MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, ६ मार्च, २०२२

Forest and wildlife in Maharastra - महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीव संपदा



♦️महाराष्ट्रातील वने

*महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१६-१७ नुसार महाराष्ट्रातील नोंदित वनक्षेत्र ६१,६२२ किमी इतके आहे. हे प्रमाण राज्याच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या २०.३०% एवढे आहे. देशाच्या एकूण वनक्षेत्रापैकी ८% वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

* महाराष्ट्रातील वनांचे प्रकार (Forest Types Maharashtra

 १) उष्णकटीबंधीय सदाहरीत वने (Tropical Evergreen Forest) •महाराष्ट्रातील पर्वतीय भागात जेथे तापमान व पर्जन्यमान अधिक आहे अशा क्षेत्रात ही वने आढळतात. साधारणपणे २५० सेमी पेक्षा अधिक पर्जन्याच्या क्षेत्रात ही वने आढळतात.

•प्रदेश सह्याद्री पर्वताचा घाटमाथ्याचा व पश्चिम उताराचा भाग तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ही वने आढळतात. जांभ्या मृदेच्या भागातही वने आढळतात. वैशिष्ट्ये ही वने अत्यंत सदाहरीत व घनदाट असु शकते. एकक क्षेत्रात अनेक प्रजातींची वृक्षे आढळतात. यासर्व प्रजातींचा पानगळतीचा कालावधी भिन्न असल्यामुळे ही वने सदाहरित दिसतात.

•येथील वृक्ष उंच व सरळ वाढतात तसेच उंचावरील भागात फांद्या व पानांचे प्रमाण अधिक असते. या वनांमध्ये स्तरीकरण (Stratification) आढळते. हे स्तरीकरण महाराष्ट्रातील वनांत साधारणपणे ३ स्तरीय असते. 

•वृक्ष यांची उंची साधारणपणे ४५ ते ६० मी पर्यंत असु शकते. 

•फणस, जांभूळ, नागचंपा, कावसी, बांबू, पांढरा सिडार इत्यादी

* महत्व

•एकक क्षेत्रात अधिक प्रकारची वने आढळत असल्यामुळे येथे व्यापारी तत्वावर लाकुडतोड करता येत नाही त्यामुळे येथे वनोद्योगांचा विकास विशेष झालेला दिसत नाही. तसेच या वृक्षांचे लाकूड कठीण व जड असते. त्यामुळे यांच्या लाकडाची वाहतूक करणे कठीण ठरते.

२) उष्णकटीबंधीय निमसदाहरित वने | Tropical Semi-Evergreen Forest) . ही वने पानझडी आणि सदाहरीत वनांच्या दरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात आढळतात. सदाहरीत वनांच्या बाह्यभागात व सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी ही वने आढळतात.

• ही बने २०० सेंमीपेक्षा अधिक पर्जन्याच्या आणि २०० ते ३० सेल्सियस तापमानाच्या प्रदेशात आढळतात. . सह्याद्रीच्या पश्चिम भागात ही वने आढळतात.

♦️वैशिष्ट्ये

• वनांत स्तरीकरण आढळत नाही हे वृक्ष उन्हाळ्यात पाने गाळतात त्यामुळे ही निमसदाहरित दिसतात.

• ही वने सलग पट्ट्यात न आढळता तुरळक व तुटक स्वरूपात आढळतात.

• वृक्षांची पाने रुंद असून वृक्षांची उंची ६० ते ६५ मी पर्यंत असु शकते.

♦️वृक्ष

ऐन, किंजळ, रान-फणस, बेन, कदंब, हिटी, बिबळा, शिसव, साग, कुसुम, साल, बांबू इ/ जातींचे वृक्ष आढळतात. . ही वने सदाहरीत वनांपेक्षा कमी उंचीची आणि कमी घनतेची असतात.

*महत्त्व

•आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून लाकडाचा वापर शेतीची अवजारे व घरे बांधण्यासाठी होतो.

• झाडांची पाने, फळे, फुले यांचा उपयोग औषधयुक्त घटक म्हणून केला जातो. प्रदेश सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांच्या पूर्व भागात व कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांच्या पश्चिम भागात ही वने आढळतात.

३) उध्यप्रदेशीय आर्द्ध पानझडी बने Tropical raoist deciduous forest) 

•यांनाच मोसमी/मान्सुन वने असे म्हणतात. प्रदेश . १०० ते २०० सेमी पर्जन्य व २० ते ३०° सेल्सियस तापमानाच्या प्रदेशात ही वने आढळतात.

 • ही वने पावसाळ्यात वाढतात तर उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाने गाळतात म्हणून यांना 'पानझडी वने' म्हणतात.

• या झाडांची उंची ३० ते ४० मीटर पर्यंत असते.

वृक्ष

•हिरडा, बिबळा, लेंडी, येरूळ, किंजळ, कुसुम, आवळा, वड, पिंपळ, मोह, कळंब, शिसम

• सागवान हे येथील महत्त्वपूर्ण वृक्ष आहेत

*प्रदेश

•चंद्रपूर गडचिरोलीच्या पूर्व भागात चिरोली व नवेगाव टेकड्यांवर ही वने आढळतात. 

• भंडारा, गोंदियाचा काही भाग तसेच उत्तर कोकणातील डोंगररांगांमध्येसुद्धा ही वने आढळतात.

• सातमाळा-अजिंठा रांगात नाशिक, ठाणे, धुळे, नंदूरबार भागातही ही वने आढळतात.

*महत्त्व

• ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असून सागाचे लाकूड हे इमारत व फर्निचरसाठी वापरतात.

• लाख, मध, डिंक, फळे व तंतु यांचे दैनंदिन जीवनात व वनांधारित उद्योगात विशेष महत्त्व आहे.

♦️ उष्ण कटीबंधीय शुष्क पानझडी वने

•ही वने सामान्यतः ५० ते १०० सेंमी पर्जन्याच्या व ३५ ते ४०० सेल्सियस तापमानाच्या प्रदेशात आढळतात.

*वैशिष्ट्ये .

•ही वने विरळ असतात. 

• निरनिराळ्या जातींची वृक्षे दुरदुरवर आढळतात तसेच एका विशिष्ट वृक्ष प्रजातीचे या वनांत अधिपत्य आढळते. . झाडांची उंची कमी असते व त्यांना काटे असतात.

 • सातपुडा व अजिंठा डोंगररांगांच्या प्रदेशात म्हणजे जळगाव, धुळे, बुलढाणा इ. जिल्हयांत तसेच विदर्भातील भागात म्हणजे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला जिल्ह्यात ही वने आढळतात.

 • घाटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालगत पर्जन्यछायेच्या प्रदेशात ही वने आढळतात.

• खैर, बेल, पळस, अंजन, तेंदू हे वृक्ष या वनांत आढळतात. 

♦️वृक्ष महत्त्व

खैरापासून कात मिळवतात तर इतर वृक्षांचे लाकूड इंधन म्हणून वापरतात. तेंदुच्या पानांचा वापर बिड़ी निर्मितीमध्ये करतात.

५)उष्ण शुष्क प्रदेशातील काटेरी वने (Tropical Thorn forest)

• महाराष्ट्रात ५० सेंमीपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात ही वने आढळतात.

 • उन्हाळे अतिशय कोरडे असल्यामुळे मृदेतील आर्द्रता कमी असते त्यामुळे या प्रदेशात ही वने आढळतात.

♦️वैशिष्ट्ये

•वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने त्याची वाढ होत नाही  .

• उन्हाळ्यात यांची पाने गळतात.

• या वनांत युफोरबिया (Euphorbia) व कॅसिया (Cassia) या अशा खुरट्या झाडाचे प्राबल्य आढळते.

• या वनस्पती खुरट्या व काटेरी असतात

♦️वृक्ष

पळस, हिवर, बोर, बाभुळ, निंब, निवडुंग, हिंगनबेट इ. वनस्पती आढळतात. 

♦️महत्त्व

• बाभूळ, निंब यांचा वापर शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तसेच इमारती बांधकामासाठी होतो. कोरफड औषध म्हणून उपयुक्त आहे.

• तारवड सालीचा उपयोग कातडी (Tanning/ कमावण्यासाठी होतो

. प्रदेश

• मध्य महाराष्ट्रात नदयांच्या खोऱ्याच्या लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगररांगांवर कमी उंचीच्या पठारावर ही वने आढळतात. यामध्ये पुणे, सातारा, सांगली व अहमदनगरच्या पूर्व भागातील वनांचा समावेश होतो.

 • सोलापूर, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागातही ही वने आढळतात. मृदेची कमी असणारी सुपिकता व पर्जन्यांचे कमी असणारे प्रमाण यामुळे या वनांचा दर्जा घटत जात आहे.

६)भरती ओहोटीच्या पट्ट्यातील वने (Tidal Flats)

•महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना भरती-ओहोटीची वने किंवा खारफुटी वने असे म्हणतातForest circle)

*वैशिष्ट्ये

• ही वने दाट असतात परंतू यांची उंची फार नसते.

*वृक्ष 

• गंगेच्या त्रिभूजप्रदेशातील सुंद्री वनांप्रमाणेच ही वने असतात. 

• चिप्पी, मारांडी, तिवट, अंबोरी

• कांदळवने (Mangrrove) महत्त्वाच्या प्रजाती : Avicennia, Rhizophora

*महत्त्व

*आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाची आहेत.

 • वनांतून बोटी व नावा बनविण्यासाठी लागणारे लाकूड मिळते. 

दलदलीची वने ( खारफुटीची वने (Magrooves)

- महाराष्ट्रातील दलदलीची वने । १४७ किमी / 

सर्वाधिक दलदलीची वने रायगड  ९५ किमी

*'सर्वात कमी दलदलीची वने : मुंबई उपनगर ३७ किमी

♦️इतर माहिती 

*अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील साग लाकुड प्रसिद्ध आहे.

*कंडोल वृक्षांच्या डिंकाचा वापर ice cream निर्मिती मध्ये होते. सालाई वृक्षापासून राळ मिळते

♦️महाराष्ट्रातील वनसंवर्धन

*१९८८ च्या राष्ट्रीय वन धोरणानुसार प्रत्येक राज्याच्या १/३ क्षेत्रावर वने असणे अगत्याचे आहे. या दृष्टीने वनक्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केले आहेत. रोपवाटिका स्थापन करणे, वनसंवर्धन करणे, वनशेतीस प्रोत्साहन देणे यांसारखे अनेक उपक्रम शासन राबवते यासाठी राज्यात २० वनसंशोधन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. .

♦️सामाजिक वनीकरण,

•पडीक व खाजगी जागेवर वनीकरण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला गेला.

•१९८१ मध्ये महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली. या विभागाचे ३४ जिल्ह्यांतील (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे वगळता) विभागीय कार्यालयांमार्फत व ५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत या विभागाचे काम चालते.

♦️किसान रोपवाटिका -१९८६

•महाराष्ट्रामध्ये १९८६ पासून सुरू.

•यामध्ये दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींना लाभदारक म्हणून प्राधान्य दिले जाते. कालवे, जलाशयांभोवतीचे वृक्षाच्छादन वाढविण्याचा प्रयत्न .

•या अंतर्गत शासन वर्गीकृत जाती-जमातींच्या व्यक्तींना वृक्षाच्छादन वाढविण्याचे काम देते. यांमध्ये शासन कालव्यांशेजारी १ हेक्टर जमिन वर्गीकृत जाती-जमातींच्या व्यक्तींना देते. तसेच त्या जमिनीवर झाडे लावुनही देतात. यामध्ये वृक्ष लागवडीचे आणि त्यांच्या वाढीचा खर्च शासन करते. या व्यक्ती ना १.५०/- ७. दरमहा भत्ता देऊन त्या झाडांची देखभाल करावयाची व त्याबदल्यात त्यांना जमिनीवरील अक्षोत्पादनाचा निम्मा चारा त्या व्यक्तीस मिळतो.

४)संत तुकाराम वन  ग्राम योजना २००६-०७ मध्ये या योजनेस सुरुवात झाली.

वने आणि वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करणे. .. कायदेशीर वृक्षतोडीपासून वनांचे रक्षण करणे.

•या योजनेअंतर्गत १२.५१७ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या (Joint Forest Management Committees) १५,५०० गावात सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात FMC द्वारे २७.०४ लक्ष हेक्टर एवढ्या वनक्षेत्राचे व्यवस्थापन केले जाते. २९.७० लाख जण या योजनेचे सदस्य आहेत.

♦️सार्वजनिक वनीकरण

*२० कलमी कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ मध्ये वन विभागाने ५३० हेक्टर जमीन, १७१६ किमी सामुदायिक जमिनीवर लावली आहेत.

*१६.९२ लाख रोपे २०१५-१६ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने २२ लाख रोपे ४३२ हेक्टर आणि १११० किमी सामुदायिक जमिनीवर लावली आहेत

६. विस्तार वने (Entension Forestry) :

• यामध्ये रस्ते, कालवे यांच्या कडेने दुतर्फा वृक्षलागवड केली जाते. यासाठी वनखात्याकडून रोपे आणि आर्थिक सहाय्य केले जाते. शुष्क प्रदेशात वाहत्या वाऱ्यासमवेत वाळू उडून येऊ नये म्हणून शेतासभोवताली झाडे लावून निर्माण केलेले वातप्रतिबंधक पट्टे (Wind belt) आणि पडित गायरान व वन-जमिनीवर पुन्हा करणे या बाबींचा यात समावेश होतो. . -

♦️वन्यजीवन : यामध्ये एक प्रकार म्हणजे Agro forestry असून यात पडीक व कमी सुपिक अशा जमिनीमध्ये झाडे लावली जातात. अशा शेतीत सुबाभूळ, साग, निलगीरी यासारखी झाडे लावून शेती केली जाते. याचा दुसरा प्रकार म्हणजे Farm forestry होय. यामध्ये शेताचे बांध, विहिरी याभोवती तसेच घराभोवती वृक्षलागवड केली जाते. सर्वसाधारणपणे पॉपलर आणि निलगिरी या शेतकऱ्यांकडून सर्वाधिक स्विकार आहे.

♦️वन्यजीवन (Wildlife)

*महाराष्ट्रात अनेक प्रकारचे हवामान विभाग आढळतात. त्यामुळे आढळणारे वन्यजीवनही भिन्न आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेला पश्चिमघाट यातील काही भाग महाराष्ट्रात आहे.

*पश्चिम घाट, पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हे वन्यजीवनाच्या दृष्टीने समृद्ध आहेत. या वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात, या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याद्वारे प्रयत्न केले जातात. त्यापैकी महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने पुढीलप्रमाणे;

राष्ट्रीय उद्याने :


• राष्ट्रीय उद्यानाचे नाव ठिकाण. 

*. ताडोबा (१९५५) भद्रावती तालुका, चद्रपूर "महाराष्ट्रातील प्रथम राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ-११६.५५ चौकिमी पानझडीची वने आढळतात सांबर लोटण ही वैशिष्ट्यपूर्ण जागा • मगरपालन केंद्रही आहे.

*नवेगावबांध (१९७२) | अर्जुनी मोरगाव तालुका प्रामुख्याने बगळे, मोर आढळतात क्षेत्रफळ १३३.९चौ.किमी गोंदिया -पवनीचे अरण्यपुत्र माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने आगेसरी पहाड, बोदराईचे मंदीर, आणि बदबद्या नाला बांधण्यात आला आहे.

* पंडित जवाहरलाल नेहरू पवनीगाव, नागपूर या परिसरामध्ये तोतलाडोह हे सरोवर पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच (१९८३) नदीवर बांधले आहे. क्षेत्रफळ - २७५ चौ. किमी 'गोलिया पहाड' हा नागपूरमधील सर्वांत मोठा डोंगर या राष्ट्रीय उद्यानात आहे.

* संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (१९६९)/ बोरिवली • याचे क्षेत्र मुंबई उपनगर (४४.४५ किमी) क्षेत्रफळ आणि ठाणे (५८.६४ किमी) या दोन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.

*गुगामल राष्ट्रीय उद्यान (१९७४) मेळघाट, अमरावती • पानझडी वनांचे अधिक्य चितळ, वाघ क्षेत्र १६७३ चौ. किमी (उडणारी खार यांचे सहअस्तित्व

* चांदोली राष्ट्रीय उद्यान २००४) सांगली, सातारा, कोल्हापूर, Oriendtal Garden Lizard à 3hfira क्षेत्रफळ ३१७.७ चौ. किमी रत्नागिरी-सर्वाधिक फुलपाखरे तसेच सदाहरीत वने, पानझडी वनांचे सहअस्तित्व • २०१२ मध्ये UNESCO द्वारा जागतिक वारसोस्थळ घोषित १०४ चौ.किमी 2 आढळतात.

♦️क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान = गुगामल राष्ट्रीय उद्यान

♦️ क्षेत्रफळाने सर्वांत लहान राष्ट्रीय उद्यान = संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.

*महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प | १९७३ साठी

•भारत सरकारने वाघांच्या घटत्या संख्येचा धोका लक्षात घेऊन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला. य राज्य सरकारनेही व्याघ्रसंवर्धनासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. यानुसार महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे फलीत म्हणजे २०१० मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या ती आज २०१४ च्या व्याघ्रगणनेनुसार १९० झाली आहे.

•व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन सहा व्याघ्र प्रकल्पाद्वारे प्रयत्न करते.

 व्याघ्र प्रकल्प -ठिकाण- वाघांची संख्या

मेळघाट -चिखलदरा, धारणी तालुका, अमरावती -४२ .

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प- सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी -३.

 ताडोबा अंधारी - चंद्रपूर -१०८

  पेंच (महाराष्ट्र) -नागपूर -३२ . .

 बोर-  नागपूर, वर्धा -४

नवेगाव नागझिरा -गोंदिया -३ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा