♦️भारतीय मृदा (Soils of India)
*मृदा म्हणजे खडकाचे छोटे तुकडे आणि सेंद्रिय पदार्थांचे असे मिश्रण जे पृथ्वीच्या भूभागावर खडकांच्या भौतिक, रासायनिक व जैविक अपक्षयाने तयार झाले आहे व वृक्षांच्या वाढीसाठी सहाय्य करते.
• मृदेच्या अभ्यास शास्त्र- 'Pedology'.
• मृदेची महत्त्वाची कार्ये म्हणजे
i) वृक्षांच्या वाढीस मदत करणे.
ii) पाण्याच्या झिरपण्यास मदत करणे व भूजल साठा वाढविणे.
iii) पृथ्वीच्या वातावरणाची गुणवत्ता सुधारण्यास सहाय्य करणे.
iv) मृदेचा पोत, सुपिकता वाढविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सुक्ष्मजीवांना अधिवास (Habitat) पुरविणे.
♦️मृदानिर्मितीच्या प्रक्रिया : (Soil Formation Process)
खालील प्रमुख प्रक्रियांद्वारे मृदा निर्मितीची प्रक्रिया
i) Leaching
ही प्रक्रिया प्रामुख्याने उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात चालते.
या ठिकाणी मृदेतील विद्राव्य सिलीका, कॅल्शिअम यासारखे घटक पाण्यासोबत वाहून जातात व उर्वरीत मृदेत आयर्न ऑक्साईड, अॅल्युमिनीअम ऑक्साईडचे प्रमाण वाढते.
ही मृदा लॅटेराईटीक मृदा (Lateritic Soil) म्हणून ओळखली जाते.
ii) Elluviation
अति पर्जन्य व मृदेत झिरपणाऱ्या पाण्यामुळे मृदेतील लोह अॅल्युमिनिअम ऑक्साईडचे विद्राव्य घटक मृदेच्या 'A आणि E' थरामधून वाहून जातात. या प्रक्रियेस Elluviation प्रक्रिया म्हणतात.
iii Illuviation
या प्रक्रियेत वरच्या थरातून वाहून येणारे घटक B थरामध्ये जमा होतात. या प्रक्रियेस Illuviation म्हणतात. वरच्या थरातून वाहून येणारे घटक जर Iron Oxides आणि Aluminium Oxides सारखे असतील तर B थराचा रंग A थरासारखा गडद. (Dark) असु शकतो
iv) Podzolisation / Chelation
पानांमध्ये थंडीपासून व बर्फापासून बचाव करण्यासाठी 'Chelating Agents' सारखे घटक असतात.
या पानांच्या कुजण्यानंतर हे घटक मृदेतील A1 व Fe मुलद्रव्यांशी अभिक्रिया पावून अॅल्युमिनिअम व iron feroxide तयार करतात. .
हे पाण्यामध्ये विद्राव्य असल्यामुळे बर्फाच्या वितळल्यानंतर पाण्यासमवेत वाहन जातात. त्यामळे मृदेत सिलिकाचे प्रमाण अधिक राहते आणि मृदा राखाडी रंगाची बनते. ही मृदा'आम्लधर्मी असून नापिक' असते.
v) Gleying
या प्रक्रियेमध्ये दलदलीच्या प्रदेशात मृदेतील आयर्न ऑक्साईड Unaerobic (ऑक्सिजनविरहीत) परिस्थितीमध्ये Reduction प्रक्रिया करतो. यामुळे या मृदेस हिरवा रंग प्राप्त होतो. गाळाचे, दलदलीचे व Bog यासारख्या प्रदेशात ही प्रक्रिया चालते.
• तयार झालेल्या मृदेत पीट (Peat) सारख्या सेंद्रिय घटकांचे प्रमाण अधिक असते.
vi) Calcification
या प्रक्रियेमध्ये शुष्क प्रदेशात मृदेतील CaCO, (कॅल्शियम कार्बोनेट) एकत्र येऊन त्यांचे गोटे कंकर तयार होतात.
♦️मृदा वर्गीकरण
१.गाळाची मृदा (Alluvial Soil): • नदीद्वारे वाहून आलेल्या गाळाच्या निक्षेपणाने ही मृदा तयार झाली असल्याने हिला Alluvial Soilम्हणतात.
भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या /१४३.१/ (दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पसरलेली ही मृदा एकूण क्षेत्राच्या ४३.४% क्षेत्र व्यापते.
• हिमालयाच्या अपक्षय व गाळाच्या वहनापासून उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात नदयांनी वाहुन आणलेल्या गाळाचे निक्षेपण होऊन ही मृदा तयार झाली.
*प्रदेश :
i) ही मृदा सतलज, गंगा व ब्रम्हपुत्रा नदी खोऱ्यात तसेच नर्मदा, तापी या पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यात तयार झाली आहे.
ii) तसेच पूर्व वाहिनी नदया म्हणजे महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांच्या खोऱ्यात व त्रिभूज प्रदेशात ही तयार झाली आहे.
iii) ही मृदा उंचावरील प्रदेशात (Mountain Region) अपरीपक्व तर मैदानी प्रदेशात परिपक्व (Mature) असते.
iv) गंगेच्या मैदानी प्रदेशातुन ह्या मृदेचा प्रदेश अरूंद क्षेत्राद्वारे राजस्थानमधून जातो व गुजरातच्या मैदानी प्रदेशातही या मृदेचे अस्तित्व आहे.
गंगेच्या मैदानी प्रदेशाच्या उर्ध्व आणि मध्यम भागात ही मृदा तयार झाली असून येथे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
* खादर (Khadar Soil) : उंचावरून वाहत येणाऱ्या नदया स्वतः सोबत गाळ वाहून आणतात आणि मैदानी प्रदेशात आल्यानंतर हा गाळ निक्षेपीत करतात. वारंवार नवनवीन गाळ निक्षेपीत होऊन जे नवीन गाळाचे प्रदेश तयार झाले आहेत त्यास खादर मृदा म्हणतात,
शुष्क प्रदेशात स्थानिक मृदेतून अल्कधर्मी आणि खारट (Alkaline and Salty) द्रव बाहेर येतो. त्यास रेह, (Kallar) किंवा थूर (Thur) म्हणतात. साधारणपणे राजस्थानच्या मैदानीप्रदेशात व वाळवंटात हे कल्लार / रेह कल्लारआढळतात.
* भांगर मृदा (Bhangar Soil)) : खादर मृदा जुनी झाल्यानंतर त्यात Calcification प्रक्रिया सुरु राहते. यामुळे पूरमैदानापासून दुरवरच्या जुन्या गाळाच्या मृदेत Calcium Carbonate चे (ककर) प्रमाण वाढते. ही मृदा कालांतराने कठीण, टणक बनते. भांगर व खादर या दोहांमध्ये कंकर असते व या मृदा लोमी (Loamy) आणि चिखलयुक्त (Clayey) असतात. या मृदेतील वाळुचे (Sand) प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत व गाळाचे प्रमाण वाढत जाते.
भौतिक वैशिष्ट्ये:
*मृदेचा रंग हलका फिकट ते राखाडी (Light grey ते Ashy grey) असतो. या मृदेचा पोत चिकणमातीयुक्त असतो व सिंचनानंतर हिचे चिखलात रुपांतर होते. या मृदेत पोटॅशचे प्रमाण अधिक असून फॉस्फरस कमी प्रमाणात असतो.
*या मृदेत ह्युमस, फॉस्फरीक आम्ल, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असते तर नायट्रोजनचे प्रमाण अत्यंत कमी असते.
२) तांबडी-पिवळसर मृदा (Red and Yellow Soil)
• ह्या मृदेचा रंग लाल असण्याचे कारण म्हणजे या मृदेच्या मुळ खडकात (अग्निज व रुपांतरीत खडकात लोहाचे प्रमाण अधिक असते.
• या मृदेस सिंचन दिल्यास किंवा पर्जन्य काळात या मृदेतील मुळ घटक (Fe,0,) याचे जलीभवन (Hydration) होऊन Fe,0,.H,O तयार होते. याचा रंग पिवळा असल्याने या मृदेस तांबडी-पिवळसर मृदा म्हणतात.
• सुक्ष्म पोत (Fine Texture) असणारी ही मृदा सुपिक असते तर जाडाभरडा पोत (Coarse Texture) असणाऱ्या मृदेतउपयुक्त खनिजे व सेंद्रिय पदार्थांचे अवक्षालन (Leaching) होऊन ही मृदा नापिक बनते
• या मृदेत साधारणपणे नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते परंतु खतांचा पुरवठा केला असता या मृदा सुपिक बनतात.
• ही मृदा सच्छिद्र, भूसभूसीत असते व यात चूना आणि कंकरचे प्रमाण कमी असते.
• उंच पठारावर आढळणारी ही मृदा वालुकामय, दगडी आणि सच्छिद्र असते तर मैदानी प्रदेशात खोल, गडद रंगाची व सुपिक असते.
♦️प्रदेश/ आढळ :
ही मृदा ही मृदा ग्रॅनाइट, निस (Granite, Gneiss) खडकापासून बनलेली असते म्हणून या मृदेस 'Omnibus Soil' म्हणतात. भारतीय द्विपकल्पावर आढळते. या मृदेचा विस्तार तामिळनाडूचा दक्षिणभाग ते उत्तरेकडे बुंदेलखंड पर्यंत आणि पूर्वेस राजमहाल टेकड्यापासून पश्चिमेस काठियावाड पर्यंत आढळून येतो.
. पश्चिम घाटाचा पूर्व उतार, ओडिशा आणि छत्तिसगड व मध्य गंगा मैदानाच्या दक्षिण भागात ही मृदा आढळते.
♦️वैशिष्ट्ये:
• या मृदेची जलधारणक्षमता (Water Holding Capacity) कमी असते.
ज्या प्रदेशात सिंचनाची व्यवस्था आहे त्या प्रदेशात गहू, कापूस, डाळी, तंबाखू, बाजरी, बटाटे यांची पिके घेता येतात.
३) काळी मृदा (Black Soil) :- ५० लशलक्ष हेक्टर - १५.
• या मृदेस रिंगुर मृदा (Regur Soil) असेही म्हणतात. कारण या मृदेत दगडगोट्यांचे (Regur) प्रमाण अधिक असते.
• ही मृदा एकूण ५० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पसरली असून भारताच्या एकूण क्षेत्राच्या १५% क्षेत्रावर पसरली आहे.
• या मृदेस भारतात कापसाची काळी मृदा म्हणतात कारण या मृदेत कापसाचे पिक अधिक येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर हिला "Tropical Soil' म्हणतात.
• या मृदेस स्वमशागत करणारी (Self -Ploughing) मृदा म्हणतात कारण उन्हाळ्यात मृदेतील अधिक चिखलाच्या प्रमाणामुळे उभ्या भेगा पडतात. त्यामुळे मृदेत हवा खेळती राहण्यास (Aeration) मदत होते.
• मृदेत पडणाऱ्या भेगांमुळे मृदेस Vertisols असेही म्हणतात.
• मृदेतील चिखलाच्या अधिक प्रमाणामुळे मृदा अधिक काळासाठी पाणी धरून ठेवते. सिंचनानंतर किंवा पर्जन्यानंतर या मृदेची मशागत करणे कठीण बनते.
प्रदेश./ आढळ :
• ही मृदा गुजरातचा मोठा भाग, महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा पश्चिमभाग, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तिसगढ, झारखंड, आणि राजमहल टेकड्यांपर्यंत आढळते.
मृदेतील घटक:
• या मृदेत चुना, लोह, पोटॅश, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळते तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रवाची कमतरता आढळते.
४) जांभी मृदा (Lateritic Soil) → वीर तयार करण्यासाठी
• ब्रिटीश भूगोलतज्ञ ‘बुचानन' याने १९०५ मध्ये सर्वप्रथम या मृदेचा अभ्यास केला.
• ही मृदा प्रामुख्याने उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात आढळते व या ठिकाणी Lateratization प्रक्रियेद्वारे खडकातील सिलिकासदृश्य घटक (चुना, Ca) वाहून जातात व उर्वरीत मृदेत आयर्न ऑक्साईड आणि अॅल्युमिनीअम ऑक्साईडचे प्रमाण अधिक बनते.
• या सर्वांमुळे मृदेस लाल रंग येतो व ही मृदा अतिशय कठीण असून हिचा वापर वीटा (Bricks) तयार करण्यासाठी केला जातो. वीटांना ग्रीक भाषेत 'Later' म्हणतात. म्हणून ही मृदा 'Latritic Soil' म्हणून ओळखली जाते.
• या मृदेत जीवाणूवाढीचा वेग अधिक असल्याने ही मृदा सेंद्रिय पदार्थरहीत असते.
♦️गुणधर्म
• या मृदेत सेंद्रिय पदार्थ, नायट्रोजन, फॉस्फेट आणि कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते परंतू Iron Oxide आणि पोटॅशचे प्रमाण अधिक असते.
• लोहाच्या अधिक प्रमाणामुळे ही मृदा वापरास अनुपयुक्त असली तरीही खतांच्या वापरामुळे हिची उपयुक्तता वाढ शकते.
♦️आढळ
• ही मृदा भारताच्या १२.२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात आढळत असून हिने एकूण क्षेत्राच्या ३.७% भूभाग व्यापला आहे
• ही मृदा प्रामुख्याने पश्चिम घाटाचा पश्चिम उतार, पूर्व घाट, सातपुडा पर्वतरांग, मेघालयातील गारो टेकड्या, विंध्य पर्वत, आडिशांचा किनारा, छत्तिसगड या ठिकाणी आढळते.
जांभी मृदा तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे काजु, मसाल्याची पिके, रबर, नारळ यांचे उत्पादन घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
५) वाळवंटी मृदा (Arid Soil)
• देशाच्या एकूण क्षेत्राच्या १५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर ही मृदा पसरली असून एकूण क्षेत्राच्या ४.४२% क्षेत्र व्यापते. अति तापमानाच्या कक्षेमुळे होणारे खडकाचे अपक्षय व वाऱ्याच्या क्रियेमुळे ही मृदा विकसीत होते.
• ही मृदा वालुकामय, रेताड (Sandy) असते. यात सेंद्रिय द्रव्ये, ह्युमस आणि नायट्रोजनचे प्रमाण अत्यल्प असून कंकर (Calcium Carbonates) आणि क्षाराचे (Salts) प्रमाण अधिक असते.
• मृदेच्या खालच्या थरात (B आणि C) कंकर आणि क्षाराचे प्रमाण वाढून अच्छिद्र असा कठीण थर बनतो त्यास 'Hardpan' म्हणतात. या Hardpan मुळे मृदेतून पाणी झिरपत नाही व ही मृदा लागवडी योग्य बनते.
♦️वैशिष्ट्ये व आढळ :
• या मृदेत वाळुचे व क्षाराचे प्रमाण अधिक असून रंग लाल ते वीटकरी असतो.
• ही मृदा राजस्थान, कच्छ, अरवली पर्वतरांगेचा पश्चिमेकडील भाग, गुजरातचा उत्तरेकडील भाग (सौराष्ट्र), पश्चिम हरियाणा व पंजाबचा पश्चिम व दक्षिण भाग या ठिकाणी ही मृदा आढळते.
पिके :
बैंचाक • या मृदेत बाजरी, गवार, डाळी, चारा, वैरण आणि दुष्काळरोधी पिके घेतली जातात
६)खारपड मृदा (Saline Soil)
• या मृदेस उिसरा (Usara Soil)') मृदा म्हटले जाते व यात Na, K, Mg यांचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असते. या घटकांच्या अधिक प्रमाणामुळे मृदेचा सामु (Soil PH) ८.५ पेक्षा अधिक असतो आणि मृदा नापिक असते.
• ही मृदा निमशुष्क, पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशात बाष्पीभवनाच्या अत्याधिक प्रमाणामुळे निर्माण होते. या मृदेची रचना लोमी (Loamy) ते रेताड असते. यांमध्ये नायट्रोजन व कॅल्शियमची कमतरता असते.
• शुष्क प्रदेशात अतिसिंचनामुळे मृदेतील ओलावा केशाकर्षन प्रक्रियेमुळे (Capillary Action) वर पृष्ठभागाकडे येऊ लागतो व पृष्ठभागावर क्षारांचे निक्षेपण होऊन मृदा खारपड बनते. या मृदेत NaCl व NaS चे प्रमाण अधिक असते.
♦️आढळ
• ही मृदा कच्छचे रण, गुजरातचा पश्चिम भाग, पूर्व किनाऱ्यावरील त्रिभूज प्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील सुंदरबन
• कच्छच्या रणमध्ये त्रिभूज प्रदेशात उंच भरतीच्या लाटेवेळी समुद्राचे पाणी पृष्ठभागावर पसरते आणि अति बाष्पीभवनामुळे या मृदा पृष्ठभागावर क्षाराचा थर साचतो.
• पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग या हरितक्रांतीच्या (Green Revolution) पट्ट्यात अतिसिंचन व अति खत वापरामुळे मृदा खारपड बनली आहे.
• या मृदेस वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत उदा. रेह, कल्लार, उसर, राकर, धूर, कार्ल आणि चोपण इ.
• या मृदेत वाळूचे प्रमाण अधिक असून हिची जलधारण क्षमता कमी असते. यात नायट्रोजन व कॅल्शिअमची कमतरता असते.
• या मृदेत जिप्सम, CaCI, मिसळले असता मृदेची रचना सुधारुन हिची सुपिकता वाढविता येते.
• या मृदेत धैंचा, ताग या पिकांची लागवड केल्यास मृदेची रचना व पोत सुधारतो.
७)पीटी / दलदलीची मृदा (Peaty and Marshy Soil)) :-
• ही मृदा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा दलदलीच्या प्रदेशात तळाशी तयार होते.
• या मृदेमध्ये सेंद्रिय घटकांचे व ह्युमसचे प्रमाण अधिक असून ही मृदा तांदूळ या पिकासाठी उपयुक्त असते.
• या मृदेतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण ४५-५०% पर्यंत असु शकते यामुळे या मृदेचा रंग गडद असतो. या मृदा अल्कधर्मीदेखील असू शकतात.
आढळ
• ही मृदा काराकोरम, (जम्मु आणि काश्मिर, कोट्टायम आणि अल्लापुझा (केरळ) येथे आढळते. तसेच सुंदरबन, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांच्या त्रिभूज प्रदेशात आढळते. वन मृदा (Forest Soil :
• वनप्रदेशात पर्जन्याचे प्रमाण पुरेसे असेल तर अशा ठिकाणी ही मृदा आढळते. या मृदेच्या रचना व पोत यावर उंची, प्रादेशिक रचना या घटकांचा अधिक परिणाम होते.
• उंचावरील प्रदेशात ही मृदा जाड्याभरड्या पोताची तर दरीय प्रदेशात गाळाची किंवा सुक्ष्म पोताची असते.
• हिमालयाच्या हिमाच्छादित प्रदेशात या मृदेचे अनाच्छदन (Denudation) होऊन मृदेतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी होते व मृदा आम्लधर्मी होते.
९) करेवा मृदा (Karewa Sony: , केसर पिक किश्मीर) Soil)
• प्लीस्टोसीन कालखंडात (Pleistocene Period) हिमालयाच्या दरीतील बहुतांश प्रदेशात हिमनदी व त्यांपासून तयार झालेले सर्क व केटल सरोवरे (Cirque and Kettle lake) येथिल हिम कालांतराने वितळून येथे जल सरोवरे तयार झाली.
• या सरोवराच्या पायथ्याला गाळ, वनस्पती,
♦️समस्याग्रस्त मृदा (Problematic Soil):
• मृदा ही वृक्ष आणि पिकांच्या वाढीसाठी आत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. या मृदेच्या नैसर्गिक घटकांमुळे किंवा मानवी कृत्यांमुळे मृदेचे अंतर्भूत गुणधर्म बदलतात. मृदेचा पोत, मृदेची रचना, सच्छिद्रता, सामु यांसारखे गुणधर्म बदलून शेती व पिकवाढीसाठी ही मृदा अनुपयुक्त बनते. अशा मृदांना समस्याग्रस्त मृदा (Problematic Soil) असे म्हणतात. या मृदांचे ३ प्रकार असून ते पुढीलप्रमाणे आहेत.
१) आम्लधर्मी मृदा (Acidic Soil)
२) अल्कधर्मी मृदा (Alkaline Soil)
३) खारपड मृदा (Saline Soil)
या मृदांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
१) आम्लधर्मी मृदा (Acidic Soil) :
• या मृदांचा सामु ६.५ पेक्षा कमी असून मृदेची Electron Conductivity (EC) 4 mmho/cm पेक्षा अधिक असते. निर्मितीची कारणे j) मृदेतील ह्युमसचे विघटन होऊन कार्बोनीक आम्लासारखे आम्ले मुक्त होऊन मृदेचा सामु घटतो.
ii) /१०० सेंमी पेक्षा अधिक पर्जन्याच्या प्रदेशात पाण्यासमवेत मृदेतील Cat, Mg+2 आयन तसेच इतर अल्कधर्मी घटक वाहून जातात व मृदा आम्लधर्मी बनते.
iii) मुळ खडकात सल्फरचे प्रमाण अधिक असल्यास त्यापासून H,SO. तयार होते. हे H,SO आम्लधर्मी असते. iv) अमोनिअम सल्फेट आणि अमोनिअम क्लोराईड सारख्या खतांचा वापर अतिप्रमाणात केल्यास मृदेतील Ca*, Mgवाहून जातात.
iii) Exchangable Sodium Percent चे प्रमाण १५ पेक्षा कमी असते.
iv) मृदेचा पोत जाडाभरडा असून मृदेमध्ये Deflocculation चे प्रमाण अधिक असते. या प्रक्रियेमुळे मृदेची सच्छिद्रता
♦️वैशिष्ट्ये
मृदेचा सामु ६.५ पेक्षा कमी
ii) EC 4.0 mmho/cm पेक्षा अधिक
घटते.
v) या मृदामध्ये Ca, Mg आणि विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी असते.
♦️आम्लतेचे मृदेवर होणारे परिणाम.
*मृदेतील H+ आयनांच्या अतिप्रमाणामुळे वृक्षांची मुळे वाढत नाहीत
ii) मृदेमध्ये Deflocculation प्रक्रिया होऊन मुक्त झालेले मृदाकण मृदेच्या छिद्रामध्ये बसतात. त्यामुळे मृदेची सच्छिद्रता व Permeability घटते
iii) मृदेतील वितंचकाच्या क्रियेत (Enzymes Action) बदल घडून येतो.
iv) मृदेतील Ca, Mg वाहून गेल्याने मृदेत त्यांची कमतरता होते.
v) Al, Mn, Fe ही मुलद्रव्ये वृक्षांना विषारी बनतील अशा प्रमाणात उपलब्ध असतात.
vi) फॉस्फरसची मृदेतील चलविचलता (Mobility) घटून वृक्षांस उपलब्ध असणाऱ्या फॉस्फरसचे प्रमाण घटते.
*आम्लधर्मी मृदेवरील उपचार व सुधारणा
/चुना मिसळणे (Lime addition) : यामुळे मृदेचा सामु वाढून मृदेचा सामु उदासीन होतो व पोषणद्रव्यांची उपलब्धता वाढते.
ii) आम्लधर्मी मृदेत (जाभी मृदा, समशितोष्ण कटीबंधीय / Pozdolic Soil) अमोनिअम, सल्फेट आणि अमोनिअम क्लोराईड या खतांचा पुरवठा न करता युरिया खत दयावे स्टील आणि लोहशुद्धीकरणाच्या कारखान्यातुन उत्सर्जीत केलेल्या मळीत | Slag) ४८-५४ Percent CaO आणि ५% Mgo असते म्हणून आम्लधर्मी मृदेत चुन्याऐवजी ही मळी मिसळता येते.
iv) Dicalcium Phosphate (DCP), Tricalicum Phosphate (TCP) आणि Murate of Potash (MOP) या खतांमुळे मदेतील फॉस्फरस आणि पोटॅशचे प्रमाण वाढून मृदेची उपयुक्तता वाढते. .
२) अल्कधमी मृदा (Alkaline Soil) :
• या मृदेचा सामु अधिक असून मृदेतील विनिमय योग्य सोडिअमचे प्रमाण (Exchangable Sodium Amount) अधिक असते. मृदेतील सोडिअम कार्बोनेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे मदेस काळा रंग प्राप्त होतो. म्हणून मृदेस काळी अल्कधर्मीमृदा म्हणतात..
*अल्कधर्मी मृदानिर्मितीची कारणे
i) शुष्क आणि निमशुष्क प्रदेशात खडकाच्या अपक्षरणापासून तयार झालेल्या मृदेतील अतिसिंचन आणि बाष्पीभवनाचा अतिवेग यामुळे Na क्षार मृदाथरावर साचतात.
ii) किनारी प्रदेशातील मृदेत कार्बोनेटचे प्रमाण अधिक असल्यास या मृदेत सागरी जलाचा शिरकाव (Ingression) होऊन
सोडिअम कार्बोनेट तयार होते.
अल्कधर्मी मृदेची वैशिष्ट्ये
i) या मृदेचा सामु ८.५ पेक्षा अधिक असतो. ii) या मृदेची EC 4.0 mmhos/cm पेक्षा कमी असते.
ii) या मृदेची सोडिअम विनिमय टक्केवारी (Exchangable Sodium Percent) १५ पेक्षा अधिक असते.
iv) मृदेचा रंग काळा असतो. मृदा व पिकांवर होणारे परिणाम
i) विनिमयक्षम सोडिअमच्या अधिक प्रमाणामुळे पिकांस उपलब्ध असणाऱ्या कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचा तुटवडा असतो. ii) मृदेतील अधिकचे हायड्रॉक्झिल (OH) आणि कार्बोनेट आयन पिकांसाठी विषारी असतात.
in) मृदेतील Naआयनांच्या अधिक प्रमाणामुळे मृदा फुगते (Swelling) आणि मृदाकण सुटे होऊन मृदेची छिद्रे व्यापतातयामुळे मृदेची सच्छिद्रता आणि permeability कमी होते. यामुळे मृदेची जलधारण क्षमता, Aeration क्षमता कमी होते.
नारळ ज्वारी, जव, बीट, ऊस, कापुस, मोहरी, भात, हरभरा, सूर्यफुल, बाजरी, टोमॅटो, , पेरु, केळी,
अल्कधर्मी मृदेवरील उपचार व त्यांच्यातील सुधारणा :
या मृदेतील सुधारणा पुढीलदोन मुख्य प्रकारे करता येते.
i) हा जलविद्राव्य सोडिअम पाण्याद्वारे अवक्षालीत (Leach out) करणे.
*) मृदेतील सोडिअम जलविद्राव्य घटकात (पदार्थात) रुपांतरीत करणे.
* जिप्सम (Caso..2H.O) साधारणपणे जिप्सम पाण्यात विद्राव्य असते. या जिप्समसमवेत सोडिअमची अभिक्रिया होऊन तयार होणारा सोडिअम सल्फेट पाण्यात विद्राव्य असतो. त्यामुळे वाहत्या पाण्या समवेत वाहून जातो रचना सुधारते.
जिप्समपेक्षा CaCl, अधिक उपयुक्त असतो कारण Na आणि CaCl, ची अभिक्रिया होऊन तयार होणारे NaCl सहज वाहून जाते. परंतू CaCl, महाग असल्यामुळे वापरावर बंधने येतात.
सल्फरयुक्त घटकांची मृदेत भर घालणे उदा. पायराईट (Fes.)
धैंचा, गवार सारख्या हिरवळीच्या खताची मृदेत भर घालणे. या जैविक खतांचे पेशीद्रव्य आम्लधर्मी असते. त्यामुळे अभिक्रियेनंतर ही मृदा उदासीन होते.
ऊसाचा चोथा मळीची मृदेत भर घालणे.
♦️ ३) खारपड मृदा (Saline Soil)
• या मृदेत जलविद्राव्य क्षार अतिप्रमाणात असून हे क्षार पिकांच्या मुळाशेजारी जमा होतात.
• या मृदेत सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे क्लोराईड व सल्फाईडचे प्रमाण अधिक असून मृदेच्या पृष्ठभागावर यांचापांढरा थर जमा होतो. त्यामुळे यास शुभ्र अल्कली मृदा म्हणतात.
खारपड मृदानिर्मितीची कारणे
i) अतिसिंचनामुळे मृदेतील क्षार पाण्यात विद्राव्य होऊन मृदापृष्ठभागावर जमा होतात. बाष्पीभवनानंतर हे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर थर करून राहतात.
ii) क्षारयुक्त पाण्याने मृदेस सिंचन दिल्यास
iii) या मृदेची सोडिअम विनिमय क्षमता १५ पेक्षा कमी असते.
iv) मृदेमध्ये मृदाकण एकमेकांना चिटकुन राहण्याची अवस्था (Flocculation) दर्शवितात.
ii) किनारी प्रदेशात सागरी जलाचे भरतीच्या लाटेवेळी शेजारील मृदेत शिरकाव झाल्यामुळे मृदेत क्षारांचे प्रमाण वाढते.
*वैशिष्ट्ये
*) या मृदेचा सामु ८.५. पेक्षा कमी असतो.
*) या मृदेची EC 4.0 mmhos/cm पेक्षा अधिक असते.
या मृदेत सोडिअम विनिमय क्षमता कमी असून सल्फेट आणि क्लोराईड आयनांचे प्रमाण कमी असते. vi) या मृदेचे परासरण बल (Osmotic Pressure) अधिक असून पिकांच्या मुळांना मृदेतून पाणी शोषून घेण्यास ताण (Tension) निर्माण होतो. यामुळे पिकांच्या वाढीचा दर घटून पाने, फुले आणि खोडांच्या वाढीवर परिणाम होतो
♦️खारपड मृदेवरील उपचार व सुधारणा
1) जमीन पाण्याने संपृक्त ठेवून (Saturated Soil) पाणी झिरपू दयावे. त्यामुळे मृदेतील क्षार वाहून जातील. परंतू खोल आणि सुक्ष्म पोत असलेल्या चोपणी (Clayey) मृदेत ही प्रक्रिया अवलंबण्यास अडथळे येतात.
ii) संपूर्ण क्षेत्र छोट्या-छोट्या भागात विभागणी करून प्रत्येक भागास स्वतंत्र सिंचन दयावे.
मृदा १५-२०सेंमी. थराच्या स्वच्छ पाण्याने संपृक्त (Saturated Soil) करावी ज्यामुळे जलविद्राव्य क्षार पाण्यात विरघळून वाहूनजातील.
Flood Irrigation : पाटाचे पाणी मृदेस देऊन मृदा संपृक्त करावी आणि पाणी सातत्याने वाहते ठेवावे. यामुळे क्षार विद्राव्य होऊन वाहून जातात.
सुपर फॉस्फेट, अमोनिअम सल्फेट व युरीयासारखी खते वापरावी. परंतू म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम क्लोराईड वापरू नये.
मृदेच्या पृष्ठभागावरील क्षाराचा थर ओरखाडूण (Scrapping) काढावा. vi)धैंचासदृश्य हिरवळीची खते फुलधारणे पर्यंत वाढवून मृदेत गाडावी.
भारताची प्राकृतिक रचना | ||
भारतीय राज्य त्यांच्या राजधानी आणि राज्यभाषा | ||
भारतातील संपूर्ण राज्यांची माहिती | ||
भारतातील केंद्रशासित प्रदेश | ||
भारतातील प्रमुख नद्या | ||
भारतातील डोंगररांगा /शिखरे | ||
भारतातील प्रमुख | ||
भारतीय सांस्कृतिक वारसा | ||
भारतातील प्रमुख | ||
भारताचे वातावरण | ||
भारतीय मृदा | ||
भारतीय खनिजसंपत्ती | ||
भारतातील प्रमुख | ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा