MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

Natural geography of Maharashtra - महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

♦️महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल


*महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० ( महाराष्ट्र दिन)

* अक्षवृत्तीय विस्तार :

 १५° ३५'४६' उत्तर ते २२° ०२' १३” उत्तर

 *रेखावृत्तीय विस्तार :

 From *७२° ३८ ४५" to पूर्व  ८०° ५३ १७' पूर्व 

*आकार:

* सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती असून तो दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रूंद होत गेला आहे.

*गोंदियाकडे महाराष्ट्राचा आकार निमुळता  आहे.

* लांबी, रुंदी व क्षेत्रफळ 

महाराष्ट्र पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणत: पूर्व घाटापर्यंत पसरला आहे.

दक्षिणोत्तर रूंदी : ७३० किमी

 क्षेत्रफळ : ३,०७,७१३ किमी

 पूर्व पश्चिम लांबी : ८६० किमी

क्षेत्रफळानुसार राज्यांच्या क्रम :

१) राजस्थान २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र ४)उत्तरप्रदेश  ५) गुजरात

महाराष्ट्राने क्षेत्रफळानुसार देशाच्या एकुण क्षेत्रफळाच्या ९.३६% भाग व्यापला आहे.

 ♦️प्रादेशिक विभाग

*महाराष्ट्रमध्ये ३६ जिल्हे असून ते भौगोलिक दृष्ट्या ५ विभागामध्ये विभाजीत 

१) विदर्भ

२) मराठवाडा

 ३) देश

 ४) कोकण

 ५) खानदेश

१) विदर्भ :

अमरावती व नागपूर विभागात ११ जिल्ह्यांचा समावेश  यालाच जुना बेरार प्रांत म्हणत असत. 

राज्याचा एकुण ३१.६% भाग हा विभाग व्यापतो व एकुण लोकसंख्येच्या २१.३% लोकसंख्या याठिकाणी राहते.

सिमा:

उत्तर - मध्यप्रदेश

पूर्व - छत्तीसगढ़ 

दक्षिण- तेलगंणा

पश्चिमेस- खानदेश, 

शहरे : क्षेत्रफळानुसार महत्त्वाची शहरे १) नागपूर २) अमरावती ३)अकोला ४) यवतमाळ

वैशिष्ट्ये:

* विदर्भ राजाने आर्य वसाहत स्थापन केली म्हणून विदर्भ हे नाव.

*नागपूर सहित विदर्भास नाग विदर्भ म्हणतात.

*कुंडीणपूर अमरावती - विदर्भाची प्राचीन राजधानी

२)मराठवाडा 

औरंगाबाद प्रशासकिय विभागातील ८ जिल्ह्यांचा समावेश .

मराठ्यांच्यातील मराहट्टी समुदायाचा राहण्याचा प्रदेश म्हणजे मराठवाडा .

३) देश

पुणे प्रशासकीय विभागातील ५ आणि नाशिक व अहमदनगर मिळून सात जिल्ह्यांचा समावेश .

सिमा :

 १) पश्चिम - सह्याद्री - पश्चिम घाट

 २) उत्तर - खानदेश

३) पूर्वेस - मराठवाडा

 ४) दक्षिणभाग कर्नाटक

भाग डोंगराळ असून पूर्वेकडील उताराचा प्रदेश गोदावरी, कृष्णा व भीमा नद्या व त्यांच्या उपनद्यांनी जलयुक्त 

 महाराष्ट्र देश या उच्चारावरून या क्षेत्राचे नाव 'देश' हे पडले. 

४) खानदेश 

३ जिल्ह्यांचा समावेश-  नंदुरबार, जळगाव आणि धुळे .

• तापी ही महत्वपूर्ण नदी असून या विभागातून जातांना तिला छोट्या मोठ्या अशा १३ उपनद्या भेटतात

• यालाच 'ऋषिक देश' असे प्राचीन काळी म्हणत, तर अकबराच्या दरबारी याला 'दानदेश' असे म्हणत.

५) कोकण 

• यालाच कारवली असे म्हणतात 

 १) कुकणा - परशुरामाच्या आईचे नाव. तिचे या प्रदेशात प्राचीनकाळी वास्तव्य होते असे म्हणतात.

२) कुंग - कुंग म्हणजे मावळणे. या भागात सूर्य मावळत असल्याने यास ‘कोकण' म्हणतात.

३) कोन - कोन म्हणजे डोंगरमाथा, हा डोंगरमाथ्याचा भाग आहे. -

♦️क्षेत्रफळानुसार जिल्हे 

क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम

जिल्ह्याचे नाव -क्षेत्रफळ

 1.अहमदनगर -१७४१३ किमी

2. पुणे-१५६४२ किमी 

3.नाशिक-१५,५३० किमी 

4.सोलापूर-१४,८४५ किमी 

5. गडचिरोली-१४,४१२ किमी

♦️ क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा चढता क्रम

जिल्ह्याचे नाव - क्षेत्रफळ

 1.मुंबई शहर-१५७ किमी

2. मुंबई उपनगर-४४६ किमी 

3.भंडारा-४०८७ किमी

4.ठाणे-४२१४ किमी

5.हिंगोली-४५२६ किमी

6.नंदुरबार-५०३५ किमी

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार जिल्हे

जिल्ह्यांची नावे - तालुक्यांची संख्या

* नांदेड ,यवतमाळ -१६    

 * नाशिक, रायगड  ,चंद्रपूर , जळगाव.-१५ .

* पुणे ,अहमदनगर ,अमरावती , नागपूर. -१४

*बुलढाणा -१३

*कोल्हापूर. गडचिरोली. - १२

*सातारा ,सोलापूर ,बीड -११

*सांगली, लातूर-१०

*रत्नागिरी , औरंगाबाद , परभणी-९

 *सिंधुदुर्ग , जालना ,उस्मानाबाद ,वर्धा , गोंदिया पालघर -८

 *भंडारा. अकोला, ठाणे-७

*नंदुरबार ,वाशिम -६

 *हिंगोली -५

*धुळे -४

*मुंबई उपनगर -३

 *मुंबई शहर- ० (शुन्य)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा