MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, ६ मार्च, २०२२

Soil of Maharashtra - महाराष्ट्रातील मृदा संपत्ती

♦️महाराष्ट्रातील मृदासंपत्ती (Soil of Maharashtra)


 *भूकवचावरील खडकांवर अनेक बाह्य कारकांचा परिणाम होतो त्यामुळे खडकांचे विखंडन होऊन त्यांचे बारीक मृदा कणांमध्ये रूपांतर होते. या मातीचा भूपृष्ठावर पातळ थर तयार होतो. भूपृष्ठावरील मातीच्या या पातळ थराला मृदा म्हणतात.

* मृदा सर्वत्र सारखी नसते मृदेमध्ये आढळणारी विविधता ही त्यांच्या निर्मितीसाठी कारणीभूत घटकांमुळे असू शकते.

♦️मृदेचे प्रकार

महाराष्ट्रातील मृदेचे पुढील सात प्रकार आहेत.

१) लाव्हारसाची काळी मृदा (Black soil)

• या मृदेचा पोत (Texture) जाडाभरडा असतो म्हणून हिला रेगूर मृदा (Regure soil) म्हणतात.

 • तसेच लाव्हरसाच्या संचयनापासून निर्माण झालेल्या खडकाच्या अपक्षयापासून तयार झाल्याने हिला लाव्हा मृदा (lava soil) असेही म्हणतात.

• या मृदेत कापसाचे उत्पादन अधिक होते म्हणून हिला 'कापसाची काळी मृदा (Black cotton soil) असेही म्हणतात. या मृदेत उन्हाळ्यात मोठ्या उभ्या भेगा पडतात म्हणून हिला व्हर्टिसोल (Vertisol) असेही म्हणतात.

 • शुष्क परिस्थितीमध्ये ही मृदा आकुंचन पावते तर आर्द्र परिस्थितीमध्ये फुगते म्हणून बांधकाम मध्ये पाया म्हणून हिला वापरणे धोकादायक असते.

• महाराष्ट्राच्या एकुण क्षेत्रापैकी ३/४ भागात ही मृदा आढळते.

- खानदेश- नंदुरबार, धुळे व जळगाव

•मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच पश्चिम विदर्भाचे यवतमाळ अकोला, वाशिम अमरावती जिल्हे या ठिकाणी ही मृदा आढळते.

• पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळते.

♦️मृदेतील घटक

• टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो.

• इतर महत्वपूर्ण घटक म्हणजे मॅग्नेशियम व सेंद्रीय द्रव्ये होत. सेंद्रिय द्रव्येही मृदेस काळा रंग प्राप्त करून देतात. या मृदेचा सामु (pH) ७.५ ते ८.५ दरम्यान असतो.

• या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, मँगनीज, कॅल्शीयमचे प्रमाण अधिक असते तर नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. उष्णकटीबंधीय प्रदेशात अतिसिंचन किंवा पाण्याचा अयोग्य निचरा यामुळे मृदेतील विनिमययोग्य Nat,K+ आयन मृदेच्या पृष्ठभागावर येऊन मृदेचा सामु ९.५ बनतो व मृदा नापिक बनते. या मृदेस खारपड मृदा  असे म्हणतात.

♦️पिके

•कापसासाठी ही मृदा उत्तम असते. या मृदेत ज्वारी, तुर, बाजरी ही पिकेही उत्तम येतात.

२) लाल रेताड मृदा

*प्रदेश

•या मृदेमध्ये आयर्न ऑक्साईड (FeO) चे व वाळूचे प्रमाण अधिक असते. FeO मुळे मृदेस लाल रंग प्राप्त होतो तर वाळूच्या अस्तित्वामुळे ही मृदा रेताड बनते.

*प्रदेश

१) सह्याद्री पर्वताच्या उत्तर भागात म्हणजे पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांच्या पूर्व भागात ही मृदा आढळते.

२) तसेच पूर्व महाराष्ट्रात वर्धा व वैनगंगा नद्यांची खोरी म्हणजे वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली भागात ही मृदा आढळते.

♦️मृदेचे वैशिष्ट्ये

• ही मृदा प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून बनलेली असून क्वचित ग्रॅनाईट व नीस् या खडकांचाही प्रभाव आढळतो.

• अधिक पर्जन्यामुळे खडकाची झीज होऊन बारीक कणांची मृदा निर्मिती झाली आहे. तसेच खडकातील आयर्न ऑक्साईड मुक्त होऊन मृदेमध्ये जमा होतो. यामुळे मृदा लालसर बनते.

 • मृदेची जलधारण क्षमता कमी असून ती पाण्याचा सहज निचरा करते. त्यामुळे यामृदेत पिक उत्पादनासाठी सिंचनाची गरज असते. 

♦️पिके

• बाजरी, नाचणी ही पिके महत्वाची असून अधिक पर्जन्य क्षेत्रात भाताचे पिक घेतले जाते.

३) जांभी मृदा (Lateritic Soil) ही महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण मृदा आहे. या मृदेला लॅटेराईटिक मृदा (Lateritic Soil) असेही म्हणतात.

 ग्रीक भाषेत लॅटर(Later) म्हणजे वीट (Brick) होय. ही मृदा वीट निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून हिला लँटेराईटिक मृदा असेही म्हणतात.

* या मृदेत वाहून जाणारी सिलीका मृदेच्या खालच्या थरात निक्षेपित होते. ज्या मृदेच्या थरातून सिलीका वाहून जाते त्यास Zone of Elluviation तर ज्या थरात सिलीका निक्षेपित होते त्यास Zone of Illuviation म्हणतात.

♦️निर्मिती

• उष्ण व आर्द्र (Hot and Humid) हवामानामध्ये मुळ खडकातील वाळूचे मातीच्या खालच्या थरात वहन होते. यामुळे मृदेमध्ये लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण तुलनात्मक दृष्टिने वाढते यालाच जांभी मृदा/म्हणतात.

 •  लोहाचे प्रमाण अधिक - मृदेस लाल रंग प्राप्त.

♦️वैशिष्ट्ये

*अधिक पर्जन्य व आर्द्र हवामानामुळे मृदेत जीवाणूंची व सुक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते. या मृदेतील सेंद्रिय द्रव्ये सुक्ष्मजीव खावून टाकतात. त्यामुळे या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. याच कारणामुळे हिची जलधारण क्षमता कमी असते.

• या मृदेत लोह, अॅल्युमिनियम, टिटॅनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच या मृदेच्या क्षेत्रात अॅल्युमिनिअमचे साठे आढळतात.

• या मृदेत पोटॅश, फॉस्फरस, चुना, नायट्रोजन इ. घटकद्रव्ये कमी असतात. या मृदेचा सामु (pH) आम्लधर्मी असतो.

• महाराष्ट्रातील जांभ्या मृदेची उत्पादकता भारतातील इतर ठिकाणच्या जांभ्या मृदेपेक्षा कमी आहे.

♦️पिके

• या मृदेत लोहाचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असल्याने सर्वसाधारण पिके येथे घेतली जाऊ शकत नाही. परंतु जी पिके मृदेतील लोहाच्या अतिप्रमाणास अनुकुलित झालेली असतात त्यांचे येथे उत्पादन घेतले जाऊ शकते. उदा. साबुदाणा, काजू, मसाल्याचे पिके, फळफळावळ कॉफी, चहा इ.

♦️प्रदेश

 • सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात तसेच पूर्वेकडील उंचवट्याच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या अतिपर्जन्याच्या पूर्व भागात व सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात ही मृदा आढळते.

४) नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मृदा -- 

•ही मृदा नद्यांच्या खोऱ्यात गाळाचे निक्षेपण झाल्यामुळे तयार झालेली असते. या मृदेस इंग्रजीमध्ये Alluvial Soil असे म्हणतात, USDA ने दिलेल्या वर्गीकरणानुसार या मृदेस inceptisol असे म्हणतात.

♦️निर्मिती

• नद्या गाळ वाहून आणतांना जेव्हा त्या समतल प्रदेशात येतात तेव्हा त्यांचा वेग मंदावून शेजारील प्रदेशात या नद्या गाळाचे निक्षेपण करतात. या सततच्या निक्षेपणामुळे नदीच्या खोऱ्यात खोलवर गाळाचे थर आढळतात. नवीन जमा झालेल्या गाळास खादर म्हणतात तर जुन्या गाळास भांगर असे म्हणतात. भांगर या मृदेत कालानुरूप कॅल्सिफिकेशन प्रक्रियेद्वारे कंकर (CaCO,) चे प्रमाण वाढते. खादरची सुपिकता भांगरपेक्षा अधिक असते..

• या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे मृदेचा रंग काळा असतो. तसेच मृदेचा पोतही सुक्ष्म असतो.

• दरवर्षी पुरकाळामध्ये अधिक गाळाचे निक्षेपण झाल्यामुळे मृदेचा कस व सुपिकता कायम राहते. त्यामुळे तिला रासायनिक खत पुरविण्याची गरज नसते. या मृदेत पोटॅश, चुना आणि फॉस्फोरीक अॅसीडचे प्रमाण अधिक असते. परंतु फॉस्फरस प्रमाण कमी असते.

♦️प्रदेश

• गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा तसेच तापी व उत्तरपूर्णा या नद्यांच्या खोऱ्यात मोडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये या मृदेचे अस्तित्व आढळते.

♦️पिके

 • ऊस, गहु ज्वारी, भाजीपाला इ.

या क्षेत्रात ऊस या पिकाची अधिक लागवड व संबंधीत अति सिंचन केल्यामुळे मृदेचा कस बिघडत आहे.

५)कोकण किनारपट्टीतील गाळाची मृदा

•कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या गाळाच्या निक्षेपणामुळे ही मृदा तयार झाली आहे.

 • सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या नद्या उतारावरून वाहतांना भूपृष्ठाची झीज होते व या नद्या संबंधीत गाळ स्वत: सोबत वाहुन आणतात.

• या नद्या डोंगर पायथ्याशी आल्यानंतर त्यांच्या गाळाचे निक्षेपण होते व ही मृदा तयार होते.

♦️वैशिष्ट्ये

• या मृदेच्या थराची जाडी कमी असते तसेच त्यांच्यातील सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाणही कमी असते कारण नदीचा प्रवाह फार कमी लांबीचा आहे.

• या मृदेमध्ये गाळ, माती व वाळूचे प्रमाण अधिक असते. तसेच समुद्राजवळील मृदा रेतीमिश्रित असते.

♦️पिके

• नारळाच्या झाडासाठी पाणी झिरपणारी मृदा लागते म्हणून नारळाची शेती समुद्रकिनाऱ्याजवळील रेतीमिश्रीत गाळाच्या प्रदेशात केली जाते.

आंबा, काजू, भात व भाजीपाला याचे उत्पादन उच्च पोत असलेल्या गाळाच्या मृदेत घेतले जाते.

६) ईशान्येकडील चिकणमृदा 

•या मृदेमध्ये गाळाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पाणी सहजासहजी झिरपत नाही. ही मृदा अधिक काळापर्यंत पाणी धरून ठेवते म्हणून हिला 'चिकण मृदा' म्हणतात. निर्मिती ईशान्य महाराष्ट्रात वैनगंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ समतल, सपाट प्रदेशात निक्षेपित होतो. या गाळात सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे कण अतिशय घट्ट असतात.

• वरील कारणांमुळे मृदेतून पाण्याचा निचरा होत नाही. ही मृदा सुपिक असते. प्रदेश नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांच्या उत्तर भागात ही मृदा आढळते.  भाताच्या पिकास उत्तम -ही मृदा.

•गहु, ज्वारी, ऊस व कापुस ही येथे घेतली जाणारी इतर पिके आहेत.

 ७.) तांबडी पिवळसर मृदा (Red-yellow soil) , Ultisol

•ही मृदा वर्धा-वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आढळते.

♦️निर्मिती 

• मुळ ग्रॅनाईट व नीस् (Gneiss) खडकावर विविध बाह्य कारकांचा परिणाम होऊन खडकाचा अपक्षय होतो व ही मृदा निर्माण होते. USDA ने दिलेल्या वर्गीकरणानुसार या मृदेस 'Ultisol' (अल्टीसोल) असेही म्हणतात. मृदा रेतिमिश्रीत वाटते.

•या मृदेतील कणांचा आकार मोठा असतो म्हणून ही वैशिष्ट्ये मुळ ग्रॅनाईट, नीस् खडकात लोहाचे प्रमाण अधिक असते म्हणून या मृदेतही लोहाचे प्रमाण अधिक असल्याने मृदेस लाल रंग प्राप्त होतो.

• पावसाळ्यामध्ये मृदेतील Fe,O, हा घटक पाण्याचे अभिशोषण(absorption) करतो यामुळे त्याचे Fe,0, 2H,O या घटकात रूपांतर होते. Fe,03.2H,O याचा रंग पिवळा असल्यामुळे पावसाळ्यात या मृदेचा रंग पिवळा होतो म्हणून या मृदेस तांबडी-पिवळसर मृदा म्हणतात.

• या मृदेमध्ये लोह, मॅग्नेशिअम, मँगनीजचे प्रमाण अधिक असते तर सेंद्रिय द्रव्ये, नायट्रोजन तसेच फॉस्फरसचे प्रमाण कमी असते.

♦️प्रदेश

•लोह-खनिजांचे साठे असणाऱ्या प्रदेशात म्हणजे नागपूर, भंडारा जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळते. तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतही आढळते.

♦️पिके

• बाजरी, भूईमूग, बटाटे व भात

♦️मृदेची धूप (Soil Erosion) 

•वाहते पाणी(नदी), हिमनदी, वारा, सागरी लाटा इ. बाह्य शक्तींचे कारक भू-पृष्ठावर विघटनाचे कार्य करतात. या कार्याने जमिनीवरील मातीचे सुपीक थर निघून जाऊन खडक उघडे पडतात. त्यामुळे मृदा नापिक होते. या प्रक्रियेला मृदेची धूप म्हणतात. यामध्ये मृदेचा सर्वात सुपिक 'अ थर ' वाहून जातो त्यामुळे मृदा नापिक बनते.

♦️प्रकार

•मृदेची धूप ही पर्जन्यमान, जमिनीचा उंचसखलपणा, उतार वनाच्छादन इ. घटकांवर अवलंबून असते. वरील सर्व घटकांचा परिणाम म्हणून मृदेची धूप वेगवेगळ्या प्रकारे होते. या धूपेचे पुढील प्रकार पडतात.

१) Splash Erosion →

२) चादर धूप (Sheet Erosion)

३) ओहोळसदृश्य धूप (RillErosion) :

४) नालीसदृश्य धूप (Gulley Erosion)

५) दुर्भूमी (Badland) -

१) Splash Erosion

• यामध्ये पावसाचे पाणी थेंबाच्या स्वरूपात जमीनीवर पडत असतांना त्याची गतीज ऊर्जा फार अधिक असते. त्यामुळे जमीनीवर आघात झाल्यानंतर मृदेचे कण सुटे होतात आणि वाहत्या पाण्यासमवेत वाहु लागतात. यालाच splasheroion म्हणतात.

२) चादर धूप (Sheet Erosion) :

•यामध्ये पर्जन्याचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहतांना पाण्याचा थर करून वाहत असते. त्यामुळे पृष्ठभागावरील मृदेचे थर उघडे पडतात त्या प्रकाराला 'चादर धूप' म्हणतात.

• या धूपेचा वेग अत्यंत मंद असून सर्व क्षेत्रास समप्रमाणात प्रभावित करतो. ही धूप जमीनीच्या समतलपणावर अवलंबून असते.

•उतारावरील वनांची तोड, अतिचराई यामुळे मृदेची धूप अनूभवयास मिळते.

 • या प्रकारची धूप कालांतराने ओहोळसदृश्य धूपीमध्ये रूपांतरीत होते कारण जमीन क्वचितप्रसंगी समतल असते.

३) ओहोळ सदृश्य धूप (Rill Erosion) :

• चादर धूपीच्या अतिप्रमाणानंतर पाणी जमीनीच्या सखल भागातून वाहू लागते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह एका ओहोळामध्ये केंद्रीत होतो. पाण्याचा प्रवाह केंद्रीत झाल्यामुळे मृदेचे खणन वाढते व मृदेची अतिप्रमाणात झीज होते. यामुळे भू-पृष्ठावर नांगरणी केल्याप्रमाणे लांब नाली तयार होतात. यालाच 'ओहोळसदृश्य धूप' म्हणतात.

४) नालीसदृश्य धूप (Gulley Erosion)

•हा मृदा धूपीचा सर्वात घातक प्रकार आहे.

•यामध्ये पृष्ठभागावर पाण्याचे एका नालीमध्ये केद्रीकरण होऊन मृदा खननाची  प्रक्रिया वेग घेते. यामुळे मृदेची अतिप्रमाणात धूप होऊन खालच्या थराचे दगडधोंडे हे पृष्ठभागावर येतात व मृदेचा पृष्ठभाग खडबडीत होतो. या प्रकारामुळे मृदा वापरयोग्य राहत नाही. या प्रकारची धुप तीव्र उताराच्या प्रदेशात आढळते. वरील सर्व प्रकारांचा अंतिम परिणाम म्हणजे 'दूर्भूमी (Badland)' तयार होणे होय. यामध्ये जमीन अतिशय उंचसखल असून शेतीसाठी अयोग्य बनते. तसेच मृदेचा सर्वात सुपिक थर वाहुन गेल्यामुळे मृदा नापिक बनलेली असते.

५) दुर्भूमी (Badland)

•नालीसदृश्य धुप मोठ्या क्षेत्रावर केंद्रीत झाली असेल तर तयार झालेल्या नापिक क्षेत्रास दुर्भूमी म्हणतात. वनव्याप्त क्षेत्राच्य अनुपस्थितीमध्ये मोठ्या क्षेत्रावर नालीसदृश्य धुप होऊन दुर्भूमी तयार होते.

• चंबळ नदीच्या क्षेत्रात मोठ्या प्रदेशावर दुर्भूमी निर्माण झाल्या आहेत.

 • मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर, भिंड आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा, इटवाह या क्षेत्रात ६ लाख हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्र प्रभावित आहे.

• दरवर्षी आपण ८००० हेक्टर एवढ्या क्षेत्राच्या दुर्भूमीचा विनाश करीत आहोत *मृदेच्या धूपीची कारणे

*जोराने पडणारा पाऊस 

 *जोरदार वारे 

*वनाच्छादनाचा -हास होणे

*नद्यांना वारंवार येणारे पूर

*जमिनीचा आत्यंतिक उतार

*अतिचराई

*स्थलांतरीत शेती 

♦️महाराष्ट्रातील भूसंवर्धन (Soil Conservation in Maharashtra)

• महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मृदेच्या धूपीद्वारे होणाऱ्या मृदा हासाचे प्रमाण ७७३.५ दशलक्ष. टन एवढे अधिक आहे. यापैकी ९४% धुप ही पाण्यामुळे (उदा. पुर इ. ) घडून आलेले आहे.

 • यामुळे मृदेची उत्पादकता घटत आहे. याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे कापसाच्या काळ्या मृदेची उत्पादकता ५०%नी घटली आहे. यामुळे मृदासंवर्धन व भूसंवर्धनासाठी प्रयत्न अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्रात केले जाणार प्रयत्न आहेत

१)/उतारावर बांधाची शेती करणे (Contour bunding) :

•जमीनीचा उतार २% ते ४% पर्यंत असेल तर अशा ठिकाणी उतारावर बांध बंदिस्ती करून वेगाने वाहणाऱ्या पाण्याला अडवता येते व त्याचा वेग मंद करता येतो. अशाप्रकारे पाण्याला वेगाने वाहण्यास अडथळा निर्माण होतो व त्यामुळे पाण्याची खणन व मृदा वहन क्षमता कमी होते. ही पद्धती कमी उताराची आणि कमी Permeability असणाऱ्या मृदेच्या क्षेत्रात अधिक उपयुक्त ठरते. शेताच्या एका बाजूस अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी नाला असावा.

२) उतारावर पायऱ्यापायांची शेती करणे (Terrace Agriculture)

•जमिनीचा उतार अधिक असेल तर अशा ठिकाणी पायऱ्या पायऱ्यांची शेती केली जाते. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार १५% पेक्षा कमी असेल त्याठिकाणी या प्रकारची शेती उपयुक्त ठरते.

३) विशिष्ट पध्दतीने नांगरणी करणे (Contour ploughing)

•उतारावर नांगरणी करतांना उतारास लंबरूपात करावी जेणेकरून पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण होऊन मृदेची धूप रोखता येईल. या प्रकारात मृदा (Permeable) असावी.

४) विशिष्ट प्रकारे पिकांची लागवड करणे. (Wind Strips):

•वाऱ्याच्या दिशेला लंबरूप या प्रकारे पिकाची लागवड केल्याने वाऱ्याच्या वहनास व पाण्याच्या वहनास अडथळा निर्माण होतो व मृदेची धूप रोखता येते.

५) वनसंवर्धन (Forest Conservation):

•वृक्ष मृदा धरून ठेवतात तसेच पाण्याच्या व वाऱ्याच्या वहनास अडथळा निर्माण करतात. यामुळे पाण्याचा व वाऱ्याचा वहनाचा वेग परिणामे माती मृदेची धूप कमी होतो.

•वनांची तोड कमी व्हावी म्हणून स्थलांतरीत शेतीचे प्रमाण कमी करणे, वनांची लागवड करणे, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.

६) नद्यांवर बांध घालणे (Nala Bunding) 

•नद्यांच्या पूरांमुळेही मृदेची धूप होते. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा आकार व वेग नियंत्रीत ठेवण्यासाठी छोटे ओहोळ ते नदी या सर्वांवर बांध घालावेत.

७) जनावरांच्या अतिचराईमुळेही मृदेची धूप होते यामुळे गावात गावरानांचा विकास करणे, कुरणांचा विकास करणे गरजेचे करणेही फायदेशीर ठरते.

•तसेच त्यांचा वापर सुयोग्यरित्या वरील प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी शासन वनक्षेत्रात चराईबंदी व कु-हाडबंदी म्हणून उपक्रम राबवित आहे. यासाठी प्रोत्साहन म्हणून जंगलतोड न करणाऱ्या आदिवासी कुटुंबास ७५% सबसीडीवर एलपीजी गॅस मिळतो. तसेच इतर उपक्रमही सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा