♦️मौर्यत्तोरकालीन प्रमुख स्त्रोत
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
♦️विदेशी आक्रमण
♦️१) इंडो-ग्रीक आक्रमण
डेमेट्रीयस प्रथम
सर्वात पहिला इंडो-ग्रीक आक्रमणकारी - बॅक्ट्रिया (अफगाण) मधून भारतावर स्वारी व पंजाबचा भाग जिंकला.
*राजधानी - स्याकल बनवली
भारतीय राजांची उपाधी धारण करून युनानी व खरोष्टी लिपीत नाणी चालू केली.
मिनाण्डर (इ.पू. १६५-१४५)
*याने गंगा-यमूना दुआबात आक्रमण केले.
*यांची राजधानी श्यालकोट (साकल) - शिक्षण व व्यापाराचे केंद्र.
एन्टीयालकिड्स
इंडो-ग्रीक (यवन) ची दूसरी शाखा जिची राजधानी तक्षशिला
*याचा राज हेलिओडोरस शुंगाच्या दरबारी गेला व विदिशा येथे गरूड स्तंभ स्थापित केले.
हे भागवतधर्म (वैष्णव) यांच्याशी संबंधीत.
*ज्योतिष: भारतीयांनी इंडो-ग्रीकांकडून ग्रहांची नावे, आठवड्यातील सात वारांचे ज्ञान घेतले.
*नाणी : इंडो-ग्रीकांनीच भारतात पहिल्या वेळेस सोन्याच्या नाणी ( द्विभाषायुक्त नाणं ) सुरू केली.
युनानी राजानी भारतीय धर्म स्विकारला. हेलियोडोरस नामक राजदूताने भागवत धर्म व मिनाण्डर राजाने बौद्धधर्म स्विकारला.
२) शक आक्रमण
*मुख्यतः उत्तर क्षेत्र (तक्षशीला व मथुरा) व पश्चिमी क्षेत्र (नाशिक, उज्जैन) होते.
*तक्षशीलेचे शक
शासक-माऊस
*मथुरेचे शक
विक्रमादित्य मथुरेच्या शासकाने विक्रम संवत (इ.स.पू.५७) केला.(MPSC)
*नाशिकचे शक
नहपान प्रसिध्द शासक .
*नहपान
याच्या राज्यात काठियावाड, द.गुजरात पश्चिमी मालवा, कोकण, पुणे -
*सातवाहन शासक गौतमीपुत्र सातकर्णीने याचा पराभव केला व त्याच्या नाण्यांचे पुनः स्वत:च्या नावाचे पुनअंकन केले. जोगलथंबी येथील नाणी यासंबंधीचे साक्ष दर्शवितात.
*उज्जैनचे शक
रूद्रदामन याच्या जुनागढ अभिलेखावरून तो व्याकरण, संगीत, राजकारणाचा पंडित असल्याचे समजते.
*शकांचा अंतिम शासक रूद्रसिंह तृतीय याला गुप्तशासक चंद्रगुप्त विक्रमादित्याने मारून पहिल्यांदाच मालवा क्षेत्रात व्याघ्र शैलीचे चांदीचे नाणे चालवले.
३) पल्लव आक्रमण(पार्थियाई)
*यांचे इराणमधून भारतावर आक्रमण झाले.
गोंडाफरनीज -
प्रसिद्ध शासक गोंडाफरनीजने -राजधानी तक्षशीला बनवली.
* याच्या काळात सेंट थॉमस नावाचा ईसाई भारतात आला. अशाप्रकारे ईसाई धर्म भारतात ई.सनाच्या पहिल्या शतकात आला.
४) कुषाण आक्रमण (मध्य आशियातील (प.चीन) यूची जनजाती.)
कुजुल कॅडफिसेस
*भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले व पश्चिमोत्तर प्रदेश जिंकला.
*विम कॅडफिसेस
विम कॅडफिसेस याने तक्षशीला व पंजाब जिंकला म्हणून त्याला कुषाण शक्तिचा वास्तविक संस्थापक म्हणतात.
* सोने व तांबे दोन्ही धातूचे नाणे ( एका बाजूला युनानी लिपी तर दुसऱ्या बाजूला खरोष्ठी लिपी )
शिव आकृती, नंदीबैल, त्रिशूल ( शैव धर्म )
♦️कनिष्क
*राजधानी-पेशावर
*कनिष्काचे राज्यारोहण तिथी इ.स. ७८ हे भारतात शकसंवत चे सूचक.
*कनिष्काच्या काळातच कश्मीरच्या कुंडलवनात चतुर्थ बौद्ध परिषदेचे आयोजन.
* बौद्ध धर्म हिनयान व महायान यात विभागला.
*कनिष्काच्या काळात दोन नवीन शैलींचा जन्म -
*गांधार शैली इंडो ग्रीक (युनान ग्रीक) शैली -
याचे केंद्र गांधार असून यात बुद्ध व बोधीसत्वाच्या मूर्ती काळ्या स्लेटी पाषाणापासून बनवल्या .
♦️मथुरा शैली
या शैलीत लाल वालुकाश्म दगडाचा वापर
मथुरा शैलीत बौद्ध, जैन, हिंदु धर्माशी संबंधित मूर्ती
प्रथम बुद्ध मुर्ती निर्माणाचे श्रेय मथुरा कलेलाच दिले जाते.
कनिष्काने कश्मीरमध्ये कनिष्कपूर व तक्षशीलेच्या सिरकप नगराची स्थापना केली.
कुषाणांनी सर्वाधिक शुद्ध सुवर्णनाणी (१२४ ग्रेन) चालवली.
• राजाश्रय आश्रय : कनिष्काच्या दरबारात पार्श्व, वसुमित्र, नागार्जुन,
अश्वघोष हे बौद्ध दार्शनिक तर चरक हा राजवैद्य यांना राजाश्रय मिळाला.
कनिष्काचे उत्तराधिकारी-
1.वासिष्क,
2. हुविष्क
मौर्योत्तर कालीन भारतीय राजवंश
शुंग वंश (इ.पू. १८५ ते इ.पू. ७५)
मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर मध्यभारतात शुंगांच्या सत्तेची स्थापना झाली.
• पुष्यमित्र शुंग
पुष्यमित्र शुंग हा अंतिम मौर्य शासक बृहद्रथचा सेनापती.
राजधानी-पाटलीपुत्र
अशोक कालीन सांची महास्तुपाची काष्ठ वेदिका पाडून पाषाण वेदिका निर्माण,
भरहूत स्तूप निर्मिती
दोन सांची येथील तीन स्तूपात पहिला स्तुप भगवान बुद्ध, दुसरा स्तुप अशोक कालीन धर्मप्रचारक तर तिसरा स्तुप बुद्धांची शिष्य यांच्या अवशेषाशी संबंधित आहे.
देवभूति
शुंगवंशाच्या अंतिमशासक देवभूतिची हत्या त्याचा मंत्री वसुदेवाने केली व कण्व वंशाची स्थापना केली.
कण्ववंश (इ.पू. ७५ - इ.पू. ३०)
वसुदेव
या वंशाचे शासक क्रमाने वसुदेव - भूमिमित्र - नारायण - सुशर्मन होवून गेले.
सुशर्मन-
अंतिम शासक सुशर्मनची हत्या सिमुक या करून नवीन वंश आंध्र-सातवाहनची स्थापना केली.
आंध्र-सातवाहन वंश (इ.पू. २३० ते इ.स. २३०)
राजधानी - प्रतिष्ठान (महाराष्ट्र).
सातवाहनांनीच महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर सर्वप्रथम आणले.महाराष्ट्रीय प्राकृत भाषेला राजाश्रय .
सातवाहनांचे राज्यक्षेत्र महाराष्ट्र व आंध्रप्रदेश.
भूमिदानाचे प्रथम अभिलेखीय साक्ष (इ.पू. १००) सातवहन काळात .
अजिंठा येथील लेणी क्र.१० मधील चित्रकला सातवाहनकालीन .
शातकर्णी प्रथम
नाणेघाट अभिलेखावरून शातकर्णी प्रथम राजाने ब्राह्मण व बुद्धांना भूमि अनुदान केल्याचे साक्ष
हाल
हाल प्राकृत भाषेतील प्रेमगाथा गाथासप्तशती हे पुस्तक लिहिले.
याच्या काळातच बृहत्कथाकोश (गुणाढ्य) व कातंत्र (सर्ववर्मन) लिहिले गेले.
गोतमीपुत्र शातकर्णी
नाशिक अभिलेखातून अशी साक्ष मिळते की, त्याने शक शासक नहपानाला हरविले . नहपानाच्या मुद्रेवर स्वत:चे अंकित केले होते.
यज्ञश्री शातकर्णी
याच्या नाण्यावर जलयानाचे चित्र अंकित आहे जे जलयात्रा व समुद्री व्यापाराचे परिचायक
सातवाहन संस्कृतीचे मुख्य केंद्र प्रतिष्ठान, गोवर्धन (नाशिक), वैजयन्ती (उत्तरी कनारा)
आंध्र सातवाहन सत्तेच्या क्षीण अवस्थेतच लहान-लहान सत्तांची स्थापना
1.आभीर वंश - महाराष्ट्र
2.इक्ष्वाकू - आंध्रप्रदेश
नागार्जुन कोंडा स्तूप - इक्ष्वाकू शासक वीरपुरुषदत्त यांनी बनवला.
3.कुंतल - उत्तरी कनारा, मैसूर
4.वाकाटक - विदर्भ
विंध्यशक्ती या ब्राह्मण वाकाटक संस्थापकाने राजधानी नंदीवर्धन (नागपूर) बनवली.
रूद्रसेन द्वितीय याने सेतुबंध नावाची प्राकृत भाषेतील रचना तयार केली.
अजंठा येथील गुंफा क्र.९ व १० या वाकाटक काळाशी संबंधीत आहेत.
कलिंगचा चेदि वंश -
संस्थापक - महामेधवाहन
खारवेल -
खारवेलाच्या हाथी गुंफा अभिलेखावरून खालील माहिती मिळते.
१) महापद्मानंद याने कलिंग येथे कालवा खोदला. अशाप्रकारे कालव्यासंबंधी माहिती देणारा हा प्रथम अभिलेखीय साक्ष ठरतो.
२) जैन भिक्षुना ग्रामदान दिले गेल्याचेहि पहिल्यांदाच वर्णन आले.
३) कालिंगाने सुदूर दक्षिण राजांचा पराभव केला.
मौर्योत्तरकालीन साहित्य -
नाट्यशास्त्र -भरतमुनी |
महाभाष्य -पतंजली |
|
गाथासप्तशती (हाल)- मुक्तक काव्याचे प्राचीनतम उदाहरण. |
कामसूत्र -वात्सायन |
|
|
प्रमुख बंदरे
१) बैरिगाजा (भडौच, भृगकच्छ) -पश्चिमी देशांशी व्यापार चाले म्हणून याला भारताचे पश्चिमी प्रवेशद्वार म्हटले जाते.
२) बारबेरिकम- हे सिंधुच्या मुखाशी असलेले बंदर नगर होते.
३) अरिकमेडू हे आधुनिक पाँडेचरीमध्ये आहे.
४) कोरकई ही पांड्यांची राजधानी होती जी मोत्यांसाठी प्रसिध्द होती.
५) मुजरिस हे बंदर चेर राज्यात होते.
६) चौल, सोपारा, नेलासिंडा, कावेरीपट्टनम, घंटाशाला, ताम्रलिपी (बंगाल) ही अन्य प्रसिध्द बंदरे होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा