MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, ७ मार्च, २०२२

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती आणि ऊर्जा संसाधने

♦️ महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती आणि ऊर्जा संसाधने (Mineral and Energy Resources)


*खडक सर्व आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले भूपदार्थ जे जमिनीतून काढावे लागतात, त्यांना खनिज म्हणतात. मुलतः हे खनिजांचे मिश्रण असते.

*निसर्गतः कोणत्याही खडकातील विशिष्ट खनिजाचे संहतीकरण (Concentration) झाल्याशिवाय त्याचे व्यापारी तत्त्वावर उत्खनन केले जाऊ शकत नाही.

*रासायनिक प्रक्रिया व भौतिक प्रक्रियांद्वारे खडकातील महत्त्वाचे खनिज सोडून इतर खनिजे वाहून जातात. त्यावेळी ऊर्वरित खडकांत महत्त्वाच्या खजिनाचा अंश वाढतो. याला खनिजाचे संहतीकरण म्हणतात. यामुळे या खडकाचे उत्खनन करणे आर्थिकदृष्ट्या परवडते.

उदा. कोकणाच्या उष्ण व दमट हवामानात मूळ खडकातील सिलिका (वाळू) वाहून गेल्यामुळे खडकामध्ये लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण तुलनात्मकरीत्या वाढते. यामुळे कोकणात बॉक्साईटचे (अॅल्युमिनिअमचे खनिज) साठे आढळतात.

१. लोहखनिज (iron ore)

*लोहखनिज अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. इमारत बांधणी, यंत्रे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये याचा वापर होतो. लोहखनिज हे उद्योगांचा कणा आहे. लोहखनिज अशुद्ध स्थितीमध्ये सापडते.

*लोहखनिज प्रामुख्याने मूळ खडकामध्ये लाव्हारसाची प्रक्रिया व संचयन झाले असता आढळून येते...

साधारणपणे आर्कियन कालखंडातील खडकांमध्ये हे खनिज आढळते. तसेच ते धारवाड कालखंडातील खडकांशीसुद्धा संबंधित आहे.

* लोहखनिजाचा प्रकार असणारा पायराईट (Fes, याचे वैशिष्ट्य म्हणजे वरवरून याचा रंग चकाकी असणारा सोनेरी असतो. त्यामुळे यास मूर्खाचे सोने (Fools gold) म्हणतात.

♦️लोहखनिजांचे प्रकार

 लोहखनिजांचा प्रमाण -लोहाचे प्रमाण-वैशिष्ट्ये.

१. मॅग्नेटाईट (Fe3,04)   ७२% सर्वोच्च दर्जाचे लोहखनिज,अग्निजन्य व रूपांतरीत खडकांमध्ये आढळ, या खनिजांचा रंग काळा असतो

 २)हेमेटाईट (Fe2 o3).-७०% -अग्निजन्य आणि स्तरीत खडकांमध्ये आढळ • या खनिजाचा रंग काळा व लालसर असतो भारतामध्ये या लोहखनिजाचे सर्वाधिक उत्खनन होते.

3.लिमोनाईट -६०% -• मध्यम दर्जाचे लोहखनिज  

(FeO(OH).nH,O) -स्तरीत खडकांमध्ये आढळते म्हणून यात गाळ व पाण्याचे प्रमाण अधिक असते.

4.सिडेराईट (FeCo3)- ४८% -कमी दर्जाचे लोहखनिज स्तरीत खडकांमध्ये आढळते रंग पिवळा व पिंगट असतो.

♦️साठे

* महाराष्ट्रातील लोहखनिजांचे साठे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये केंद्रीत झाले आहेत. राज्यातील एकूण २६०.८२४ दशलक्ष टन साठ्यापैकी १७८ दक्षलक्ष टन साठे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आहेत तर ऊर्वरित ७५.३८ दशलक्ष टन साठे सिंधुदुर्ग व २.१८ दशलक्ष टन साठे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीत झाले आहेत. गडचिरोलीमधील इटापल्ली (Etapalli) तालुक्यातील सुरजगड (Surajgarh) या ठिकाणी असलेले लोहखनिजाचे साठे सर्वांत मोठे आहेत,

*भारतातील लोहखनिजाच्या एकूण साठ्याच्या २% पेक्षा कमी साठा महाराष्ट्रात आढळतो.

♦️महाराष्ट्रातील लोहखनिज उत्पादक प्रदेश

*जिल्हा

१.गडचिरोली

* १७८ दशलक्ष टन साठे आहेत. हे साठे टॅकोनाईट खडकांत आढळतात. सुरजगड हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लोहखनिजाचा साठा आहे. देऊळगाव हे आणखी एक महत्त्वाचे लोहखनिज साठ्याचे क्षेत्र आहे.  इतर साठे - फुसेर, भामरागड, पडवी, दमकोटे इ.

2.सिंधुदूर्ग

•७५.३८ दशलक्ष टन लोहखनिजाचे साठे असून ते हेमेटाईट प्रकारचे आहेत.

*वेंगुर्ले तालुक्यात लोहखनिज आढळते तसेच टेडी, टाका व बंडपेटा ही इतर महत्त्वाची लोहखनिज क्षेत्रे आहेत.

3.चद्रपूर

*हे साठे जांभा खडकांमध्ये आढळतात. २.१८ दशलक्ष टंन साठे असून हे साठे टॅकोनाईट खडकात आढळतात. लोहखनिजाचे साठे

१. लोहारा २०० मी. लांबीच्या क्षेत्रात

२.असोला ४०० मी. लांबीच्या क्षेत्रात

४.गोंदिया

  • अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते. • गोरेगाव तालुक्यातील खुर्सीपार, आंबे तलाव येथील साठे मॅग्नेटाईट प्रकारचे आहे.

५.कोल्हापूर

*शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आहेत.

६.नागपूर

*भिवापूर तालुक्यात लोहखनिज आढळते. येथे अत्यल्प प्रमाणात लोहखनिजाचे साठे आहेत. 

२) मँगनीज (मंगल) (Manganese)

*हा धातू शेंदरी काळ्या रंगाचा असतो. याचे प्रमुख स्त्रोत खनिज म्हणजे पायरोलुसाईट (Pyrolusite) होय.

*सर्वसाधारणपणे मूळ खडकात शिलारसाच्या थंड होण्यामुळे त्यात हे खडक तयार होतात. शिलारस थंड होताना लोह व मँगनीजचे निक्षेपण सोबतच होते म्हणून साधारणपणे ही दोन खनिजे सोबत आढळतात. म्हणून त्यांना 'फेरो मँगनीज' (फेरो लोह, मँगनीज देशातील एकूण साठ्याच्या ४०% साठा महाराष्ट्रात आढळतो. मँगनीजच्या खनिजात मँगनीजचे प्रमाण ४०%ते ४५% इतके असते. याचे ९५% उत्पादन लोहपोलाद कारखान्यात वापरतात. सर्वसाधारणपणे १ टन लोहपोलाद निर्मितीमध्ये १० किलो मँगनीज गरजेचे असते. महाराष्ट्रातील लोहखनिजांचे साठे २०.८५ दशलक्ष टन एवढे आहेत.

♦️ मैंगनीज साठा असणारी राज्ये

 राज्य -साठ्याचे प्रमाण

ओडिशा -४४% 

कर्नाटक २२%

मध्यप्रदेश १३%

 महाराष्ट्र ८%

3.बॉक्साईट (Bauxite)

*बॉक्साईटपासून अॅल्युमिनिअम मिळवतात. देशातील एकूण उत्पादनाच्या २१% उत्पादन महाराष्ट्रात होते.

*उष्ण व दमट प्रदेशात पावसाच्या पाण्यासमवेत मूळ खडकातील सिलिका (वाळू) डीसिलिकेशन (Desilication) किंवा लिचिंग (Leaching) प्रक्रियेद्वारे वाहून गेल्यानंतर उर्वरित खडकात बॉक्साईटचे साठे आढळतात.

*सह्याद्रीमधील बॉक्साईटचे साठे उच्च दर्जाचे आहेत. हे साठे (डायस्पोर (Diaspore) व गिब्साईट प्रकारचे आहेत. महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे ११२.९५१ दशलक्ष टन एवढे आहेत.

4.क्रोमाईट (Chromite)

*क्रोमाईट हे प्रामुख्याने धातूशास्त्र (metallurgy), रामायनिक, उद्योगांमध्ये वापरले जाते. तसेच मौल्यवान पाट्यांवर प्रक्रिया करण्यासाठी देखील क्रोमाईटचा बाप mere साम्याच्या अत्यल्प प्रमाणात महाराष्ट्रात मिळता महाराष्ट्रात क्रोमाईटचे एकूण ०,६६१ दशल माल आहेत. तर देशात है, माट २०० दशला टॉपचा अधिक, आहेत,

याचेसाठे ऑक्साईडच्या स्वरूपात आढळतात. उदा, (Mg.e) Cr.P)

♦️साठे व उत्पादक प्रदेश

*भारतात ओडिशामधील मुर्किदा क्षेत्रामध्ये क्रोमाईटचे सर्वाधिक साठे आहेत,

 १. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि बागडा तालुक्यात क्रोमाईट आढळते.

२. नागपूरमधील टाका भागातही क्रोमाईटचे साठे आहेत.

३. भंडारा जिल्ह्यातील मौनी क्षेत्रात क्रोमाईटचे साठे आहेत. 

५.डोलामाईट

*डोलामाईटचे रासायनिक संरूपण CaCO,.MgCO, असे आहे. ६०% डोलामाईट लोहपोलाद निर्मितीमध्ये वापरले जाते. राज्यात डोलामाईटचे ६१.३ दशलक्ष टन इतके साठे आहेत, देशातील एकूण साठ्यांच्या तुलनेत हे प्रमाण १% इतके आहे.

•उत्पादक प्रदेश

*चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात डोलामाईटचे साठे केंद्रित झाले आहेत.

•वापर

*लोहपोलाद कारखान्यांमध्ये लोहखनिजाच्या शुद्धीकरणासाठी फ्लक्स (flux) म्हणून डोलामाईट वापरले जाते.

*सुशोभित फरशांच्या निर्मितीसाठी सुद्धा डोलामाईट वापरतात.

६. साने Gold

साधारणपणे सोन्याचे साठे प्लेसर या स्तरीय खडकामध्ये आढळतात किंवा ग्रॅनाईटसारख्या प्रिकब्रिअन खडकातील भेगांमध्ये लाव्हारसाच्या संचयनाने निर्माण होतात. Geological Survey of India या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूरमधील पासोटी येथे सोन्याचे साठे आढळण्याची शक्यता आहे.

७.तांबे (Copper)

*तांबे हे उष्णतेचे व वीजेचे उत्तम सुवाहक आहे. हे साठे नाईट सारख्या खडकातील भेगांमध्ये लाव्हारसाच्या संचयनाने निर्माण होतात. महाराष्ट्रातील तांब्याच्या खनिजाचे साठे ७.७० दशलक्ष टन इतके असून त्यामधील तांब्याचे प्रमाण ०.८१ ते २.७३% इतके असते.

*तांब्याचे साठे

चंद्रपूरमधील ठानेवासना, दुबारपेठ ही ठिकाणे - नागपूरमधील पुलार परसोडी, रनबोरी - कोलार - तांबेखाणी, रणमांगली. 

८. बॅराईट (Barytel)

*बॅराईट हे अग्निजन्य खडकांत आढळते. महाराष्ट्रातील बॅराईटचे साठे ०.१३६ दशलक्ष टन एवढे आहेत.

*लाव्हारसाच्या शंकुसभोवताली याचे साठे आढळतात.

♦️ साठे

चंद्रपूर - फुटाना, देवाडा गडचिरोली जिल्ह्यातील साठ्यांचे सर्वेक्षण करणे बाकी आहे.

वापर:

*रंग उत्पादने निर्मिती तसेच तेलविहिरी खोदण्यासाठी याचा वापर होतो.

९. चुनखडी (CaCO.)

*देशातील चुनखडीच्या एकूण साठ्याच्या ९% साठा महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील साठे १३७१.४२५ दशलक्ष टन इतके आहेत.

*देशातील एकूण उत्पादनाच्या २% उत्पादन महाराष्ट्रात होते. उत्पादक प्रदेश - चुनखडीच्या - एकूण साठ्याच्या ३०% पेक्षा अधिक साठे यवतमाळ जिल्ह्यात एकवटलेले आहेत.

* वणी राजूर, सिंदोला व चनाखा

*राळेगाव - गौराळा चंद्रपूर महाराष्ट्रातील एकूण साठ्याच्या ५५% साठे चंद्रपूरमध्ा आढळतात. राजुरा तालुक्यातील आवारपूर, चांदूर, सांगोडा येथे चुनखडीच्या खाणी आहेत.

*गडचिरोली - अहेरी तालुक्यात देवळमारी व कोतेपल्ली येथे चुनखडीच्या खाणी आहेत. १० कायनाईट (Kyanite)

*देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनाच्या १५% उत्पादन महाराष्ट्रात होते. देशात कायनाईटच्या उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

-आढळ-भंडारा व साकोळी तालुक्यातही कायनाईंट आढळते.

* महत्त्व -हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात, काचसामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, वीज उपकरणे निर्मितीमध्येही कायनाईटचा वापर केला जातो.

 ११ बायराईट

*अग्निजन्य खडकात आढळते.  

*आढळ -रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये बायराईट आढळते. महत्त्व रंग, कागद, रबर उद्योगात बायराईट वापरतात. 

♦️ऊर्जासाधने (Energy Resources)

*काम करण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे 'ऊर्जा' होय. ऊर्जेचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते.

♦️पारंपरिक ऊर्जासाधने (Conventional Energy Resources)

पारंपारीकरित्या वापरली जाणारी ऊर्जासाधन म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व जलविद्युत या ऊर्जासाधनांचा यामध्ये समावेश होतो.

 ♦️ अपारंपरिक ऊर्जासाधने (Non-Conventional Energy Resources) सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरी लाटा, टाकाऊ पदार्थांपासून निर्माण केलेली ऊर्जा या ऊर्जासाधनांचा यामध्ये अंतर्भाव होतो.

१.पारंपारिक ऊर्जासाधने

१. दगडी कोळसा (Coal)

*देशातील एकूण वीजनिर्मितीच्या जवळपास ६०% पेक्षा अधिक ऊर्जा ही दगडी कोळशापासून निर्माण केली जाते.

• भारताच्या एकूण साठ्याच्या ४% दगडी कोळसा महाराष्ट्रात आढळतो.

• हा जलजन्य किंवा स्तरीत खडकाचाच एक प्रकार आहे. दगडी कोळसा कोणत्या कालखंडातील स्तरीत खडकांत आढळतो.

२.खनिजतेल (Petrolium)

निर्मिती -

*किनारीप्रदेशातील भूखंडमंचावर भूऐतिहासिक काळापासून सागरी जीव आणि सागरी वनस्पतींचे निक्षेपण होत आले आहे. यावर गाळाच्या थराचे निक्षेपण होत गेले.

*त्यावर उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन जीवाश्मांचे खनिजतेलामध्ये रूपांतर झाले. सर्वसाधारणपणे ऐतिहासीक काळात भूखंडमंचाचा भाग असलेल्या ठिकाणी याचे साठे आढळतात. उदा. सौदी अरेबिया, इराणचे वाळवंट मायोसीन युगावेळी (Miocene age) टेथिस समुद्राच्या भूखंडमंचचा भाग होते.

*आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खनिजतेलाचे साठे आहेत.

*खनिज तेलाच्या निर्मिती इतकीच महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा साठा करून ठेवणाऱ्या खडकाची रचना होय.

*साधारणपणे Permeable खडकांवर impermeable खडकांचा थर असेल तर अशी रचना घनतेने हलक्या खनिजतेलास छिद्रांद्वारे वर जाऊ देते.

*नंतर impermeable खडकामुळे (पंकाश्म, चिखल इ.) खनिज तेल छिद्र / भेगांद्वारे गळत नाही. Permeable खडकांत छिद्रे एकमेकांना जोडलेली असतात. त्यामुळे तेलाचे उर्ध्ववहन सहज शक्य होते. खनिज तेलाच्या साठ्यातील Permeable - वालुकाश्म, चुनखडी आणि लवण खडक (Rock Salt) खनिज तेलाच्या साठ्यातील impermeanle - शेल, पंकाश्म, चिखल

औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी कृत्रिम रबर निर्मितीमध्ये

३.नैसर्गिक वायु 

दगडी कोळसा व खनिज तेलांच्या साठ्यांसमवेत जे वायूरूप इंधन आढळते त्यांना नैसर्गिक वायू ही संज्ञा वापरली जाते. जे या वायूचे रासायनिक संरूपण CH, हे असे असते. भारतातील नैसर्गिक वायूंचे साठे ६३८ अब्ज घनमीटर असून या साठ्यांचे सर्वाधिक प्रमाण मुंबई हायजवळ आहे.

४.औष्णिक विद्युत केंद्र (Thermail Power Plant)

*महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युतचा फार मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. जलविद्युत निर्मितीची क्षमता कमी असणाऱ्या प्रदेशात औष्णिक विद्युत केंद्रे उभारली जातात. 

*त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कोळशाचे साठे असल्यामुळे देखील औष्णिक विदयुत केंद्रांचा विकास झालेला दिसतो.

*वाढते औदयोगिकरण, दळणवळण साधनांचा विकास आणि प्रोत्साहनपर शासकीय योजना यामुळे औष्णिक विद्युत केंद्रांचा विकास झाला आहे.

♦️महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रे 

 जिल्हा -औष्णिक विद्युत केंद्राचे नाव आणि वैशिष्ट्ये

१. बीड -परळी वीज निर्मिती क्षमता २७० मेगावॅट बीड, उस्मानाबाद, लातूर या शेजारील जिल्ह्यांना वीज पुरवठा

२. जळगाव-फेकरी भुसावळ जवळील या विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता ४८३ मेगावॅ४ एवढी असून ही वीजेवरील रेल्वे इंजिन चालविण्यासाठी वापरली जाते.

३.नाशिक- एकलहरे या विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता ९१० मेगावॅट असून हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

४. चद्रपूर बल्लारपूर या विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता १००० मेगावॅट असून हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

 चंद्रपूर दुर्गापूर । यांची विद्युत निर्मिती क्षमता ८४० मेगावॅट वीज चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यांना पुरविली जाते.

५.नागपूर- कोराडी महाराष्ट्रातील सर्वांत मोठे औष्णिक विद्युत केंद्र असून याची क्षमता ११०० मेगावॅट आहे, खापरखेडा-/ ऊर्जा निर्मिती क्षमता ४२५ मेगावॅट |

 ६. ठाणे -चोल ऊर्जा निर्मिती क्षमता ९६ मेगावॅट होती (सध्या बंद) तुर्भे। ऊर्जा निर्मिती क्षमता ८३७ मेगावॅट)

७.रत्नागिरी- धोपावे  बेलदुर येथील MIDC मध्ये स्थापनेसंबंधीत हा प्रस्तावित प्रकल्प असून 'MAHAGENCO' या कंपनीद्वारे हा १९८० मेगावॉटचा प्रकल्प उभारला जाईल. 

♦️जलविद्युत निर्मिती ( Hydro-electricity)

*खोपोली (जि. रायगड) येथील जलविद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वांत पहिले जलविद्युत केंद्र असून त्यानंतर जलविद्युतचा विकास वेगाने होत गेला. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ मध्ये महाराष्ट्राच्या एकूण वीजनिर्मितीमध्ये जलविद्युतचा वाटा ५.६४% एवढाच होता, आणि २०१५ च्या आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत जलविद्युत १३.४% निर्मितीमध्ये घट झाली आहे.

*बहुतांश जलविद्युत निर्मिती केंद्रे ही पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात केंद्रीत असण्याची कारणे म्हणजे,

१. येथे सह्याद्री पर्वतावर पर्जन्याचे प्रमाण अधिक असून येथे अनेक नद्या उगम पावतात.

२. पर्जन्याचे प्रमाण २५० सेमी पेक्षा अधिक असल्यामुळे घाटपायथ्याशी पाणी उपलब्धता अधिक आहे.

३. या भागात खोल दऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे जलाशय निर्मितीस कमी खर्च येतो तसेच त्यामुळे होणारे विस्थापनही कमीच असते.

♦️जलविद्युत निर्मितीमधील अडचणी

१. महाराष्ट्रातील नद्या हंगामी आहेत त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावते व जलविद्युत निर्मितीसाठीचे पाणी शेती व पिण्यासाठी वापरास प्राधान्य द्यावे लागते.

२. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात औद्योगिकरण कमी असल्यामुळे तेथे वीजेसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही.

३. स्थानिकांचे विस्थापन आणि पर्यावरणाचा होणारा हास ही देखील जलविद्युत निर्मितीची मोठी अडचण आहे.

४.आवश्यक भांडवल व यंत्रसामग्रीचा अभाव ही देखील अडचण आहे. महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा