MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

Indian currency system - भारतीय चलन व्यवस्था

 भारतीय चलन व्यवस्था

 १९५७ पूर्वी-  एक पैसा, एक आणा, चार आणे, आठ आणे अशा नाणी अस्तित्वात 

१९५५ - “नाणे दुरुस्ती कायदा" संमत 

१ एप्रिल  १९५७ -  कायद्यानुसार रोजी “दशमान चलन पद्धती" अस्तित्वात 

             एक रुपया समान १०० पैशांमध्ये विभागीत करण्यात आला.

मार्च १९६२ - पहिला नवा पैसा अस्तित्वात-

जुलै १९६२ - पहिला नवा रुपया अस्तित्वात 

भारतीय चलनः

भारतीय चलनामध्ये नाणी व नोटांचा समावेश होतो.

 १)नाणी (Coins)

३० जून, २०११ -  ५० पैशापेक्षा कमी मूल्याची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याचे RBI  ठरविले.

‘लघू नाणे' (small coin)  - 50 पैशाला  

रूपये नाणी' (rupee coins) - १ रू. आणि त्यावरील नाण्यावरील नाणे.

 'नाणे कायदा-१९०६' - अंतर्गत सर्व नाणी भारत सरकारमार्फत तयार मात्र RBI मार्फत चलनात आणली जातात.

 भारत सरकार १००० रुपयांपर्यंतचे नाणे तयार करू शकते.

 'नाणे कायदा-२०११' - नाण्यांच्या साहाय्याने पेमेंट करण्यासाठी व स्विकारण्यासाठी महत्तम सीमा १००० रुपयांची निर्धारित .

•नाणी निकेल व त्याच्या संयुगांपासून बनवली जातात.

 भारत सरकारच्या टाकसाळी -

 1.मुंबई.

 2.अलीपूर (कोलकाता).

 3.सैफाबाद (हैद्राबाद).

4.चेरलापल्ली (हैद्राबाद) 

5.नोएडा.

२)चलनी नोटा (Corrency Notes)

RBI सर्वाधिक म्हणजे, १०,००० रुपयांपर्यंत किंमतीची नोट 

चलनाला पुढीलप्रकारे संबोधले जाते

१)प्रतिक/सांकेतिक चलन (Token Money)

• प्रतिक चलन- चलनाची दर्शनी किंमत (Face Value) त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किंमतीपेक्षा (Intrinsic Value) पेक्षा खूप अधिक 

प्रमाणिक चलन (standard money) -या दोन्ही किंमती जेव्हा समान असतात तेव्हा 

 Example, १८९३ पर्यंत भारतात प्रचलित असलेला चांदीचा रुपया.

२)कायदेशीर चलन (Legal Tender)

 सरकारने/रिझर्व्ह बँकेने पुरस्कृत केलेल्या चलनाला 

दोन प्रकार-

अ)मर्यादित कायदेशीर चलन

यामध्ये ५० पैशाच्या नाण्याचा समावेश होतो. दहा रूपयांपर्यंतचेच पेमेंट यांद्वारे करता येते.

 ब)अमर्यादित कायदेशीर चलन

•एक रूपया व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या सर्व नाणी व नोटा अमर्यादित कायदेशीर चलन असतात.

बँकांच्या मागणी ठेवी (Demand Deposits) ह्या कायदेशीर चलन नसतात, कारण धनादेशामार्फत केलेले पेमेंट नाकारता येते व रोख पैशाचा आग्रह धरता येतो.

चलनाचे काही विशेष रुपे

१)सुलभ चलन (Soft Currency)

 ज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी व पुरवठा अधिक असते.

२)दुर्लभ चलन (Hard Currency)

 ज्याची मागणी अधिक व पुरवठा कमी असतो.

चलन पुरवठा (Money Supply):

 कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत चलनात असलेली पैशाची संख्या.

•चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समावेश . 

१)लोकांच्या हातातील पैसा 

२)लोकांच्या बँकामधील ठेवी

३) स्थानिक सरकारे, बँकेतर वित्तीय संस्था, सार्व. प्रमंडळे यांच्या जवळील पैसा.

४)परकीय मध्यवर्ती बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इतर देशातील सरकारे व संस्था इत्यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात RBI मध्ये ठेवलेल्या ठेवी.

मात्र चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समावेश केला जात नाही.

१)केंद्र & राज्य सरकारचा RBI मधील खजिन्यातील पैशाचे साठे.

२)व्यापारी बँकांचा स्वत:चा पैसा (Money lying with the banks) सरकार व व्यापारी बँका जवळील पैशाचा समावेश चलन पुरवठ्यात करण्यात येत नाही कारण ते स्वत: पैशाचे उत्पादक आहेत.

चलन पुरवठा मापन पद्धती

 जुन्या पद्धती

 नव्या पद्धती

 रोखता मापन पद्धती 

•M1  = लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + लोकांच्या बँकामधील मागणी ठेवी + RBI मधील इतर ठेवी 

M2 = M, + पोस्ट ऑफिस बँकेतील बचत ठेवी

•M3 = M1 + बँकामधील मुदत ठेवी

M4 = M3 + पोस्ट ऑफिस सर्व ठेवी

•M1 = संकल्पनेत

•M2 = M1 + बँकांमधील बचत ठेवींपैकी मुदत ठेवी + बँकांनी विकलेल्या CDs चे पैसे + १ वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी.

M3 = M2+  १ वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी + बँकेची मागणीदेय व मुदत कर्जे.

•M4 = ही संकल्पना रद्द करण्यात  आली आहे

•L1 = नवीन M3 + पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी (NSCवगळता)

•L2= L1 + FIs कडील मुदत ठेवी + FIs कडील मुदत कर्जे + FIsकडील CDs

L3 = L2 +  NBFCs कडील लोकांच्या ठेवी.

RBI चा चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती

•१९७७ - फक्त M, या पद्धतीचा वापर 

• जानेवारी १९७७ पासून - M1, M2, M3, व M4( रॅडक्लिफ समितीच्या शिफारसीनुसार )

• मात्र डिसेंबर १९९७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. वाय. व्ही. रेड्डी कार्यगटाने आपल्या जून १९९८ च्या अहवालात या संकल्पनामध्ये बदल सुचविले आहेत. तसेच त्यांनी नवीन रोखता मापन पद्धतीच्या संकल्पना सुद्धा सुचविल्या आहेत. त्यानुसार चलन पुरवठ्याच्या जुन्या व नव्या मापन पद्धती आणि नवीन रोखता मापन पद्धती तत्क्यात दिल्या आहेत.

M1 - पैशाचा पुरवठा - “संकुचित पैसा” (Narrow Money) म्हणतात. 

 M2- एकूण पैसारुप साधनसंपत्ती.

 M3 - पैशाची व्यापक व्याख्या - “व्यापक” किंवा “विस्तृत पैसा"म्हणतात.

 भारतीय रुपयाचे स्वतंत्र चिन्ह

•अमेरिकन  -डॉलर, 

ब्रिटिश  - पाऊंड, 

जपानी - येन 

युरोपीय संघाचे - युरो या चार चलनांनंतर 

भारताचा रुपया हे पाचवे असे चलन आहे ज्यास स्वत:चे स्वतंत्र चिन्ह (symbol) आहे.

मुंबई आय.आय.टी.चे पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या श्री. डी. उदय कुमार यांच्या चिन्हाची निवड रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्हनर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने केली, 

ज्यास केंद्रीय मंत्रीमंडळाच्या १५ जुलै, २०१० च्या बैठकीत मान्यता .

१० रुपयांचे नाणे  

डिझाईन -  नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, अहमदाबाद येथे करण्यात आली आहे

 नाणे द्वि-धात्विक (bi-metallic) - बाहेरची कडा निकेल-ब्राँझची - मधला भाग फेरस स्टिलचा.

 

 भारतातील छापखान व टाकसाळी (Presses & Mints), 

1

 इंडियन सिक्युरिटी प्रेस, नासिक रोड (१९२८ - स्थापना)

 पोस्टाची व कोर्टाची तिकिटे व इतर कागदपत्रे धनादेश, बाँडस्, NSC, IVP, KVP, राज्य सरकारे, सार्व. उद्योग, वित्तीय संस्था यांचे रोखे,

2

करन्सी नोटस् प्रेस, नासिक रोड 

•रु. १, २, ५, १०, ५०, १००, ५०० च्या नोटा येथे छापल्या जातात 

3

बँक नोटस् प्रेस, देवास (१९७५ - स्थापना) 

येथे २ कारखाने आहेत

अ)रु, २०, ५०, १००, ५०० च्या नोटा

ब)शाईची फॅक्टरी - नोटा व रोख्यांसाठी आवश्यक

4

सिक्युरिटी प्रिटिंग प्रेस, हैद्राबाद

दक्षिणेच्या राज्यांची पोस्टाच्या कागदपत्रांची गरज भागविण्यासाठी या छापखान्याची स्थापना १९८२ मध्ये करण्यात आली.

5

सिक्युरिटी पेपर मील, होशंगाबाद.

नोटा व रोख्यांसाठी लागणाऱ्या कागदाचे उत्पादन

6

टांकसाळी (Mints) - 

मुं कोलकाता, हैद्राबाद, नोयडा.

7

आधुनिक करन्सी नोटस् प्रेस 

 म्हैसूर व सालबोनी (प. बंगाल) येथे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा