♦️चालुक्य
*वाकाटकाच्या पतनानंतर भारताच्या पश्चिमी क्षेत्रात चालुक्य राजवंशाची स्थापना झाली, ता पूर्ण (पूर्व) क्षेत्रात पाय राजसत्तेची स्थापना झाली.
*इ.स.५०० ते ७५० हा काळ दक्षिण भारताच्या इतिहासात चालुक्य आश्चर्याचा इतिहास आहे.
*दोन्ही सत्ता कृष्णा-तुंगभद्रा दुआबावर कब्जा मिळविण्यासाठी संघर्ष करत होत्या. इ.स. १७५७ नेता हेच सत्र चास व सावनी चालुक्यांच्या संघर्षाचे कारण बनले.
•बदामीचे चालुक्य
*यांच्या वंशाची माहिती देणारा सर्वाधिक महत्वपुर्ण स्त्रोत हा पुलकेशीन द्वितीयचा एहोळ अभिलेख आहे, लेखक विक्रिीन यामध्ये हर्षवर्धन आणि पुलकेशीन यांच्यामधील युद्धाचे वर्णन केले आहे.
*हे युध्द नर्मदा नदीकाठी लढले गेले. या वंशाचा हे संस्थापक पुलकेशी प्रथम होता. परंतु पुलकेशी द्वितीय हा महान शासक होता.
*पुलकेशी द्वितीय याने हर्षवर्धनवरील विजयानंतर परमेश्वर उपाधी धारण केली.
*याने कृष्णा-गोदावरीचा दुआब जिंकला व भाऊ विष्णुवर्धनाच्या अधिपत्याखाली बंगी चालुक्यवंशाची पायाभरणी केली.
• पुलकेशीन द्धितीय :
*याने पल्लव शासक महेंद्रवर्मन प्रथमला पराजित केले.
*परंतु पल्लव नरेश नरसिंहवर्मन प्रथम याने पुलकेशीन द्वितीयचा पराभव करून बदामीवर पल्लवाचे वर्चस्व प्रस्थापित करत वातापीकोंड उपाधि धारण केली.
*पुलकेशीन द्वितीयच्या दरबारात व्हेनत्सांग (चीनी यात्री) आला होता.
• विक्रमादित्य प्रथम :
*याने नरसिंहवर्मन प्रथम (पल्लव) चा पराभव केला आणि कांचीची लुट केली.
• विक्रमादित्य द्वितीय :
यान पल्लव शासक नंदिवर्मा द्वितीयला पराभूत करून कांचीकोंड उपाधी धारण केली.
*विक्रमादित्य द्वितीय याने त्रिलोक महादेवी व लोकमहादेवी या हैह्य वंशांच्या राजकुमारीशी विवाह केला.
*या राजकुमारींनी क्रमश: त्रैलोकेश्वर मंदीर व लोकेश्वर मंदीर बनवले.
•वेंगीचे चालुक्य
*यांचे साम्राज्य कृष्णा गोदावरी दुआबात वेंगी (राजधानी) क्षेत्रात होते.
*ते बदामीच्या चालुक्याचेच वारसदार होते. शासक विष्णुवर्धन जो पुलकेशीन द्वितीयचा भाऊ होता.
*याचा संघर्ष राष्ट्रकुटाशी चालला पण शेवटी चोल साम्राज्यात विलय झाला.
•कल्याणीचे चालुक्य : (इ.स. ९७३ पासून पुढे)
* स्त्रोत : बिल्हणचा विक्रमांकदेवचरित.
तैलप द्वितीय याने राष्ट्रकुट शासक कर्क द्वितीयचा पराभव करुन कल्याणीच्या चालक्य वंशाची स्थापना केली.
*याचा प्रसिध्द शासक विक्रमादित्य षष्ठम होता. याने शक सवंत बंद करुन विक्रम चालुक्य सवत (१०७६) चालू केले.
*याच्या दरबारात बिल्हण (विक्रमांकदेवचरित) व विज्ञानेश्वर (मिताक्षरा) हे दोन मंत्री होते.
*अन्हिलगढचे चालुक्य (गुजरात)
*गुजरातच्या या चालुक्य शाखेचा संस्थापक मुलराज प्रथम (इ.स. ९४१ ते ९९५) होता याची राजधानी अन्हिलवाडा होती.
* भीम प्रथम :
(इ.स. १०२१ ते १०६८) या शासकाच्या काळातच गजनीच्या मुहमदाने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले.नष्ट झालेल्या सोमनाथ मंदिराचे भीम प्रथमने पुनर्निमाण केले.
*भीम द्वितीय :
याच्या काळात मुहमद घोरींचे आक्रमण झाले. घोचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबकाने भीम द्वितीयचा पराभव केला.
नंतर येथील बघेल वंशाची जागा अल्लाउद्दीन खिलजींच्या आक्रमणाने सल्तनताने घेतली.
•चालुक्यकालीन कला
• शिल्पकलेची चालुक्य शैली
*यात नागर व द्रविड या दोन्ही प्रकारच्या मंदिर शैलीचा संगम असल्यामुळे नवीनच अशी बेसर शैली उदयाला आली. यालाच चालुक्य शैली म्हणतात.
*चालुक्य शैलीत शिल्पकारांनी स्वत:ची शोधक कल्पना व प्रतिभेचा अफलातुन वापर केला आहे.
*मंदिराचे शिखर उंच व नक्षीदार आहे. स्तंभ गोल गुळगुळीत असून छत घुमटाकार आहे. छत व भिंतीवर सुरेख मुर्ती कोरल्या असून त्यांची प्रमाणबद्धता कमालीची आहे.
* बदामी, ऐहोळ, पट्टडकल हि चालुक्य शिल्पकलेची प्रमुख केंद्रे आहेत.
*काशी विश्वेश्वर मंदिर (लवकुंडी), सिद्धेश्वर मंदिर (हवेरी), मल्लिकार्जुन मंदिर (कुरुवट्टी) या प्रसिद्ध वास्तु चालुक्य शैलीची देण आहेत.
*याशिवाय गुहामंदिर, अखंड पहाड खोदून तयार केलेली बौद्ध विहारे (कर्नाटक) प्रसिद्ध आहेत.
•चालुक्यांची देणगी (ठेवा)
*मुळत: चालुक्य शासक वैदिक धर्माचे उपासक होते. त्यांनी आपल्या शासनकाळात अनेक वैदिक यज्ञ कले.
*परंतु हे राजे धर्म सहिष्णु होते. त्यांच्या राज्यात जैन व बौद्ध धर्मांनाही राजाश्रय लाभला.
*ऐहोळ शिलालेखकर्ता हा जैन पंडित होता. व्हेनत्सांग सांगतो कि, चालुक्याच्या राज्यात चार अशोकस्तंभ होते व इतरही अनेक स्तूप होते.
* वैदिक धर्मात- पौराणिक देवतांचे शिव व विष्णू यांचे महत्व वाढले होते.चालुक्यांनी अनेक शिव व वैष्णव मंदिरे बांधली.
* ऐहोळचे लाडखान मंदिर, दुर्गा मंदिर व हुच्चिमल्लीगुडी मंदिरे प्रसिद्ध आहेत.
*लाडखान मंदिराची रचना चैत्यगुहेसारखी आहे. मंदिराचा सभामंडप सपाट छताचा आहे.
*प्रवेशद्वाराच्या खांबावर गंगा-यमुना कोरलेल्या आहेत. द्रविडशैलीची वैशिष्ट्ये येथे पाहता येतात.
*दुर्गामंदिरामध्ये गर्भगृह व सभामंडप यांच्यामध्ये अंतराल आहे.
*गर्भगृहावर शिखर आहे. हुच्चिमल्लीगुडी येथील मंदिरावर नागरशैलीचे शिखर आहे. इ.स. सातव्या शतकात प्रस्तरातून मंडप खोदण्याची पद्धत सुरू झाली.
*पट्टडकल येथे अशी दहा मंदिरे आहेत. त्यापैकी सहा द्रविड शैलीची आहेत. यातील विरूपाक्ष मंदिर प्रसिद्ध आहे.
*त्यात सभामंडपाच्या बाहेर स्वतंत्र नंदीमंडप आहे. व मंदिराच्या चहूबाजूस अंगण आहेत. मंदिरावर चौकोनी शिखर आहे.
*चालुक्य कलेची सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे पहाड खोदून तयार केलेली मंदिरे.
*अजिंठ्याच्या पहिल्या गुफेत दुसऱ्या पुलकेशीच्या दरबारात इराणी वकील नजराणा देतानाचे चित्रण आहे.
*अजिंठा गुहासमुदायातील काही चैत्यगृहे चालुक्य काळात खोदलेली आहेत.
*चालुक्य विक्रमादित्य दुसरा याच्या राणीने म्हणजे लोकमहादेवीने पट्टडकल येथे बांधलेले शिवमंदिर विरूपाक्ष मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
* यात गर्भगृह, अंतराल व अनेकस्तंभी सभामंडप आहे. सोळा अखंड खांबांवर सभामंडपावरील सपाट छत तोलून धरले गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा