गुप्तवंश
*कुषाणांच्या पतनानंतर मगध येथे गुप्त राजवंशाचा उदय .
संस्थापक : श्रीगुप्त
उपाधी धारण - महाराज
चंद्रगुप्त प्रथम (इ.स. ३१९ ते इ. स. ३३४)
राजधानी-पाटलीपुत्र
गुप्त वंशाचा वास्तविक संस्थापक
उपाधी धारण - महाराजाधिराज
समुद्रगुप्त - (इ.स. ३३५ ते इ.स. ३७९)
हरिषेणाच्या प्रयाग स्तंभालेखातून- समुद्रगुप्ताने विजयी अभियानच्या विजयासंबंधी माहिती.
खालील राज्यावर विजय मिळवला.
१) आर्यावर्त विजय -
‘आर्यावर्त राज्य प्रसभोधरण' आर्यावर्त १२ राज्यांचे बलाने उन्मूलन करून त्यांचे साम्राज्यात विलिनीकरण.
२) दक्षिणापथ विजय -
ग्रहणमोक्षानुग्रह १२ राज्यांच्या विजयप्राप्तीनंतर त्यांना ते वापस करण्यात आले.
३) आटविक राज्य विजय -
‘परिचारिकीकृत सर्वाटवीक राज्य'. वनातील या राजांना सेवक बनविले.
४) सीमावर्ती राज्य विजय -
‘सर्व करदानाज्ञाकरण प्रणागमन'. हि राज्य आज्ञापालन करून कर देत होते.
५) विदेशी शक्तिशी संबंध -
विन्सेंट स्मिथ समुद्रगुप्ताला - भारताचा नेपोलियन म्हणतात.
•समुद्रगुप्ताची नाणी
*गरूडप्रकार, धर्नुधारी प्रकार, परशू प्रकार, अश्वमेध प्रकार, व्याघ्रहनन प्रकार, विणावादन प्रकार.
•चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य (इ.स. ३७५ ते ४१५)
विजय -दिल्लीतील मेहरोली लोहस्तंभावरील चंद्रराजाचे विजय हे सिंधूपार बाल्टीक प्रदेश व पुर्वेस बंग देश असे होते.
शकविजय - उज्जैयनीचा शक शासक रूद्रसिंह तृतीय याला पराभूत करत वाघ्र शैलीचे चांदीचे नाणे सुरू केले.
•नवरत्न दरबार
कालीदास, धन्वतंरी, वराहमिहीर, अमरसिंह, क्षपणक, शंकु, वेतालभट्ट, घटकर्पर व वररूची यांचा समावेश .
फाहयान (इ.स. ३९९ ते इ.स. ४१४)
*चंद्रगुप्त द्वितीय याच्या काळात चिनी यात्री फाहयान भारतात आला.
चंद्रगुप्ताने सुवर्ण नाणी दीनार तर रजत नाणी रूपक नावाने चालवल्या. (धनुर्धारी शैलीच्या नाणी सर्वाधिक )
कुमारगुप्त (इ.स. ४१५ ते इ.स. ४५५)
गुप्तकालीन मुद्रांचा सर्वाधिक मोठा ढिग बयाना येथे
कुमारगुप्ताच्या काळात पुष्यमित्र नावाच्या टोळीचे आक्रमण .
कुमारगुप्ताने नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केली.
याच्या काळात मोर मुद्रा सर्वाधिक मिळतात.
•स्कंदगुप्त (इ.स. ४५५ ते इ.स. ४६७)
याच्या काळात मध्य आशियातून हूण टोळीचे भारतावर आक्रमण.
जुनागढ अभिलेखातून गिरनार प्रशासक चक्रपालीतने सुदर्शन तलावाची पुनर्बाधणी केल्याची साक्ष मिळते
*स्कंदगुप्ताने वृषभ शैलीची नाणी चालवली.
परवर्ती गुप्त (उत्तरवर्ती गुप्तशासक)
*पुरूगुप्त - बुध गुप्त - नरसिंह गुप्त - भानुगुप्त - विष्णुगुप्त.
*भानुगुप्त काळातील एरण अभिलेख (इ.स. ५१०) हा सतीप्रथेची प्रथम अभिलेखीय साक्ष.
*गुप्त काळातील नारदस्मृती व बृहस्पतीस्मृती यावरून न्यायव्यवस्थेची माहिती .
•भू-राजस्व व्यवस्था (महसुल)
*गुप्तकाळात राजा भूमीचा मालक होता. भूराजस्व १/६ ते १/४ होते. याला भाग म्हणत.
*उद्रंगकर स्थाई काश्तकाराना तर उपरिकर हा अस्थाई शेतकऱ्यांना..
*कृषक भूमी कर हा हिरण्य (नगदी) किंवा मेय (अन्नधान्य) किंवा दोन्ही स्वरूपात .
*विष्टी, बली, शुल्क आदि अन्य करही आकारले जात.(mpsc)
*अमरकोशात १२ प्रकारच्या भूमीचा उल्लेख-
उर्वरा (सुपीक), असर (नापीक), मरू (रेती युक्त), देवमातृक (वर्षाधारीत), पंकील (दलदल) इत्यादी.
भूमिमाप एकक : निवर्तन, पाटका, नड, कुल्यावाप, द्रोणवाप, आढवाप.
अग्रहार : ब्राह्मणांना दिली गेलेली करमुक्त भूमी.
• वाराह मिहिर - बृहत्संहिता या पुस्तकात पाऊस संभावना व अभाव तसेच वातावरण संबंधी भविष्यवाणी केल्या
गुप्त काळात अरघट्ट (रहाट) या सिंचन साधनाचे तर व्हेनत्सांग सिंचनासाठी घटी यंत्रा (रहाट) चे वर्णन करतो.
* प्रमुख मंदिर
तिगवा (विष्णू),
भूमरा (शिव),
खोह (शीव)
नजनाकुठार (पार्वती),
देवगड (दशावतार)
सिरपूर (लक्ष्मण),
उदयगिरी (विष्णू) ही प्रसिध्द मंदिरे (MPSC).
अंजिठा चित्रकला :
* २९ गुफेपैकी ३ गुफा या गुप्तकालीन.
अंजिठा गुफेची निर्मिती इ.पू. २०० ते इ.स. ७०० अशी चालली.
अंजिठा गुफेचा शोध जेम्स अलेझेंडर याने लावला
अंजिठा कलेचे विषय ब्राम्हण आणि बौध्द धर्माशी संबंधी.
*१७ व्या नंबरची गुफा जी चित्रशाळा समजली जाते यात अधिकतर चित्र बुध्दाचा जन्म, जीवन, महाभिनिष्क्रमण व महानिर्वाण याच्याशी संबंधी.
१६ वी गुफा - मरणासन्न राजकुमारी चित्रयुक्त आहे.
साहित्य
कवि कालिदास -
गुप्तकालीन साहित्यिक कविमध्ये सर्वश्रेष्ठ
*कालिदासाच्या रचना-
अ) नाटके
गुप्तकालीन नाटक मुख्यतः प्रेमप्रधान व सुखांत होती.
*या नाटकातील उच्च सामाजिक स्तरातील पात्र बोलणारी तर निम्न स्तरातील पात्र व स्त्रीया प्राकृत बोलणारी होती.
१) मालविकाग्नी मित्रम्
२) विक्रमोर्वशीयम्
३) अभिज्ञानशंकुतलम
हि कालिदासाची सर्वश्रेष्ठ नाटके होती.
*यात दुष्यंत व शकुंतला मिलन आहे याची कथा महाभारतातून घेतली गेली आहे. याचा विलिमय जोन्सनी आंग्ल भाषेत अनुवाद केला.
ब) महाकाव्य :
रघुवंश, कुमारसंभव
क) गीतकाव्य :
मेघदूत, ऋतूसंहार.
♦️अन्य लेखकांच्या रचना
• मृच्छकटिकम् : शुद्रक
• मुद्राराक्षस : विशाखादत्तकृत
• अमरकोश :अमरसिंहा.
• कामसूत्र : वात्सायनाच्या
• पंचतंत्र : विष्णुशर्माच्या
• नीतिसार : कामंदक
•न्यायावतार : सिद्धसेन (जैन)
*गुप्तकालीन विज्ञान तंत्रज्ञान
१) आर्यभट्ट
*पृथ्वी गोल असून परिभ्रमण करते हा सिद्धांत.
*पाय ची किंमत ३.१४
सौर वर्षाची लांबी ३६५.३५ दिवस
३) ब्रह्मगुप्त :
पृथ्वीच्या आकर्षणशक्तीचा सिद्धांत
४) वाराहमिहिर :
पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला.
५) चिकित्सा ग्रंथ :
ध्वनंतरी, हा आयुर्वेदाचा विद्वान चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारी
*बौद्ध दार्शनिक नागार्जुन-
रसायन व धातुविज्ञानाचा विद्वान.
धातुप्रयोगाने रोगाचे निवारण शक्य करून दाखविले.
महर्षी पतंजली
योगसूत्र ग्रंथ लिहिला.
* गौतम - न्यायशास्त्राची रचना केली.
* महर्षी कणाद यांनी अणू चा सिद्धांत परमाणुवाद सांगितला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा