केरळ
♦️धार्मिक स्थळे (Religious institutions) :
• शबरीमाला मंदिर :
*शबरीमाला मंदिर पश्चिम घाटात(डोंगर) वसलेले अय्यपन देवतेचे मंदिर आहे. विनाशकारी शक्तीपासून केरळचे संरक्षण करण्यासाठी योगी लोकांनी त्यांच्या शक्तीने ज्या पाच मंदिर पंचशस्थांची उभारणी केली त्यापैकी हे एक आहे.
• श्री पद्मनाभस्वामी मंदिर :
*विष्णू या देवतेला समर्पित असलेले हे मंदिर तिरूअनंतपूरम किल्याच्या उजव्या बाजूला पडते. हे द्रविडियन स्थापत्यशैलीत असुन दगड व ब्रांझ धातुनी बांधले आहे.
• वडकुनाथ मंदिर (Vadakkunathan) :
*थ्रिसूर येथील हिंदू धर्माचे प्राचीन मंदिर वडकुनाथ मंदिर हिंदू देवता शिवाला समर्पित आहे.
♦️उत्सव/सण (Festivals & fairs)
*ओनम् :
*ओनम हा केरळचा राज्य उत्सव असून प्राचीन काळापासून साजरा केला जातो. ओनम हे अतिप्राचीन कालीन राजा बाहुबली जो लोकप्रिय होतो त्याच्या गृहवापसी (home coming) चे निदर्शक आहे. हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट-सप्टेबर मध्ये जवळपास दहा दिवस चालतो.
• पुरम उत्सव :
*हा वार्षिक उत्सव दुर्गा व काली यांना समर्पित असून खरीपाची पिक काढणी च्या वेळेस मंदिरात साजरा केला जातो. यामध्ये सोन्याच्या पत्र्यानी सजवलेल्या हत्तीची मिरवणूक काढली जाते.
• वल्लमकली (Vallamkali) :
*वल्लमकली हा केरळीय लोकांचा पारंपारीक बोटींचा स्पर्धा उत्सव आहे. मुख्यतो ओनम उत्सवा दरम्यानच अनेक आकारांनी युक्त बोटी मानवी शक्तीने वल्हविल्या जातात.
♦️कला व हस्तशिल्प (Art & craft)
• अरानमुला कन्नाडी (Aranmulla Kannadi, G.I. as handicraft) :
*हा केरळातील धातू आरसा आहे. याला इतर आरशांसारखेच समोर परावर्तक आरसा आहे.
• अल्लपी काथ्या (Alleppey coir, G.I. as handicraft) :
*नारळाच्या या काथ्यापासून चटया दोरखंड, पायदाण्या बनविल्या जातात.
•पल्लकडचे मड्डलम (Maddalam of Palakkad, G.I. as handicraft)
*हे एक आघात वाद्य (percussion) आहे. या वाद्यात ड्रम हा फणसाच्या लाकडापासून बनवतात.
*याच्या दोन्ही बाजूला कातडीपासून बनवलेले वेगवेगळे आवाज उत्पन्न करणारे पातळ थर असतात.
•कुथामपुल्ली साडी (Kuthampully sarees, G.I. as handicraft) : *केरळातील कुथामपुल्ली साडी कापसाच्या धाग्यापासून बनलेली असल्याने परिधान करावयास थंड व आरामदायी असते.
• बलरापूरम साडी :
*बलरामपूरम(तिरूअनंतपूरम) येथे तयार होणारी ही सूती साडी तिच्या सुक्ष्म सूती धाग्यच्या विणकामासाठी प्रसिध्द आहे.
*साडीवर गुंतागुतीच्या डिझाईनही आढळतात त्यातील नक्षीकामामुळे त्या आकर्षक दिसतात.
• कासारगोड साडी (Kasargod sarees, G.I. as handicraft) :
*येथील साड्या या मुख्यतः सूती वस्त्राच्या तर काही कृत्रीम रेशमाच्या आहेत.
•चंदामंगलम धोती (GI. as handicraft)
*या धोतीचे वैशिष्ट्ये म्हणजे साधी रचना व त्यावर आडव्या धाग्याचा स्पेशल इफेक्ट होय.
२०१२ ला बौध्दिक संपत्ती अपीलीय बोर्डाने याला दिलेले भौगोलिक संकेतक मागे घेतले.
•नेट्टरपेटी :
*ही महिलांची पारंपारीक दागीना पेटी आहे. प्रभावशाली महिलांचे हे निदर्शक आहे. रोजवूड झाडापासून ही हस्तकला बनवली आहे.
•नेट्टीपट्टोम (Nettippattom) :
*हत्तीच्या अग्रमस्तिष्कावर धारण करण्यात येणारा हा सोन्याचा दागिना आहे. शिरोधारा
• पय्यन्नूर पवित्र अंगठी (Payyannur pavitra ring, GI. as handicraft) :
*पयन्नूर (कन्नूर) येथील कारगीरांनी बनवलेली ही सोने व चांदीची अंगठी आहे. हा पवित्र दागिना अस्थेने धारण केला तर नशीब उजळते अशी धारणा आहे.
♦️कला सादरीकरण :
• कथकली:
*हा शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे. यामधील कथा व रंगमंच भूमिका या महाभारत, रामायणातून घेतल्या आहेत.
*याचे सादरीकरण फक्त पुरषांकडूनच केले जाते. महिलांची भूमिकासुध्दा पुरषच वटवतात. हे नृत्य व नाटकाने संमिश्र स्वरूप ड्रमच्या पार्श्वभूमीने सुरू होते.
*कलाकार न बोलता फक्त मुख हावभावाने (मुद्रा) २४ प्रकारच्या हातवाऱ्याने व विशिष्ट आकर्षक पोषाखात सादरीकरण करतात.
•मोहिनीअट्टम :
*अत्यंत मोहक स्त्रीने केलेले हे नृत्य असा याचा अर्थ होतो. हे भरतनाट्य व कथकलीचे मिश्रित रूप आहे.
*हे एकपात्री असून फक्त महिलेकडूनच सादर केले जाते. मृदंग व वायोलिन वाद्याच्या कर्नाटक संगीत तालात हे सादर केले जाते. या नृत्याचा भाव हा विष्णू देवतेला समर्पित नृत्य आहे. यामध्ये ४० मूलभूत हालचाली (अटककल) आहेत. यामध्ये स्त्री पांढरी साडी, पायात चुंगरू, गळ्यात अलंकार, कानात रिंग, नेकलेस, केसांमध्ये जास्मीन फुलांचा गजरा, कमरपट्टा धारण केलेली असते.
• युध्दकला :
*कलारीपयट्ट (Martial art - Kalaripayattu)
*२००० वर्षापासून चालत आलेली केरळमधील कलारीपयट्ट व ही युध्द कला पुढे चीनी मार्शल आर्टला मार्गदर्शक ठरली बुध्द साधू बोधीधर्मा यानी ती चीनला नेली. ही कला हल्ला व संरक्षण या दोन पॅटर्नमध्ये सादर केली जाते.
• पारंपारिक रंगभूमी :
कुटीयाट्टम (Kutiyattam) :
*युनोस्कोने याची नोंद मानवतेचा अस्पर्शीय सांस्कृतिक वारसा अशी केली आहे. (२००८) ही भारतातील सर्वाधिक प्राचीन रंगशाळा आहे. जी २००० वर्षापासून चालत आली.
*यामध्ये चकियार (पुरूषकलाकार), नांगियार (महिला कलाकार), नांबियार (वाजवणारा), विदूषक (हसवणारा) या चारींचा समावेश रंगभूमीवर असतो.
•मुडीयेटू (Mudiyettu) :
*२०१० ला युनेस्कोने याची नोंद मानवतेचा अस्पर्शीय सांस्कृतिक वारसा म्हणून घेतली आहे. दरवर्षी भद्रकाली मंदिरात सादर केले जाणारे हे एक नृत्य-नाटक आहे.
*याचा विषय हा देवी कालीमाता व राक्षस दारिका यांच्यातील युध्द आहे. खरीफ पिकाची काढणी झाल्यानंतर मंदिरात संपूर्ण गाव यात सहभागी होते.
*यात रंगभूमीवर सात कलाकार शीव, भद्रकाली, नारद, दारिका, दानवेंद्र, कुली, कोईंबिदार यांचे पात्र असते.
• कृष्णाट्टम (Krishnattam) :
*कृष्णाम ही मंदिरातील नृत्य-नाटक असून कृष्णाच्या जीवनातील कथा आठ दिवस नाटकाच्या भूमिकेतून पार पाडल्या जातात. यात अवतारम्, कालीयामर्दनम, रासक्रीडा, कामसंवधम, स्वयंवरम, वनयुध्दम, विविदावधम, स्वर्गारोहणम् या कथांचा समावेश होतो.
♦️लोककला :
•थुल्लूल (Thullal) :
*थुल्लल हे अग्रगामी कवि कंचन नांबियार याने सुरू केलेले सोलो डान्स (Solo dance) सादरीकरण आहे.
*नाट्यशास्त्राच्या तत्वावर आधारीत या लोककलेत शास्त्रीय संगीताइतके कडक नियम नाहीत. यामधील गीत हे साध्या मल्याळम भाषेत विनोद सादरीकरणाचे साधारण व दररोजच्या जीवनाशी संबंधित आहे. यामध्ये नृत्यकार संगीताच्या तालावर चेहरा, हात, शरीराचे हावभाव दाखवत नृत्य सादर करतो.
•ओप्पाना (Oppana) :
*ओप्पाना हे लोकनृत्य मालाबार किनाऱ्यावरील मोपला जातीच्या महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये जवळपास १५ महिला मुस्लिम वधूभोवती गोल फेरा धरून रंगीबेरंगी कपडे घालून गीत म्हणत संगीताच्या तालावर नृत्य करतात.
•कोलकल्ली :
•केरळच्या मुस्लिम शेतकरी (महिला-पुरूष) वर्तुळाकार फेरा धरून संगीताच्या तालावर हातात धारण केलेल्या टिपऱ्या एकमेकावर आपटत सादर केले जाते.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा