MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

Religious movements in India upsc - धार्मिक आंदोलन

 नवीन बौद्धिक आंदोलन

इ.पू. ६०० ला महावीर व बुद्धाच्या समकालीन खालील संप्रदाय अस्तित्वात .

 १) पुरणकश्यप -

 हा ब्राह्मण जातीचा होता. तो अतिशय अक्रीयावादी होता.

२) मक्खलिपुत्र गोशाल -

आजीवक संप्रदायाची स्थापना केली. महावीरांचे शिष्य होते. याच्या दर्शनाचा मूळ आधार नियतीवाद (भाग्यवाद) होता. कर्माला यांनी महत्व दिले नाही.

३) अजितकेसकम्बलिन -

 हा नितांत भौतिकवादी होता. याचे दर्शन चार्वाक (लोकायत) परंपरेची पुष्टी करते.

 ४) पकुधकच्चायन 

हा सुद्धा भौतिकवादी होता. याने कर्म व पुनर्जन्माचा स्विकार केला नाही

 ५) संजयवेलट्टीपुत्त 

 हा अनिश्चयवादी व संदेहवादी होता.

जैन धर्म 

संस्थापक :महावीर स्वामी

जैन धर्माचे अन्य नाव : कुरूचक, यापनीय, निग्रंथ. 

जैन संस्थापकांना तीर्थंकर म्हणतात. 

तीर्थकर त्यांच्या प्रतिकांसह :

 क्र.

 नाव

 प्रतीक

 1

ऋषभदेव(आदिनाथ) 

 ऋषभ

 2

अजीतनाथ

 गज

 3

संभवनाथ 

अश्व 

4

अभिनंनदनाथ

 कपी 

 5

सुमतीनाथ

 क्रौंच

 6

पदमप्रभू

 पदम

 7

 सुपार्श्वनाथ 

  स्वस्तिक

 8

 चंद्रप्रभू  

 चंद्र

 9

 सुविधीनाथ

 मकर  

 10

 शीतलनाथ 

 श्रीवत्स  

 11

 श्रेयांसनाथ 

गेंडा 

 12

 पूज्यनाथ 

 महिष 

 13

 विमलनाथ 

 वाराह 

 14

 अनंतनाथ

 श्येन

 15

 धर्मनाथ

  वज्र 

 16

 शांतीनाथ

मृग 

 17

 कुंथूनाथ

 अज

 18

 अरनाथ

 मीन 

 19

 मल्लीनाथ

 कलश

 20

 मुनीसूव्रत 

 कुर्म

 21

 नेमीनाथ 

 निलोत्पल 

 22

 अरीष्टनेमि

 शंख 

 23

 पार्श्वनाथ

 सर्पकण 

 24

 महावीर

 सिंह

महावीर स्वामी : (५९९ इ.पू. ते ५२७ इ.पू.)

जन्म-कुंडगाम (बासुकुंड)  वैशाली (Bihar) 

मृत्यू-पावानगरी

जैन ग्रंथ आचारांगसूत्रात महावीरांच्या तपस्येचे वर्णन मिळते.

त्रिरत्ल-

सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक आचरण

पंचमहाव्रत -

अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य यांचा समावेश ( पाच अणुव्रत )

 कायाक्लेश -

संलेखना पद्धती (उपवासाने आत्महत्या)

जैन धर्मप्रचार -

महावीरांनी ११ अनुयायांचा एक संघ गणधर ची स्थापना .

स्वामींच्या मृत्युनंतर सुधर्मन जैन संघाचा अध्यक्ष.

चंद्रगुप्त मौर्याच्या वेळी पाटलीपुत्र येथे प्रथम जैन परीषदचे आयोजन.( अध्यक्ष स्थूलभद्र )

 जैन संप्रदाय श्वेतांबर व दिगंबर यामध्ये विभागला गेला. 

श्वेतांबर - स्थूलभद्राचे अनुयायी जे श्वेत वस्त्र धारण करतात.

डिगंबर - भद्रबाहूचे अनुयायी जे भटकत जे धर्मप्रसार करतात व नग्न असतात.

साहित्य -

जैन साहित्याला आगम म्हणतात. ( अर्धमागधी- मागधी - प्राकृत भाषेत )

१२ अंग - यात जैन सिद्धांत व नियमांचे संकलन . 

१२ उपांग - यात ब्रह्मांड वर्णन, खगोलविद्या, मरणोत्तर जीवन, कालविभाजन वर्णन 

बौद्ध धर्म

संस्थापक - गौतम बुद्ध

जन्म -  इ.पू. ५६३ लुंबिनी (नेपाळ तराई) 

मृत्यू - इ.पू. ४८३ कुशीनगर (मल्लांची राजधानी) 

महाभिनिष्क्रमण - बुध्दाने वयाच्या २९ व्या वर्षी ग्रहत्याग केला याला  म्हणतात.

धम्मचक्रप्रवर्तन - सारनाथ येथे उपस्थित पाच ब्राह्मणांना त्यांनी आपला पहिला उपदेश दिला.

मावसभाऊ आनंद विनंतीनुसार बुद्धांनी अनिच्छेने महिलांना बौद्ध संघात प्रवेश- प्रजापती गौतमी 

• बुद्धांचे प्रमुख शिष्य-

१) सारिपूत्र, 

२) आनंद - बुद्धांचा वैयक्तिक शरीर परिचारक. प्रमुख योगदान- स्त्रियांना संघात घेणे.

३) मौदगलायन 

४) उपाली

५) अनाथपिंडक

६) बिंबिसार 

७) अजातशत्र 

८) जीवक

९) महाकश्यप.

बौद्ध धर्मानुयायी स्त्रिया -

महाप्रजापती गौतमी-(प्रथम महिला प्रवेश)

 यशोधरा, नंदा, क्षेमा, आम्रपाली, 

विशाखा (बौद्ध संघाची संरक्षिका). 

बौद्ध धर्म सिद्धांत

* चार आर्य सत्य

 दुःख, 

दुःख समुदाय, 

दुःखनिरोध, 

दुःखनिरोध गामिनी प्रतिपदा

निर्वाण : निवार्ण प्राप्तीसाठी बुद्धानी आष्टांगिक मार्ग सांगितला 

बौद्ध परिषद

प्रथम बौद्ध परिषद -

स्थान - राजगृह (सप्तपर्णी गुफा)

अध्यक्ष - महाकश्यप

शासक - अजातशत्रू 

 द्वितीय बौद्ध परिषद 

 स्थान - वैशाली (वालुकाराम विहार)

अध्यक्ष - सुबुकामी

शासक -  कालाशोक 

या परिषदेचे आयोजन बुद्धाच्या मृत्यूनंतर (इ.पू ४८३) करण्यात आले. 

बुद्ध दर्शनाचे संकलन सुत्तपिटक व विनयपिटक च्या रचनेतून करण्यात आले.

जीवनशैली मध्ये बदल मान्य करणाऱ्या सर्वास्तिवादी (महासांघिक) व परिवर्तन विरोधी थेरावादी (स्थाविर) या दोन गटात विभाजन याचे १८ उपसंप्रदाय तयार झाले. 

तृतीय बौद्ध परिषद 

स्थान-पाटलीपुत्र (अशोकराम विहार)

अध्यक्ष - मोगलीपुट्टे पूत्र तिस्स

 शासक - अशोक 

तृतीय पीटक अधिधम्मपीटक व संबंधित ग्रंथ कथावस्तूचे संकलन करण्यात आले. 

चतुर्थ बौद्ध परिषद  

स्थान- कश्मीर (कुंडलवन)

अध्यक्ष - वसुमित्र

शासक - कनिष्क

बौद्ध धर्म हिनयान व महायान या दोन संप्रदायात विभागला

 बौद्धांनी संस्कृत भाषेचा स्विकार केला.

 हिनयान (श्रावकयान) 

   महायान (बोधिसत्वयान)

 १) हे बौद्ध धर्माच्या प्राचीन आदर्शला मुलरूप  मानून आचरण करणारे .

२) यांनी बुद्धाला महापुरूष मानला

३) हिनयानी मूर्तीपूजक नव्हते 

 ४) आपल्या वैयक्तिक साधनेतून निर्वाणप्राप्ती. 




५) स्वकर्माने स्वकल्याण तत्व स्विकारले.

 ६) मांस खाणे वर्जित


७) यांनी कोणतेही तीर्थ मानले नाही


८) हिनयान ग्रंथ -पाली भाषेत

१) यांना धार्मतील प्राचीन आदर्शलाकाळाच्या गरजे नुसार परिवर्तन मान्य होते.

 २) यांनी बुद्धाला देवता मानला

३) हे मूर्तिपूजक होते (मथुरा कलेतील बुद्धमुर्ती)

४) बोधिसत्व जो मोक्षप्राप्तीनंतर दुसऱ्यांच्याही (अर्हत पद) साठी प्रयत्न केले मुक्तीसाठी प्रयत्नरत 

५) समस्त मानवजाती कल्याण तत्व

 ६) मांस खाण्यावरील प्रतिबंध जरूरी नाही. 

 ७) महायानीनी चार तीर्थ . लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर जे बुध्दांच्या जीवनाशी संबंधीत 

८) महायान ग्रंथ-संस्कृत भाषेत


बौद्धसाहित्य

 बौद्धसाहित्याला त्रिपिटक म्हणतात ( पाली भाषेत )

• सुत्तपिटक : बोद्ध धर्म उपदेशाचे संग्रहण,

• विनयपिटक : भिक्षु-भिक्षुणीच्या दैनिक आचरणाचे नियम, प्रायश्चित (पतिमोख्ख) यांचे वर्णन 

• अधिधम्मपिटक : बौद्ध दार्शनिक सिद्धांत प्रश्नोत्तर रूपात वर्णन.

• जातक हा सुत्तपिटकाचा भाग असून यात बुद्ध पूर्वजन्माच्या कहाणीचे संग्रहण

• मिलिंदपन्हो : या ग्रंथात युनानी राजा मिनेण्डर आणि बौद्ध भिक्षु नागसेन यांच्यामधील वार्तालाप

(रचनाकार नागसेन )

* दीपवंश व महावंश - पाली भाषेतील हे ग्रंथ सिंहलद्विप (श्रीलंका) चा इतिहास सांगतात. 

• बुद्धरचित : (रचनाकार - अश्वघोष), बुद्धजीवनाचे सहज वर्णन ( संस्कृत भाषेत ) 

भागवतधर्म (वैष्णव धर्म  सात्वत धर्म - पांचरात्र धर्म 

प्रवर्तक : कृष्ण ( देवकीपुत्र व गोपीकृष्ण )

जैन परंपरेनुसार वासुदेव कृष्णाला २२वे जैन तीर्थंकर अरीष्टनेमी यांच्या समकालीन मानण्यात आले.

अवतारवाद म्हणजे वरून खाली येणे, शरीर धरण करणे होय. 

विष्णूचे १० अवतार सर्वाधिक प्रचलित 

 1

 मत्स्यावतार -

 जलप्लावन समयी विष्णूने मत्स्य रूप धारण करून मनूला वाचविले.

 2

 कूर्मावतार -

समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूने कूर्म रूपात मंदराचल पर्वताला धारण केले होते. कांचीपूरम येथील भगवान विष्णू मंदिरात कूर्मावताराचे पूजन होते.

 3

 वाराह अवतार -

 हिरण्याक्षाने जेव्हा पृथ्वीला समुद्रात फेकले तेव्हा विष्णूने वाराह रूप धारण करून पृथ्वीला समुद्रतळापासून उचलले. चंद्रगुप्त द्वितीयाने उदयगिरी गुहालेखात वाराह अवताराचा उल्लेख केला आहे. गुप्तकाळात हाच अवतार सर्वाधिक प्रचलित होता. MPSC

 4

नृसिंह अवतार -

या अवताराद्वारे विष्णूने हिरण्यकशिपूचा वध केला

 5

वामनावतार -
स्कंधगुप्ताच्या जुनागढ अभिलेखात या अवताराचा उल्लेख येतो

 6

 परशुराम अवतार -

 परशुराम ब्राह्मणऋषी जगदग्नीचा पुत्र होता

 7

 रामावतार

 8

 कृष्णावतार/बलरामवतार 

  बुद्धावतार

 10

 कल्की -

हा अवतार आणखी व्हायचा आहे. अशी मान्यता आहे की, कलयुगात भगवान विष्णु पांढऱ्या घोड्यावर बसून येतील.

 शैव धर्म

शिवउपासकाला शैव आणि संबंधीत धर्माला शैवधर्म

शिवाची प्राचीनतम मूर्ती पहिल्या शतकात रेणीगुंठा येथे प्रसिद्ध गुडीमल्लाम लिंगाच्या रूपात प्राप्त झाली आहे.

शैवधर्माचे प्रमुख सम्प्रदाय

वामनपुराणात शैवांचे चार सम्प्रदाय

1.पाशुपत शैव- 

सर्वाधीक प्राचीन

2.वीरशैव (लिंगायत)-

संस्थापक - चिन्नाबासव (बस्वराज) (कल्याणी चालुक्य शासक कलचुरी विज्जल यांचे प्रधानमंत्री)

उपासक शिवलिंगाची आराधना त्याला चांदीच्या डबीत (संपुट) ठेवून त्याचे गळ्यात धारण करत.

3.कापालीक शैव - 

भैरवाला शिवाचा अवतार मानून त्याची उपासना 

कापालिक उपासक सुरासुंदरी यांचे सेवक करणे, मास खाणे, नरमुंडधारण करीत होते

 श्रीशैल - कापालीकांचे प्रमुख केंद्र

4.कालामुख शैव

भारतातील १२ ज्योतिर्लिंग -

१) श्रीभिमाशंकर, (पुणे महाराष्ट्र)

  २) श्रीमल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश)

३) श्रीत्र्यंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र)

 ४) श्रीवैजीनाथ (परळी महाराष्ट्र )

५) श्रीघृष्णेश्वर (औरंगाबाद, महाराष्ट्र)

 ६) श्रीनागनाथ (औंढा नागनाथ, महाराष्ट्र)

७)श्रीरामेश्वर (तमिळनाडू)

   ८) श्रीसोरटी सोमनाथ (सौराष्ट्र, गुजरात)

९) श्रीमहाकालेश्वर (उज्जैन, मध्यप्रदेश) 

१०) श्रीओंकारेश्वर (मध्यप्रदेश) 

 १) श्रीविश्वेश्वर (काशी उत्तरप्रदेश)

 १२) श्रीकेदारेश्वर (उत्तराखंड).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा