महाराष्ट्राचे हवामान (Climate of Maharashtra)
*महाराष्ट्र हा या वाऱ्यांचा मान्सुन वाऱ्यांच्या टापुत येतो त्यामुळे सर्वसामान्यपणे महाराष्ट्राचे हवामान मान्सुन /मोसमी प्रकारचे आहे.
*परंतू भूप्रादेशिक विस्तार पाहता येथे वर्षभर हवामानाची स्थिती समान नसते. उलटपक्षी उन्हाळा-पावसाळा-हिवाळा या ऋतुनुसार ही परिस्थिती बदलत राहते. या वाऱ्यांचा विचार मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत व दिशेत फरक पडतो. विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे पुढील दोन प्रकार पडतात.
i) नैऋत्य मान्सुन हवामान
ii)ईशान्य मान्सुन हवामान
♦️नैऋत्य मान्सुन हवामान:
*२१ मार्च रोजी सूर्याचे उत्तर दिशेने असणारे भासमान भ्रमण सुरु होते. यामुळे उत्तर भारताचे तापमान वाढून ते २०°C पेक्षा अधिक असते व याठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
* त्यामुळे ITCZ २० ते २५° उत्तर अक्षवृत्ताजवळ सरकतो. त्यामुळे ITCZ कडे दक्षिण गोलार्धातून येणारे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर स्वत:च्या उजवीकडे वळतात. यामुळे हे वारे 'नैऋत्य मान्सुन' वारे म्हणून ओळखले जातात.
या काळात हवामानाची स्थिती समान नसून मान्सुन खंड हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. या नैऋत्य मोसमी हवामानाचे शरद ऋतु व वर्षा ऋतु हे दोन गट पडतात.
♦️ शरद ऋतु :
*जगात उन्हाळा व हिवाळा हे दोन ऋतु मानले आहेत. परंतू भारताच्या मान्सुन हवामानाच्या वैशिष्ट्यांमुळे येथे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु मानले जातात.
*परंतु पावसाळ्याच्या उत्तरार्धात व हिवाळ्याच्या पूर्वार्धात देशात हवामानाची स्थिती वेगळी असते. त्यामुळे भारतीय वेधशाळेने परतीचा मान्सुनचा काळ (शरद ऋतु) हा एक स्थानिक ऋतु मानला आहे.
*ऑक्टोबर ते डिसेंबरचा मध्य कालावधी या काळात मोसमी वारे परतीच्या मार्गावर असतात.
♦️तापमान (Temperature)
*या काळात पर्जन्य संपत आलेला असतो आणि प्रदेशावरून ईशान्य मान्सुन वारे वाहत असतात. हे वारे भूखंडावरून | जमीनीवरून येत असल्यामुळे यापासून मिळणाऱ्या पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते.
त्यामुळे या काळात आकाश निरभ्र असते व हवेतील आर्द्रता अधिक असते.
*ऑक्टोबर मध्ये तापमान जास्त असते व तापमानाची स्पष्ट जाणीव होते. त्यामुळे याला 'ऑक्टोबर उष्मा (October Heat)' असेही म्हणतात. या काळात महाराष्ट्राचे तापमान ३०°C ते ३१°C असते तर खंडांतर्गत भागात (उदा. नागपूर) तापमान ३२°C पर्यंत असु शकते.
♦️दैनिक तापमानकक्षा (Daily Temperature Range)
*या काळात दैनिक तापमान कक्षा थोडी जास्त असते. सागराजनजीकच्या प्रदेशात ही ५°C तर खंडांतर्गत भागात ८°C ते ९°C पर्यंत असते.
♦️वारे (Winds)
*या काळात समुद्रावर कमी वायुभार तर जमीनीवर जास्त वायुभाराचा प्रदेश तयार होतो. यामुळे जमीनीकडून समुद्राच्या दिशेने वारे वाहू लागतात.
या ठिकाणी वायुदाबाचे उतारमान (Pressure gradient) कमी असल्यामुळे वाऱ्याचा वेग कमी असतो. या वाऱ्यांनाच 'परतीचे मान्सुन वारे' म्हणतात.
♦️ वायुभार (Atmospheric Pressure) :या काळात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वायुभार सरासरी १०१० मिलीबार पर्यंत असतो तर समुद्रावर हा वायुभार कमी असतो.
♦️ईशान्य मोसमी हवामान
*२२ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिण गोलार्धात भासमान भ्रमण चालु झालेले असते. याच काळात उत्तर भारतात हिवाळा असल्यामुळे तापमान घटण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे या ठिकाणी हवेचा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
*या उलट दक्षिण गोलार्धात तापमान अधिक असल्याने तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहण्यास सुरुवात होते. यांनाच आपण ईशान्य मान्सुन वारे म्हणतो. या काळाचे दोन ऋतुमध्ये विभाजन करता येते.
अ) शीत ऋतु ब) उष्ण ऋतु
अ) शीत ऋतु
मध्य डिसेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या या ऋतुस (हिवाळा किंवा शीत ऋतु' म्हणतात.
♦️तापमान (Temperature)
सूर्य दक्षिण गोलार्धात असल्याने उत्तर गोलाधात सूर्याची किरणे तिरपी पडु लागतात. त्यामुळे या काळात तापमान कमी होण्यास सुरुवात होते. किनारी भागात समुद्राच्या सानिध्यामुळे सरासरी तापमान अधिक असते व दैनिक तापमान कक्षा कमी असते. दिवसाचे तापमान ३०° से. तर रात्रीचे तापमान १८° से. असु शकते. उत्तर महाराष्ट्राचे सरासरी तापमान मराठवाड्यापेक्षा कमी म्हणजे १०° से. ते ११° से. इतके असते.
♦️वायूभार (Atmospheric Pressure)
या काळातील कमी तापमानामुळे वायुभार कमी असतो. खंडांतर्गत भागात हा वायुभार १०१७ मिलीबार असतो. तर किनारीप्रदेशात हा वायुभार कमी असतो. साधारणपणे किनारी प्रदेशात वायुभार १०११ मिलीबार पर्यंत असु शकतो.
♦️दैनिक तापमान कक्षा (Diurnal Temperature Range) :
शीत ऋतुमध्ये दिवसाचे कमाल व रात्रीचे किमान तापमान यात फार फरक जाणवून येतो. त्यामुळे या काळात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते. ही तापमान कक्षा खंडांतर्गत भागात सर्वात जास्त असते तर किनारी प्रदेशात समुद्रसानिध्यामुळे ही तापमान कक्षा कमी असते.
उदा. हिवाळ्यात रत्नागिरीची दैनिक तापमान कक्षा १० से, औरंगाबादची १५ से तर नागरपूरची दैनिक तापमान कक्षा १४°से एवढी असते.
♦️वारे (Winds)
*या काळात समुद्रावर कमी दाबाचा तर जमीनीवर जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहू लागतात. त्यांनाच आपण 'ईशान्य मान्सुन वारे' म्हणतोः
या काळात वायुभाराचे उतारमान (Pressure gradient) कमी असल्याने वाऱ्याचा वेग कमी असतो.
♦️) पर्जन्यमान व आर्द्रता (Rainfall and Humidity)
ईशान्य मान्सुन वाऱ्यांपासून महाराष्ट्रात सरासरी १०सेमी पर्जन्य पडतो. त्यापैकी १५ सेमी महाराष्ट्रच्या पूर्व भागात पडतो. या काळात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. ही आर्द्रता पूर्व आणि मध्य महाराष्ट्रात ४५% पर्यंत तर किनारी भागात ६०-६५% इतकी असते.
ब) उष्ण ऋतु
मार्च ते मे या कालावधीत वातावरणाचे व हवेचे तापमान जास्त असते. म्हणून यास उन्हाळा किंवा वसंत ऋतु म्हणतात. या काळात हवेची स्थिती पुढीलप्रमाणे असते.
♦️तापमान (Temperature)
या काळात सूर्याचे उत्तरेकडे भासमान भ्रमण सुरु झालेले असते. त्यामुळे तापमान सर्वत्र अत्याधिक असते. या काळात खंडांतर्गत भागात 'Continentality परिणामामुळे तापमान अधिक असते तर किनारी भागात सागरी सानिध्यामुळे तापमान कमी असते.
b) वायुभार (Atmospheric Pressure) या काळात वायुभार साधारणपणे सर्वाधिक कमी असतो.
या काळात तापमान अत्यंत जास्त असल्यामुळे वायुभार कमी असतो. महाराष्ट्राच्या पुर्वेस वायुभार १००८ मिलीबार तर मध्य व उत्तर महाराष्ट्रात हा १००९ मिलीबार एवढा असतो. संपूर्ण राज्याचा विचार करता हवेचा दाब सर्वत्र कमीच राहतो तरी विशेषत: पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना हा वायुभार वाढतो.
♦️दैनिक तापमान कक्षा (Daily temperature range)
*या काळात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दिवसा व रात्रीच्या तापमानात बरीचशी तफावत जाणवते. या कारणांमुळे याठिकाणी दैनिक तापमानकक्षा जास्त आढळते.
*या काळात महाराष्ट्राच्या पूर्वेस ही तापमान कक्षा २०° से पर्यंत, मराठवाड्यात १८° से, पर्यंत, मराठवाड्यात १८° से. तर कोकणात ८° से. पर्यंत असते.
♦️) वारे
*या काळात वायुभाराचे उतारमान (Pressure gradient) अधिक असल्यामुळे वारे वेगाने वाहु लागतात. हे वारे उष्ण व कोरडे असतात. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात या काळात वावटळी आणि धुळीची वादळे निर्माण होतात. पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात दिवसा ‘खारे वारे (Sea breeze)'. तर रात्री “मतलई वारे (Land Breezes)' वाहु लागतात. यामुळे येथील हवामान सम असते.
♦️) पर्जन्यमान (Rainfall/Precipitation) आणि आर्द्रता (Humidity)
*सर्वसाधारणपणे हा काळ कोरडा असला तरीही या ऋतुत थोडा पाऊस पडतो. विशेषत: महाराष्ट्राच्या दक्षिण भागात या पर्जन्याचे प्रमाण अधिक असते.
*एप्रिल व मे महिन्यांच्या काळात दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास विजांच्या लखलखाटा बरोबरच ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. काही वेळेस पर्जन्यासमवेत गारांचा वर्षावही होतो. अशाप्रकारे अवेळी पडणाऱ्या वादळी पाऊसास 'वाळवाचा पाऊस' असेही म्हणतात.
♦️) वर्षा ऋतु,
• जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडतो. त्यामुळे यास ‘वर्षा ऋतु किंवा ओला ऋतु' असेही म्हणतात. या काळात तापमान, पर्जन्य, वायुभाराची परिस्थिती पुढीलप्रमाणे असते.
a) तापमान (Temperature)
मार्चनंतर महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होऊ लागते. एप्रिल व मे महिन्यात सूर्य उत्तर गोलार्धात असल्याने या काळात तापमान वाढु लागते. या काळात राज्याचे तापमान २८°-२९° से एवढे असते.
*) दैनिक तापमान कक्षा (Daily temperature range)
पर्जन्यामुळे या काळात सरासरी तापमान कमी असते. त्यामुळे येथील दैनिक तापमान कक्षा कमी असते. ही कक्षा खंडांतर्गत भागात ७° ते तर किनारपट्टीच्या भागात २° से एवढी कमी असते.
*) वायुभार (Atmospheric Pressure)
एप्रिल मे महिन्यात सूर्य उत्तर गोलार्धात असतो. त्यामुळे या ठिकाणचे सरासरी तापमान अधिक असते. भारताच्या उत्तर व वायव्य भागात तापमान आत्यंतिक अधिक असते. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर दक्षिणेस हिंदी महासागरावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. महाराष्ट्रात वायुभार ९८५ ते ९९० मिलीबार पर्यंत असतो. हा वायुभार पश्चिमेकडून पूर्वेकडे (किनारीभागापासून खंडांतर्गत भागात) कमी होत जातो.
d) वारे
या काळात हिंदी महासागरावर जास्त दाबाचा पट्टा असतो तर उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे वारे नैऋत्येकडून ईशान्यदिशेकडे (फेरलच्या नियमामुळे) वाहू लागतात.त्यांना आपण
सेमी पेक्षा जास्त लागतात. त्यांना आपण नैऋत्य मान्सुन वारे' असे म्हणतो.
e) पर्जन्य
* साधारणपणे जुनच्या पहिल्या आठवड्यात भारतात पर्जन्यास सुरुवात होते. विशेषतः ७ जुनच्या सुमारास मान्सुनचे वारे कोकणकिनारपट्टीस येऊन धडकतात. यालाच 'मान्सुनचा स्फोट होणे' असे म्हणतात.
अरबी समुद्रावरून येणारे हे वारे आपल्या मार्गात खूप बाष्प धारण करतात. हे वारे सह्याद्री पर्वतास अडतात त्यामुळे महाराष्ट्राच्या कोकण भागात आणि सह्याद्रीच्या पश्चिम उतार व घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो यालाच 'प्रतिरोध पर्जन्य' (Orographic rain) म्हटले जाते.
नैऋत्य मान्सुन वाऱ्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य मिळते. पश्चिम किनारपट्टीच्या भागात हे पर्जन्य २५० ते ३००
सेमी इतके असते तर मराठवाड्यामध्ये हे पर्जन्य ५० सेमी ते १०० सेमी पर्यंत असते. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे होय. या ठिकाणची प्राकृतिक रचना नरसाळ्याप्रमाणे (Funnel shaped) आहे. वाऱ्याच्या प्रवेशाची दिशा या ठिकाणी उघडी आहे व इतर तीन बाजु नरसाळ्याप्रमाणे बंद आहेत.
त्यामुळे मोसमी वारे येथे आल्यानंतर उर्ध्व दिशेने जाऊ लागतात. त्यामुळे याठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो.
आंबोली येथे पडणारे पर्जन्य ७४७ सेमी तर महाबळेश्वर येथे पडणारा पाऊस ६६३ सेमी. . हे मोसमी वारे पश्चिम घाट ओलांडून पूर्व बाजुच्या उताराकडे जातात तेव्हा हे वारे उतरू लागतात. यावेळी त्यांचे तापमान इतका आहे. पर्जन्याचे प्रमाण कमी होते.
. यामुळे महाबळेश्वर येथे पर्जन्याचे प्रमाण ६६३ सेमी असले तरीही त्याच्या जवळच असणाऱ्या वाई येथे पर्जन्याचे प्रमाण १०० सेमी एवढे आहे. अशाच प्रकारची परिस्थिती सोलापूर , सातारा (माण, खटाव तालुके) अहमदनगर व मराठवाड्याचा पश्चिम भाग येथे अनुभवयास मिळते. या भागास 'पर्जन्यछायेचा प्रदेश' म्हणतात.
यानंतर मराठवाड्याकडे येत असताना मोसमी वारे नदयांवरून वाहत येतांना बाष्प ग्रहण करतात. त्यामुळे मराठवाड्याच्या पूर्वेस पर्जन्याचे प्रमाण वाढतांना दिसते.
. विदर्भाच्या पूर्वेकडे नदयांचे क्लिष्ट जाळे असून याठिकाणी वनांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी पर्जन्याचे प्रमाण वाढतांना दिसते. गडचिरोली येथे १५० सेमी पर्यंत पर्जन्य मिळते तर चिखलदरा (अमरावती जिल्हा) याठिकाणी डोंगर व वनांमुळे पर्जन्याचे प्रमाण १७० सेंमी पर्यंत आहे.
• आर्द्रता : हवेतील आर्द्रतेचे प्रमाण या काळात सर्वाधिक असते. हे प्रमाण किनारपट्टीच्या प्रदेशात ८५-९०% असते तर राज्याच्या अंतर्गत भागात हे प्रमाण ६०-८०% पर्यंत असत
महत्त्व : शेती हा राज्यातील महत्त्वाचा व्यवसाय असून बहुतांश शेती ही पर्जन्याधारीत आहे. खरीप पिकांच्या दृष्टीने वर्षा ऋतुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, भूईमुग, कापूस, तूर भात अशा खरीप पिकांच्या लागवडीसाठी हे पर्जन्य महत्त्वाचे आहे
♦️महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण (Rainfall Distribution)
महाराष्ट्राच्या पर्जन्य वितरणावर भूपृष्ठ, समुद्र सानिध्य, नदीप्रणाली जाळे व वने यांचा परिणाम होतो. पडणाऱ्या पर्जन्यानुसार महाराष्ट्राचे तीन गटात विभाजन होते.
i) अधिक पर्जन्याचा प्रदेश (High rainfall region)
ii) मध्यम पर्जन्याचा प्रदेश (Moderate rainfall region)
iii) न्युन पर्जन्याचा प्रदेश (Less rainfall region)
i) अधिक पर्जन्याचा प्रदेश (Higia rainfall region) प्रदेश : कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उताराचा भाग, घाटमाथा
पर्जन्याचे प्रमाण : सरासरी २०० सेमी इतका पाऊस कोकण किनारपट्टीस मिळतो. हे प्रमाण घाटमाथ्यावर अधिक असते. उदा. अंबोली (सिंधुदुर्ग) महाबळेश्वर (सातारा) = ६६३ सेमी 2 = ७४७ सेमी
कारणे : अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे सर्वप्रथम कोकणात पोहचतात त्यामुळे याठिकाणी खूप पाऊस पडतो. पुढे हे वारे सह्याद्री पर्वताला अडवले जातात. त्यामुळे त्यांचे उर्ध्ववहन चालु होते व त्यापासून पाऊस पडतो. यालाच आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो. अशाप्रकारे समुद्रसान्निध्य आणि प्राकृतिक रचना या दोहोंचा परिणाम म्हणजे याठिकाणी पडणारा जोराचा पाऊस होय. :
ii) मध्यम पर्जन्याचा प्रदेश
प्रदेश : सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराचा व पायथ्याचा भाग आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, तसेच नांदेड, धुळे, नंदुरबार जिल्हयांचा उत्तर भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा समावेश होतो.
पर्जन्याची कारणे : अरबी समुद्रावरून येणारे वारे जेव्हा सह्याद्री पर्वत ओलांडून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची पर्जन्यक्षमता कमी होते.
हे वारे जसे जसे पूर्वेकडे जाऊ लागतात तसे त्यामधील बाष्पाचे प्रमाण वाढते व त्यापासून मिळणाऱ्या पर्जन्याचे प्रमाण वाढत जातांना दिसते. विदर्भाच्या पूर्व भागात वनांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारे जेव्हा या वनांना अडतात तेव्हा येथे पाऊस पडु लागतो.
• गडचिरोली, अमरावती, धुळे, नंदुरबार या ठिकाणी वने व पर्वतांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. पर्जन्याचे प्रमाण : सरासरी पर्जन्य १०० सेमी पर्यंत पडतो
iii) न्युन पर्जन्याचा प्रदेश
प्रदेश : सर्वसाधारणपणे पर्जन्य छायेच्या प्रदेशाचा यात समावेश होतो. सातारा, सांगली जिल्ह्यांचा पूर्व भाग तसेच अहमदनगर जिल्हा, मराठवाडा व खानदेशच्या महत्त्वपूर्ण भागाचा यात समावेश होतो. कमी पर्जन्याची कारणे : समुद्रापासून दूर असणारा हा भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. याठिकाणी वनस्पतींचे अच्छादन विरळ असून येथील भूभाग कमी उंचीचा आणि समतल आहे.
पर्जन्याचे प्रमाण : सरासरी पर्जन्याचे प्रमाण ५० सेमी असून काही भागात हे प्रमाण ३०-४० सेमी इतके कमी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा