MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

मंगळवार, २९ मार्च, २०२२

IMF and World Bank UPSC mpsc notes notes


• दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे अनेक राष्ट्रांच्या, अर्थव्यवस्थांचे अतोनात नुकसान .

१९४४ मध्ये या अर्थव्यवस्थांच्या पुनर्रचनेबरोबरच विकसनशील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा योजनाबद्ध विकास घडवून आणण्यासाठी.

 जगातील ४४ देश ब्रेटनवूड, न्यू हॅम्पशायर (यु.एस.ए.) येथे १ जुलै ते २२ जुलैं, १९४४ दरम्यान ‘संयुक्त राष्ट्र चलनविषयक आणि वित्तीय परिषदे' च्या माध्यमातून एकत्र .

तीन प्रमुख मुद्द्यांचा विचार -

१.विनिमय दराचे स्थैर्य व अल्पकालिन व्यवहारतोलाचे असंतुलन भेडसावणाऱ्या देशांना मदतीची तरतूद.

२.विकासासाठी भांडवलाची उपलब्धता.

३.वस्तूंच्या व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना.

 प्रश्न सोडविण्यासाठी अनुक्रमे तीन बहुपक्षीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय-

१.आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF).

२.आंतरराष्ट्रीय पुनर्बाधणी व विकास बँक (IBRD).

३.आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना (ITO).

आंतरराष्ट्रीय नाणे निधी  (International Monetary Fund: IMF)

 स्थापना -  २७ डिसेंबर, १९४५ ( ब्रेटन वूड परिषदेच्या शिफारसीनुसार ) 

१ मार्च, १९४७ -  प्रत्यक्ष कार्य  सुरू 

मुख्यालय -वॉशिंग्टन डी.सी..

सदस्य संख्या

 (March 2022) -IMF चे 190 सदस्य -

 IMF चे अलिकडील सदस्य पुढीलप्रमाणे आहेतः

i)१८४ वा सदस्यः ईस्ट तिमार (जुलै २००२)

ii)१८५ वा सदस्यः माँटीनेग्रो (जानेवारी २००७)

iii)१८६ वा सदस्यः कोसोवो (जून २००९)

iv)१८७ वा सदस्यः तुवालू (जून २०१०)

v)१८८ वा सदस्यः दक्षिण सुदान (१८ एप्रिल २०१२)

vi)१८९ वा सदस्यः नौरू (१२ एप्रिल २०१६) 

vii)190 वा सदस्यः अंडोरा ची रियासत , (16 ऑक्टोबर 2020 )

IMF चे वित्तीय वर्ष (Finantial year)- १ मे ते ३० एप्रिल .

कार्ये/उद्दिष्टे (Functions/Objectives)

‘Articles of Agreement' नुसार IMF ची कार्ये/ उद्दिष्टे -

i)आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्यास प्रोत्साहन देणे

ii)जागतिक स्तरावर विनिमय दर स्थैर्य राखण्यास प्रोत्साहन देणे. 

iii)चलनांच्या विनिमयावरील बंधने कमी किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी बहुपक्षीय पेमेंट व्यवस्थेस (multilateral payment system) प्रोत्साहन देणे.

iv)आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संतुलित वाढीला प्रोत्साहन देणे.

 v)आपल्या सदस्य राष्ट्रांतील तात्पुरते व्यवहारतोलाचे असंतुलन (BoP mismatchs) दूर करण्यासाठी त्यांना अल्पकालीन कर्ज देणे. 

 vi)आर्थिक सर्वेक्षणाद्वारे, सदस्यांच्या आर्थिक आरोग्यावर लक्ष ठेवणे, आणि त्यांना येऊ घातलेल्या जोखिमांपासून सावध करणे, तसेच त्यांना धोरणत्मक सल्ला देणे.

IMF चे संघटन (Organisation of IMF) 

• IMF - ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स' (Board of Governors) (सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था )

प्रत्येक सदस्य राष्ट्र या बोर्डावर आपले प्रतिनिधी म्हणून एका गव्हर्नरची व एका पर्यायी गव्हर्नरची नेमणूक करतो.

 भारताचे केंद्रीय वित्त मंत्री - गव्हर्नर .

 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI ) -कार्य पर्यायी गव्हर्नर.

•दैनंदिन कामकाजासाठी - ‘कार्यकारी मंडळ' (२४ सदस्य सर्व सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करतात.)

IMF चे भांडवलाचे स्त्रोत (Sources of Finance)

IMF ला आपले कार्य करण्यासाठी भांडवल आपल्या सदस्य राष्ट्रांकडून प्राप्त होते. 

प्रत्येक सदस्य राष्ट्राला एकूण भांडवलातील 'कोटा' (Quota) ठरवून दिला जातो. 

हा कोटा चार बाबींच्या भारित सरासरीच्या (weighted average) सहाय्याने काढला जातोः

 i)जी.डी.पी. (GDP)

जी.डी.पी.च्या गणनेसाठी बाजार दर सनद, आणि क्रयशक्ती समानतेचा दर यांचा एकत्रित वापर केलाजातो.

ii)खुलेपणा (openness)

iii)आर्थिक चलक्षमता (economic variability), 

 iv)आंतरराष्ट्रीय चलनसाठा (international reserves)

प्रत्येक सदस्य राष्ट्राला आपला कोटा पुढीलप्रमाणे देता येतो,

i)२५ टक्क्यांपर्यंत कोटा SDRs च्या स्वरूपात किंवा स्विकार्हार्य चलनांच्या (डॉलर, युरो, येन व पाऊंड) स्वरूपात 

ii) ७५ टक्क्यांपर्यंत कोटा देशाच्या स्वतःच्या चलनांच्या स्वरूपात.

१३ वी सुधारणा, २००८(2008 Amendment on Voice & Participation) 

३ मार्च, २०११ - अंमलात 

सदस्य राष्ट्रांच्या कोट्यात वेळोवेळी बदल 

 भारताचा कोटा १.९११ टक्क्यांहून २.४४२ टक्के इतका वाढला. 

 भारत हा IMF मधील कोटा धारण करणारा ११ व्या क्रमांकाचा देश .

१४ वी सुधारणा, २०१०-  (14th Amendment, 2010) 

२७ जानेवारी, २०१६ - अंमलात 

 भारताचा कोटा २.४४२ टक्क्यांहून २.७८ टक्के इतका झाला. 

 भारत IMF मधील ८ व्या क्रमांकाचा कोटा धारक देश.

**भारताचा कोटा (India's Quota in IMF) January 2022-
13114.4 Million Rs.***

कोट्याचे उपयोग (Uses of Quota)

•सदस्य राष्ट्राच्या कोट्याच्या आधारावर पुढील दोन बाबी निश्चित होतातः

१)मताधिकार (Voting Power)

•प्रत्येक सदस्य राष्ट्राचा मताधिकार पुढील सुत्राद्वारे ठरवितातः मूलभूत मते + प्रत्येक लाख एस.डी.आर. साठी एक अतिरिक्त मत. 

•मूलभूत मते सर्व सदस्यांसाठी सारखीच असतात. सध्या मूलभूत मतांची गणना एकूण मतांच्या ५.५०२ टक्के इतकी केली जाते.

•२००८ च्या सुधारणेनंतर भारताचा IMF मधील मताधिकार १.८८२ टक्क्यांहून २.३३७ टक्के इतका वाढला. त्यानुसार भारत IMF मधील सर्वाधिक मताधिकार असलेला ११ व्या क्रमांकाचा देश बनला.

•२०१० च्या सुधारणेनंतर भारताचा मताधिकार २.६६ टक्के इतका झाला असून भारत ८ व्या क्रमांकाचा सर्वाधिक मताधिकार असलेला देश बनला. (सर्वाधिक मताधिकार अमेरिकेचा असून तो १६.६६ टक्के इतका आहे.)

वित्त पुरवठ्यास प्रवेश (Access of financing)

कोट्याच्या प्रमाणानुसार सदस्यास किती कर्जे मिळतील हे निश्चित होते.

प्रत्येक सदस्यास त्याच्या कोट्याच्या वार्षिक २०० टक्क्यांपर्यंत, तर संचितपणे (cumulatively) ६०० टक्क्यांपर्यंत कर्जे प्राप्त होऊ शकतात. 

 IMF ची प्रकाशने (Publications of IMF)

१)जागतिक आर्थिक परिदृश्य (World Economic Outlook)

 IMF चे सर्वात महत्वाचे प्रकाशन असून त्यात जगातील आर्थिक घडामोडींबद्दलचे विश्लेषण असते.

२)जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल (Global Financial Stability Report)

यामध्ये जागतिक वित्तीय बाजाराचे वेळोवेळी केलेल परीक्षण असते.

 स्पेशल ड्रॉइंग राईट्स (Special Drawing Rights)

IMF ने १९७१ पासून एस.डी.आर. या एका 'आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ते' ची (international reserve asset) निर्मिती आपल्या सदस्य राष्ट्रांच्या सरकारी राखीव निधीला (sovereign reserves) पूरक म्हणून केली.

• एस.डी.आर. ची भूमिका :

i)IMF च्या 'लेख्यांचे एकक' (accounting unit) म्हणून कार्य .

•एस.डी.आर. ची किंमत १ ऑक्टोबर, २०१६ पासून पाच चलनांच्या संदर्भात मोजली जातेः

 डॉलर, 

पाऊंड,

 युरो, 

येन आणि

 रेनमीनबी. 

त्यांच्या भारित सरासरीच्या (weighted average) सहाय्याने एस.डी.आर. ची किंमत डॉलरच्या संदर्भात दररोज मोजली जाते.

ii)वापर 'आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीचे एकक' (unit of international settlements) म्हणून.

एस.डी.आर. SDR- ला ‘कागदी सोने' (paper gold) असेही म्हणतात.

जागतिक बँक गट (World Bank Group)

'जागतिक बँक गट' हा पाच आंतरराष्ट्रीय संस्थांचा गट 

i)IBRD  - International Bank for Reconstruction and Development 

ii)IDA  -  International Development Association.

iii)IFC -  International Finance Corporation.

iv)MIGA  - Multilateral Investment Guarantee Agency 

v)ICSID  -  International Centre for the Settlement of Investment Disputes. 

आंतरराष्ट्रीय पुनबांधणी व विकास बैंक (International Bank for Reconstruction and Development: IBRD)

•या बँकेलाच साधारणतः जागतिक बँक म्हणून संबोधले जाते. 

 स्थापना -  २७ डिसेंबर, १९४५ रोजी (वॉशिग्टन येथे २९ सदस्य सरकारांनी बँकेच्या 'Articles of Agreement' वर सह्या केल्या)

मुख्यालय (Headquarters) - वॉशिंग्टन डी.सी.

ऑपचारिक व्यवसाय -  २५ जून, १९४६ रोजी सुरू 

 ९ मे, १९४७ - पहिले कर्ज फ्रान्सला (सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स)

सदस्य संख्या (Member countries)

IBRD चे एकूण १८९ सदस्य  January- 2022

भारत IBRD चा संस्थापक सदस्य आहे. 

दर्जा (Status)

•IBRD ला आंतरराष्ट्रीय नाणे निधीप्रमाणेच संयुक्त राष्ट्राच्या ‘विशेषीकृत संस्थे' चा दर्जा 

 IBRD चे संघटन (Organisation of IBRD) DEvelopment

•IBRD ((Financial year) वित्तीय वर्ष -  १ जुलै ते ३० जून.

•IBRD ही संस्था एका सहकारी संस्थेप्रमाणे असून ‘बोर्ड ऑफ बँकेची गव्हर्नर्स' ही तिची अंतिम धोरण ठरविणारी संस्था आहे.

 प्रत्येक सदस्य आपला एक प्रतिनिधी नियुक्त करतो. सहसा सदस्य राष्ट्राचा वित्त मंत्री किंवा विकास मंत्र्याची या बोर्डावर नियुक्ती केली जाते.

बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी २५ ‘कार्यकारी संचालक' कार्य करतात.

 यु.एस.ए., यु.के., जपान, फ्रान्स व जर्मनी हे सर्वात मोठे भागधारक देश आपल्या प्रत्येकी एक संचालकाची नेमणूक करतात, 

तर उर्वरित सदस्य राष्ट्रांमधून २० संचालक निवडून दिले जातात.

IBRD ची कार्ये (Functions fo IBRD)

i)सदस्य राष्ट्रांना विकासासाठी दीर्घकालिन कर्जे देणे. मात्र IBRD सध्या केवळ मध्यम उत्पन्न गटातील देश आणि पतपात्र कमी उत्पन्न गटातील देशांनाच कर्जे देते.

ii)शाश्वत, न्याय्य व रोजगार-सृजक वृद्धीला प्रोत्साहन देणे.

 iii)मध्यम उत्पन्न व पतपात्र कमी उत्पन्न गटातील देशांमधील दारिद्र्य कमी करणे.

iv)प्रादेशिक व जागतिक चिंतेचे विषय हाताळणे.

वित्त पुरवठ्यास प्रवेश (Sources of financing)

•IBRD आपल्या निधीची उभारणी जागतिक वित्तीय बाजारातून करते. 

त्यासाठी बँकेमार्फत बाँड्स व दीर्घकालिन रोख्यांची विक्री केली जाते. 

हे रोखे मध्यवर्ती बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड्स, तसेच खाजगी व्यक्तीही विकत घेऊ शकतात.

 प्रकाशने (Publications)

१)जागतिक विकास अहवाल (World Development Report: WDR)

 IBRD चा सर्वात महत्वाचा अहवाल .

जगातील विविध देशांच्या आर्थिक विकासाबद्दलचा तो एक सर्वसमावेशक अहवाल .

२)व्यवसाय करणे अहवाल (Doing Business Report): 

विविध देशांचा त्याच्या व्यवसाय करण्याच्या सुगमतेनुसार (ease of doing business) लावला जातो.

३)आंतरराष्ट्रीय कर्ज सांख्यिकी (International Debt Statistcs)

जागतिक बँक गटातील इतर संस्था

१)आंतरराष्ट्रीय विकास संघटन (International Development Association: IDA)

 IBRD ची सहयोगी संस्था -जागतिक 'सुलभ कर्ज खिडकी' (Soft loan window) म्हणून ओळख.

•स्थापनाः २४ सप्टेंबर, १९६०.

•सदस्यत्वः

  जागतिक बँकेच्या सर्व सदस्यांना आपले सदस्यत्व खुले( IDA च्या कर्जासाठी पात्र सदस्य राष्ट्रसंख्या ८१ )

कार्यः 

 आपल्या सदस्यांपैकी अत्यंत गरीब देशांना व्याजविरहित कर्ज व अनुदाने देते. त्यांवरील अटी खूप सुलभ असतात.

२)आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (International Finance Corporation: IFC)

विकसनशील देशांमध्ये खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीस उत्तेजन देण्यासाठी कर्जे, समभाग व तांत्रिक सहाय्य देते.

३)बहुपक्षीय गुंतवणूक हमी अभिकरण (Multilateral Investment Guarantee Agency: MIGA)

विकसनशील देशांमध्ये गुंतवणूकदारांना गैरव्यापारी जोखिमांमुळे होणाऱ्या हानीविरूद्ध हमी देण्याचे कार्य करते.

४)आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद निवारण केंद्र (International Center for Settlement of Investment Disputes: ICSID)

केंद्र गुंतवणूक विवादांबाबत समझौता व मध्यस्थसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून देते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा