पंजाब
♦️ धार्मिक स्थळ (Religious heritage)
*श्रीहरमंदिर साहिब (अमृतसर)
*शिखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी बांधलेले अमृतसर येथील सुवर्णमंदीर हरमिंदर साहिब या नावाने ओळखले जाते. याची युनेस्कोच्या वारसा स्थळ यादित नोंद झाली आहे.
♦️उत्सव
• गुरूनानक जयंती
*पंजाबमध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहाने दरवर्षी गुरूनानक जयंती साजरी केली जाते.
*शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक यांचा हा जन्मदिवस गुरूंद्वाऱ्यापासून पहाटे प्रभातफेरी, गाणे भजन यांनी , सुरू होतो.
• लोहरी
*पंजाब राज्यातील मोठ्या उत्सवापैकी एक लोहरी उत्सव पीक काढणीला आल्यावर सुरू होतो. यावेळी देवाने पंजाबला दिलेल्या संसाधन, संपन्नतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अग्निभोवती फेरे धरून नृत्य, गायन केले जाते. बालकांना खाऊ देत दुलाभट्टी नावाची प्रार्थना प्रत्येक घराच्या दारावर जाऊन केली जाते.
• बैसाखी
*बैसाखीला वैशाख (एप्रिल/मे) महिन्याचा पहिला दिवस उत्तर भारतासाठी काढणीचा उत्सव सुरू करणारा आहे.
*रबी पिके पिकलेली असतात. यावेळी उत्साही पंजाबी लोकांचा आनंद त्यांच्या प्रसिद्ध लोकनृत्य भांगडा मधून दिसतो. ढोलकीच्या प्रत्येक नादावर नृत्यकाराच्या हालचाली नांगरणे, पेरणे, खुरपणे, पिकवणे, उफणणे या क्रमाने सुरू होतात. हिंदूंच्या दृष्टीने ही याचे महत्व आहे. कुंभमेळा (हरिद्वार) याच काळात येतो.
• होला (मोहल्ला)
*होला-मोहल्ला उत्सव हा पंजाबमधील सर्वाधिक रंगीबेरंगी व आनंददायी उत्सव आहे. या उत्सवाचे आयोजन आनंदपूर साहिब येथे होळीचा एक भाग म्हणून सुरू होते.
*याच दिवशी गुरू गोविंदसिंगांनी पंचप्यारे यांची निवड केली होती. या उत्सवाप्रसंगी युद्धकला जसे धनुष्यबाण, तलवारबाजी, अश्वारोहण, आक्रमण-संरक्षण सादरीकरण होते.)
* कला व हस्तशिल्प (Art and Handicraft)
*फुल्कारियन नक्षीकाम (Phulkarian Embroidery, G. I. as handicraft) -
*यामध्ये फुलांच्या आकृतीचे नक्षीकाम वस्त्र शाल, स्कार्प, ओढणी यावर केले जाते. पंजाबी स्त्रिया फक्त कौटुंबिक वापरासाठी या कलेचा नमुना जो दिवसेंदिवस खुलतच चालला आहे. रफूचे टाके कपड्याच्या उलट भागावर घेतले जातात व त्यामध्ये रंगीत रेशमी धागा गुंफून नक्षीकाम केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न बनवले जातात.
*लोकनृत्य
• भांगडा (Bhangra Dance)
*भांगडा हा देशातील ५ लोकप्रिय नृत्यापैकी एक आहे. या नृत्याचे सादरीकरण वैशाखी रात्रीपासून पीक काढणीच्या मौसम आगमनाने सुरू होते. पण आता हे नृत्य लग्नकार्य, पार्टी, वाढदिवस आदी आनंदी प्रसंगी मोठ्या संख्येने व उत्साहाने सादर केले जाते.
• झुमर नृत्य (Jhumar)
*झुमर हे मोहक लोकनृत्य पंजाबी लोकनृत्य शैलीचा अविभाज्य भाग आहे. यामध्ये मध्यभागी ढोलकीवाले व त्याभोवती नृत्यकार (dancer) गोल फेरा धरून आनंदाने गाणे म्हणत नाचतात. हे नृत्य केवळ पुरूषांनी उत्सव, लग्न यामध्ये तिन्ही पिढ्या (आजोबा, वडील, मुलगा) एकत्र नृत्य करताना दिसतात.
•किकली नृत्य (Kikli dance)
*किकली हे आकर्षक नृत्य आहे. यात महिला जोडीजोडीने हातात हात तिरप्या दिशेने घेऊन गोल गिरकी घेतात.
• अन्य नृत्य
*लुड्डी, जुली, गिद्धा, सामी, जागोनृत्य.
*डंकारा नृत्य
*याला गटका म्हणतात. हे शिखांचे युद्धकला नृत्य आहे. लोकांची धारणा आहे की, पाचव्या गुरूला मृत्यूदंड दिल्यावर सहावे गुरू हरगोविंद याने गटका (डंकारा) चालू केला.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा