♦️🛑नदीप्रणाली🛑♦️
*जलप्रणाली
•कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहायक नद्यांना मिळणारे नाले-ओढे या सर्व लहान-मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला 'जलप्रणाली' म्हणतात.
♦️ महाराष्ट्रात आढळणारी जलप्रणाली (Drainage Pattern Found India)♦️
•यावर भूपृष्ठरचना, हवामान, जलप्रणाली याचा परिणाम झालेला दिसतो.
i) वृक्षाकार जलप्रणाली (Dendratic Drainage Pattern)
• या जलप्रणालीवर भूपृष्ठाचा मोठा परिणाम झालेला दिसतो. या प्रकारात प्रमुख नदी व तिला मिळणाऱ्या उपनद्या, सहाय्यक नद्या यांचा विकास वृक्षाप्रमाणे झालेला दिसतो. एकाच प्रकारच्या समान घनतेच्या क्षितीज समांतर थराच्या खडकावरून नदीप्रवाहाचे वहन होतांना अशा नदयाच्या खोऱ्यांचा विकास होतो.
• म्हणून यास वृक्षाकार जलप्रणाली म्हणतात.
• महाराष्ट्रात प्रामुख्याने ही जलप्रणाली आढळते. उदा. गोदावरी, कृष्णा, वैनगंगा या नद्यांनी बनविलेली जलप्रणाली ही वृक्षाकार जलप्रणालीचे उत्तम उदाहरण आहे.
ii) समांतर जलप्रणाली (Parallel Drainage Pattern)
• एखाद्या प्रदेशात एकाच दिशेने उतार असल्यामुळे या उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह एकमेकांना समांतर असतो. यालाच समांतर जलप्रणाली म्हणतात.
उदा. महाराष्ट्रात सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट आणि महादेव डोंगररांगा दरम्यान वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा यांचा प्रवाह समांतर जाणवतो. म्हणजे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांचा एकमेकांच्या तुलनेत विचार करता त्या एकमेकांना समांतर आहेत.
•तसेच कोकणातील नद्यांमध्ये या प्रकारची जलप्रणाली अधिकतर सापडते.
iii) केंद्रत्यागी जलप्रणाली ( Centrifugal Drainage Pattern)
• घुमटाकार पठार किंवा पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या, उपनद्यांचे प्रवाह सर्व दिशांना वाहत जातात.
♦️महाराष्ट्रातील जलविभाजक♦️
•उंचवट्याचा जो प्रदेश दोन भागातील नदीप्रणालीस विभक्त करतो त्यास जलविभाजक म्हणतात.
• या उंचवट्याच्या प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या वेगवेगळ्या दिशांनी वाहतात, त्यामुळे हा उंचवट्याचा भाग दोन्हीकडील नद्यांचे पाणी विभाजीत करतो असे वाटते म्हणून त्यास जलविभाजक म्हणतात. उदा. सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळणाऱ्या व पूर्वेस वाहत जावून बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक म्हणून कार्य करते.
• महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक असून इतर दुय्यम जलविभाजक पुढीलप्रमाणे आहेत.
*दुय्यम जलविभाजक
i) सातमाळा-अजिंठा हा तापी नदी व गोदावरी नदीप्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतो.
ii) हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगा गोदावरी व भीमा नदीप्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतात.
iii) शंभू-महादेव या डोंगररांगा भीमा व कृष्णा नदीप्रणालीचा जलविभाजक म्हणून कार्य करतात. -
♦️महाराष्ट्रातील नद्या ♦️
• महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा अरबी समुद्रास व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक म्हणून कार्य करतात.
♦️बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या
•या नद्या सह्याद्री पर्वतरांगा किंवा सातपुडा पर्वतरांगामधुन उगम पावतात व निरनिराळ्या राज्यांमधुन वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागरास मिळतात. यापैकी काही नद्या पूर्व दिशेने तर काही दक्षिण दिशेकडे वाहतात म्हणून त्यांचे पूर्ववाहिनी नद्या व दक्षिणवाहिनी नद्या असे ®प्रकार पडतात.
♦️ पूर्व वाहिनी नद्या :
• या नद्यांचा बहुतांश प्रवाह हा पश्चिमेकहून पूर्वेकडे होतो. उदा. गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा इ. .
♦️गोदावरी ♦️
• पाणलोट क्षेत्रातील अंतर्भूत प्रदेश - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा , छत्तिसगड, ओडिशा, पाँडीचेरी
• प्रवाहाचा प्रदेश-मध्य महाराष्ट्र
•उगम -नशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रम्हगिरी येथे. .
• प्रवाहाची एकुण लांबी १४६५किमी
• ही महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -प्रवाह ६६८ किमी
♦️उपनद्या
*प्रवाहाच्या डाव्या दिशेने मिळणाऱ्या नद्या
१)दारणा २)मांजरा ३) प्रवरा ४) सिंदफना ५) दुधना ६) मुळा ७) कुंडलिका
*एकूण पाणलोट क्षेत्राचा १६.१४% भाग या उपनदयांनी व्यापला आहे.
*प्रवाहाच्या उजव्या दिशेने मिळणाऱ्या
१)शिवना, २)दक्षिणपूर्णा ३) प्राणहिता ४) इंद्रावती५) कादवा
*गोदावरीच्या एकूण पाणलोट क्षेत्राचा ५९.५७% भाग यांनी व्यापला आहे.
♦️गोदावरी नदीचे महाराष्ट्राती खोरे (Catchment area of Godavari in Maharshtra)
*क्षेत्रफळ- १,५२, ८११ किमीर
* पिके - गहु, कापूस, ज्वारी,आणि ऊस
*धरणे 'नाथसागर' हे भारतातील महत्वाचे मातीचे धरण असून ते औरंगाबादमधील पैठण येथे स्थित आहे.
* खनिजे - खनिजे अत्यल्प प्रमाणात सापडत असून खनिजांच्या दृष्टिने हा भाग महत्वाचा नाही. केवळ उस्मानाबाद येथे चुनखडी सापडते.
* वीजकेंद्रे- जलविद्युत -वैतरणा (नाशिक), भंडारदरा (अहमदनगर) पैठण (औरंगाबाद), येलदरी (हिंगोली) औष्णिक एकलहरे(नाशिक), परळी-वैजनाथ(बीड) शहरे - नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव व नांदेड -
*धार्मिक महत्व धार्मिकदृष्ट्या ही नदी पवित्र असल्यामुळे हिला 'दक्षिणेकडील गंगा' म्हणून संबोधितात.
भीमा
•भीमा ही कृष्णेची उपनदी असून महाराष्ट्राबाहेर कृष्णेला मिळते.
•उगम-पुणे मधील अंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ उगम पावते. महाराष्ट्रातील लांबी- ४५१ किमी असून प्रवाहात तिला अनेक उपनद्या मिळतात! भीमेची एकुण लांबी – ८६० किमी आहे.
♦️ भीमा नदीचे खोरे
• क्षेत्रफळ ४६,१८४किमी
• महत्व भीमा व तिला मिळणारी इंद्रायणी नदी या धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र भीमानदीकाठावर वसले आहे.
• पंढरपूर जवळ भीमानदीचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून तिला चंद्रभागा' म्हणतात.
• इतर धार्मिक ठिकाणे - देहु, आळंदी, भीमाशंकर
♦️कृष्णा ♦️
• उगम -सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे
•भौगोलिक वैशिष्ठ्ये - महादेव डोंगर आणि ज्योतिबा, पन्हाळा व चिकोडी डोंगरादरम्यानच्या प्रदेशात वाहते.
•लांबी - एकुण प्रवाहाची - १४०० किमी महाराष्ट्रातील लांबी - २८२ किमी आहे.
• या नदीच्या नैऋत्येस दख्खनचे पठार, पूर्वेस कडप्पा खडकप्रणाली आहे. कृष्णेचा त्रिभूज प्रदेश हा प्लीस्टोसीन ते सध्यापर्यंतच्या गाळापासून बनला आहे.
♦️कृष्णानदीचे खोरे
•भारतातील क्षेत्रफळ -२५८९४८ किमी महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्र ६९,४२५ किमी
•धार्मिक महत्व - नृसिंहवाडी हे कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले ठिकाण असून हे दत्ताचे तीर्थस्थान आहे. कृष्णा व वेण्णाच्या संगमावर माहूली एक छोटे धार्मिक क्षेत्र आहे.
•औदुंबर, बाहुबली हे इतर महत्वाचे तीर्थक्षेत्रे आहेत.
♦️पैनगंगा ♦️
• विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहते.
•वर्धेची उपनदी असून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. - उगम - अजिंठा डोंगर, बुलढाणा
• विदर्भातील सर्वात लांब नदी असून या नदीची महाराष्ट्रातील लांबी ४९५ किमी आहे.
•एकूण लांबी६७६ किमी
*उपनद्या
• उजव्या बाजूने मिळणाऱ्या कयाधू
• डाव्या बाजूने मिळणाऱ्या - पूस, अरूणावती, अडाण, विदर्भा, खुनी, वाघाडी
• नदीच्या काठावरील ठिकाणे
घाटजी -वाघाडी नदी काठावर
पांढरकवडा - खुनी नदी काठावर
आर्णी - अरूणावती नदीकाठावर न
♦️दक्षिणवाहिनी नद्या ♦️
•वर्धा व पैनगंगा नदींचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे होतो. या नद्या गोदावरीच्या खोऱ्यातील उपनद्याच आहेत.
♦️ वर्धा ♦️
•उगम-
मध्यप्रदेशातील बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगात उगम.
*भौगोलिक सीमा
•ही नदी इतर नद्यांप्रमाणे स्पष्टपणे एकाच जिल्ह्यातून वाहत नाही तर उत्तरेकडून दक्षिणेकडे अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर यांच्या सीमेवरून वाहते.
* महाराष्ट्रातील लांबी ४५५किमी
•ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिणवाहीनी नदी आहे.
• या नदीवर बांधलेले मोर्सी धरण हे अमरावती शहराची जीवनदायीनी असून बेंबळा नदीवर बांधण्यात येणारे धरण यवतमाळ जिल्ह्याची जीवनदायीनी ठरेल.
*उपनदया
• पूर्वेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या - बाकळी, यशोदा, वेणा, ईकाई
• पश्चिमेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या - बेंबळा, रामगंगा, निरगुडा, पैनगंगा, मदु . वेणाच्या उपनद्या - बोर, धाम, पोथरा, वेळा, इराई. वर्धा नदीचे खोरे
• क्षेत्रफळ - ४६,१८२किमी' असून ते वर्धा, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत आहे.
• खनिजे खनिजांच्या दृष्टीने हा भाग संपन्न असून येथे चुनखडी, डोलामाईट, क्रोमाईट दगडीकोळसा आढळतो.
♦️ वैनगंगा ♦️
• दक्षिणवाहिनी नदी
. उगम - मैकल डोंगर ,शिवनी जिल्ह्( मध्य प्रदेश)
• महाराष्ट्रातील लांबी २९५ किमी
*उपनद्या
• पश्चिमेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या - कन्हान, मूल, सूर, बावनथडी
• पूर्वेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या - पांगोली, बाघ, चुलबंद, गाढवी, दीना. . *उपनद्यांची वैशिष्ट्ये
*बावनथडी ही नदी मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून तसेच नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते.
• बाघ नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. . कान्हान नदीच्या सहाय्यक उपनद्या पेंच, साड व नाग
• जलवाहन क्षेत्र (३७,९८८ किमी
♦️अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या
• उत्तर महाराष्ट्र व कोकणातून वाहणाऱ्या सर्व नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.
🛑उत्तर महाराष्ट्रातील नदया
• नर्मदा व तापी येथील प्रमुख नद्या आहेत.
♦️ नर्मदा ♦️
* भारतीय द्विपकल्पातील पश्चिम दिशेला वाहणारी ही सर्वात लांब नदी असून महाराष्ट्रात तापीनंतर दुसरी आहे.
• सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून म्हणजेच मैकल पर्वतरांगेच्या अमरकंटक डोंगरामध्ये उगम पावणारी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहत जाते.
. 'उगम -मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगेच्या अमरकंटक डोंगरामध्ये
•एकूण पाणलोट क्षेत्र ९८७९६ किमी
• जलविदयुत केंद्रे (ओंकारेश्वर बार्गी आणि महेश्वर
• नदीच्या क्षेत्रात काळ्या मृदेचे अधिक्य दिसते.
• खंबातच्या आखातामध्ये ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. . लांबी नदीची एकुण लांबी १३१२ किमी असून महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी ७४ किमी आहे.
• उपनद्या - उदाई व देवगंगा या महाराष्ट्रातील उपनद्या
•नंदुरबारमधील (धडगाव तालुक्याचे ठिकाण उदाई नदीकाठावर स्थित आहे.
♦️तापी ♦️
• भारतात नर्मदा नंतर सर्वाधिक लांबीची पश्चिमवाहिनी नदी आहे. हिचा महाराष्ट्रातील प्रवाह २०८ किमी लांब आहे.
• उगम- मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ होतो. तापीच्या प्रवाहाची एकूण लांबी = ७२४ किमी
• प्रवाह - सातपूडा व सातमाळा अजिंठा दरम्यानच्या खचदरीमधून हिचा प्रवाह वाहतो.
• मध्यप्रदेशात उगम पावून अमरावतीच्या वायव्यसीमेवरून वाहत पुढे मध्यप्रदेशमध्ये जाऊन परत महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतून प्रवास करते. शेवटी गुजरातमध्ये प्रवेश करून सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते.
• एकूण पाणलोट क्षेत्र =६५१४५ किमी एकूण पाणलोट क्षेत्राच्या ७९.१% महाराष्ट्रात आहे.
*उपनद्या
• उत्तरेकडून उजव्या बाजुने मिळणाऱ्या मोट, गुळी, अनेर(जळगावमधील उपनद्या)
•अरूणावती(धुळे मधील उपनदी)
• गोमती, वाकी (नंदुरबार मधील उपनद्या)
•दक्षिणेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या
•वाघूर, गिरणा, अंजनी पूर्णा(जळगाव जिल्हा)
•पांझरा बुराई, अमरावती, (धुळे जिल्हा)
•शिवा, नेसू (नंदुरबार जिल्हा) क) उत्तर पुर्णा
*उत्तर पुर्णा
•ही तापीची प्रमुख सहाय्यक नदी आहे.
• उगम - अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांत .
•जळगाव जिल्ह्यात चांगदेवजवळ तापीला मिळते.
*उपनद्या
• दक्षिणेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या - काटेपूर्णा, मोर्णा, मन, उमा (अकोला) .
•उत्तरेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या
• शहानूर, पठार, व आस(अकोला)
• बाणगंगा बेंबळा, पांडव व निपाणी(बुलढाणा)
• तापी उत्तरपूर्णा नदी खोरे - खोऱ्याची लांबी + २४० ते२५० किमी
• जलवहन क्षेत्र- ५१,५०४ किमी
♦️धार्मिक स्थळे♦️
•नंदुरबार जिल्ह्यातील तापी व गोमती नद्यांच्या संगमावर वसलेल्या प्रकाशे या तीर्थक्षेत्रास ‘खानदेशची काशी संबोधितात. बुलढाणामधील मोक्ष नदीकाठी शेगाव हे क्षेत्र वसलेले असून तेथे गजानन महराजांचे मंदीर आहे. धुळे जिल्ह्यात पांझरा व तापी नदीसंगमावर मुदावद हे ठिकाण भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
♦️कोकणातील नद्या♦️
• कोकणातील नद्यांच्या प्रवाह, जलप्रणालीवर भूपृष्ठ रचना व हवामानाचा बहुतांशी फरक पडतो.
• कोकणातील नद्या घाटमाथ्यावर उगम पावून पश्चिमेकडे वाहत जातात. सह्याद्री पर्वत त्यांना पठारावरील नद्यांपासून वेगळा करणारा जलविभाजक आहे. येथील सर्व नदया अरबी समुद्रास मिळतात.
• या नद्या ८० ते १३० किमी लांबीच्या आहेत. - कोकण किनारपट्टीच्या प्रदेश अरूंद असल्याने येथील काही नद्या ८० किमी पेक्षा कमी लांबीच्या आहेत.
• उल्हास
. उल्हास - कोकणातील सर्वांत लांब नदी (लांबी १३० किमी.)
सह्याद्री पर्वतावर खंडाळ्याजवळ उगम पावून साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस मिळते.
* खोऱ्यातील पिके
•भाताचे उत्पादन प्रामुख्याने होते.
• येथील पायरी व हापूस अंब्याच्या प्रजाती प्रसिध्द आहेत. तसेच चलाटी भागात फणस आणि इतर फळांची लागवड होते.
खनिजे बॉक्साईट हे येथील प्रमुख खनिज आहे.
• लोह केवळ दक्षिण कोकणातील नद्याच्या सापडते.
• क्रोमाईट, जिप्सम, मँगनीज ही इतर खनिजेही येथे सापडतात.
♦️भारताची जल संपत्ती♦️
• भारतात पडणारे वार्षिक पर्जन्य : ४००० किमी एवढे आहे परंतु भारताच्या स्थानिक भौगोलिक परिस्थितीमुळे केवळ १८६९ किमी एवढेच पाणी नदीद्वारे वापरासाठी उपलब्ध आहे.
• यापैकी ११२३ किमी एवढे पाणी (६९० किमी भूपृष्ठ जल, ४३३ किमी' भूजल) वापरासाठी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय मानांकणे] १७०० मी/व्यक्ती पेक्षा कमी पाणी उपलब्धता १००० मी/व्यक्ती पेक्षा कमी पाणी उपलब्धता = Water scarce परिस्थिती
= Water stressed परिस्थिती
♦️द्रुतगती सिंचन लाभ कार्यक्रम AIBP (Accelerated irrigation benefit program)♦️
रु. १००० कोटी व त्यापेक्षा अधिक खर्चाच्या सिंचन प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी राज्य सरकारला कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने १९९६-९७ मध्ये हा प्रकल्प सुरू केला असून सध्या मध्यम व लहान प्रकल्पांसही याद्वारे आर्थिक मदत केली जाते.
*मार्गदर्शक तत्त्वे १) दुष्काळग्रस्त, आदिवासी भागात व पूर प्रभावित क्षेत्रात विस्तार, नुतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी मुख्य/मध्यम प्रकल्प ९०% अनुदान पात्र)
२) इतर मुख्य/मध्यम प्रकल्प २५% अनुदानास पात्र
३) विशेष वर्गीय राज्ये व ओडिशामधील कोरापूत, बोलनगीर व कलहांडी जिल्ह्यातील विशेष वर्गीय राज्ये ९०% अनुदान
४) AIBP अंतर्गत प्रमुख/मध्यम प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ४ वर्षांची अधिकतम मर्यादा ठरवून दिली असून यात पात्र प्रकल्पाच्या समावेशाचे वर्ष मोजले जात नाही
५) राज्य सरकारला प्रकल्पास दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास नेण्यासंबंधी जलसंसाधन मंत्रालयासमवेत MOU करावा लागतो.
६) AIBPअंतर्गत भूपृष्ठावरील जलसाठ्यासंबंधीचे लघु प्रकल्प पूर्णत्वासाठी २ वर्षांची अधिकतम कालमर्यादा दिली असून यात प्रकल्पाच्या समावेशाचे वर्ष मोजले जात नाही.
*सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि पाण्याचा सूयोग्य वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन तुषार सिंचन व ठिबक सिंचन विकासासाठी सबसीडीमार्फत प्रोत्साहन देते. यामध्ये लघु आणि सिमांत शेतकऱ्यास ६०% तर इतर शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचनाच्या खरेदीसाठी ५०% सबसीडी दिली जाते.
♦️जलयुक्त शिवार अभियान उद्दिष्टे♦️
१) २०१९ पर्यंत महाराष्ट्रास दुष्काळ मुक्त करणे.
२) दरवर्षी ५००० गावातील जलाशयांचे पूननिर्माण करणे.
३) राज्यात जलसंवर्धन, सिंचनासाठी आणि दुष्काळ निवारणासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व योजनांचे यात एकत्रीकरण केले आहे.
*फायदे
१) दुष्काळ निवारणास मदत
२) शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर प्रतिबंध लावेल.
३) दुष्काळकाळात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा