♦️कर्नाटक
*पुरातनकालीन वारसा (Architectural heritage)
• पट्टडकल (Pattadakal) :
*यांचा युनोस्कोच्या वारसा स्थळ यादीत समावेश १९८७ साली केला गेला. यामध्ये ऐहोळ, बदामी, पट्टडकल ही जवळजवळ वसलेली ठिकाणे चालुक्यवंशीय स्थापत्याचे दर्शन घडवतात.
*पट्टडकल येथे अनेक शैव मंदिरांची साखळी आहे. यामध्ये विरूपाक्ष मंदिर (बैसर शैली), संगमेश्वर मंदिर (द्रविड शैली), मल्लिकार्जुन मंदिर, काशीविश्वनाथमंदीर(नागर शैली), पापनाथ मंदीर यांचा सामावेश होतो.
• होयसळ :
*येथे बेसर शैलीची शैव-वैष्णव दोन्ही मंदिरे आढळतात. यामध्ये चन्नकेशव मंदिर(वैष्णव), होयसळेश्वर (शैव), केशव मंदिर (वैष्णव)
• हंपी:
*हंपीचा युनोस्कोच्या वारसा स्थळ यादीत समावेश १९८६ ला केला गेला. विजयनगर साम्राज्याची ही शेवटची राजधानी ठरली. तालीकोटा युध्दात ही राजधानी पुर्णतः उध्वस्त झाली.
*येथील विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, पट्टभिरामा मंदिर, हजाराराम मंदिर दर्शनिय आहे. दरवर्षी हंपी उत्सव साजरा केला जातो.
♦️उत्सव :
• उदागी:
*हा आंध्र प्रदेश व कर्नाटकचा नवीन वर्ष सुरूवात होण्याचा उत्सव आहे.
• महामस्तकाभिषेक :
*श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी गोमटेश्वराच्या मूर्तिवर दुध, मध, हळद, चंदन नारळ, फुलांचा अभिषेक केला जातो.
♦️कला व हस्तशिल्प (Arts and crafts)
*मैसूर पारंपारिक चित्रकला (G. I. as handicraft) .
*ही चित्रकला तिच्या सुरेखपणा, नि:शब्द षा, गुंतागुतीच्या कुंचल्याचा फटकारा, गडद रंगाचा नाजूक उपयोग, आकृत्यांचे डौलदार आरेखन यासाठी प्रसिध्द आहे. या चित्रांचे विषय हिंदू देव-देवतांचे महाकाय दृश्य आहे.
•मैसूरचा गांजिफाकार्ड (Ganjifa card of Mysore, GI. as handicraft) : *कार्डवर केलेली पारंपारिक कलाकुसरी (गंजिफा) यामध्ये प्रथम पेपर राळ व तेलाच्या लेपाने अस्तरीत करून त्यावर नैसर्गिक रंगाने चित्रकला केली जाते.
•मैसूर रेशम (Mysore silk, G. I. as Handicraft) Handicraft) :
•बिद्रीवेअर (Bidriware, G. I. as handicraft) :
*हे धातूचे हस्तशिल्प आहे. मुख्यतः बिदरमध्ये लोह किंवा कास्यधातूवर चांदीचे पातळ पत्राच्या थर स्वरूपात काम केले जाते. यामध्ये भांडी, धातूच्या प्राणीकृती यावर हे काम केले जाते.
• चन्नापाटण खेळणी (G.I. as Handicraft)
•कासूटी नक्षीकाम (Kasuti Embroidery, G.I. as
*या नक्षीकामात इलकल, कांचिपुरम या साडीवर जवळपास पाच हजार टाके घेतले जातात. या कलेचा इतिहास चालुक्य काळापर्यंत मागे जातो.
•इलकल (Ilkal sarees, G.I. as Handicraft) :
*बागलकोट जिल्ह्यातील इलकल या गावी बनवल्या जाणाऱ्या पारंपारिक साड्यामध्ये साडीचा मुख्य भाग सूती तर किनार किंवा पदराचा भाग रेशमाचा बनलेला असतो. यावरही कसूटी नक्षीकाम केलेले असते.
• मोलकलमुरू साडी (Molakalmura sarees G.I. as , handicraft) :
*ही पारंपारीक रेशमी साडी आहे. या साडीवर आरशे, सुंदर चांदीची लहान चकती किंवा अन्य सजावटी काम कलेले असते. ही साडी महिलेच्या व्यक्तिमत्वाला, तिच्या सौंदर्याला आणखीनच खुलवते.
•संदूरलंबानी नक्षीकाम (Sandur Lambani Embroidary, G.I. as Handicraft) :
*लंबानी जातीच्या जवळपास ३००० महिला संदूर (बेलारी) येथे हे नक्षीकाम करतात. यामध्ये महिलांच्या व्यक्तिगत वस्तु, ड्रेस, बॅग यावर आरशे, शंख ज्वेलरी यावर हे नक्षीकाम केले जाते.
•किन्हाळ खेळणी (Kinhal toys, GI. as handicraft) : या काष्ठ खेळणी आहेत.
•पारंपारिक रंगशाळा :
• यक्षगान:
*रंगभूमीवरील ही कला शास्त्रीय, लोक व ग्रामीण अशी सर्व वैशिष्ट्ये दार्शविते. ही कर्नाटकातील पारंपारीक नाटक नृत्य व शास्त्रीय लोककला आहे.
*यामध्ये हावभाव, नृत्य, संगीत, गायन, नकल सर्व एकाच नाटक नृत्यातून साधले जाते. यामध्ये कर्नाटक संगीताची जोड असते पूर्ण रात्रभर याचे सादरीकरण चालते.
• गोंबेअट्टा
*हा कर्नाटकातील बाहुल्यांचा एक प्रकारचा खेळ आहे. मैसूर चंदन साबण व मैसूर चंदन तेल यांना भौगोलिक संकेतक प्राप्त आहे.(G I. as manufactured product)
♦️लोकनृत्य (Folk dance)
*डोलू कुन्हिता, गोरवा कोलीया, सुगीकुनीथा
*यामध्ये ढोल वाद्य वाजवत गायन केले जाते.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा