MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

Magadha Empire upsc-mpsc Notes- मगधचा उत्कर्ष

 ♦️द्वितीय नगरीय क्रांती व मगधचा उत्कर्ष

*६०० इ .पू. ला बाली नगरीय क्रांती ही गंगा-यमुना दृावात झाली.

*बुद्ध काळात (६०० इ.पू. नगरांचा जलद उदय झाला.)

*मुद्रा (Coinage):

*मुद्रा अध्ययनाला न्यूमिस्मेटिक्स पाटले आहे. बौद्ध ग्रंथात नाण्यासाठी कहापण (कार्षापण) या मुद्रेची प्राचीन साठा (hoards) मगध क्षेत्रात मिळाला आहे,

* व्यापार -वाणिज्य:

*नगरांचा उदय झाल्याने व मुद्रा प्रचलनाने व्यापारात वृद्धी झाली, बंटा भृगुकच्छ (भट्टीच, बैरीगात्रा) सोपारा हि पश्चिम किनारपट्टीवर ता ताम्रलिप्ती है बंदर बंगालच्या किनारपट्टीवर होते,

*बीद्ध पुस्तक बाबरू जातक मध्ये मध्य आशियाला निर्यात होणाऱ्या वस्तृमध्ये मोर व कावळे यांचा उल्लेख आहे.

*शिल्पी व (व्यापाऱ्यांकडून का बमूल केले जायचे, शिल्पीकडून राज्य एक दिवस बंगार (विष्टी) काम करून घ्यायचे.

*चुंगीकर वसूली अधिकाऱ्याला शुल्काध्यक्ष म्हटले जायचे.

♦️महाजन पदांचा उदय

* बौद्ध ग्रंथ अंगुत्तरनिकाय व जैन ग्रंथ भावती सूत्रात १६ महाजनपदांचा उल्लेख मिळतो (MPSC).

१) अंग : राजधानी-चंपा, मगध शासक बिंबिसार याने याचे मगध साम्राज्यात विलीनीकरण केले.

२) मगध राजधानी राजगीर

३) बाजी : गजधीनी-लिछवी

४)काशी : राजधानी-वाराणसी

५) कोसल: राजधानी-श्रावस्ती, सरयू नदी या जनपदाच्या मधोमध वाहत होती. 

६)मल्ल : राजधानी १) कुशीनगर-बुद्ध महापरिनिर्वाण, २) पावा - महावीर मृत्यू.

७) वत्स राजधानी-कोशंबी. (इ.स.पु.४८३)

८) कुरू : राजधीनी इंद्रप्रस्थ

९) पांचाल : राजधानी-अहिछत्र, कांपिल्य

१०) अवंती : राजधीन महीष्मती, उजैन.

११) शूरसेन

१२) चेदि : राजधानी-सोत्थिवती. येथील शासक शिशुपालाचा वध कृष्णाने केला.

 १३) मत्स्य : राजधानी-विराटनगर.

१४) अिश्मक हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. जे गोदावरीकाठी होते. याची राजधानी पोटिल होती.

 १५) गांधार : राजधानी-तक्षशीला. तक्षशीला प्राचीनकाळी विद्या व व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते.

१६) कंबोज : राजधानी-राजपूर (घटक). कंबोज जनपद श्रेष्ठ घोड्यांसाठी प्रसिद्ध होते.

♦️मगध साम्राज्याचा उद्भव व उत्कर्ष

*प्रारंभिक राजधानी : राजगीर (गिरीव्रज), नंतर पाटलीपुत्र.

*इ.स.पूर्व ६व्या शतकाच्या प्रारंभी मगध आजच्या दक्षिण बिहारमध्ये पटना आणि गया यांच्या निकटवर्ती क्षेत्रात स्थित होते.

*याच्या उत्तर आणि पश्चिमेस क्रमशः गंगा व सोन नदी होती. पूर्वेकडे याच विस्तार छोट्या नागपूरपर्यंत झाला होता.

*पुर्वेकडे चंपा ही नदी त्याला अंग महाजनपदापासून अलग करत होती. याची राजधानी पाच पहाडाने वेढलेले अभेद्य शहर होते नंतर याची राजाधानी पाटलीपूत्र येथे स्थलांतरीत करण्यात आली.

* वैदिक काळातही साम्राज्यवादाची भावना होती परंतू या काळी विशाल साम्राज्य स्थापणे संभव नव्हते.

♦️हर्यकवंश (पितृहता वंश) (५४४ इ.स.पू. ते ४१२ इ.स.पू.)

*बिंबिसार (इ.पू. ५४४ ते इ.पू. ४९२),

*हर्यक वंशाचा संस्थापक बिंबिसार होता. जैन साहित्यात याचे नाव श्रेणिक आले आहे. बिंबिसाराने विजय आणि वैवाहिक संबंधाद्वारे आपल्या राज्याचा विस्तार केला.

*त्याने लिच्छवी, कोसल व मद्र या तीन राजवंशासोबत वैवाहिक संबंध स्थापित केले. बिंबिसाराने आपला राजवैद्य जीवकाला अवंती नरेश चंद्रप्रद्योतचा पांडूरोग बरा करण्यासाठी पाठविले.

*त्याने अंग जनपदाला मगधेत मिळविले. हा बौद्ध व जैन दोन्ही धर्माचा पोषक होता. याने राजगृह नावाच्या नवीन नगराची स्थापना केली. बिंबिसाराची हत्या त्याच्या पुत्राने (अजातशत्रू) केली. 

*अजातशत्रू : (४९२ इ.पू. ते ४६० इ.पू.)

*याने कोसल जनपदाशी वैवाहिक संबंध जोडले. कुटनितीज्ञ मंत्री वत्सकाराच्या सहाय्याने लिच्छवी गणराज्यावर विजय मिळविला.

*हा सुद्धा बौद्ध, जैन दोन्ही धर्माचा पोषक होता. याच्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी बुद्धाचे महापरीनिर्वाण झाले, बुध्दाच्या अवशेषावर अजातशत्रूने राजगृह येथे स्तूप बनवला.

* अजातशत्रूच्याच काळात राजगृह येथील सप्तपर्णी गुफेत प्रथम बौद्ध परिषदचे आयोजन करण्यात आले.अजातशत्रूची हत्या त्याच्या पुत्राने (उदायिन) केली.

*उदायिन (उदयभद्र) (४६० इ.पू. ते ४४४ इ.पू.)

*उदायिन याने गंगा व सोन नदी संगमावर पाटलीपुत्र (कुसुमपूर) या नगराची स्थापना केली व तिला राजधानी बनवले.

*उदायिन नंतर त्याच्या पुत्राचे शासन आले परंतु वरील पितृहता वंशाचा अंत शिशुनाग नावाच्या अमात्याने केला.

*शिशुनाग वंश (४१२ इ.पू ते ३४४ इ.पू.)

संस्थापक - शिशुनाग. (इ.पू ४१२ ते इ.पू.३९४) :

*शिशुनागाने अवंती राज्य जिंकले व मगध साम्राज्यात मिळविले. याने राजधानी वैशाली येथे स्थानांतरीत केली.

*कालाशोक (३९४ इ.पू. ते ३६६ इ.पू.)

*कालाशोक याने राजधानी पुनः पाटलीपुत्र बनवली. कालाशोकाच्या काळात वैशाली येथे द्वितीय बौद्ध परीषदेचे आयोजन करण्यात आले.

*नंद वंश (३४४ इ.पू. ते ३२४ इ.पू.)

संस्थापक : महानदिन

*महापदमानंद: हा मगध साम्राज्याचा शक्तिशाली शासक होता.

*याने पहिल्यांदाच कलिंग जिंकले व तेथे एक कालवा खोदला. या घटनेचा उल्लेख कलिंग शासक खारवेलाच्या हाथीगुंफा अभिलेखात मिळतो.

* पुराणात महापदमानंदाचा एकराट शासक म्हणून उल्लेख आला आहे. व्याकरणाचार्य पाणिनी महापद्मानंदाचे मित्र होते.

*धनानंद : हा नंद वंशाचा अंतिम सम्राट होता. याच्या शासनकाळात जनतेवर अत्याधिक कर लादल्यामुळे जनता असंतुष्ट होती.

* त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या मदतीने सत्तापालट करून मौर्यवंशाची स्थापना केली.

*धनानंदाच्या काळातच भारतावर सिकंदरचे आक्रमण झाले. धनानंद जैन धर्माचा पोषक होता. वर्ष, उपवर्ष, वररूचि, कात्यायन आदि विद्वान धनानंदाच्या आश्रयाला होते.

♦️बुद्ध काळातील प्रमुख गणराज्य

*बुद्ध काळात सोळा महाजनपदासोबतच गंगा खोऱ्यात अनेक गणराज्यांचे अस्तित्व असल्याचे प्रमाण मिळतात.

१) कपिलवस्तु चे शाक्यगणराज्य – हे नेपाळच्या तराई भागात होते. 

२) सुमसुमार पर्वताचे भग्ग गणराज्य

३) अलकप्प चे बुलि गणराज्य

४) केसपुत्तचे कोलाम गणराज्य आलारकालाम नामक आचार्य येथील होते.

 ५) रामगाम चे कोलीय गणराज्य

६) कुशीनारा चे मल्ल गणराज्य

७) पावा चे मल्ल - पावांच्या मल्लांनी एक संसद भवन बनविले त्याला उत्भटक म्हटले जाई.बुद्धाने याचे उद्घाटन केले होते.

८) पिप्लीवनचे मोरे गणराज्य

९) वैशालीचे लिच्छवि - हे गणराज्य बुद्ध काळात सर्वात शक्तीशाली गणराज्य होते.

१०) मिथिला चे विदेह गणराज्य. 

 ♦️विदेशी आक्रमण

*ईराणी (हखमनी) आक्रमण :

*भारतावर सर्वप्रथम विदेशी आक्रमण ईरानीयांकडून झाले. सायरस द्वितीय याने सर्वप्रथम हे धाडस केले. डेरियस प्रथमच्या साम्राज्याचा २०वा प्रांत हा भारताचा पश्चिमोत्तर प्रदेश होता.

*पारसी (ईराणी) संपर्कामुळे भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशात खरोष्टी नावाच्या एका नवीन लिपीचा जन्म झाला जी इरानी आरमेईक लिपीपासून उत्पन्न झाली.

*यामुळे भारतात इराणी मुद्रा प्रचलनात आल्या. फारसी सुवर्णमुद्रा डेरिक व चांदीच्या मुद्रा सिग्लोई प्रचलनात आल्या.

*मौर्य अशोकाने इराणी सम्राटासारखेच स्तंभ व शिलेवर घोषणा उत्कीर्ण केल्या. अशोककालीन स्तंभांचे घंटाकार शीर्ष बनवण्याची कला सुध्दा ईराणी प्रभाव दर्शवते.

♦️सिकंदराचे आक्रमण :

*सिकंदर युनान (ग्रीस) च्या मकदुनिया प्रांताचा निवासी होता. त्याने भारतावर ३२६ इ.पू.ला आक्रमण केले.

*परंतु व्यास नदीच्या पुढे त्याला येता आले नाही. याच्या आक्रमणाच्या वेळी मगधचा शासक धनानंद होता.

*झेलम युद्ध:या युध्दात शासक पोरस (झेलम चिनाब खोरे) याच्या विरोधात सिकंदरला विजय मिळाला परंतु सिकंदरने पोरसला त्याचे साम्राज्य परत केले

* झेलम युद्धात भारतीय शासक आंभी याने सिकंदरला मदत केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा