MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

SERVICE SECTOR UPSC NOTES- सेवा क्षेत्र



अर्थव्यवस्थेच्या तृतीयक क्षेत्र-  सेवा क्षेत्र (Service Sector)

सेवा या अशा आर्थिक कृती असतात ज्या स्वतः वस्तूंचे उत्पादन करीत नाही, मात्र प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी मदत करतात. 

 उदाहरणे - वाहतूक, साठवणूक, दळणवळण, बँकींग, व्यापार 

सेवा क्षेत्राचे वर्गीकरण (Classification of service sector)

केंद्रीय सांख्यिकीय संघटनेच्या (CSO) नुसार सेवा क्षेत्राचे ४ प्रमुख गटांमध्ये विभाजन 

i)व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स.

ii)वाहतूक, साठवणूक व दळणवळण.

iii)वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा.

 iv)सामुदायिक सेवा (शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक, वैद्यक, आरोग्य इ.), सामाजिक सेवा (लोकप्रशासन, संरक्षण, मनोरंजन, करमणूक इ.) आणि वैयक्तिक सेवा.

भारतीय रिझर्व्ह बँक आणि जागतिक व्यापार संघटना यांनी केलेल्या वर्गीकरणात बांधकाम क्षेत्राचाही समावेश

भारताच्या सेवा क्षेत्राचे महत्व/योगदान (Contribution of service sector)

१)जी.डी.पी.मधील हिस्सा (Share of services in GDP) 

भारताच्या जी.डी.पी.मध्ये                           सेवा क्षेत्राचा हिस्सा 

1950-51                                                   30.5 %

2020-21 -                                                53.89 टक्के

•भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर वाढविण्यातही (सेवा क्षेत्र ) SERVICE SECTOR ची सर्वात मोठी भूमिका .

एकूण GDP च्या वार्षिक वाढीच्या दरापेक्षा सेवा (सेवा क्षेत्र ) SERVICE SECTOR- GDP चा वार्षिक वाढीचा दर १९९७-९८ पासून सतत अधिक.

२)राज्य जी.डी.पी.मधील सेवा क्षेत्राचा हिस्सा (Contribution of service sector in state GDP)

भारतातील बहुतेक राज्यांच्या GDP मध्ये (सेवा क्षेत्र ) SERVICE SECTOR चे प्राबल्य आढळून येते.

राज्य जी.डी.पी.मध्ये सेवा क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा असलेल्या पहिल्या चार राज्ये/केंद्रशासित प्रदेश-

 1.चंदिगड, 

2. दिल्ली, 

3.केरळ आणि

 4.महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो.

 ओडिशा-राजस्थान सारख्या कमी-उत्पन्न राज्यांमध्ये  (सेवा क्षेत्र ) SERVICE SECTORचा मोठा विस्तार .

३)रोजगारातील सेवा क्षेत्राचा हिस्सा (Services employment in India)

•जरी प्राथमिक क्षेत्र (कृषि व संलग्न क्षेत्र) हे सर्वात मोठे रोजगार पुरविणारे (dominant employer) क्षेत्र असले व सेवा क्षेत्राचा त्यानंतर क्रमांक लागत असली तरी रोजगारातील सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढत असून प्राथमिक क्षेत्राचा कमी होत आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (NSSO) रोजगार व बेरोजगार स्थितीविषयक अहवालानुसार, २०११-१२ मध्ये कृषि, उद्योग व सेवा क्षेत्रांचा रोजगारातील हिस्सा पुढीलप्रमाणे होता.

  क्षेत्र

 रोजगारातील हिस्सा

 रोजगारातील हिस्सा

 

 1993-94

 2011-12

 कृषि क्षेत्र

 64.8%

 48.9 %

 उद्योग क्षेत्र 

 15.6 %

 24.3 %

 सेवा क्षेत्र

 19.7 %

 26.8 %

४)सेवा क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI in the service sector)

परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीतील (FDI) सेवा क्षेत्राचा हिस्सा मोजणे अवघड आहे, कारण कॉम्पुटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर, दूरसंचार, बांधकाम इत्यादी क्षेत्रांच्या बाबतीत वस्तू व सेवांमध्ये काटेकोर फरक करणे अवघड असते.

 •एप्रिल २००० ते जून २०१८ दरम्यान भारतात आलेल्या परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वाधिक हिस्सा असलेली पहिली पाच सेवा क्षेत्रे पुढीलप्रमाणे

i)वित्तीय व गैर-वित्तीय सेवा (१८ %)

ii)कॉम्पुटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर (८ %

iii)दूरसंचार (८%)

iv)बांधकाम विकास (७ %)

v)व्यापार (५ %)

वित्तीय व गैर-वित्तीय सेवा क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक मॉरिशस कडून आली, तर त्याखालोखाल सिंगापूर, युके, युएसए व जपान या देशांकडून आली.

५)सेवांची निर्यात (Export of services)

भारत सेवाधारित निर्यात वृद्धीच्या (service-led export growth) दिशेने वाटचाल करीत आहे. २०००-०१ पासून वस्तूंच्या निर्यातीच्या वृद्धी दरापेक्षा सेवांच्या निर्यातीचा वृद्धी दर अधिक ठरत आहे.

निर्यात केल्या जाणाऱ्या सेवां पैकी अर सेवांचा प्रथम क्रमांक लागतो, तर त्याखालोखाल व्यवसाय सेवा व वाहतूक सेवांचा क्रमांक लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा