MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, २ एप्रिल, २०२२

Pal ,Pratihar, Rashtrakuta Dynasty - पाल, प्रतिहार व राष्ट्रकूट घराणे

♦️ पाल, प्रतिहार व राष्ट्रकूट घराणे

•पाल वंश

•पाल साम्राज्याचा संस्थापक - गोपाल (इ.स. ७५०)

पालवंशाच्या धर्मपाल शासकाने त्रिपक्षीय संघर्षा (पाल-प्रतिहार-राष्ट्रकूट) भाग घेतला.

*धर्मपाल बौद्ध धर्मानुयायी होता. याच्या शासन काळात विदेशी यात्री सुलेमान आला होता.

*पाल काळातच विक्रमशीला व ओदंतपुरी शिक्षण केंद्राचा विकास .

*दीपंकर या बौद्ध पंडिताने तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला.

• गुर्जर प्रतिहार

 *मिहिरभोजाच्या ग्वालियर प्रशस्तिवरून गुर्जरप्रतिहारांचा इतिहास समजतो.

*भोजाची प्रशंसा अरबयात्री मिहिरभोज करतो. 

शासक महेंद्रपाल याचा गुरू राजशेखर होता.

*राजशेखर याने कर्पूरमंजरी, बालरामायण, काव्यमीमांसा, हरविलास आदि ग्रंथाची रचना केली.

राजपुत काल (इ.स. ७५० ते १२००)

*प्रतिहार वंशाच्या पतनानंतर अनेक छोटे छोटे राजवंश अस्तित्वात 

 गहडवाल वंश-कनौज 

अंतिम शासक जयचंद ११९४ ला मुहम्मद घोरी यांच्याकडून चंदावरच्या लढाईत पराभूत व कनौजवर तुर्काचे अधिपत्य.

• चंदेल वंश 

खजुराहो अभिलेख (शासक धंग) चंदेल शासकाची वंशावळी (देवनागरी लिपीत )

* चंदेलांनीच सर्वप्रथम देवनागरी लिपीचा प्रयोग अभिलेखात केला.

*मुहम्मद गजनी याने खजुराहोवर दोन वेळेस आक्रमण होते.

• परमार (मालवा)

 राजधानी - धार.

*भोज परमाराच्या काळात (इ.स. १०१० ते १०६०) परमार वंशाची राजकीय व सांस्कृतीक प्रगती .

*भोज शिक्षण व संस्कृतीचा महान उपासक होता. त्याने धार येथे एक सरस्वती मंदिर व एक संस्कृत महाविद्यालय बनविले.

* भोज - श्रृंगारप्रकाश, शब्दानुशासन, आयुर्वेदसर्वस्व, सरस्वतीकंठाभरण या रचनांची निर्मिती .

*भोजाने भोपाळच्या दक्षिण पूर्वेला भोजसर नावाची विशाल झील (तलाव) बनवली.

* चित्तोड येथे त्रिभुवन नारायण मंदिर बनवले. 

•चव्हाण (शाकंभरी)

*महान शासक पृथ्वीराज तृतीय याला रायपिथौरा म्हणून ओळखले जाते.

*११९१ला तराईनच्या पहिल्या युद्धात याने मुहम्मद घोरीचा पराभव केला परंतु तराईनच्या दुसऱ्या युद्धात (११९२) पृथ्वीराजचा पराभव .

* चंदबरदाई राजकविने -  पृथ्वीराजरासौ  हिंदी महाकाव्याची रचना.

*या महाकाव्यातच पृथ्वीराज तृतीय द्वारा जयचंद गहडवालाची पुत्री संयोगिताच्या अपहरणाची कहाणी उधृत केली आहे. 

•सेनवंश (बंगाल)

*पालवंशाच्या विघटनानंतर बंगालमध्ये सेनवंशाची स्थापना झाली. 

- शासक बल्लाळसेन याने कुलीन प्रथेची सुरवात करताना कनौजहून अनेक ब्राह्मण कुळांना बंगालमध्ये वसविले.

 बल्लाळसेन याने  - दानसागर, अद्भूतसागर हे ग्रंथ लिहिले. 

* या वंशाच्या लक्ष्मणसेन शासकाने पुरी, काशी, प्रयाग येथे विजयस्तंभ उभारले.

* जयदेवाने  - गीतगोविंद ची रचना केली. 

हलायुध हा लक्ष्मणसेनचा न्यायाधीश व मुख्यमंत्री होता.

*याच्या काळातच बंगालवर तुर्की आक्रमण (बख्तियार खिलजी).

•विदेशी आक्रमण

*७१२ इ.स. ला मुहम्मद बिन कासिमने अरबी सिंध प्रांतावर आक्रमण .

*या आक्रमणाच्या वेळी सिंधचा शासक दाहिर होता. 

७३१ला अरबांनी सिंधू नदीच्या मुखावर मन्सूरानगर वसविले.

*महम्मद गजनी या तुर्कीचे भारतावर प्रथम आक्रमण १००१ ला पश्चिमोत्तर भारताच्या राजा जयपालाच्या क्षेत्रावर झाले.

 ♦️राष्ट्रकूट घराणे

* राष्ट्रकुट साम्राज्याचा संस्थापक - दंतिदुर्ग .(इ.स. ७३५ ते ७५५).

*राष्ट्रकुटांचे सत्ताकेंद्र नंदीवर्धन(Nagpur), माण व लातूर हे होते.

•राष्ट्रकुटांची राज्यव्यवस्था

*राजा हा सर्वसत्ताधीश होता व महाराजाधिराज पदवी धारण करायचा.

•धर्म  

शैव, वैष्णव धर्म प्रमुख होते. जैन धर्माला राजाश्रय मिळाला. बौद्ध धर्माला अवकळा आली.

• कला 

कैलास लेणी (वेरूळ)

वेरूळची सुप्रसिद्ध कैलास लेणी हि राष्ट्रकुटांची अजरामर कलाकृती आहे. 

पहिल्या कृष्ण याने अखंड प्रस्तरातून हे अखंड देवालय निर्माण केले.

राष्ट्रकुलाचे योगदान

*दक्षिणेत राष्ट्रकूट काळ (इ.स. ७५३ ते ९७५) हा भारतीय इतिहासाचा गौरवशाली काळ आहे.

*या वंशाने उत्तरेत पाल-प्रतिहारांना पराभूत करून इतिहासाला वळण दिले.

*यांच्या मोहिमा या उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेस रामेश्वरपर्यंत.

*कला व साहित्य ज्यात कन्नड व संस्कृतचा विकास झाला. 

राजा अमोघवर्ष - कन्नड भाषेत कविराजमार्गची रचना केली.

राष्ट्रकूट शैली

वेरूळचे कैलाश लेणे हे राष्ट्रकूट पहिला कृष्ण (इ.स. १७५६ - ७५) याने खोदविले.

वेरूळ येथील लेण्या बौद्ध, जैन व हिंदू धर्मासंबंधीच्या.

लेणे क्र. .३ : सुंदर प्रार्थनागृहामध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वर याचे चित्रण.

लेणे क्र.५ : पद्मासनात बुद्धीची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मूर्ती

लेणे क्र. १० : चैत्यगृह विश्वकर्मा लेणी

 लेणे क्र. १२ : तीन मजली लेणी. तळमजल्यात गर्भगृहात ध्यानस्थ बुद्ध, त्याच्या बाजूला चार बोधिसत्व- मैत्रेय, मंजूझी ज्ञानकेतू, स्थितचक्र यांच्या मूर्त्या.

* पहिल्या मजल्यावर भूमिस्पर्श मुद्रेतील प्रचंड बुद्धमूर्ती. सर्वात वरचा मजला स्थापत्य व शिल्परचनेतील सजवलेला आहे.

*बौद्ध लेण्यांमधील शिल्पाचा शांती, उदात्तता, भव्यता व गभीरता हा स्थायीभाव आहे

लेणे क्र. १४ : रावणाची खाई, शिवपार्वतीचा सारीपाट क्रीडा हे शिल्पही भावपूर्ण आहे.

लेणे क्र. १६ : हे कैलाशलेणे, भारतीय शिल्पकलेची नमुनेदार व प्रेक्षणीय अमराकृती आहे.

 लेणे क्र. २९ : सीतेची न्हानी.

*घारापूरी येथील भव्य त्रिमूर्ती जगद्विख्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा