MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

मंगळवार, १ मार्च, २०२२

Cultural heritage of Odisha:ओडिसा राज्याचा सांस्कृतीक वारसा

ओडिसा




♦️धार्मिक स्थळे

 *सुर्यमंदिर (कोणार्क):

*कलिंग शासक नरसिंहदेव याने काळ्या ग्रॅनाईटपासून हे स्थापत्य बनविले याला ब्लॅक ध्दा म्हणतात.

*सूर्यदेवतेला समर्पित रथ स्वरूपात (६ घोडे, २४ चाके) याची आखणी केली आहे. याला १९८४ ला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाले. जगन्नाथ मंदिर (पुरी), लिंगराज मंदिर (भूवनेश्वर) हि अन्य प्रसिध्द मंदिरे आहेत.

♦️उत्सव:

*रथयात्रा:

*आषाढ महिन्यात रथात बसलेल्या देवता विष्णूची मिरवणूक काढली जाते.

• बीच उत्सव :

*पुरी बीचवर पारंपारीक नृत्य, संगीत, कला सादरीकरणतसेच शाल, साडी आदीचे दुकान लावले जातात. सर्वात आकर्षक म्हणजे वाळूतील कला (Sand art) प्रदर्शन. 

• कलिंग महोत्सव :

*हा महोत्सव शांततेचा युध्दावरील विजय दर्शवते. यामध्ये युध्दकला नृत्य हे महत्त्वपूर्ण असते. एकेकाळी ओडिशा हे उत्कल(कलेमध्ये निपूण क्षेत्र) या नावाने ओळखले जायचे. कला व स्थापत्य :

• कोटपड हातमाग वस्त्र (Kotpad Handloom fabric GI as hasdicraft)

*कोटपड येथील आदिवासी विणकरांनी शाक रंगात (vegatable dye) रंगवलेली ही वस्त्र आहेत. या क्षेत्रातील आऊल(Aul) झाडापासून बनवलेल्या रंगाने तयार वस्त्र पर्यावरणाशी मैत्रीपूर्ण आहे.

• ओडिशा इकात (Orissa Ikat, G.I.) :

*इकातमध्ये विणकामाची रेजिस्ट डाईंग प्रोसेस (Resist dyeing process) वापरली जाते. यामध्ये धाग्याचे तंतु कौशल्याने जूळवून घेतले जातात. ज्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांना रंग द्यायचा नाही ते अगोदर रबरबँडने झाकून उरलेला भाग रंगवला जातो. नंतर क्रमश बंधन केलेला भाग वेगळ्या रंगात रंगवला जातो व इच्छित रंगसंगती साधली जाते. 

•कोनार्क दगडावरील कोरीव काम (GI. as handifraft) : 

*पांढरा सोप स्टोन, हिरवट क्लोराईट, गुलाबी खोंडोलाईट, काळा ग्रॅनाईट या दगडावर कोरीव काम केले जाते व देवतेचे रूप दिले जाते.

•पट्टाचित्र (Patta chitra - G.I. as handicraft)

*पट्टाचित्र हे कपड्यावरील चित्रकला आहे. यामध्ये वस्त्राचा काहीभाग खळ लावून चित्रासाठी तयार केला जातो. नंतर गुळगुळीत करून विविध रंगाने आऊटलाईन काढल्या जातात. रंग उडू नये म्हणून लाखेचा लेप दिल जातो.

 •खांडवा साडी(Khandua saree G.I. as handicraft) :

-ओडिशाचा अभिमान म्हणता येईल अशी रेशमी खांडवा साडी पारंपारिक पद्धतीने लाकडी मागावर हाताने विणलेली साडी आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या तुसर या रेशमामुळे साडीचा पोत सूक्ष्म आहे.

• गंजाम केवडा फुल (G.I. as Agricultural product) :

*उडीसाच्या किनारपट्टीवरील गंजाम जिल्ह्यात केवडा सुगंधी द्रव्याचा ग्रामोद्योग प्रसिद्ध आहे. केवडा रूह (तेल) हे सुद्धा उडिसातील प्रसिद्ध भौगोलिक संकेतांक (G.I.) ठरले आहे.

•बेहरामपूर पट्टा जोडा (Behrampur patta & joda G.I. as handicraft) : *ही शुद्ध रेशमाची, माध्यम वजनाची, गडद रंगाची साडी आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूवर (पृष्ठभागावर) साम्यता आहे. त्यामुळे कोणत्याही बाजूने परिधान करता येते. यावरील डिझाईन या साध्या आहेत.

•संबळपूरी बांधा साडी (G.I. as handicraft):

*संबळपूरी साडी ही पारंपारिकरित्या विणलेली ईकात साडी आहे. संबळपूरी टाय अॅण्ड डायचा हा सर्वात प्राचीन प्रकार आहे. यात दुहेरी इकात चेकर बोर्ड पॅटर्न आहे. 

•हबसपूरी साडी (GI. as handicraft) :

*जनजाती विणकामाचा आधार असलेली ही लोकप्रिय साडी आहे. यामध्ये साडी दोन्ही सूती व रेशमी प्रकारात बनवली जाते व दुपट्टा हा सूती असतो.

•बोमकाई साडी (GI. as handicraft) :

•गोपालपूर टसर विणकाम वस्त्र (GI. as handicraft) :

*रेशमाच्या टसर प्रकारापासून गोपालपूर येथे साडी व इतर विणकाम केलेले वस्त्र जवळपास ४०० वर्षापासून बनवले जातात. 

• ढालपाथेर पडदा (G.I. as handicraft) 

*ढालपाथेर येथील पडदा हा त्याच्या अद्वितीय डिझाईन, सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. धाग्यांचे दाट विणकाम कौशल्य यातून दिसते.

•तालपत्रचित्र : .

*तालपत्रचित्र किंवा ताडपत्रावर केलेले कोरीव काम हे गोठलेल्या रेषांच्या स्वरूपात जे हस्तलिखिताचे स्पष्टीकरणात्मक रूप म्हणता येईल.

•सादरीकरण कला :

• शास्त्रीय नृत्य

• ओडिसी (Odissi)

*पुरातत्व पुराव्यांचा विचार करता ओडिशी हा भारतातील सर्वात जुना शास्त्रीय नृत्य प्रकार ठरतो. नाट्यशास्त्रामध्ये याचा उल्लेख ओडरा-मगधी असा आला आहे.

*इतर नृत्यापासून वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे त्रिभांगी ज्यात डोके, छाती व ओटीपोट याची होणारी स्वतंत्र हालचाल आणि चौका, ओडिशीला दोन्ही शास्त्रीय व भक्तिपर नृत्य म्हणता येईल. ओडिसी हा डौलदार, ज्ञानेंद्रियांना सुखद वाटणारा, बोलका, सुसंस्कृत नृत्य प्रकार आहे. ओडिशीचा मोहक प्रकार हा तांडव (masculine) व लास्या (femine) नृत्य आहे. शरीराच्या धडाचा प्रवाहीपणा इतकाच असतो की , समुद्राच्या शांत लाटांचे स्मरण करून देणारे ते ओडिशा तटाला आपटतात.

• नृत्य -

•छऊ (Chhau dance)

*छऊ नृत्य हे पूर्व भारतातील पारंपारीक नृत्य प्रकारात येते, जे महाभारत, रामायण या महाकाव्यांना रंगभूमीत आणते. छऊच्या मयूरभ्रूज (ओडिशा) प्रकाराचा पाया हा पारंपारिक युद्धकला (Martial) आहे. हे मौखिक युद्ध आहे. ज्यामध्ये नृत्यांच्या दोन्ही गटाकडून तलवार व ढाल यांचा आळीपाळीने वापर केला जातो. देवधनी नृत्य, पालानृत्य. हे आणखी लोकप्रिय नृत्य आहेत. 

•लोकनृत्य .

*यामध्ये घुमुरा नृत्य - ओडिशात लोकप्रिय बनत चाललेले हे लोकनृत्य आहे. यात पोषाख हा अदिवासीसारखा केला जातो. पण मुद्रा (भाव) या ओडिसीसारखे असतात.

भारतीय सांस्कृतिक वारसा 



 

सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र          

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश   

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा आसाम 

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा गोवा       

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा छत्तीसगड  

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा गुजरात

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश   

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा हरियाणा   

क्लिक करा

सांस्कृतिक वारसा उत्तराखंड 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा सिक्कीम 

क्लिक करा  

सांस्कृतिक वारसा बिहार 

क्लिक करा  

 सांस्कृतिक वारसा मिझोराम 

 क्लिक करा

 सांस्कृतिक वारसा त्रिपुरा 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा झारखंड 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा केरळ 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा नागालँड 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा तामिळनाडू 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा राजस्थान 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा पंजाब 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा ओडिसा 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा मेघालय 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा मणिपूर 

 क्लिक करा

सांस्कृतिक वारसा कर्नाटक 

क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा