MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, ३० मार्च, २०२२

Maurya Empire upsc mpsc notes- मौर्य साम्राज्य

 ♦️मौर्य साम्राज्य


* सर विलियम जोस यानीच सैन्ड्रोकोटस् ची ओळख चंद्रगुप्त मौर्य म्हणून केली.

*कौटिल्याचे अन्य नाव विष्णुगुप्त, चाणक्य असे आहे. अर्थशास्त्राची रचना हि राजकारण व लोकप्रशासनावरील एक प्रामाणिक पुस्तक केली गेली म्हणून.

*कौटिल्याला भारताचा मैकियावेली म्हणतात.

 अर्थशास्त्रात १५ अधिकरण (भाग) असून हा ग्रंथ अन्य पुरूष (Third person) शैलीत लिहिला गेला आहे.

•अधिकरण : (१ ते १५)

पहिले : विनयाधिकारीक -यात विनय, अनुशासन, राज्याचे सामान्य व्यवहार

दुसरे :अध्यक्षप्रचार -यात २६ अध्यक्ष व त्यांची कार्यविभागणी यांचे वर्णन केले आहे.

तिसरे : धर्मस्थीय -दिवाणी न्याय संबंधी

चौथे : कंटकशोधन -फौजदारी न्यायालय

संबंधी पाचवे : योगवृत्त -राजाप्रती प्रशासकीयअधिकाऱ्यांची कर्तव्ये 

सहावे : मंडलयोनी -राज्य सप्तांगाचे वर्णन

 सातवे : षाड्गुण्य करार, विग्रह, विदेशनीति

आठवे : व्यसनाधिारिक- घातक व्यसनांचे (दुर्गुण) वर्णन

नववे : अभियास्यत्कर्म,-आक्रमणासंबंधी नियम

दहावे :सांग्रामिक-युद्धात विजय प्राप्तीसाठी नियम 

अकरावे : संघवृत्त -संघराज्यात एकमेकात फूट घालण्याचे प्रकार

बारावे :आबलीयस -कमजोर राज्य संरक्षणाचे उपाय 

तेरावे :दुर्ग लंभोपाय-शत्रूच्या किल्ल्यांचा ताबा घेण्याचे  उपाय

चौदावे : औषनिषदक -औषधी व मंत्रांचे महत्व सांगणारे

पंधरावे : तंत्रयुक्ति नियमांचे विवेचन.

♦️सप्तांग सिद्धांत

*कौटिल्याने राज्याला सात तत्वाने निर्मित मानले.

१) स्वामी (राजा) : राज्याचे डोके

२) अमात्य : विविध मंत्री व विभागाध्यक्ष. हि रथरूपी राज्याची चाके आहेत

 ३) जनपद (राज्यक्षेत्र) : राज्यांच्या जांघा

 ४) दुर्ग (किल्ले) राज्यांचे बाहू 

 ५) कोष (धन): राज्याचे तोंड (मुख)

६) दंड (सेना) : राज्याचे मस्तिष्क

७) मित्र राज्य : राज्याचे कान

*मेगास्थिनीजची इंडिका

*मेगास्थिनीज हा सेल्यूकस निकेटर (युनान) चा राजदूत होता व चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात (इ.पू.३०४- इ.पू. २९९) आला होता.

*याचा ग्रंथ इंडिका यामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या प्रशासनाविषयी विश्वसनीय माहिती मिळते. यात महिला अंगरक्षकाचे

१) शासकाचे वर्णन : मेगास्थिनीज चंद्रगुप्ताचे नाव सैन्ट्रोकोटस् सांगतो. त्याच्या चारी बाजूला सशस्त्र तो वर्णन करतो. .

२) पाटलीपुत्र नगराचे वर्णन : गंगा सोन नदी संगमावरील वसलेले पूर्व भारतातील सर्वात मोठे नगर म्हणजे पाटलीपूत्र होय नगराच्याचारी बाजुला तटरक्षक भिंत आहे. नगरांचे ६४ प्रवेशद्वार व ५७० बुरूज आहेत.

३) नगरप्रशासनाचे वर्णन : प्रशासन हे ६ समिती आणि त्याच्याशी संबंधित ३० प्रशाकीय अधिकारीकडून चालत असे.

४) सैन्य प्रशासन :

५) महसूल प्रशासन : भूराजस्व हे भूमी उत्पादनाच्या एक चतुर्थोश इतके वसूल केले जाई.

६) उत्तरापथचे वर्णन : सिंध ते बंगालच्या सोनार गावापर्यंतच्या रस्त्याची निर्मिती चंद्रगुप्त मौर्याने केली. पुढे यालाच शेरशाहसूरीने पक्क्या रस्त्याचे रूप दिले. ब्रिटिश गव्हर्नर जनरल ऑकलंड (१८३६-४२) ने याला ग्रँड ट्रॅक (GT.) रोड असे नाव दिले.

७) सोन्याची खाण : भारतात उत्कृष्ट सोन्याच्या खाणी व सोने काढणाऱ्या मुंग्या असल्याचे मेगास्थिनीज वर्णन करतो.

*मेगास्थिनीनचे भ्रामक वर्णन : भारतातील वस्तुस्थितीला नीट समजून न घेतल्याने तो भ्रामक वर्णन करतो.

१) सात जातीचे वर्णन

२) दासप्रथा नसल्याचे वर्णन

३) दुष्काळ न पडण्याचे वर्णन

४) लेखन कलेचा अभाव असल्याचा उल्लेख.

*रूद्रदामनचा जुनागढ अभिलेख:

*शक शासक रूद्रदामन याच्या जुनागढ अभिलेखात (इ.स १५०) चंद्रगुप्त मौर्य व अशोक दोघांची नावे आहेत.

*यात असे वर्णन आहे कि चंद्रगुप्त मौर्याने सौराष्ट्र प्रांतात सुदर्शन तलाव बनवला. यावेळी येथील प्रशासक पुष्यगुप्त होता.

* अशोकाच्या काळात राज्यपाल तुषास्प याने सुदर्शन तलावाची पुनबांधणी केली.

*रूद्रदामनच्या वेळी या तलावाची पुनर्निर्मिती हि राज्यपाल सुविशाख याने केली. स्कंदगुप्तच्या राज्यपाल प्रशासक चक्रपालित याने या तलावाची पुनर्बाधणी केली. अशाप्रकारे जुनागढ अभिलेखात चार शासकांची नावे आली आहेत.

♦️अशोकाचे अभिलेख

 *सर्वप्रथम जेम्स पिंसेप याला तत्कालीन ब्राह्मी लिपीचे वाचन करण्यात यश प्राप्त झाले. त्याने प्रथम दिल्ली-टोपरा अभिलेख वाचला.

१) शिलालेख (Rock Edicts)

*शिलालेख हे दीर्घ शिलालेख व लघुशिलालेख अशा दोन प्रकारचे आहेत.

अ) दीर्घ शिलालेख : हा १४ विभिन्न लेखांचा समूह असून ८ विभिन्न ठिकाणी सापडतात. या शिलालेखात प्रशासकीय व धम्म संबंधी गोष्टीचे वर्णन आहे.

*हे शिलालेख (चतुर्दश शिलालेख) खालील आठ ठिकाणी सापडतात. शाहबाजगढी (पाकिस्तान), मानसेहरा (पाकिस्तान), कालसी (उत्तराखंड), गिरनार (गुजरात), धौली(उडीसा), जौगड (ओरिसा), एरंगुडी (आंध्रप्रदेश), सोपारा (महाराष्ट्र).

*या दीर्घ शिलालेखावर १ ते १४ लेख खोदले आहेत.

 *पहिला लेख : जीव हत्या निषेध सांगितला. परंतु तीन पशू प्रतिदिन - दोन मोर, एक मृग मारला जातो हे हि सांगितले.

 - दुसरा लेख : यात सुदूर दक्षिणेतील राज्य चोल, चेर, पांड्य यांचा उल्लेख. चिकित्सेचे दोन प्रकार मानव चिकित्सा व पशू चिकित्सा वर्णन केले.

- तिसरा लेख : राज्याभिषेकाच्या १२ वर्षानंतर राजा अशोकाने प्रादेशिक, रज्जुक, युक्त या अधिकाऱ्यांना प्रत्येक पाच वर्षाला धर्म कार्याचे प्रजेला प्रशिक्षण देण्यासाठी दौऱ्याचे आदेश दिले आहेत.

*चौथा लेख : भेरी घोषाची जागा धम्मघोषाने घेतली.

-पाचवा लेख : राज्याभिषेकाच्या १४व्या वर्षी धम्ममहामात्राची नियुक्ती केली. जो जनतेच्या कल्याणासाठी व त्यांचे दुःखनिवारण करण्यासाठी प्रयत्न करतो.

*सहावा लेख : अधिकारी प्रतिवेदक जे प्रजेचे हाल राजापर्यंत पोहचवतो या संबंधी येथे वर्णन आले आहे.

- सातवा लेख : सर्व संप्रदायांचा सामुहिक अधिवास.

 *आठवा लेख : राज्याभिषेकाच्या १०व्या वर्षी धम्मयात्रा प्रारंभ केली जी बोधगयापासून सुरू झाली.

 *नववा लेख : धम्मरूपी मंगलाचरण, दास-सेवकांप्रती शिष्टाचार, गुरूप्रती आदर, ब्राह्मण-श्रमणांना दान या वर्णन आले आहे.

दहावा लेख : धम्म पालनावर भर देणारा लेख. 

* अकरावा लेख : सर्व दान, प्रशंसामध्ये धम्मच श्रेष्ठ कसा ठरतो हे वर्णन केले.

* बारावा लेख : सर्व संप्रदायांची वृद्धी व विकास याविषयी बोलतो.

-तेरावा लेख : राज्याभिषेकाच्या नवव्या वर्षी अशोकाने कलिंग विजय प्राप्त केली. ज्यात अनेक मृत्यू झाले व लाखोंचे विस्थापन झाले.

*अशोक जनजाती संतुष्टीचे प्रयत्न करतो. अशोक धम्म विजयाला प्रमुख विजय मानतो. 

*चौदावा लेख : लेखनाचे सार वर्णन करतो. काही पृथक लेखही पाहवयास मिळतात.

 ब) लघु शिलालेख :

*लघु शिलालेख अशोकाच्या व्यक्तिगत जीवनाची (Minor rock edicts) माहिती देतात.

*मास्की अभिलखात अशोक स्वत:ला बुद्ध शाक्य संबोधतो.

 *येथे त्याचे अशोक नावही उत्कीर्ण आहे.

 *भाव किंवा बैराट अभिलेखात अशोकाचे नाव प्रियदर्शी असे मिळते.

*येथे बौद्धधर्म त्रिरत्न-बुद्ध, धम्म, संघ यांचा उल्लेख आला आहे.नेटूर व उदेगोलम येथे अशोकाचे नाव सापडते.

* गुर्जरा येथेही अशोक असा उल्लेख येतो. एरंगुडी येथे बुस्ट्रोफेडन लिखाण शैली आढळते.

♦️स्तंभालेख (Pillar edicts) :

*यामध्ये मुख्यतः धम्म आणि प्रशासकीय बाबीचे उल्लेख आहेत. या लेखांची संख्या ७ असून ६ ठिकाणी पाषाण स्तंभावर कोरले गेले आहेत.

१) दिल्ली मेरठ : मेरठचा अभिलेख फिरोजशहा तुघलकाने दिल्ली येथे आणला. याचा शोध टीफेन थेलर याने लावला.

 २) दिल्ली टोपरा : हा एकमेव स्तंभालेख आहे, ज्यावर सातही स्तंभालेख उत्कीर्ण केले गेले. हा अशोकाचा अंतिम अभिलेख आहे.

३) लौरिया अरराज :

४) लौरिया नंदनगढ :

५) रामपुरवा :

६) प्रयाग : अकबर शासनकाळात जहांगीरने याला अलाहाबात किल्ल्यात ठेवले.

वरील ६ ठिकाणी खालील ७ लेख कोरले गेले आहेत :

• पहिला लेख : हा धम्म लेख आहे जो राज्याभिषेकाच्या २६ व्या वर्षी कोरला धम्मानुसार शासन, प्रजेचे सुख व साम्राज्य रक्षणाचा सिद्धांत सांगितला.

• दुसरा लेख : येथे धम्माची व्याख्या केली.

• तिसरा लेख : यात अशोकाने मन, वचन, कर्म, इंद्रिय यांच्यावर विजय प्राप्त करण्याचे सांगितले. याला तो निज्झती (आत्मपरीक्षण) म्हणतो.

• चौथा लेख : रज्जुक अधिकारी जो न्याय व दंड दोन्ही करून कर्तव्याचे पालन करतो. मृत्युदंड दिलेल्या व्यक्तिला तीन दिवसाची सूट द्यावी असे सांगतो.

• पाचवा लेख : यात प्राणी हत्या निषेध केल्याचे सांगतो.

• सहावा लेख : सर्व संप्रदायासोबत शिष्ट वर्तन.

• सातवा लेख : यात धम्मवृद्धी हेतूने अशोकाने केलेल्या लोककल्याणकारी कार्याचे वर्णन जे केवळ दिल्ली टोपरा अभिलेखात पहायला मिळते.

• लघुस्तंभालेख (Minor pillar edicts)

लघुस्तंभालेखावर अशोकाच्या राजघोषणा कोरल्याआहेत.

सारनाथ लेख : येथेही संघभेद रोखण्याचे आदेश

सांची लेख : महामात्रांना संघ भेद रोखण्याचे आदेश

•कौशांबी लेख

रूम्मिनदेई लेख :

*नेपाळच्या तराईत राज्याभिषेकाच्या २० व्या वर्षी अशोकाने धार्मिक कर बली माफ केले व भूमिकर कई करून १/८ केले.

*याला आर्थिक अभिलेख म्हणतात. हा सर्वात छोटा अभिलेख आहे.

निग्लीवा : कोनकमुनी स्तूप संवर्धनाचा उल्लेख.

३) गुहा लेख (Cave inscription)

*अशोकाने बाराबर या पहाडात सुदामा गुहा व कर्णचोपार गुफा आजीवक संप्रदायासाठी बनवल्या व दान केल्या.

*विश्वझोपर्नु गुफा निर्माण केली. अशोकाचा नातू दशरथ याने नागार्जुनी पहाडातील गोपी, लोमर्षी, वडथिका गुफा आजीवकांना दा केल्या. या गुफेतील लेखांची भाषा प्राकृत असून लिपी ब्राह्मी आहे. 

♦️चंद्रगुप्त मौर्य

*राज्यारोहण तिथी-इ.पू. ३२२ होती.

*चंद्रगुताचे विविध नाव - सैन्ट्रोकोट्स्, एन्ड्रोकोट्स्, सैन्ड्रोकोप्टस् असे युनानी लेखक सांगतात पण सर विलियम जोस यान ती व्यक्ती एकच चंद्रगुप्त मौर्य असल्याचे सांगितले.

*चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने तक्षशीलेत अनेक कला व कूटनीतिचे घर घेवून मोठ्या कौशल्याने नंदवंशाच्या अंतिम शासक धनानंदाचा पराभव केला. त्याच्या विजयाचा क्रम असा होता.

*उत्तरपश्चिम सीमा विजय - मगध विजय - सेल्युकसशी युद्ध-संपूर्ण भारत विजय.

* सेल्युकस निकेटर (बॅबिलोन)शी झालेल्या युद्धात चंद्रगुप्ताचा विजय झाला.

*सेल्युकसने त्याची कन्या हेलेना हिचा विवा चंद्रगुप्ताशी लावून हेरात, कंधार, मकरान, काबूल हे प्रांत हुंड्याच्या रूपाने देवून टाकले. तसेच मेगास्थिनीज नावाचा राजदू मौर्याच्या दरबारी (पाटलीपुत्र) पाठवला.

*जैन ग्रंथानुसार चंद्रगुप्त मौर्याने संलेखना पद्धतीने जीवन लीला संपवली.

*बिंदुसार : (अमित्रचेटस् इ.पू.२९८ ते इ.पू. २७३)

*शत्रुचा नाश करणारा म्हणून अमित्राघात नावानेही ओळखला जातो. बिंदुसार शासन काळातच तक्षशिलेच्या आमात्याने विदा केला व त्याला दाबून टाकण्यासाठी उज्जेन प्रशासक अशोक तेथे गेला.

* बिंदुसार शासन काळात सिरिया शासकाने डायमेकस केली. इजिप्त शासकाने याच काळात डायनोसिस नावाचा राजदूत बिंदुसार दरबारी पाठवला.

*बिंदुसार धर्म सहिष्णु होता. नावाचा राजदूत मौर्यांच्या दरबारी पाठवला. बिंदूसाराने सिरीया शासकाला पत्र पाठवून मदिरा, अंजीर व दार्शनिक याची मागणी केली.

*अशोक (इ.पू. २७३ ते इ.पू. २३२)

*अशोकाला त्याच्या अभिलेखात सामान्यतः 'देवांनां प्रिय' म्हणून संबोधले आहे. मस्की, गुर्जरा, नेट्यूर, उदेगोलाम अभिलेखा त्याचे नाव (अशोक) मिळते.

*राज्याभिषेक : उत्तराधिकारासंबंधी वादामुळे अशोक जरी इ.पू. २७३ ला राज्याच्या गादीवर बसला असला तरी राज्याभिष चार वर्षानंतर इ.पू. २६९ ला झाला.

* राज्याभिषेकाच्या ९ व्या वर्षी (इ.पू. २६१)कलिंग विजयाचे वर्णन १३व्या शिलालेखात येते.

*राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने, दक्षिणापथ याला जोडणारा समुद्री मार्ग व उत्कृष्ट हत्तीसाठी कलिंगचा विजय महत्वपूर्ण ठरण परंतु युद्धातील नरसंहार, विस्थापन या घटनेने अशोकाच्या आंतरात्म्यावर तीव्र आघात झाला.

♦️अशोकाचे धर्मपरिवर्तन

*बौद्ध धर्माचा अवलंब करण्यापूर्वी अशोक शैव धर्माचा उपासक असल्याचे कल्हणकृत राजतरंगिनीतून लक्षात येते.

• अशोकाचा धम्म : इतिहासात अशोकाची प्रसिद्धी ही विजयामुळे नसून त्याच्या विशिष्ट धम्मामुळे आहे. धम्माची व्याख्या दुसऱ्या व सातव्या स्तंभालेखात आहे.

*यात कल्याणकारी शासन, शिष्ट व्यवहार, मधुरता दान, शुचिता, अहिंसा, आदर व सर्वधर्म समभाव अपेक्षित आहे.

*रोमिला थापर म्हणतात धम्म अशोकाची वैयक्तिक कल्पना होती जी त्याने प्रशासनिक उद्देशांना ध्यानात घेवून बनवली होती.

*अशोकाचा बौद्ध धम्म हा उपासक बौद्ध धर्म होता. 

• धम्म प्रचार : प्रचारासाठी अशोकाने धम्ममहामात्र नावाचा अधिकारी तसेच संबंधित युक्त, रज्जुक, प्रादेशिक या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

*बौद्ध ग्रंथ महावंशात धर्मप्रचारक पाठविल्याचे (विदेशात) उल्लेख आहेत.

 *महेंद्र व संघमित्रा (श्रीलंका), मझांतिक (कश्मिर व गांधार), महारक्षित (युनान), महाधर्मरक्षित (महाराष्ट्र), महादेव (म्हैसूर), रक्षित (बनवासी), धर्मरक्षित (अपरांक), मझिम (हिमालय), सोना (सुवर्णभूमी) इत्यादी.

♦️मौर्य कालीन संस्कृती

*प्रशासन : प्रशासनासंबंधी माहिती ही कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगास्थिनीजची इंडिका, रूद्रदामनचा जुनागढ अभिलेख व अशोकाचे अभिलेख यावरून मिळते.

*अर्थशास्त्राचे विषय : राजा, मंत्रीपरीषद, विभागाध्यक्ष, महसूल, आर्थिक नियंत्रण, गुप्तचर व्यवस्था, दंडव्यवस्था, कूटनीति.

*इंडिकाचे विषय : नगरप्रशानस (पाटलीपुत्र), सैन्य प्रशासन, आर्थिक नियंत्रण.

♦️प्रांतीय प्रशासन

अशोकाच्या काळात पाच प्रांत होते. उत्तरापथ (तक्षशीला), दक्षिणापथ (सुवर्णगिरा), अवंती (उज्जयनी), प्राची (पाटलीपुत्र), कलिंग (तोसली)(सौराष्ट्राची स्थिती अर्धस्वतंत्र प्रांत अशी होतीव तेथे पुष्यगुप्त हा प्रशासन होता.

♦️नगरशासन 

प्रमुख अधिकारी मौर्यकालीन

*अमात्य : अमात्य हा मंत्रीपरिषदेचा सदस्य होता. मंत्रीपरिषद ही एक योग्य अधिकाऱ्यांचा समूह हाती.

*अग्रामात्य : हा प्रधानमंत्री होता. चाणाक्य हा चंद्रगुप्त व बिंदुसार यांचा, तर राधागुप्त अशोकाचा प्रधानमंत्री होता. विष्णुगुप्त हा पाटलीपुत्रचा महामात्य होता.

*प्रदेष्टा : (मंडलाधिकारी, ऐस्ट्रोनोमाई, नागरक (नगरअधिकारी), रूपदर्शक (मुद्रा परीक्षण), ऐग्रोनोमाई (भूराजस्व), सौवर्णिक (टाकसाळ), प्रदेष्टा (फौजदारी गुन्हे), गोप (१०-१५ गावाचे भूराजस्व लेखन), स्थानिक (भूराजस्व वसुली) हे अन्य प्रशासकीय अधिकारी होते.

*अशोकाच्या अभिलेखातील अधिकारी

*धम्ममहामात्र (जनतेत धम्मप्रचार), प्रादेशिक, रज्जुक (जनपद व न्यायिक अधिकारी), युक्त, प्रतिवेदक (जनतेचे हाल राजापर्यंत नेणारा), व्रजभूमिक (पशुंची देखभाल करणारा), इतिझाका महामात्य (स्त्रीयांची देखरेख), अंतमहामात्य (सीमावर्ती प्रदेशात धर्मप्रचार) आदि. 

♦️गुप्तचर व्यवस्था

*मौर्यकाळात गुप्तचराना गुढपुरूष म्हटले जाई.

*राज्यात संचरा नावाचे भ्रमणशील गुप्तचरही होते. यात परिव्रजिका ही भिक्षुणी वेशात असायची व गुप्त संदेशाचे वहन करायची.

♦️राजदूत : अर्थशास्त्रात ३ प्रकारच्या राजदुताचे उल्लेख आहेत.

♦️न्याय प्रशासन

पाटलीपुत्र येथे केंद्रिय न्यायालय तर गावात ग्रामन्यायालय होते.

♦️ राजस्वप्रशासन (महसूल)

कौटिल्याने महसूल प्राप्तीचे सात स्रोत सांगितले यात दुर्ग, राष्ट्र, खाण, सेतू, वन, ब्रज, वणिक पथ यांचा समावेश होतो.

 *सीता (राज्याच्या मालकीची जमीन). 

*भाग (शेतकऱ्याकडून १/४ ते १/६ राजस्व), सिंचन कर (१/३)

*मौर्यकालीन विविध कर : प्रणय (संकटकाळातील), विष्टी (बेगार, निःशुल्क काम) उत्संग, बलि (धार्मिक कर), (नगदी कर) रज्जु (भूमीमाप कर), विवीत (चारा कर), कौष्ठेयक (जलाशय), शुल्क (आयातक), वर्तनी (सीमापार कर), आयातकराला (१/५) प्रवेश्य तर निर्यात कराला निष्क्राम्य म्हटले जाई.

उद्योग : मदिरा उद्योग, मीठ उद्योग, खाण उद्योग, हत्यार उद्योग, नौकायान उद्योग पूर्णत: राज्याच्या नियंत्राखाली होते.

♦️सैन्य प्रशासन

 *कौटिल्य शतघ्नी नावाच्या आयुधाचा उल्लेख करतो जे आक्रमणप्रसंगी विरोधी सैन्यावर फेकले जायचे.

*अग्नियोग (अग्निबाण) चा चाही अर्थशास्त्रात उल्लेख येतो. युद्धात वापरण्यात येणाऱ्या व्यूहरचनेचेही उल्लेख येतात.

*तुष्णीयुद्ध जे राज्यात फूट पाडून जिंकले जायचे.

♦️ सामाजिक जीवन

*समाज चार वर्णात विभाजीत असला तरी शूद्रांना शिल्पकार्य, व्यापार, पशूपालन, करता येत होते. त्यांना सैन्यातही भरती केले जाई.

*कौटिल्याने अनेक वर्णसंकर जातीचे वर्णन केले आहे. मेगास्थिनीज भारतीय समाजाचे सात जातीत विभाजन करतो. यात दार्शनिक, शेतकरी, गवळी, कारागीर, सैनिक, निरीक्षक व सभासद.

♦️आर्थिक जीवन

*मौर्य  अर्थव्यवस्था - कृषी, पशुपालन, वाणिज्य व्यापारावर आधारीत यांना एकत्ररित्या वार्ता म्हटले -

*कृषी : मौर्य काळात अनेक प्रकारच्या कृषी पिकांचे उत्पादन घेतले जाई.

*यात तांदूळ पिकाला सर्वोत्कृष्ट तर उस या पिकाला  निकृष्ट समजले जाई. 

वर्षात तीन पिकांचे उत्पादन घेतले जाई.

* हैमन (रब्बी), ग्रैष्मीक (खरीप), व केदार (जिरायत) असे तीन हंगाम वर्णन करण्यात आले आहेत.

*मेगास्थिनीज म्हणतो भारतात दोन वेळा पाऊस पडतो. म्हणून कृषक दोन वेळा कृषी पिकवतात.

* राज्याच्या मालकीच्या भूमीला सीता म्हटले जाई. सिंचनाची व्यवस्था तळे, विहीरी, डबके यातून केली जाइ.

*सौराष्ट्रातील सुदर्शन तलाव याचेच उदाहरण आहे. सिंचनकर १/३ ते १/५ होता.

*उद्योगधंदे : मुख्य उद्योग हा सूत कातणे व कापड विणणे होता. काशी, बंग, कलिंग, मालवा सूती वस्त्रासाठी प्रसिध्द होते.

*काशी, पुंड्र येथील रेशमी कापड तर बंग (बंगाल) येथील मलमल विश्वप्रसिद्ध होती. कौटिल्य चीनहून येणाऱ्या रेशमी कापड .

*चीनपट्टाचाही उल्लेख करतो. मौर्य काळात धातू उद्योग, मीठ, मदिरा, जहाज, चमडा, दगड कोरणे, दगडावर पॉलिश काम या प्रकारचेही उद्योग चालु होते.

*व्यापार : वरील उद्योगाचा उत्कर्ष असल्याने स्वाभाविकच व्यापाराचा विकास झाला. व्यापाऱ्यांच्या नेत्याला सार्थवाह तर संगठनाला सांव्यवहारिक म्हटले जाई.

*मौर्य काळात चार प्रमुख व्यापारी मार्ग जे पाटलीपुत्रापासून सुरू व्हायचे यांचे वर्णन आले आहे.

*उत्तरापथ हा सर्वात मोठा मार्ग असला तरी कौटिल्याचे मते दक्षिणी मार्ग अधिक महत्वाचा आहे कारण दक्षिणेतूनच बहुमूल्य व्यापारी वस्तू, सोने, मणि, मुक्ता आदि प्राप्त होतात.

♦️मार्ग :

 १) पुरूषपुर पाटलीपुत्र – तामलुक (उत्तरापथ)

२) श्रावस्ती - राजगृह

 ३) श्रावस्ती - प्रतिष्ठान - म्हैसूर (दक्षिणपथ)

४) कौशांबी बनारस चंपा

*पश्चिमी तटावर भडौच, सोपारा तर पूर्वी तटावर ताम्रलिप्ती (तामलुक) हि प्रमुख बंदरे होती.

*नाणी : मौर्यांची राजकीय मुद्रा पण होती हि चांदीची होती.

*राज्यांची इतर सुवर्ण, रजत, ताम्र धातूंचीही नाणी होती.

♦️मौर्य कला

 *सांची महास्तूप, सारनाथचा धर्मराजिक स्तूप हे मुख्य स्तुप होते.

स्तंभ : . हे स्तंभ मथुरा आणि चुनार खाणीतील लाल-वालुकाश्म दगडांपासून बनवले गेले.

*मौर्य कालीन पहिला स्तंभ हा बखेडा स्तंभ वैशाली येथे आहे. नंतर संकिशा, रामपुरवा, सांची, सारनाथ येथे स्तंभ बनवले गेले.

*लोककला : दीदारगंज(पाटणा) येथील दगडाची यक्षीणी मूर्ती मौर्यकालीन लोककलेचा उत्कृष्ट नमुना आहे विदिशा येथे यक्ष आणि यक्षीणी मूर्ती सापडल्या आहेत.

*या काळात उत्तरी काळे पॉलिशदार मृदभांड (NBPW) सापडते

♦️मौर्य साम्राज्याचे पतन

*ब्रहद्रथ मौर्य वंशाचा अंतिम शासक होता. त्याचा ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शुग (इ.पू.१८५) याने याची हत्या करून शुग वंशाची स्थापना केली.

*असे असले तरी सम्राट अशोकाच्या मृत्यु (इ.पू.२३२) पासूनच साम्राज्य विघटनाची प्रक्रिया प्रारंभ झाली होती.

*अनेक विद्वावानाचे मत लक्षात घेता पतनाची खालील कारणे होती.

१) ब्राम्हण प्रतिक्रिया.

२) अशोकाची अहिंसावादी नीति.

३) वित्तिय संकट.

४) दमनकारी शासन.

५) अतिकेंद्रित शासन (रोमीला थापर).

६) उत्तर पश्चिम सीमेचे संरक्षणाची उपेक्षा.

 ७) योग्य उत्तराधिकाऱ्यांचा अभाव.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा