♦️भिमबेटका गुफा : .
*अश्मयुगीन संस्कृतीचे सातत्य दर्शवणाऱ्या भीमबेटका गुफेची २००३ साली युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत नोंद झाली.
*तत्कालीन संस्कृतीचे दर्शन दगडावरील चित्रकला, मृदभांड व दगडी हत्यारे यावरून घडते. येथील चित्र हे दररोजच्या जीवनातील शिकार, नृत्य, अश्वारोहण, पशूशी संघर्ष, शारीरिक सजावट, धार्मिक चिन्ह, संबंधित आहेत.
*वेगवेगळ्या पशूच्या आकृत्या या सुंदर रंगसंगतीने सजवल्या आहेत. रंग तयार करण्यासाठी मैंगनीज, हेमेटाईट, मऊ लाल दगड, काष्ठ चारकोल पशू चरबी, पानाचा सार याचा वापर केला गेला आहे.
• सांची (Sanchi):
*सांची येथील उत्खनानवरून लक्षात येते की, हे अशोकाच्या काळात (मौर्य), वसले. येथे बुद्ध जीवनाशी संबंधित स्तूप, विहार आहे. तसेच एकाश्म स्तंभ, मंदिर, यांचेही अवशेष सापडले आहेत.
*याचा युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत समावेश होतो.
• महाकालेश्वर मंदिर (उजैन):
*महाकालेश्वर मंदिर देवता शिव याला समर्पित आहे. हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकीएक आहे.
•खजुराहो (छतरपूर) :
*हे चंदेल शासक (इ.स. ९५० ते १०५०) यांनी कलेत (art) दिलेल्या योगदानामुळे आज जगात प्रसिद्ध आहे. याचाही युनेस्को वारसास्थळ यादीत समावेश आहे.
*येथील मंदिर हे हिंदू व जैन धर्माशी संबंधित आहे. मंदिरावर केलेल्या कामूक (erotic) कोरीव कामामुळे विशेष प्रसिद्ध आहे. मंदिर बांधणी हि नागरशैलीत आहे.
♦️उत्सव:
• अखिल भारतीय कालीदास उत्सव :
*जवळपास एक आठवडा चालणाऱ्या या अखिल भारतीय कालिदास उत्सवाची सुरवात उज्जैन येथे प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात कालीदासाच्या नाटकाने होते.
*जे पारंपारिक पद्धतीने (संस्कृत भाषेत) सादर केले जाते. त्यानंतर भारताच्या इतर भागातून आलेल्या साहित्य, नाटक, रंगभूमी, शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण होते.
*भगोडीया (भिल्ल) मडाई (गोंड) हे उत्सवही आदिवाशी जमातीकडून साजरे केले जातात.
♦️कला व हस्तशिल्प :
• वाघ ठसा (Bagh prints GI. as handicraft) :
*वस्त्रावर केला जाणारा हा चौकोनी ठसा आहे. यामध्ये साडी, ड्रेस मटेरियल पांघरून यावर चौकोनी ठसा (block print) मारला जातो. यामध्ये वेगवेगळ्या भूमितीय रचना, फुले यांची डिझाईन लाल, निळ्या, काळ्या रंगात केली जाते.
• चंदेरी विणकाम : (Chandri fabrics. Gi. as handicraft) :
*चंदेरी हे खेडे आज भारतभर त्याच्या विणकामाच्या गुणवत्तेमुळे प्रसिद्ध ठरले आहे. हलकी, अत्यंत आरामदायी, सूक्ष्म, हस्तविणीत, सूती व रेशमी चंदेरी साडी पिढीची शाही पसंद ठरली आहे. चंदेरी विणकाम हे त्याच्या पारदर्शकता व सुरेख विणकामासाठी प्रसिद्ध आहे.
• लोकचित्रकला : यामध्ये बुंदलखंडी, पिथोरा, गोंडवाना, माळवा या चित्रकलेचा समावेश होतो.
♦️ लोकनृत्य : ,
गृडा नृत्य, मटकी नृत्य, फुलपती नृत्य.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा