चोल साम्राज्य
*संपूर्ण दक्षिण भारत स्वत:च्या अधिपत्याखाली आणणारे चोल हे प्रारंभी पल्लवांचे मांडलिक.
विजयालय (इ.स. ८५० ते ८७५)
*चोल वंशाचा संस्थापक - विजयालय
*प्रमुख राजे
• आदित्य प्रथम
याच्या काळात कावेरी नदीपासून सह्याद्री पर्यंत शिवाची विशाल पाषाण मंदिर बनवली गेली.
•परांतक प्रथम
उपाधी धारण -मदूराईकौंड
परांतक प्रथम याने पांड्य नरेशाला पराभूत केल.
याच्या दरबारात ऋग्वेदाचा टिकाकार वेंकटमाधवचा निवास होता.
•परांतक द्वितीय
याने त्रिचनापल्ली येथे पाटंगनाथ मंदीर बनविले.
•राजराज प्रथम (इ.स. ९८५ ते १०१४)
याने सिंहासनारोहणाच्या नवव्या वर्षी चोल विरोधी संयुक्त गठबंधन (पांड्य, चेरे, श्रीलंका) यांचा पराभव केला.
श्रीलंकेला ताब्यात घेतले.
मामुली चोलपुरम (श्रीलंका) विजय प्राप्त केला.
•राजराजेश्वर (बृहदेश्वर मंदिर), चुडामणि विहार निर्मिती, भूमिचे मापन, ऐतिहासिक प्रशस्ती अभिलेख निर्मिती या घटना राजराज प्रथमशी संबोधित आहेत.
• राजेंद्र प्रथम (इ.स. १०१२ ते १०४४)
उपाधी धारण -गंगैकोंडचोल
*पाल शासकविरोधी गंगा अभियान, दक्षिण पूर्व द्वीप विरोधी नौसैनिक अभियान केले.
चीनला दोन दुतमंडल पाठविले. या घटना राजेंद्र चोलाशी संबंधित आहेत.
चोल प्रशासन
प्रांत ( मंडलम् )
नाडू
कुर्रम (अनेक गावाचा संघ )
धर्म
शैव नयनार-
अप्पर, नानसंबदर, तिरूमूलर, सुंदरमूर्ती, नबिअंडारनबी (तामिळ व्यास) आदि ६३ नयनार
वैष्णव अलवार -
पोयगई, तिरूमंलिई, तिरूमंगई तसेच एकमात्र महिला अलवार अंडाल होती.
काही महत्वपूर्ण आचार्य
• नाथमुनी : न्यायतत्वाची रचना केली.
• यमुनाचार्य
• रामानुज : जन्म पेरम्बदूर (कांचींजवळ) येथे झाला. विशिष्टाद्वैत दर्शनाची रचना केली.
चोल शासक कुलोलुंग द्वितीय यांनी फेकलेली गोविंदराजाची मुर्ती रामानुजांनी तिरूपती मंदिरात स्थापित केली.
चोल कला :
चोल कला हि द्रविड शैलीवर आधारीत आहे. या कलेचे वैशिष्ट्य म्हणजे मंडप, विमान व गोपूरम.
मंदिर स्थापत्य
बेसर शैली : विंध्यपासून कृष्णा नदीपर्यंत.
द्रविड शैली : कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंत.
नागरशैली : हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत.
विशेषता : नागरशैलीत मंदिर चतुष्कोणीय, बेसर शैलीतील मंदिर अर्धगोलाकार तर द्रविड शैलीतील मंदिर अष्टभूजाकार होती.
अ) नागरशैलीतील मंदिर -
ओडिशा
परशुराम मंदीर (भुवनेश्वर), मुक्तेश्वर मंदिर, राजा-राणी मंदिर, लिंगराज मंदीर, जगन्नाथ मंदिर (पुरी), कोणार्क मंदिर (ब्लॅकपेगोडा)
खजुराहो
चंदेल शासकांनी शैव, वैष्णव, शाक्त, जैन मंदिरे बांधली. यात जगदंबा मंदिर, विश्वनाथ मंदिर, कंडरिया महादेव मंदिर, चतुर्भूज मंदिर, चौसष्ट योगिनी मंदिर यांचा समावेश होतो.
पश्चिम भारत
मोढेरा सुर्य मंदिर (सोळुकी शासक), सोमनाथ मंदिर (भीम प्रथम).
ब) बेसरशैलीतील मंदिर ( चालुक्य शैली )
या शैलीत द्रविड स्थापत्यासारखी विमान, मंडप, खुले मंडप असे नियोजन आहे.
विमानावर एकावर एक अलंकृत ताटवांचे नियोजन हे नागर शैलीतील प्रभाव आहे.
प्रदक्षिणापथ छतविहीन असणे व मंदिराच्या बाहेरील भिंतीवर रथांचे प्रयोजन हे सुद्धा नागर शैलीचे लक्षण आहे.
प्रमुख स्थापत्य
कालेश्वर मंदिर (कुकानूर), लौक्कीगुंडी जैन मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर (कुकुड्डी), मल्लिकार्जुन मंदिर, होयसळेश्वर मंदिर (हळेबीड), लडखन मंदिर (एहोळ), विरूपाक्ष मंदिर .
क) द्रविड शैली
द्रविड स्थापत्यात मंदिराचे विमान (शीर्षभाग) हे पिरामिडाकृती असते.
यात विमान उत्तरोत्तर छोटे होणाऱ्या खंडात विभाजित असते व शेवटी स्तुपिकेत बदलते.
या शैलीत चौकोनी गर्भगृहाच्या चारही बाजूला प्रदक्षिणा-पथ असतो.
या शैलीतील गोपूरम (प्रवेशद्वार) नंतर अधिकच अलंकृत व प्रभावशाली रूप धारण करत गेले.
द्रविड शैलीत मंदिरे राष्ट्रकुटानीही निर्मित केली.
यात रावणंखाई, रामेश्वर दशावतार व कैलाश मंदिर यांचा सामावेश होतो. पल्लव व चोलांचे द्रविड स्थापत्यात अनमोल योगदान आहे.
प्रमुख स्थापत्य :
पंचपांडव मंदिर, सप्तपैगोडा मंदिर, महाबलीपूरमचे तटीय मंदिर, कांचीचे कैलाशनाथ मंदिर, तंजोरचे बृहदेश्वर (राजराजेश्वर) मंदिर, गंगैकोंडचोलपुरम मंदिर, दारसूरमचे ऐरावतेश्वर, त्रिभुवनचे त्रिभुवनेश्वर मंदिर यांचा यात सामावेश होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा