♦️गुप्तोत्तर काळ
*गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर अनेक नवीन वंशाचा उदय -
•वल्लभीचे मैत्रक
•संस्थापक-भट्टार्क
*वंशाचा उदय गुजरातच्या वल्लभी येथे.
•वल्लभी विश्वविद्यालय जगविख्यात विश्वविद्यालय स्थापन केले.
•स्थानेश्वरचे पुष्यभूती वंश
*पुष्यभूती वंशाचा इतिहास आपल्याला साहित्य, पुरातत्व व विदेशी विवरणातून प्राप्त होतो.
*साहित्य
हर्षचरीत :
हर्षचरितचा लेखक बाणभट्ट होता. जो हर्ष राजाचा दरबारी कवि होता.
कादम्बरी : हि बाणभट्टाची कृती आहे.
हर्षाचे ग्रंथ : हर्षानी स्वतः तीन नाटके लिहीली.
१) प्रियदर्शिका
२) रत्नावली
३) नागानंद.
*गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर हरियाणातील स्थानेश्वर येथे पुष्यभूमि वंशाची स्थापना झाली.
•हर्षवर्धन (इ.स. ६०६ ते इ.स. ६४७)
ऐहोळ अभिलेखात
*बदामीचा चालुक्य शासक पुलकेशीन द्वितीयशी हर्षवधनाचे नर्मदाकाठी युद्ध झाले.यात पुलकेशिन विजयी झाल्याचे ऐहोळ अभिलेखात सांगितले आहे.
•व्हेनत्सांग (इ.स ६२९ ते ६४५)
*व्हेनत्सांग हा चीनी यात्री
त्याच्या यात्रा संस्मारणाला सी. यु. की. या नावाने संकलित केले. (mpsc)
•प्रयागची महामोक्षपरीषद
*राजा हर्ष प्रत्येक पाचव्या वर्षी दान करण्यासाठी एक मोठी सभा बोलवत असे. याला मोक्षपरीषद म्हटले जाते.
*अशी सहावी सभा प्रयाग येथे (इ.स. ६३५) याला श्वानच्चांग (व्हेनत्सांग) उपस्थित होता.
•गुप्तोत्तर काळात आयाप्रसंगी हर्षाने बुद्ध, सूर्य, शिवपूजा केली.
राजतरंगिनी मध्ये उल्लेख आहे कि बौद्ध धर्म स्विकारण्यापूर्वी हर्ष शैव होता.
•नाणी
हर्षाच्या दोन मुद्रा (ताम्र) ज्यावर शिववाहन नंदी व नालंदा मुद्रेवर श्रीहर्ष उत्कीर्ण आहे.
गुप्तोत्तर कालीन समाज परीवर्तन
•गुप्तोत्तर काळ सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे.
*भूमीदानामुळे नवीन जाती कायस्थांचा उदय झाला.
कायस्थ : हे लेखक, गणक व कागदपत्रांचे जतन करण्याऱ्याचा एक वर्ग होता.
•उद्योग
वस्त्रोद्योग : गुप्तोत्तर काळात वस्त्रोद्योग उन्नत अवस्थेत होता.
व्हेनत्सांग अनेक प्रकारच्या रेशमी व सूती कापडाचा उल्लेख करतो.
*बाणच्या हर्षचरितामध्ये रेशमी वस्त्रांची लालांतुज, अंशुक, चीनांशुक ही नावे आली आहेत.
कौशेया क्षोम, दुकूल हि अन्य सूती धाग्यापासून (सन वृक्ष) बनवलेली वस्त्रे होती.
*भडौच येथील सूती वस्त्र खूप प्रसिद्ध होती व वेरोज नावाने ओळखली जायची.
मध्यदेश चुनरीसाठी प्रसिद्ध होता.
*काश्मीरचे वस्त्र पांढरे लिनन चा व्हेनत्सांग उल्लेख करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा