•तामिळनाडू
•कला व हस्तशिल्प (Art and craft)
Telecalcat feal (Nachair Koil lamp) . •
*तंजावूर पेंटींग
* विजयनगर काळात विकसित झालेली चित्रकलेची ही शैली दक्षिण भारतातील शास्त्रीय चित्रकलेच्या प्रकारात येते.
*चित्रकलेचे वैशिष्ट्ये म्हणजे पृष्ठाची समृद्धता, चकमदार रंग, निटनेटकी रचना आणि मुख्यतः लखलखीत सोन्याचा पत्रा यामुळे ती आकर्षक दिसते. हिंदू देव-देवता या शैलीचे विषय आहेत.
*तंजावूर बाहुली (Tanjavur dolls, G.I. as handicraft)
*टेराकोटापासून बनलेल्या या बाहुलीचा गुरूत्व मध्य हिच्या तळाला असल्याने सदैव मंद लयीत नृत्य करताना दिसते.
*कशीही पडली तरी ती लगेच तिच्या मूळ स्थितीला येते.
*तंजावूर वीणा (G.I. as handicraft)
*हे कर्नाटक शास्त्रीय संगीताचे तंतू आधारीत वाद्य यंत्र आहे. फणसाच्या लाकडापासून हे बनवलेले असते.
* स्वामीमलाई ब्रांझ प्रतिमा (G.I. as handicraft)
*विश्वकर्मा जमातीने बनवलेल्या देव-देवतांच्या या ब्रांझच्या (धातू) मूर्त्या प्रसिद्ध आहेत.
*नाचेरकोली दिवा
नाचेरकोली (तंजावूर) येथे बनवलेला ब्रांझ धातूचा दिवा प्रसिद्ध आहे. हा दिवा lost wax तंत्राने बनवला आहे.
*नागरकोईलची मंदिर दागिने
*नागरकोईल येथे देव-देवतांचे दागिने बनवले जातात. काही दागिने मंदिरातील देवदासीसाठीही तयार केली जातात
*चेट्टीनाड कोट्टन (G.I. as handicraft)
*चेट्टीनाड येथील कोट्टन हे पारंपारिक बुरूडकामाने केलेल्या टोपल्या आहेत.
*सालेम वेनपट्ट (G.I. as handicraft)
*ही सालेम येथे बनवलेली रेशमी साडी आहे.
*कांचीपुरम रेशीम (G.I. as handicraft)
*कांचीपूरम हे रेशमी विणकाम व हातमागाचे पारंपारीक केंद्र आहे. येथील रेशमी साड्या प्रसिद्ध असून रेशीम उद्योग राजराज प्रथम (चोल) व विजयनगर साम्राज्यात खूप फुलला.
*आरनी रेशीम (Arani silk, GI. as handicraft)
*अरनी हे तामिळनाडूतील प्रसिद्ध रेशीम केंद्र आहे. मुदालीया जातीचे लोक येथे रेशमी साड्या बनवतात.
• भवानी जमक्कलम (Bhavani Jamakkalam) ही सतरंजी आहे. हातमागापासून पारंपारीक पद्धतीने विणलेली आहे.
*मदुराई सुंगुडी (Madurai Sungudi, G.I. as handicraft) ही एक सुती साडी आहे.
♦️उत्सव
• पोंगल
हे थाई या तमिळ महिन्याचा पहिल्या दिवशी साजरे केले जाते. धान्य काढणीच्या वेळीचार दिवसाच्या या उत्सवात सूर्य देवतेची पुजा केली जाते व शेती पिकवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोंगल सणापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. भारतात साजरी केली जाणारी मकरसंक्रांती हा सण याच दिवशी येतो.
•जलीकेट्ट - ही बैलांची झुंज आहे.
• महामहम् (Mahamaham) *तामिळनाडूतील हा पवित्र उत्सव बारा वर्षातून एक वेळा साजरा केला जातो. हा उत्सव कुंभकोणम् (तंजावूर) येथे भरतो. हा जलाभिषेकाने (शाही स्नानाने) साजरा करतात. यामध्ये कावेरी नदीत शाही स्नान केले जाते. याला दक्षिण भारताचा कुंभमेळा म्हटले जाते
*सादरीकरण कला (Performing arts)
• शास्त्रीय नृत्य
• भरतनाट्यम (Bharatnatyam)
*भरतमुनीच्या नाट्यशास्त्र ज्यामध्ये नृत्य, रंगभूमी, संगीत वर्णन आहे. यातून भरतनाट्यमचा उगम झाल्याचे मानले जाते. तामिळनाडूचा हा शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे.
*या नृत्याची उत्क्रांती शिवमंदिरातील प्रायोगिकीकरणातून झाली. हे अत्यंत विशेष विज्ञान आहे. ज्यामध्ये पारंपारिक पार्श्वभूमी आणि कडक नियमांचे सम्मेलन घडते.
*भरतनाट्यम हे कौशल्याने भाव(मुद्रा), राग (संगीत), ताल (वेळ) या तीन नृत्य पैलूंना (थिल्लाना) मूर्त रूप देते. भरतनाट्यम तंत्रात हात, पाय,चेहरा, शरीराची हालचाल ही ६४ तत्वाच्या समन्वयासोबत ठेवली जाते.
• सिलाम्बम (Silambam)
*सिलाम्बम ही दक्षिण भारतातील काठ्यांची पारंपारिक युद्ध कला आहे. यामध्ये बांबूच्या काठ्या वापरल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्याला एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. शरीरस्वास्थाचेही चिकित्सक उपाय सांगितले जातात.
• रंगशाळा (Theatre) -
*थेरूकुथू(Theru kosthu)
*थेरूकुथू हे रंगभूमी सादरीकरण मुख्यतः खेड्यात असून मरियाम्मा (पावसाची देवी) मंदिरासमोर सादर केली जाते.
* द्रोपदी वस्त्रहरण, कर्णमोक्षम, पल्हादचरित्रम् हे या सादरीकरणाचे भाग आहेत.
*नोंदीनाटकम् हे नृत्य नाटक आहे.
• करावंजी
गणपती या मुख्य देवतेशी संबंधित हे नृत्य नाटक आहे
• लोककला (folkart)
• कराग अट्म (लोकनृत्य) -कोलट्टम् लोकनृत्य.
• पोईक्कल कुडीराईअट्टम -
*घोड्याचे डमी रूप धारण करून नृत्य केले जाते. कुम्मी खेड्यातील महिला वर्तुळाकार थांबून एकमेकांना टाळ्या देत कोणत्याही वाद्यविना गाणे गात नृत्य करतात. .
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा