•राजस्थान
*पुरातात्विक वारसा (Archeological heritage) -
• जैसलमेर किल्ला (Jaisalmer fort)
*ही जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. पिवळ्या वालुकाश्माच्या भिंतींनी बनलेला हा किल्ला थारच्या वाळवंटात त्रिकूट टेकडीवर आहे. दिवसा याचा रंग तपकिरी, सूर्यास्ताच्या वेळी मध-सोनेरी होतो. यामुळे याला सोनेरी किल्ला म्हणतात. यामध्ये पाणी वाहून जाण्याची प्रणाली आहे.
• जंतर-मंतर
*जयसिंह द्वितीय यानी १८व्या शतकात जयपूर येथे बांधलेली जंतर-मंतर ही वेधशाळा आहे. याचा युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये २०१०ला समावेश केला. जयसिंहाने अशाच वेधशाळा दिल्ली, मथुरा, उज्जैन, वाराणसी येथेही बांधल्या.
*धार्मिक स्थळे
अजमेर शरीफ दरगाह, ब्रह्मा मंदिर (पुष्कर), दिलवाडा मंदिर, ओसियन मंदीर, रानीसती मंदिर.
*उत्सव
*तीज उत्सव
*राजस्थानमधील तीज उत्सव हा शिवाची पत्नी देवी पार्वती हिला समर्पित आहे. मान्सून महिन्यास राजस्थानी महिला दीर्घ आयुष्य, आनंदी वैवाहिक जीवन याची कामना करतात. हिरवे वस्त्र परीधान करून त्या तीज ची गाणी गातात.
• पुष्कर यात्रा
*कार्तिक महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो.
• गंगोत्री यात्रा
• उंटोत्सव
*बिकानेर येथे हा उत्सव भरतो. उत्कृष्ट उंट वंश, उंट स्पर्धा, रस्सीखेच असा साजरा केला जातो.
*कला व हस्तशिल्प
• कोटा डोरीया (साडी) (G.I. as handicraft)
*कोटा साडी ही शुद्ध सूती व रेशमाची साडी आहे. यावर चौकोनी आकृतीबंध काढले आहेत. याला खतस् म्हणतात. चौकटीचे डिझाईन असलेले विणकाम कोटा साडीला लोकप्रिय बनवते.
*जयपूरची निळी भांडी (Blue pottery of Jaipur G.I. as handicraft)
*मुलतानी मातीची बनवलेली ही भांडी त्यांच्या या डोळ्यांना आकषून घेणाऱ्या निळ्या रंगामुळे प्रसिद्ध आहे.
• मोलेलाचा ओतीव टेराकोटा (Kathputli of Rajasthan G.I. as handicraft) मोलेला येथील लाल मातीपासून बनवलेल्या मुर्त्या प्रसिद्ध आहेत.
• राजस्थानची कठपुतळी (Kathputli of Rajasthan G.I. as handicraft)
*कठपुतळी म्हणजे कळसूत्री बाहुले. ही राजस्थानमध्ये लाकूड, सूती वस्त्र, धातूची तार यापासून बनते. ही सजावट केलेली लाकडी बाहुली म्हणता येईल. येथील कोणतीही यात्रा, धार्मिक उत्सव, सामाजिक संमेलन कळसूत्री बाहुल्यांचा खेल पार पडल्याशिवाय संपत नाही.
• बिकानेर भुजिया (Bikaneri Bhujia, G.I.as food article) ही भुजीया बेसन पीठ, बिकानेरी मसाला, मोठ दाळ, लालतिखट, इलायची, शेंगदाणा तेल आदीपासून बनते.
• बंधनी (Tie & Die)
• चित्रकला
मेवाड शैली, किशनगढ शैली, बुंदी शैली, मारवाड शैली, बिकानेर शैली, जयपूर शैली. (यांचे मागे वर्णन आले आहे.)
* नृत्य
*कालबेलिया (Kalbelia dance)
*सर्व ज्ञानेंद्रियांना सुखी बनवणारे (Sensory) कालबिलीया हे नृत्य राजस्थानातील कालबेलिया या जमातीकडून सादर केले जाते. याला सपेरा नृत्य किंवा नाग जादुगरी नृत्य म्हटले जाते. यामध्ये पारंपारिक वाद्य पुंगी वाजवली जाते. याचा २०१० ई.स. ला मानवतेची अस्पृशीय सांस्कृतिक ठेव म्हणून युनेस्को यादीत नोंद झाली आहे
• घुमर (Ghoomer) नृत्य
*हे नृत्य विशेषतः आदिवासी महिलांकडून सादर केले जाते. नृत्याचा हा साधा प्रकार आहे. हेलकावे घेणाऱ्या गतीमध्ये जेव्हा महिला गोल गिरकी घेतात तेव्हा घाघरा रूंदावतो. त्यांच्या चेहेऱ्यावर बुरखा असतो. हे नृत्य मंगल उत्सव म्हणजे लग्न प्रसंगी महिला वधूकडून एक धार्मिक पारंपारिक विधी म्हणून सादर केले जाते. याला घाघरा नृत्यही म्हणतात.
• चारी नृत्य (Chari dance)
*यामध्ये महिला डोक्यावर भांडे घेवून तोल सांभाळत नृत्य करतात.
• तेरा थाळी नृत्य
*कच्छी घोडी नृत्य, भवई नृत्य.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा