MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

Rock System of Maharashtra- महाराष्ट्रातील प्रमुख खडक प्रणाली

♦️महाराष्ट्रातील प्रमुख खडक प्रणाली 


•अर्कियन कालखंडातील खडक (Archean Rock) (वय- ४ अब्ज वर्षे/4 Billion Yrs)

• हा अतिप्राचीन खडक आहे.

• या खडकामध्ये साधारणपणे जीवाश्मे आढळत नाहित कारण;

अ) या खडकाच्या निर्मितीवेळी जीवसृष्टी अस्तित्त्वात नव्हती.

ब) या खडकाचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरण (Metamorphism) झाले असल्यामुळे यातील जीवाश्म नष्ट झाले असू शकतात.

• अतिप्राचीन असल्यामुळे हा महाराष्ट्राच्या भूखंडाचा पायाभूत खडक आहे.

 • या खडकाचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरण झालेले दिसते.

• यामध्ये ग्रॅनाईट(कृष्णप्रस्तर/Granite) या अग्निज खडकाचे व नीस् (Gneiss) आणि शिस्ट् (Schist) या रूपांतरीत खडकाचे अधिक्य जाणवते.

♦️आढळ

• महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली जिल्हे - उत्तरपूर्व महाराष्ट्र 

• मराठवाड्याच्या काही भागात व नांदेड जिल्ह्यात ह्या प्रकारचे खडक आढळतात. सिंधुदुर्ग जिल्हा

♦️आर्थिक महत्त्व

• या खडकात धातू खनिजे विशेषतः लोह व मॅगनीजचे प्रमाण अधिक असते.

• भारतात या खडकात कोरडम, सिलिमनाईट, झिंक, तांबे, शिसे इ. खनिजेही आढळतात

* धारवाड कालखंडातील खडक (Dharwar Rock System) (वय- २ ते २.५ अब्ज वर्षे)

• हे प्राचीन खडक असून यामध्ये अग्निज, रूपांतरित, स्तरीत खडक आढळतात.

 • ही खडकप्रणाली २.५ अब्ज वर्षे ते १.८ अब्ज वर्षे एवढी जुनी आहे.

• ही स्तरीत खडकांचे रूपांतरण झालेली पहिली खडक प्रणाली आहे.

• हे खडक धातु खनिजांनी समृध्द असतात. उदा. लोह, मँगनीज, लेड, झिंक, सोने, चांदी इ.

• या प्रणालीमधील चॅम्पियन (Champion) प्रणाली जी कर्नाटकमध्ये आहे तेथे सोने आढळते. उदा. कोलार खाण.

• या खडक प्रणालीमध्ये खडकाचे डोलामाईट, संगमरवर (Marble), अभ्रक (Mica), सिलीमेनाईट, ग्रॅन्युलाईट, हॉर्नब्लेंड व गारगोटी हे प्रकार आढळतात. 

•प्रदेश भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग

♦️महत्त्व

. धातू खनिजांचा साठा सापडतो.

. मँगनीज(मंगल) हा प्रमुख धातू सापडतो.

*कडप्पा कालखंडातील खडक (१४००-६०० दशलक्ष (Million)वर्षे)

 •हे खडक 'पुराना (PURANA)' खडक प्रणालीचाच भाग आहेत

• हे खडक सर्वप्रथम आंध्रप्रदेश मधील कडप्पा येथे अभ्यासले गेले म्हणून यांना हे नाव पडले आहे.

• हे खडक लोअर पॅलिओझॉईक कालखंडात निर्माण झाले असावेत. या कालखंडात जीवसृष्टीचे अस्तित्व नव्हते म्हणून या खडक प्रणालीमधील स्तरीत खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

• हे खडक स्तरीत खडकाच्या रूपांतरणापासून तयार झालेले आहेत. . शेल, स्लेट, मायका यासारख्या खडक व खनिजासाठी प्रसिद्ध आहेत.

i) महत्त्वाचे खडक ?

• स्तरीत - पंकाश्म (Shale), चुनखडी (Lime Stone), वालुकाश्म (Sandstone)

 • रूपांतरीत - क्वार्टझाईट (Quartizite), स्लेट (Slate) -

ii) प्रदेश व आढळ

पूर्व महाराष्ट्र -यवतमाळ व चंद्रपूर (वर्धा नदीचे खोरे .)

 • दक्षिण महाराष्ट्र - कोल्हापूर

• पश्चिम महाराष्ट्र - सिंधुदुर्ग

iii)महत्व :

•सिमेंट, लोह, पोलाद कारखान्यात चुनखडीचा वापर केला जातो. डोलामाईटचा वापर सिमेंट कारखान्यात केला जातो.

*विंध्यायन कालखंडातील खडक (Vindhyan Rock system) (वय-१३००-६०० दशलक्ष वर्षे)

•विंध्य पर्वत हे गंगेचे मैदान व दख्खनचे पठार यांना विभाजित करतो. या खडक प्रणालीस विंध्य पर्वतावरून नाव पडले आहे.

• चित्तोडगड(राजस्थान) ते सासराम(बिहार) पर्यंत ही खडक प्रणाली पसरली आहे. . या खडकाची निर्मिती लोअर पॅलिओझॉईक कालखंडात झाली असली तरीही यात जीवाश्म आढळत नाहीत. . या खडकप्रणालीमध्ये पन्ना व गोवळकोंडा येथे हिऱ्याच्या खाणी आढळतात.

• लाल वालुकाश्म खडक हे या प्रणालीमध्ये प्रामुख्याने आढळतात.

• खडकाच्या भेगेमध्ये लाव्हारसाचे संचयन होणे यात हिरा या खनिजाचा स्त्रोत सांगता येतो.

i) महाराष्ट्रातील विस्तार - चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो.

ii) महत्व - इमारती बांधकामामध्ये लाल वालुकाश्म (Red Sandstone) प्रामुख्याने वापरतात. उत्तर भारतातील बहुतांश ऐतिहासिक इमारतीस लाल वालुकाश्मचा पुरवठा येथूनच केला गेला.

*गोंडवना कालखंडातील खडक (Gondawana Rock system) (वय-३५० दशलक्ष वर्षे)

• या खडकप्रणालीस ‘कार्बोनिफेरस खडक प्रणाली', 'द्रविडीयन खडक प्रणाली' असेही म्हणतात.

• कार्बोनिफेरस कालखंडामध्ये भूअंतर्गत भागात हालचाली होऊन भुपृष्ठाचा बराच भाग खचला गेला होता. या भागातील वनांचे अवशेष या खचलेल्या भागात गाळाने दडून गेले. कालांतराने या वनांच्या अवशेषापासून दगडी कोळशाची निर्मिती झाली.

 • या खडकप्रणालीमध्ये भारतातील महत्त्वाचे दगडी कोळसा साठे आढळतात. हे साठे उत्तम प्रकारच्या“बिट्यूमिनस' कोळशाचे स्रोत आहेत. भारतातील ९८% कोळसा येथूनच मिळतो.

•पर्मोकार्बोनिफेरस काळामध्ये वनांवर गाळाचे निक्षेपण होऊन दगडी कोळसा तयार झाला.

• हा खडक दामोदर, सोन नदीचा प्रदेश तसेच राजमहाल टेकड्याच्या प्रदेशातही आढळतो. महाराष्ट्रातील गोदावरी व वर्धा नदीच्या खोऱ्यातही हे खडक आढळतात.

i) महाराष्ट्रातील विस्तार

• पूर्व महाराष्ट्रात - नागपूर, चंद्रपूर, अमरावती,यवतमाळ

ii) आर्थिक महत्त्व :- उच्च प्रतीचा (बिट्युमिनस) कोळसा आढळतो. परंतु यामध्ये मिळणाऱ्या कोकिंग कोल (Coking Coal) चे प्रमाण अत्यंत कमी आहे.


* ज्वालामुखीचे खडक (Volcanic Rock)

. या खडकानाच 'आर्यन खडकप्रणालीचा' भाग मानतात

यालाच 'क्रेटॅशिअस खडक प्रणाल'असे म्हणतात.

• यांची निर्मिती क्रेटॅशिअस कालखंडामध्ये (६५दशलक्ष) वर्षापूर्वी झाल्यामुळे यांना हे. नाव देण्यात आले. हा कालखंड मेसोझॉयीक युगाचा भाग आहे.

• याच कालखंडामध्ये मेक्सिकोच्या आखातामध्ये एव्हरेस्ट एवढ्या उंच उल्कांचा आघात होऊन त्यापासून मुक्त झालेली ऊर्जा व नंतरच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे डायनसोरचा अंत झाला. हा पर्यावरणात महासंहार (Mass Extinction) या नावाने ओळखला जातो. यालाच Cretaceous Mass Extinction म्हणतात.

• भारतीय द्वीपकल्प गोंडवाना भूभागापासून तुटून युरेशियाकडे जातांना मार्गातील रियुनियन (Reunion) बेटाजवळून जातांना २९ वेळा झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाने ही प्रणाली तयार झाली.

• यामध्ये बेसिक(Basic) प्रकारचे खडक म्हणजे बेसॉल्ट (Basalt) खडकांचे आधिक्य आहे. या लाव्हारसाच्या संचयनाची जाडी काही ठिकाणी ३०००. मी. एवढी आहे. या खडकांमुळेच महाराष्ट्रात कापसाच्या काळ्या मृदेचे अधिक्य जाणवते.

 i) देशातील विस्तार

• जवळपास ८०% महाराष्ट्र आणि गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेशच्या काही भागावर ही खडकप्रणाली पसरली आहे.

♦️महाराष्ट्रातील विस्तार

• महाराष्ट्राचा ८०%भाग खडकप्रणालीपासून बनला आहे.या खडकप्रणालीची जाडी मुंबईनजीक अधिक आहे.

 • महत्त्व:

• बेसॉल्ट(असिताश्म) हा खडक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. याचा वापर स्थानिक बांधकामामध्ये केला जातो तसेच रोड, मातीचे धरण बांधकामासाठी याचा वापर केला जातो.

♦️जलजन्य खडक प्रणाली (Sedimentary rock system) 

• ही खडक प्रणाली  युगामधील  सेनझोंयेक 'टर्शरी(Tertiary) व क्वार्टर्नरी (Quarternary)' कालखंडात तयार झालेली आहे. प्लिस्टोसीन कालखंडात हिमनदीच्या अपक्षरण व निक्षेपण कार्यामुळे ही खडकप्रणाली तयार झाली.

•३५ ते ६० दशलक्ष वर्षापूर्वी या खडकप्रणालीचा उदय झालेला आढळतो. हिमालयाची निर्मिती झाल्यानंतर बाह्य कारकांमुळे (हिमनदी, नदी इ.) त्याचे अपरक्षण होऊन खोलगट भागात या गाळाचे निक्षेपण झाल्यामुळे या खडकांची निर्मिती झाली. या प्रणालीत स्तरीत खडकांचे अधिक्य जाणवते तसेच यामध्ये पीट आणि लिग्नाईटचे स्रोत आहेत.

1) महाराष्ट्रातील जलजन्य खडकप्रणाली

•गोदावरी,वर्धा, वैनगंगा, तापी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात गाळाचे संचयन होऊन ही खडकप्रणाली तयार झाली.

ii) महत्त्व :

• इमारत बांधकाम, सिमेंट, विटा तयार करण्यासाठी या खडकाचा वापर होतो.

•शेतीसाठी या खडकाची मृदा अत्यंत उपयुक्त असते. कारण यामध्ये सेंद्रीय घटकांचे प्रमाण अधिक असते.

♦️महाराष्ट्रातील भूअंतर्गत हालचाली व संबंधीत भूशास्त्रीय रचना

•पश्चिम किनारी प्रदेश भ्रंशामुळे (Faulting) तयार झालेला आहे.

• या भ्रंशाच्या सीमेवर रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर येथे सरळरेषेमध्ये उष्ण पाण्याचे झरे आढळतात. यावरून येथे भ्रंश व भूजैविक हालचाली सक्रिय (Active fault) असल्याचे जाणवते. कारण उष्ण पाण्याच्या झऱ्यांच्या (Hot spring) स्वरूपात भूअंतर्गत भागातील उष्णता सातत्याने मुक्त होत असते.

• लाव्हारस संचयनाची जाडी किनारी प्रदेशात अधिक असून पूर्वेकडे जातांना कमी होत जाते.

♦️भूशास्त्रीय रचनेचे महत्व

• एखाद्या प्रदेशाच्या भूशास्त्रीय रचनेवर खनिजांची निर्मिती व भौगोलिक वितरण (formation and geological distribution)अवलंबून असते.

• भूशास्त्रीय रचना व इतर भूअंतर्गत हालचालींवर भूपृष्ठावरील अनेक घटकांचे अस्तीत्व अवलंबून असते. उदा. भूअंतर्गत भागातील सक्रीय हालचालींमुळे गरम पाण्याचे झरे निर्माण होतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा