वैदिक संस्कृती
वैदिक संस्कृतीचे निर्माता - आर्य.
ज्ञान श्रवण क्रियेतून ग्रहण करत व पुढील पिढीला सांगत म्हणून वैदिक साहित्याला श्रुतिसाहित्य म्हणतात.
आर्यांचे मूळ - मध्य आशियातील बॅक्ट्रिया किंवा आल्प्स पर्वताच्या पूर्व क्षेत्रातील युरेशिया.
ऋग्वेदिक काळ - (१५०० ई.पू. ते १००० इ.पू.). उत्तरवैदिक काळ - (१००० इ.पू.-६०० इ.पू.)
भौगोलिक क्षेत्र
ऋग्वेदात सप्तसैंधव प्रदेशाचे वर्णन -
सिंधू , सरस्वती, शतुद्रि (सतलज), विपासा (व्यास), परूष्णी (रावी), वितस्ता (झेलम), अक्सिनी (चिनाब) या सात नद्यांनी व्यापलेले क्षेत्र. (Imp for MPSC )
उत्तरवैदिक काळ -
यांचा विस्तार पूर्वेकडे गंगा-यमुना खोऱ्यात झाला. विंध्य पर्वत हि दक्षिण सीमा ठरली. या क्षेत्राला आर्यावर्त म्हटले गेले.
सरस्वती नदी - सर्वाधिक पवित्र ऋग्वेदात
सिंधु नदी - सर्वाधिक उल्लेख ऋग्वेदात
वैदिक साहित्य
यामध्ये चार वेद, विभिन्न ब्राह्मणग्रंथ, आरण्यक व उपनिषद यांचा समावेश
उपवेदांना वैदिकोत्तर साहित्यात ठेवले जाते.
वेदत्रयी मध्ये - (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद) यांचा समावेश होतो.
१) ऋग्वेद -
हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. याची रचना सप्तसैंधव प्रदेशात
यात १० मंडल, १०२८ सूक्त, १०५८० मंत्र.
याच मंत्रांना ऋचा असं म्हणतात.
याचे संकलन वेदव्यासांनी केले.
तैतरेय -
या ऋग्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथात समुद्र, सोमयज्ञ व राज्याभिषेकाचे वर्णन येते
आरण्यकात-
दार्शनिक सिद्धांत व रहस्यवादाचे वर्णन आहे.
उपनिषद (१०८)-
उपनिषदांना वेदान्त म्हटले जाते याचा मूळ विषय आत्मा व ब्रह्म असून यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिले.
२) सामवेद-
गायनाशी संबंधित असून याच्या छांदोग्य या उपनिषदात तीन आश्रम, ब्रह्म व आत्मा यांची अभिन्नता वर्णन केली आहे.
३) यजुर्वेद
हा एक कर्मकांडीय वेद असून गद्य व पद्य दोन्ही रूपात आहे.
शुल्क यजुवेदातील शतपथ ब्राह्मणात पुनर्जन्म सिद्धांत सांगितला आहे.
४) अथर्ववेदः
याला अथर्व अंगिरस असेही म्हणतात.
यामध्ये वशीकरण, जादू-टोना, मरण, भूत-प्रेत आणि विविध औषधांचे वर्णन आहे.
अथर्ववेदात मगध व अंग या सुदूरवर्ती प्रदेशाचा उल्लेख आला आहे.
याच्याशी संबंधित मुंडकोपनिषदात सत्यमेव जयते व यज्ञाची तुलना तुटक्या नौकेशी केली.
वैदिक संस्कृतीचे पुरातात्विक साक्ष ऋग्वेद साक्ष :
काळे व लाल मृदभांड (Black and red ware)
ताम्र पुंज (copper hoards)
गेरूवर्णी मृदभांड (O.C.P. ochre colored pottery)
उत्तरवैदिक साक्ष :
चित्रित धुसर मृदभांड (Painted Grey Ware P.G.W.)
उत्तरी काळे पॉलिशयुक्त मृदभांड (Northern Black polished ware NBPW)
वैदिकोत्तर साहित्य -
यात वेदांग व उपवेदाचा समावेश होतो.
* वेदांगे
यांची संख्या ६ असून वेदांना नीट समजून घेण्यासाठी यांची रचना करण्यात आली. यात शिक्षण, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद, ज्योतिष यांचा समावेश होतो.
* शिक्षण : स्वरांचे शुद्ध उच्चारण संबंधी
* कल्प : कर्मकांड संबंधी विधिनियम तीन भागात वर्णन करण्यात आले आहेत.
* स्रोतसूत्र : यात यज्ञासंबंधी वेदी मोजमाप (रेखागणित चा प्रारंभ) वर्णन करण्यात आले.
* गृह्यसूत्र : यात गृहकर्मकांड व यज्ञाचे वर्णन
* धर्मसूत्र : यात राजकीय, सामाजिक, धार्मिक कर्तव्य वर्णाश्रम, पुरुषार्थ विषयी वर्णन केले आहे.
* व्याकरण -
व्याकरणसंबंधी प्राचीनतम ग्रंथ अष्टाध्यायी आहे. अष्टाध्यायी (पाणिनी), महाभाष्य (पतंजली), वार्तिक (कात्यायन). या तिघांना मुनीत्रय म्हटले जाते.
* निरूक्त: हे शब्दाचे व्युत्पत्तीशास्त्र आहे.
* छंद : छंदामध्ये पद्यांना सूत्रबध्द केले आहे. पिंगलचे छंदशास्त्र प्रसिध्द आहे.
* ज्योतिष : यात ब्रह्मांड व नक्षत्राविषयी भविष्यवाणी केली आहे.
* उपवेद : उपवेद चार असून वेदांशी संबंधित आहेत. यामध्ये शिल्पवेद (ऋग्वेद), धनुर्वेद (यजुर्वेद),गंधर्व वेद (सामवेद), आयुर्वेद (अथर्ववेद) यांचा समावेश होतो.
भारतीय संस्कृतीचे अन्य आधारभूत ग्रंथ
• स्मृतीग्रंथ
स्मृतीग्रंथांना हिंदू धर्माचा कायदा ग्रंथ समजले जाते.
याची रचना पद्यरूपात आहे. (अपवाद-विष्णुस्मृती).
* मनुस्मृती
हिंदू धर्मासंबंधी प्रमुख व सर्वाधिक प्रामाणिक ग्रंथ आहे जो हिंदू समाज आणि सभ्यतेचे सर्वाधिक लोकमान्य स्वरूप प्रकट करतो.
स्मृतीची रचना मौर्योत्तर शुंग काळात.
मनुस्मृतीत चार वर्ण, जाती, दासप्रथेचे प्रकार वर्णन.
मनूने स्त्रीयाचे वेद , अध्ययन नाकारले (संपत्तीहक्क नाकारला, नियोगप्रथा (पतिपासुन पुत्रप्राप्ती होत नसेल तर इतर पुरुषांकडून संभोग करून पुत्र प्राप्ती करता येते) नाकारली.
* याज्ञवल्क स्मृती
स्त्रियांना सर्वप्रथम संपत्तीचा अधिकार दिला गेला.
नियोग प्रथा अनिंद्य ठरवली.
विधवांना समस्त उत्तराधिकारात स्थान दिले.
द्यूतक्रिडेला राज्याच्या महसूलचा स्त्रोत म्हणून मान्यता दिली गेली.
• नारदस्मृती
गुप्तकाळात लिहिली.
स्त्रीपुनर्विवाह, दासप्रथामुक्ती, नियोग, विधवांचे संरक्षण संबंधी विधान.
सुवर्ण मुद्रा दीनाराचा उल्लेख.
• विष्णुस्मृती
गुप्तकालीन, गद्य रूपातील रचना आहे.
• देवलस्मृती
ही पूर्वमध्यकालीन स्मृती आहे.
यात धर्मातरीत हिंदूना पुन: हिंदू धर्मात सामील करण्याचे विधान मिळते.
मनुस्मृतीवरील टीकाकार - मेधातिथी, कुलूकभट्ट, गोविंदराज, भरूचि यांचा समावेश.
याज्ञवल्क स्मृती वरील टिकाकार - विश्वरूप, अपरार्क
• मिताक्षरा
लेखक - विज्ञानेश्वर ( कल्याणी चालुक्य शासक विक्रमादित्य यांच्या दरबारात )
यांनी पित्याच्या संपत्तीत मुलांचा अधिकार त्याच्या जीवनाकाळापासून मान्ये केला काही राज्य सोडून या विधीचे प्रचलन सके भारतात आहे.
• दायभाग
लेखक - जीमुतवाहन.
यानी पूत्रांना पित्याच्या संपत्तीचा वाटा पित्याच्या मृत्युनंतरच सांगितला.
या विधानाचे प्रचलन भारताच्या बंगाल, आसाम व काही पूर्व राज्यात दिसते.
• पुराण :
संकलनकर्ता - महर्षीलोमहर्ष
एकुण १८ पुराण असून सर्वाधिक प्राचीन मत्स्यपुराण आहे. पुराणामध्ये प्राचीन राजवशांचे वर्णन आहे.
ऋग्वैदिक संस्कृती
राजकीय संगठन
समाजव्यवस्था हि चढत्या क्रमाने - कुल-ग्राम- विश-जन
• दाशरज्ञ युद्ध
ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात रावी नदीकाठी भरतवंशी राजा सुदास व अन्य दहा जन यांमध्ये झालेल्या युद्धाचे वर्णन .
राजासुदास विजयी .
युद्धात दोन्ही बाजूकडून आर्य-अनार्य सहभागी .
• राजाचे पदाधिकारी
पुरोहित, सेनानी, ग्रामणी, सूत (रथ हाकणारा), रथकार (सुतार), कर्मरा (धातुकर्मी), पुरप (दूर्गपती), स्पर्श (गुप्तचर) दूत यांचा समावेश
पुरोहित सर्वश्रेष्ठ असून तो राजाचा मार्गदर्शक, शिक्षक, मित्र व दार्शनिक होता.
गावाचा प्रमुख ग्रामणी होता.
पुरोहिताच्या सहाय्याने राजा न्याय करायचा.
शिक्षा ही गायीच्या स्वरूपात दिली जायची.
अपराधीयांचा उल्लेख - जीवगृह
व पोलीस यांचा उल्लेख - उग्र
प्रसिद्ध संस्था
१) विदथ
ही महत्वपूर्ण सभा होती जिचा ऋग्वेदात सर्वाधिक २२ वेळा उल्लेख आला आहे. यामध्ये पुरुषांसोबत महिलांचा सहभाग होता.
२) सभा
उत्तरवैदिक काळात महिलांची सभेमध्ये भागिदारी बंद झाली.
३) समिती
सर्वसाधारण लोकांचा आवाज होती.
४) गण
कुलीन लोकांची सभा .
५) परीषद
एक प्रकारे जनजातीय सैन्य सभा होती. अंशत: मातृसत्ताक व अंशतः पितृसत्तात्मक होती. पुरोहिताचे यावर वर्चस्व होते.
सामाजिक जीवन
पितृसत्ताक व्यवस्था .
ऋग्वेदात जायेदस्थम् म्हणजे पत्नी हे गृह आहे असे संबोधून तिला महत्व दिले आहे.
ऋग्वेद काळात आंतरजातीय विवाह होत असत.
अनुलोम विवाह - यात पुरूष उच्चवर्णीय तर कन्या निम्न वर्णीय.
प्रतिलोम विवाह - यात पुरूष निम्न वर्णीय तर कन्या उच्चवर्णीय.
ऋग्वेदिक स्त्रियांची स्थिती
स्त्रियांना उपनयन संस्कार पुरूषांसारखा शिक्षणाचा अधिकार .
लोपामुद्रा, घोषा, सिक्ता, विश्ववारा, अपाला, निवावरी या विदुषी स्त्रियांनी ऋग्वेदातील ऋचा रचल्या.
स्त्रिया सभा व विदथ यामध्ये भाग घेत.
पुनर्विवाह, नियोग व बहुपती विवाहाचे स्वातंत्र्य .
हुंडा, पडदा, सती प्रथेचे उल्लेख मिळत नाहीत. यांना संपत्तीचा अधिकार प्राप्त नव्हता.
वर्ण व्यवस्था
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात पुरूषसुक्तात वर्णव्यवस्थेचे प्रथमताच वर्णन.
शुद्र शब्द - पहिल्यांदाच येथे वर्णन .
वर्णव्यवस्था - जाती किंवा विशिष्ट कार्याशी संबंधित नव्हती.
ऋग्वेदाच्या नवव्या मंडलात एक व्यक्ती म्हणतो “मी कवि आहे, माझे वडील वैद्य तर आई पीठ दळते". अशा प्रकारे कर्माच्या आधारे वर्णाचे विभाजन होते.
आर्य दोन्ही शाकाहारी व मांसाहारी .
सुरा पान निंदनीय असली तरी सोमपान प्रशंसनीय होते
ऋग्वेदात दासप्रथेचे प्रचलन होते. पुरूष व स्त्री दोन्ही प्रकारचे दास होते.
आर्थिक जीवन
कृषीपेक्षा पशूपालनाला अधिक महत्व होते. गाईनंतर दुसरा मुख्य पशू घोडा होता ज्याचा युद्ध व रथासाठी वापर केला जायचा.
कृषी
कृषी ही गौण आर्थिक क्रिया होती.
उर्वरा ही सुपीक भूमी होती.
खिल्य ही अनुपजाऊ भूमी होती.
मुख्य खाद्य पीक यव (जव) होते.
ऋग्वेदाच्या १६ व्या मंडलात कृषीचे वर्णन आले आहे.
उद्योग
रथकार, चर्मकार, धातूकार आदि शिल्पींचे वर्णन आले आहे.
सिंधू नदी (हिरण्यी) तून सोने प्राप्ती केले जाई. ऋग्वेदात लोह, चांदीचा उल्लेख नाही.
ऋग्वेदकाली अर्थव्यवस्थाही मुळत: ग्रामीण होती.
धर्म -
ऋग्वेदाचा प्रसिद्ध गायत्री मंत्र सविता (चमकणारा सूर्य) या देवतेला समर्पित आहे.
आद्य जीवाणू हिरण्यगर्भ याची उत्पत्ती पाण्यात झाली.
ऋग्वेदातील १० वे मंडल एकेश्वरवादाचे दर्शन घडवते.
उत्तरवैदिक कालीन संस्कृती
राजकीय जीवन
राजा उत्पत्तीचा सर्वप्रथम सिद्धांत ऐतरेय ब्राह्मणात येतो.
राज्याभिषेकासंबंधी राजसूय यज्ञाचे वर्णन शतपथ ब्राह्मणात आले.
राजसूय यज्ञात १७ प्रकारच्या जलाचा ऐंद्राभिषेक केला जायचा.
अश्वमेघ यज्ञ हा राज्यविस्ताराशी संबंधित होता.
सामाजिक जीवन
ऐतरेय ब्राह्मणात पूत्रीला सर्व दुःखाचे कारण समजले गेले.
याज्ञवल्क-गार्गी संवादाचे उल्लेख बृहदारण्यक उपनिषदात आले हे स्त्रियांची शिक्षण क्षेत्रातील प्रगती दर्शवितात.
उत्तरवैदिक काळात स्त्रीयांचा उपनयन संस्कार बंद झाला.
बालविवाह होऊ लागले.
विदुषी स्त्रिया - गार्गी, सुभला, वेदवती काशकृत्सनी यांचा उल्लेख येतो.
उत्तरवैदिक काळात गोत्र प्रथा प्रस्थापित
एकाच गोत्रातील व्यक्तिंचा विवाह निषिद्ध करण्यात आला.
या काळात तीन आश्रम (ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ) वर्णन करण्यात आले.
सर्वप्रथम जाबालोपनिषदात चार आश्रमांचा उल्लेख.
आर्थिक जीवन
सिंचनासाठी कालवा व्यवस्थेचे सर्वप्रथम वर्णन अथर्ववेदात येते.
आद्य नगरीय स्थळ हस्तिनापूर व कोशांबी यांचा उल्लेख आला.
धार्मिक जीवन
शतपथ ब्राह्मणात पुनर्जन्माचा सिद्धांत देण्यात आला.
वैदिक धर्म आणि त्याचे महत्व
प्रकृतिच्या नियमांना "ऋत" ही संज्ञा
अर्थात सूर्य पूर्वेकडून उगवतो व पश्चिमेकडे मावळतो हे सदैव चालते.
यज्ञाला देवतांची प्रशस्ती म्हटले गेले. यज्ञ याचा सामान्य अर्थ विधी-विधानातून काही मंत्रांच्या उच्चारणासोबत जव, तीळ, तूप, दूध यांची अग्निला आहूती देणे होय. यज्ञामुळे देवता बलवान होतात
ऋग्वेदात ऋत (नियम) चे संरक्षण वरूण करतो असे म्हटले आहे.
नास्तिक त्याला म्हटले जायचे जे प्रकृतीच्या नियमाचे पालन करत नाही.
एकेश्वरवाद
आर्यजन प्रारंभी विविध देवी-देवतांची आराधना करायचे. या बहुदेववादापासून एकदेववादाकडे वळताना विभिन्न देवतेतील एक शक्तिशाली देवता याला सर्वोच्च पदी बसवले गेले. याला ऋतस्यगोप म्हणजे प्राकृतिक नियमांचा संरक्षक म्हटले गेले.
उपनिषदामध्ये मोक्ष किंवा मुक्तीसाठी कर्मकांडाला महत्व दिले नाही तर समस्त विश्वामध्ये एकाच आत्म्याचे दर्शन करणे म्हणजे मोक्ष मानले गेले. मुक्तीचा अभिप्राय शारीरिक परीवर्तन नसून विचारामध्ये परिवर्तन असे मानले गेले. मुक्ती या जीवनात संभव मानली गेली.
सूत्र काळ : (६०० इ.पू. - ३०० इ.पू.)
वैदिक साहित्याला अक्षुण्ण व अबाधित राखून ठेवण्यासाठी आणि त्याला संक्षिप्त करण्यासाठी सूत्र-साहित्याची रचना झाली. यात वेदांगे (६), पाणिनीची अष्टाध्यायी(५०० इ.पू) आदी वेदोत्तर संस्कृत साहित्याची निर्मिती .
संस्कृती
जातींचा आधार कर्म नसून तो जन्मावरून .
आंतरवर्णीय विवाह, खानपान यावर प्रतिबंध
प्रथम तीन वर्ग (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) यांना द्विज संबोधले.
शुद्रांना अत्यंत हीन समजून वेद अध्ययन, यज्ञ, मंत्रोच्चारण अधिकार नाकारले.
सूत्रकाळात चार प्रकारच्या आश्रमाचे विधीवत वर्णन.
गृह्यसूत्रात १६ प्रकारच्या संस्कारचे उल्लेख- ( संस्काराचा संबंध शिक्षणाशी.)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
विवाह
ग्रह्यसूत्रात ८ प्रकारच्या विवाहाचे वर्णन-
|
|
सर्वोत्तम प्रकार, सर्वाधिक प्रचलित कारण यात वधूपिता स्वतः आपली कन्या वराला घरी बोलावून सोपवत असे. |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सूत्रकाळातच मुद्राप्रचलन झाले. या नाणींना आहत नाणी म्हटले गेले. हे मुख्यतः तांबे व चांदीचे होते. (५०० इ.पू.)( सूर्य, चंद्राचे निशान )
महाकाव्य काळ
रामायण
रचनाकार- वाल्मिकी
प्रारंभी याच्यात ६ हजार श्लोक .
अंतिमतः २४ हजार श्लोक - चतुर्विशंती साहस्त्रीसंहिता म्हणतात.
अनुवाद
रामायणाचा तामिळ भाषेत अनुवाद - कंबनने (चोल काळात) रामायणम असा केला,
बांग्ला भाषेत अनुवाद कृत्तिवास (वारबकशाह) याने केला.
२० व्या शतकात रामास्वामी नायकर यांनी तमिळ भाषेत सच्ची रामायणाची रचना केली.
महाभारत
संकलन - वेद व्यास.
प्रारंभी - ८८०० श्लोक - तेव्हा - जयसंहिता म्हटले
श्लोकांची संख्या २४ हजार - तेव्हा - भारत म्हटले .
१ लाख श्लोक -वर्तमान नाव महाभारत किंवा शतसाहस्त्री संहिता .
जगातील सर्वात मोठे महाकाव्य.( एकूण १८ पर्व ).
यातील भीष्म पर्व (६वे पर्व) याचाच एक भगवतगीता .
गीतेमध्ये अवतारवाद, कर्म, भक्ति व ज्ञान मार्ग याचे वर्णन.( कर्माला सर्वाधिक महत्व)
अनुवाद
तमिळ भाषेत (भारतम्) अनुवाद- पेरुन्देवनार याने केला.
बांग्लाभाषेत अनुवाद - मालाधार वसू यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा