्यास ‘स्थितस्तब्धी (Stratopause)' म्हणतात.
iii)मध्यांबर (Mesophere)
*स्थितस्तब्धी नंतर ८० किमी उंचीपर्यंतच्या थरास मध्यांबर म्हणतात.
• अवकाशातून पडणाऱ्या उल्का या भागात नष्ट होतात. त्यामुळे येथे धुळीचे प्रमाण अधिक असते.
iv) उष्मांबर (Thermosphere)
• वातावरणाच्या. या थरामध्ये वाढत्या उंचीबरोबर तापमान वेगाने वाढते.
*अयनांबर हा या थराचा भाग असून तो ८० ते ४०० किमी या उंचीवर आढळतो. .
*हा थर रेडिओ प्रसारणासाठी मदत करतो तपाबर कारण पृथ्वीवरून पाठविलेल्या रेडिओ लहरी या थरातून जातांना परावर्तीत होऊन भुपृष्ठावर परत येतात.
• आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानके (International Space Station) आणि उपग्रह (Satellite) या थरातून मार्गक्रमण करीत असतात. या भागात वायुचे कण एकमेकांपासून दुरदूर असल्यामुळे याठिकाणी उष्मा जाणवत नाही. तसेच उष्मा कमी जाणवतो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या थरामध्ये हवेचा कमी असणारा दाब होय.
• Arora Borialis (उत्तर ध्रुवाजवळ) Arora Austrialis (दक्षिण ध्रुवाजवळ) यासारख्या घटना या थरामध्ये घडतात. या घटनांमध्ये अवकाश निरनिराळ्या रंगानी प्रकाशमान होते.
a) अयनांबर (Ionosphere)
. ८० किमी ते ४०० किमी उंची पर्यंतच्या वातावरणाच्या थरात विद्युतीय दृष्ट्या प्रभारीत कणांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याला अयनांबर म्हणतात.
• या थरामध्ये वायुंचे अणु प्रभारीत (Charged) असतात.
• या प्रभारीत कणांमुळे या थरातून जाणाऱ्या रेडिओ लहरी पृथ्वीकडे परावर्तीत होतात. या थरामध्ये उंचावर जातांना सूर्यप्रकाशाचे प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढते.
v) बाह्यांबर (Exosphere)
• अयनांबरापासून (४०० किमी उंचीनंतर) बाहेर पसरलेल्या वातावरणाच्या सर्वोच्च थरास बाह्यांबर म्हणतात.
• यामधील हवा अत्यंत विरळ असून येथील हवेचे कण एकमेकांपासून अत्यंत दुरदूर असतात त्यामुळे उंचीवर जाताना तापमान वाढत असले तरीही येथील तापमान जाणवत नाही.
• या थरामध्ये हायड्रोजन आणि हेलियम वायु असतात.
वातावरणाच्या थरातून जाणाऱ्या ध्वनीचा वेग
• ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या तापमानाशी समानुपाती (Directly Proportional) असल्यामुळे तपांबरात ध्वनीचा वेग उंची नुसार कमी होतो तर स्थितांबरात ध्वनीचा वेग उंचीसमवेत वाढतो.
♦️हवामान व संबंधीत घटक
*मानव आणि इतर जीवप्रजातींवर परिणाम करणाऱ्या भौतिक पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हवामान होय. यामध्ये उष्मा आर्द्रता आणि हवेच्या हालचालींचा समावेश होतो. भारतासारख्या विकसनशील देशात हवामान आर्थिक संरचना, जीवनमान पद्धती, आहार पद्धती, संस्कृती आणि लोकांचे राहणीमान यांवर परिणाम करते. भारतामध्ये वाढत्या औदयोगिकरण आणि वैज्ञानिक विकासानंतरही मान्सुन पर्जन्यावरील अवलंबित्व कमी झालेले नाही.
*भारतातील पर्जन्य हे उष्णकटीबंधीय मान्सुन पर्जन्य प्रकारात मोडले जाते. या पर्जन्यावर भारताच्या भौगोलिक स्थानाचा आणि ग्रहिय वाऱ्यांचा परिणाम होतो.
♦️हवामान
*भारतीय हवामानाचे वैशिष्टपुर्ण गुणधर्म (Salient features of Indian climate)
1) वाऱ्याच्या दिशेचे परावर्तन (Reversal of Wind)
वर्षाच्या विविध हंगामानुरूप भारतातील वाऱ्याची दिशा बदलते.सर्वसाधारणपणे हिवाळयांमध्ये वारे ईशान्य दिशेकडून वायव्य दिशकडे वाहू लागतात.
हे वारे जमिनीवरून वाहत असल्यामुळे ते शुष्क असतात व त्यांचे तापमान कमी असून हवेचा दाब अधिक असतो.याउलट उन्हाळयात वाऱ्याच्या दिशेत परावर्तन होऊन वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहू लागतात. नैऋत्येकडून येणारे वारे समुद्रावरून येत असल्यामुळे ते पाऊस देतात.
• वाऱ्यांना नाव देताना सर्वसाधारणपणे त्यांच्या उगमाच्या दिशेचा विचार केला जातो. जर वाऱ्यांचा उगम पुर्व दिशेकडून होत असेल तर त्यास पूर्वीय वारे म्हणतात. उदा. विषूववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागात वाहणारे ग्रहीय वारे (planetary winds) पूर्वीय वारे म्हणून ओळखले जातात.
. याबरोबरच भारतात येणारे मान्सून वारे नैऋत्य दिशेने (south - west) येतात त्यामुळे त्यांना नैऋत्य मान्सून वारे म्हणतात.
• स्थानिक वाऱ्यांमध्ये (Local Winds) दिवसा पर्वतीय भागात सूर्यकिरणांमुळे तापमान अधिक असते (हवेचा दाब कमी असतो) त्यामुळे वारे दरीय भागातून पर्वताकडे वाहू लागतात त्यांना दरीय वारे (valley Winds) म्हणतात. रात्री याउलट परिस्थिती असते म्हणून या वेळी पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्यांना पर्वतीय वारे (mountain winds) म्हणतात.
ii) भूभागावर आळीपाळीने निर्माण होणारे कमी आणि जास्त दाबाचे पटटा :
भारतीय भूभागावर हंगामानुसार हवेचा दाबाचे प्रमाण बदलते. हिवाळयात उत्तर भारतामध्ये कमी तापमानामुळे हवेचा दाब वाढतो तर उन्हाळयात अत्यंत अधिक तापमानामुळे हवेचा दाब कमी होतो. हा हवेचा दाब भूभागावर वाहणाऱ्या हवेच्या दिशेचे आणि वेगाचे नियंत्रण करतो.
i) हंगामी आणि परिवर्तनशील पर्जन्य (Seasonal and Variable Rainfall)
भारतामध्ये ८०% पर्जन्य हे उन्हाळयाच्या शेवटच्या भागात पडते. हे पर्जन्य १ ते ५ महिन्यांमध्ये भारताच्या विविध भागात पडते. मान्सून पर्जन्य हे फार कमी कालावधीत विखुरलेले असून अत्यंत कमी कालावधीत प्रपाताचा पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती उदभवते. उदा. गंगा, ब्रम्हपुत्रा,कोसी नदीचा मैदानी प्रदेश येथील पर्जन्यात स्थल कालपरत्वे भिन्नता आढळते.
• हे पर्जन्य फार थोडया काळासाठी पडते व मोठा कालावधी कोरडा असतो.
• या मान्सून पर्जन्यामध्ये स्थलिय भिन्नता आढळते. उदा. चेरापुंजी तसेच मौसिनराम येथे पडणारे पर्जन्य राजस्थान मधील जैसलमेर येथे दहा वर्षामध्ये पडणाऱ्या एकूण पर्जन्यांपेक्षा अधिक आहे.
iv) हंगामाची बहुलता (Plurality of seasons) :
• भारतीय हवामानाचे वैशिष्टयपुर्ण महत्व म्हणजे येथे अनेक हंगाम असून साधारणपणे तीन हंगाम महत्वाचे आहेत.काही वेळेस वर्ष सहा हंगामात विभागले जाते. (हिवाळा,परतीचा हिवाळा, वसंत, उन्हाळा, पर्जन्यकाळ, शरद)
v) भारतीय हवामानाची एकता(Unity of Indian climate):
• हिमालयासंबंधीच्या पर्वतरांगा भारतीय उपखंडाच्या उत्तरेस पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत.या उंच पर्वतरांगामुळे मध्य आशिया तसेच सायबेरीयावरून हिवाळयात वाहणारे शीत वारे भारतीय उपखंडात येत नाहीत. त्यामुळे कर्कवृत्ताच्या उत्तरेस असणारा भुभाग हा उष्णकटीबंधीय हवामान अनुभवतो. या पर्वतरांगा मान्सुन वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडण्यास कारणीभूत ठरतात. अशाप्रकारे संपूर्ण भूभाग मान्सून वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत असल्यामुळे संपुर्ण भुभाग मान्सून प्रकारच्या हवामानाखाली येतो.
vi) भारतीय हवामानाची विविधता (Diversity of Indian Climate)
भारतीय हवामान मान्सुन प्रकारचे असले तरीही यामध्ये प्रादेशिक विविधता आणि परिवर्तनशीलता आढळते. उदा.पश्चिम राजस्थानमध्ये उन्हाळयात तापमान ५५°C पर्यंत असते तर हिवाळयात काश्मिरमधील लेह ठिकाणचा पारा उणे ४५०० पर्यंत पडतो. हवामानातील बदल वारे, तापमान, पर्जन्य,आर्द्रता आणि शुष्कता यामध्ये जाणवतो. हवामानातील हा बदल भारताचे स्थान, प्रादेशिक रचना,उंची, समुद्रापासूनचे अंतर, पर्वतीय प्रदेशापासूनचे अंतर आणि विविध प्रदेशाची स्थानिक रचना यांवर अवलंबून असते.
♦️भारतीय मान्सून (Indian Monsoon)
*मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसम Mausim शब्दापासून बनलेला असून याचा अर्थ 'हंगाम' होय. मुलतः मान्सून हा शब्द मध्य युगात अरबी व्यापारी हिंदी महासागराच्या उत्तर भागात हंगामानुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांसाठी वापरत असत
.जगात कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानच्या भागात भूखंडाच्या पूर्व बाजूस या प्रकारचे हवामान अनुभवयास मिळते.
जगात अमेरीका, आफ्रीका खंडाचा पूर्व भाग, या ठिकाणी या प्रकारचे हवामान अनुभवयास मिळते.
* मान्सून हा अत्यंत क्लिष्ट प्रकार असून शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या उत्पत्तीसंबंधी विविध सिध्दांत मांडले आहेत. त्यांपैकी महत्वाचे सिध्दांत म्हणजे
1) उष्मा सिध्दांत (Thermal concept) : ‘हॅले' या प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञाने (ज्याने धुमकेतुचा शोध लावला) अभ्यासाद्वारे दाखवून दिले की भारतीय मान्सूनच्या निर्मितीचे प्रमुख कारण म्हणजे जमीन आणि पाणी यांचे तापन्याचा आणि थंड होण्याचा विभेदात्मक दर होय (Differential rate a heating cooling) या सिध्दांतानुसार मान्सूनचे वारे म्हणजे खारे वारे (Sea breeze) व मतलई वारे (Land breeze) यांचे विस्तारीत स्वरूप होय.
• हिवाळयामध्ये आशिया खंडाचा बराचसा भाग शेजारील समुद्रापेक्षा वेगाने थंड होतो. भूखंडाचे तापमान कमी असल्याने या ठिकाणी हवेचा दाब अधिक असतो तर शेजारील सागरजलाचे तापमान अधिक असल्याने त्या ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पटटा निर्माण होतो. अशाप्रकारे जमीन आणि पाणी यांमध्ये हवेच्या दाबातील फरक निर्माण होतो.त्यामुळे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वारे वाहू लागतात. हे वारे खंडाच्या अंतर्गत भागातून येत असल्याने ते शुष्क तर असतातच ते परंतु ते अति उत्तरे कडून येत असल्याने ते अतिशय थंड असतात.
• उन्हाळयात तापमान आणि हवेच्या दाबाची परिस्थिती उलट होते. उन्हाळ्यात भुभागाचे तापमान फार वेगाने वाढते त्यामुळे याठिकाणचा हवेचा दाब अत्यंत कमी होतो. यामुळे साधारणपणे विषुववृत्तानजीक असणारे Inter-tropical converagence zone (ITCZ) उत्तरेकडे सरकून भारतीय भूभागाच्या मधून जाते. ITCZ च्या भूभागावरच्या आगमनामुळे दुरदुरवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे वारे समुद्राकडून जमीनीकडे वाहू लागतात. हे उष्ण वारे सागरावरून येतांना स्वतः सोबत पाण्याची बाष्प घेऊन येतात त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते.
या सिध्दांतील त्रूटी
• हा सिध्दांत भारतीय मान्सूनचे स्थलकालपरत्वे भिन्न वितरण, मान्सूनचे अचानक आगमन आणि मान्सून पर्जन्यातील खंड या वैशिष्टयांचे स्पष्टीकरण देण्यास अयशस्वी ठरतो.
• या सिध्दांताच्या मांडणीविरूध्द हवेच्या दाबाचे पट्टे स्थिर नसून त्यांची जागा बदलत राहते. या सिध्दांताने दिल्याप्रमाणे पर्जन्य हे केवळ आरोह प्रकारचे पर्जन्य असते. परंतु साधारणपणे पर्जन्य हे आरोह (convectional), प्रतिरोध (orographic) आणि आवर्त (cyclonic) या तिन्ही प्रकारचे असू शकते.
♦️. दक्षिण प्रशांत महासागरात निर्माण होणारे ENSO (EI NINO and Southern Oscillation) भारतीय मान्सुनवर अल्-निनो, Southern Oscillation
. अ) अल्-निनो (EI-Nino)
• अल्-निनो म्हणजे प्रशांतमहासागराच्या पूर्वेकडील भागात सागरी प्रवाहांची दिशा उलट होणे भारतीय मान्सुन आणि अल्-निनो हे एकमेकांशी समचलनात संबंधीत नसले तरीही ज्या वर्षी अल्- निनो सामर्थ्यवान असतो त्यावेळी पर्जन्याचे प्रमाण कमी असते.
Southern Oscillation :
यामध्ये यामध्ये हवामानाच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी हिंदी महासागरातील 'डार्विन बेटावरील' आणि पॅसिफिक महासागरातील 'ताहिती बेटावरील हवामान परिस्थितीचा विचार केला जातो. ज्यावेळी हिंदी महासागरात हवेचा दाब अधिक असेल.
त्यावेळी पॅसिफिक महासागरात हवेचा दाब कमी असेल. इतर वेळी परिस्थिती उलट असेल यासच See-saw Pattern म्हणतात. या परिणामाच्या अभ्यासासाठी (Southern Oscillation Index) (SOI) ही श्रेणी वापरली जाते.
sol = (ताहिती बेटावरील हवेचा दाब - डार्विन बेटावरील हवेचा दाब)
जेव्हा SOI ) 0 उत्तम मान्सुन = ला निना परिस्थिती जेव्हा SOI ( 0 भारतातील मान्सुनचे कमी प्रमाण = अल-निनो परिस्थिती
♦️भारताचे हवामान विभाग (Climatic Regions of India सर्वसाधारणपणे भारताचे हवामान उष्णकटीबंधीय मान्सुन प्रकारचे आहे असे म्हटले जाते.
*परंतू भूभागाचा महत्तम अक्षवृत्तीय विस्तार, उत्तर दिशेला हिमालयाचे अस्तित्व, दक्षिणेस हिंदी अवाठर्वप महासागराचे सानिध्य यामुळे भारताच्या तापमान आणि पर्जन्य वितरणात बदल निम्न आढळून वाढवटी येतो.
*भारताच्या अशा वैविध्यपूर्ण हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्याचे पुढील हवामान विभागात वर्गीकरण केले जाते. हवामान विभाग म्हणजे असा प्रदेश ज्यावर तापमान, हवादाब, वारे, आर्द्रता व पर्जन्य यांचा | परिणाम होऊन निर्माण झालेली हवामान परिस्थिती सर्वत्र सारखी असते.
तापमान आणि पर्जन्य यांच्या अभ्यासावरून हवामान विभाग पाडले जातात. भारताचे हवामान विभाग कोप्पेन (Koppen) या शास्त्रज्ञाने दिलेल्या सिद्धांतानुसार पाडले गेले असून ते पुढील प्रमाणे आहेत.
*कोप्पेन या हवामानतज्ज्ञाने मासिक सरासरी तापमान आणि मासिक सरासरी पर्जन्य याचा वापर करून भारताचे पुढील हवामान विभाग पाडले आहेत.
1) शुष्क उन्हाळा असणारे मान्सुन प्रकारचे हवामान (Mansoon type with dry season in Summer (As)
या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडतो. या भागात ईशान्य मान्सुन वाऱ्यामुळे पडणाऱ्या पर्जन्याचा प्रभाव आढळता.
उदा. तामिळनाडु मधील कोरोमंडलचा किनारा.
ii) उष्णकटीबंधीय सव्हाना प्रकारचे | Tropical Savannah type) काही किनारी प्रदेश वगळता द्वीपकल्पीय पठाराचा बराचसा भाग या हवामान विभागाच्या अंतर्गत येतो.
ii) निम शुष्क स्टेपी प्रकारचे ! Semi arid Steppe Climate (BShw) Boat वाहवरीश करा दिया भाग (पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश) तसेच गुजरात, राजस्थान,यामध्ये द्वीपकल्पीय पठाराचा भूअंतर्गत
हरियाणा, पंजाब आणि जम्मु काश्मीरचा काही भाग याचा समावेश होतो.
iv) उष्ण वाळवंटी प्रकारचे Hot desert type (BWhw) राजस्थानच्या अतिपश्चिमेकडील भागात या प्रकारचे हवामान आढळते
v) | शुष्क हिवाळा असणारे मान्सुन प्रकारचे (Cwg) हवामान गंगेच्या मैदानी प्रदेशाचा बराचसा भाग या प्रकारचे हवामान अनुभवतो.
vi) शीत-आर्द्र हिवाळा असणारे छोट्या उन्हाळ्याचे हवामान (Cold - Humid Winter type with short summer (Dfc):ईशान्य भारताचा अति ईशान्येकडील भाग (अरुणाचल प्रदेशचा बराचसा भाग) या प्रकारच्या हवामानाखाली येतो.
vii) ध्रुवीय प्रकारचे (Polar Type - E) : जम्मु काश्मीर आणि शेजारील पर्वतीय भागाचे हवामान या प्रकारात मोडते.
Viii) छोटा शुष्क कालावधीचे मान्सुन हवामान (Monsoon Type with Short dry Season (Amw) :
गोवा व महाराष्ट्राचा पश्चिम किनाऱ्याचा दक्षिण भागामध्ये आढळणाऱ्या हवामानाचा यात समावेश होतो.
भारताची प्राकृतिक रचना | ||
भारतीय राज्य त्यांच्या राजधानी आणि राज्यभाषा | ||
भारतातील संपूर्ण राज्यांची माहिती | ||
भारतातील केंद्रशासित प्रदेश | ||
भारतातील प्रमुख नद्या | ||
भारतातील डोंगररांगा /शिखरे | ||
भारतातील प्रमुख | ||
भारतीय सांस्कृतिक वारसा | ||
भारतातील प्रमुख | ||
भारताचे वातावरण | ||
भारतीय मृदा | ||
भारतीय खनिजसंपत्ती | ||
भारतातील प्रमुख | ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा