♦️पांड्य घराणे
*पांड्य घराणे द्रविडवंशीय असून याचा उल्लेख पाणिनी, मेगॅस्थिनीज, अशोकाच्या शिलालेखात येतो.
*कडुंगण याने इ.स.च्या सातव्या शतकाच्या प्रारंभी पांड्य राजवंशाची स्थापना केली.
*मारवर्मन पांड्याने चोल राजकन्येशी विवाह केला व शैव संत समंदर याला मदुराईला (राजधानी) बोलविले.
*पांड्यांचा पल्लवांशी संघर्ष होता. यांच्या पराक्रमी मारवर्मन कुलशेखर पांड्याने (इ.स. १२६८ ते १३१०) केरळ, कोंगु देश, चोलमंडल, तोंडमडल, सिलोन (श्रीलंका) यावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली होती.
*व्हेनिसचा मार्कोपोलो पांड्य राज्यासंबंधी आपल्या यात्रा विवरणात म्हणतो. "उत्तम मोत्यासाठी पांड्य देश प्रसिद्ध आहे.
*येथील बंदरांना दूरवरचे व्यापारी भेट देतात. राजाजवळ खूप संपत्ती व ५५० राण्या आहेत. लोक नग्न हिंडतात.
*सतीची चाल प्रचलित आहे. लोकांचा ज्योतिष व शकुनावर विश्वास आहे. मंदिरात नर्तिका आहेत. "
♦️पांड्य शैली
*पांड्य कालातील मंदिरे द्रविड शैलीचीच आहेत पण यात गोपूराची भर पडली.
*प्रांगणाच्या प्रवेशद्वारालाच मनोऱ्यासारखे शिखर उभे केले गेले. याला गोपूर म्हणतात.
♦️चालूक्य शैली
*बदामीच्या चालुक्याच्या काळात बेसर शैलीची मंदिरे अधिक प्रमाणात बांधली गेली. या शैलीत द्रविड व नागर अशा दोन्ही पध्दतीची मंदिरे आढळतात.
* ऐहोळ येथील लड़कान मंदिर वैशिष्टयपूर्ण आहे.
*चालूक्य मंदिराचे मुख्य दोन भाग विमान व मंडप होय.
* द्वारसमुद्र येथील होयसळेश्वर मंदिर हे या पद्धतीने अमर शिल्प आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा