♦️🛑हडप्पा (सिंधू संस्कृती ) 🛑♦️
संस्कृतीचा शोध - दयाराम साहनी (इ.स. १९२१)
हडप्पा संस्कृती, सिंधु संस्कृती, सिंधु सरस्वती संस्कृती, कांस्ययुगीन संस्कृती ,प्रथम नगरीय क्रांती अशा विविध नावाने ओळख.
संस्कृतीचा काळ -इ.स.पू. ३५०० ते इ.स.पू. १३५०
प्रोटो आस्ट्रेलायड- सिंधु क्षेत्रात प्रथम आलेली मानव प्रजाती.
मेडिटेरियन प्रजाती - सिंधू संस्कृतीची निर्माती प्रजाती.
♦️हडप्पा सभ्यतेचा विस्तार♦️
उगम - ताम्रपाषाणिक पृष्ठभूमीत भारतीय उपमहाद्विपाच्या पश्चिमोत्तर भागात .
या संस्कृतीच्या जवळपास १४०० वस्तीपैकी बऱ्याच वस्ती सिंधु व गंगा नदीखोऱ्यादरम्यान.
पूर्वेकडे - आलमगीरपूर (हिंडन नदी ) (उत्तरप्रदेश)
पश्चिमकडे -सुत्का गेंडोर (दाश्कनदी)बलुचीस्थान ( पाकिस्तान ).
उत्तरेकडे - मांडा (चिनाब नदी) (जम्मू -काश्मीर)
दक्षिणेकडे - दैमाबाद (प्रवरा नदी) (महाराष्ट्र).
या २० लाख वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर वस्त्या होत्या.
♦️हडप्पा नगर योजना♦️
मुख्य रस्ते, एकमेकांना काटकोनात छेदत.
प्रत्येक नगराची विभागणी पश्चिमी किल्ला व पूर्व वस्ती या दोन भागात.
पश्चिमी टिला (दूर्ग) - हा उंचावर असून प्रशासकीय, सार्वजनिक भवन व अन्नागाराशी संबंधीत .
पूर्व टीला (दुर्ग ) - हा नागरीक, व्यापारी, शिल्पकार, श्रमिक यांच्या अधिवासाशी संबंधीत .
नगरक्षेत्र हे संरक्षक भिंतींनी घेरलेले.
नगरात प्रवेशाचे अनेक द्वार होते.
♦️धौलवीरा♦️
येथील साईनबोर्ड हा मुख्य प्रवेशद्वारापाशीच आहे.
घरे हि पक्क्या विटांनी बनलेली (विटांचा प्रचलित आकार ४:२:१)
पायऱ्यांच्या (सीढी) रचनेवरून घरे दोन मजली असल्याचे साक्ष मिळते.
घराचे व खिडक्या मुख्य रस्त्याकडे न उघडता त्यांची तोंडे गल्लीमध्ये उघडत.
घराची जमीन (floor) ही पक्क्या किंवा कच्च्या विटांची असून काही घराच्या भिंती प्लास्टरयुक्त.
सांडपाण्याच्या व्यवस्था बंद नालींनीयुक्त ( स्वास्थ्य व स्वच्छतेविषयीचे महत्व )
♦️हडप्पाकालीन प्रमुख नगरे ♦️
|
दयाराम साहनीद्वारा शोध. सिंधु सभ्यतेचे हे दुसरे सर्वात मोठे स्थळ. अन्नागार, कब्रिस्तान आढळले. |
|
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठे स्थळ. पश्चिमेस दूर्ग (टिल्यावर) स्नानागार, अनागार. सभा भवन. पुरोहित आवास आढळतो. हडप्पा व मोहनजोदडो यांना सिंध संस्कृतीची जुळी राजधानी असा पिग्गट यांनी उल्लेख केला.
|
|
मण्याचा कारखाना. लिपस्टिक, काजल आदी शृंगार वस्तू |
|
(जहाजांची गोदी) गोदीबाडा साक्ष. नगरीय जलप्रबंधनाचे साक्ष, अग्निकुंड . |
|
अंत्येष्टी संस्काराच्या तीन विधी अस्तित्वात असल्याचे साक्ष. छिद्रयुक्त कवटी आढळते जो शल्यक्रियेचे प्राचीनतम उदाहरण. भूकंपाचे प्राचीनतम साक्ष. |
|
|
|
जलसंरक्षणाशी संबंधित जलाशय, साईनबोर्ड. पॉलीशयुक्त श्वेत पाषाण खंड. |
|
|
|
|
|
|
♦️सिंधु (हडप्पा )संस्कृतीची विशेषता♦️
मातृप्रधान संस्कृती (सर्वाधिक नारी मृण्मूर्ती आढळल्या).
आभूषण - सोने, चांदी, माणिक्य व हाडांची
मनोरंजनाचे मुख्य साधन- पाशांचा खेळ, शिकार व नृत्य.
आर्थिक जीवन
अत्यंत विकसित आर्थिक जीवनाचा आधार -
कृषी, पशूपालन, शिल्प, व्यापार
♦️ कृषी ♦️
प्रमुख पीक - कापूस (मेहरगढ येथे जगातील सर्वात जुनी कापूस पिकवण्यासंबंधीचे प्राचीनतम साक्ष )
इतर पिके - गहू, जव, कापूस, खजूर, टरबूज, वाटाणा, राई, मोहरी, तीळ, ज्वारी, रागी .
♦️पशूपालन ♦️
कुबडवाला सांड अधिक प्रिय.
सिंधू संस्कृतीचे लोक बैल, गाय, म्हैस, मेंढी, बकरी, डुक्कर, कुत्रा, उंट, हत्ती, गेंडा, वाघ यांच्याशी परिचित.
घोड्याचे अस्तित्व नाही.
♦️शिल्प व उद्योग ♦️
प्रमुख उद्योग - वस्त्रोद्योग
मोहनजोदडो मध्ये -लाल रंगाचे वस्त्र चांदीच्या पात्रात आणि सूती धागा तांब्याच्या उपकरणाभोवती सापडला
जहाज, विटा, आभूषण, मृदभांड, मणी आदि उद्योग.
सैंधव लोक घनाकार मोजपात्र, वापरत.
खालच्या स्तरावर - द्विभाजन प्रणाली (binary system) वापर.
उच्च स्तरावर - दशमलव प्रणालीचा वापर.
♦️व्यापार♦️
अन्न कोठार, मोहरा, मानवीकृत मोजपात्र, 'मुद्रेवरील जहाज व नौकेचे चित्र .
वजनमाप हा घनाकार होता तो १६ गुणकांचा होता.
धातूची नाणी नसल्याने व्यापाराचे स्वरूप (आदानप्रदान) विनिमयाचे
गावाकडून खाद्य सामग्री शहरात येई व सूती वस्त्र, धातू, उपकरण, आभूषण नगरांकडून खेड्यामध्ये पोहचवले जायचे.
मध्य व पश्चिम आशियाई देशांशी व्यापार .
लाजावर्द, माणिक, चांदी अफगाणिस्तानातून आयात.
बहरिन देश सिंधु व मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापारी मध्यस्थ म्हणून कार्य करत होता.
इराणकडून हरिताश्म, टिन, चांदी, फिरोजांची आयात.
सिंधुनगरांकडून सूती वस्त्र, हस्तीदंत व इमारती लाकडाची निर्यात.
♦️कला♦️
पुरोहिताची अलंकृत शाल ओढलेली पाषाणमुर्ती - मोहंजोदडो
येथे सापडली. येथे नृत्यरत नवयुवकाची मूर्ती - हडप्पा
• धातूमूर्ती
धातू मुर्ती लुप्तमोम (lost wax) प्रक्रियेने बनविलेल्या आहेत.
मोहनजोदडोच्या एच.आर. क्षेत्रात नर्तकीची कांस्यमूर्ती (115 cm),
दैमाबाद - कास्य रथ सापडला.
• मृण्मूर्ती
या चिकोटी विधीने बनवलेल्या असून पुरूष, नारी व पशू-पक्ष्यांच्या आहेत.
मोहंजोदडो - वृषभ मूर्ती .
बनवाली - मातीचा नांगर.
• मोहरा (नाणी)
सेलखडी (Steatite) च्या बनवलेल्या.
काही मोहोरा मृदा, ताम्र, गोमेदच्या बनल्या होत्या.
आकार - गोलाकार, अण्डाकार, आयताकार, वर्गाकार (सर्वाधिक लोकप्रिय).
मोहनदोजडो - पशुपती शिवाची मुद्रा सापडली (त्रिमुखी पुरूष जो पद्मासनात)
•मणी (beads)
सेलखडी( Steatite ),शंख, हत्तीदात, सोने, चांदी, तांबे यांच्यापासून निर्मित
चन्दूदडो व लोथल येथे मण्यांचे कारखाने.
• मृदभांड
लाल व गुलाबी रंगाच्या मृदभांडावर अनेक आकृत्या, चित्र.
♦️लिपी♦️
सिंधू लिपी हि मृदभांड, मोहरा, कु-हाडी, ताम्रगुटीकावर आढळते.
लिपीत ४००-५०० पर्यंत चित्राक्षर (Pictograph).
सर्वाधिक U सारखा आकार.
लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि पुन्हा डावीकडून सुरू होते.
अशाप्रकारे ब्रुस्ट्रोफेडन (गोमूत्रिका) पद्धतीचे लेखन.
♦️धार्मिक जीवन♦️
सिंधू संस्कृतीच्या धर्माविषयी लिखित साक्ष किंवा मंदीर साक्ष आढळत नाहीत.
परंतू मातृदेवी पूजा, पशुपती पुजा, मूर्तीपूजा अग्निपूजा, जलपूजा, पशूपुजा, वृक्षपुजा नागपूजा यासंबंधी संकेत मिळतात.
अंतेष्टी संस्कार
१) पूर्ण समाधीकरण :
यात पूर्ण मृत शरीराला उत्तर-दक्षिण अवस्थेत झोपवून त्यासोबत उपयोगी वस्तू, भांडी, आभूषण ठेवले जायचे. यावरून त्यांच्या पारलौकीक जीवनातील विश्वासासंबंधी पुष्टीचे ज्ञान होते.
२) आंशिक समाधीकरण
३) अग्निसंस्कार :
यासंबंधीचे साक्ष मोहनजोदडो व सुरकोटाडा येथे मिळते.
♦️हडप्पा संस्कृतीच्या पतनाची कारणे ♦️
पतनासंबंधी विद्वानांची अनेक मते आहेत.
♦️१) पूर♦️
सिंधू सभ्यतेच्या पतनाचे प्रमुख कारण पूर मानला जातो. मोहनजोदडो येथे सात थर सापडतात जे ७ वेळेस पूर आल्याचे दर्शवितात.
मार्शल, मैके, एस.आर.राव यांनी या संबंधी पुष्टी केली.
♦️२) आर्यांचे आक्रमण ♦️
याची पुष्टी व्हिलर, मैके, पिगट यांनी केली.
♦️३) हवामान परिवर्तन♦️
याची पुष्टी ऑरेलस्टाईन, अमलानंद घोष यांनी केली.
अत्यधिक वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण घटले.
साधनसंपत्तीचा हळुहळु हास होत गेला.
♦️४) भूतात्विक परिवर्तन ♦️
याची पुष्टी साहनी, राईक्स, डेल्स, लैम्ब्रिक यांनी केली.
♦️ ५) विदेशी व्यापारात अडथळा ♦️
याची पुष्टी डब्लू. एफ. अल्ब्राईट यांनी केली.
♦️ ६) प्रशासकीय शिथीलता ♦️
मार्शलने याची पुष्टी केली.
♦️७) रोगराई ♦️
केनेडी यांनी याची पुष्टी केली. हडप्पा (सिंध)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा