MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

Sangam Era upsc mpsc notes - संगम युग

 ♦️संगम युग

 भारतातील कृष्णा व तुंगभद्रा नदीदरम्यानच्या तामिळ प्रदेशातील तामिळ कविचे (विद्वानाचे) मिलन 

*संगम संस्कृतित सुदूर दक्षिणेतील तीन राज्य चोल, चेर व पांड्य यांच्या संस्कृतीचे अध्ययन .

*तीन्ही संगम पांड्य राजानी आयोजित केली परंतु साहित्यातुन सर्वाधिक माहिती चेर राज्यांची.

*संगम युग (५०० इ.पू. - ५०० इ.स.)

१) प्रथम संगम : केंद्र-मदुराई 

अध्यक्ष-अगस्त्य ऋषी (अगत्तियार) 

हा संगम सर्वाधिक जास्त काळ चालला. 

 २) द्वितीय संगम : केंद्र-अलवै

अध्यक्ष अगस्त्य (नंतर तोलकाप्पियर)

एकमात्र तमिल ग्रंथ तोलकाप्पियम् उपलब्ध आहे.

३) तृतीय संगम :

 केंद्र-उत्तर मदुराई

अध्यक्ष - नक्कीरर

नक्कीरर द्वारा तिरूमरुकात्रिपदे व नेडनलवाड हे ग्रंथ लिहले गेले.

अ) तोलकाप्पियम : व्याकरण ग्रंथ 

ब) परिपादल : तामिळ साहित्याचा प्रथम संगीत संग्रह

क) कुरेल : रचनाकार - तिरूवल्लूवर.( तामिळ साहित्याचा आधारग्रंथ )

*संगम युगातील पाच महाकाव्य

1.शिल्पादिकारम्, 

2.मणिमेखले, 

3.जीवकचिंतामणि, 

4.वलयपति 

5.कुंडलकेशी 

♦️ राजकिय इतिहास

 *दक्षिणेत चोल (उत्तरपूर्व), चेर (दक्षिण पश्चिम), पांड्य (सुदूर दक्षिण) असा विस्तार होता.

 १) चोल 

राजधानी - पुहार किंवा कावेरीपट्टनम्.

प्रारंभिक राजधान्या -उत्तर मनलूर व उरयूर.

राजचिन्ह - वाघ (चित्ता)

संगमकॉलीन राज्यांमध्ये चोलांचा प्रथम अभ्युदय झाला.

 महत्वपूर्ण शासक करिकाल 

 याने कावेरीपट्टम राजधानी श्रीलंकेवर विजय मिळवला. कृषीसाठी विशेष प्रयत्न केले.

२) पांड्य

 राजधानी - मदुराई

प्रारंभिक राजधानी - कोरकई

राजचिन्ह -मासा

३) चेर

राजधानी - कूरूयूर (वांजी), तोंडी

राजचिन्ह - धनुष्य.

* संगम प्रशासन

*संगम राज्य हे कुलसंघासारखे दिसतात. कुळातील वयस्क व्यक्ति राज्य कार्यात सहभागी होत.

*संपूर्ण राज्याला मंडलम् - नाडू - उर - पेरूर - शिरूर. अशा क्रमाने राजकीय एककात विभाजित करता येईल. यात शिरूर सर्वात लहान ग्राम होते. 

*राजाच्या न्यायालयाला मरम म्हटले जाई.

♦️सामाजिक जीवन

*संगम युगात वर्णव्यवस्था प्रचलित नव्हती. पुरूनानरू नामक ग्रंथात चार वर्ग तुदियन, पाडन, पडैयन, कडम्बन याचा उल्लेख मिळतो समाज सामान्यत: चार वर्गात विभाजीत होता.

१) शुड्डूम वर्ग (ब्राह्मण व बुद्धिजीवी वर्ग)

२) अरसर वर्ग (शासक व योद्धा वर्ग)

 ३) बेनिगर वर्ग (व्यापारी वर्ग)

 ४) वेल्लाळ वर्ग (शेतकरी वर्ग)

*परियार लोक शेतमजूर होते. या युगात गुप्तचरांचा ओर्रार वर्ग होता. या काळात दास प्रथेचा अभाव होतो. 

*विवाह : उत्तर भारतासारखे दक्षिण भारतात विवाह एक संस्कार मानला जाई. 

*तोलकाप्पियम ग्रंथात आठ प्रकारच्या विवाहाचा सामान्यतः विवाहात उल्लेख मिळतो.

*मुलीचे वय १२ वर्षे तर मुलाचे वय १८ वर्षे होते.

*पंचतिणे - 

प्रेमविवाह-(गंधर्व विवाह) स्त्री आणि पुरूषाचे सहज प्रणय आणि त्याच्या विविध अवस्थेला पंचतिणे म्हटले  जाते.

* पेरू दिणे - 

* हा संगम युगातील सर्वाधिक प्रचलित विवाह प्रकार होता. समाजात विधवा विवाह व पुनर्विवाह प्रचलित होता.

*गणिकेला परतियर म्हटले जाई. नर्तक-नर्तकी आणि गायकांचे दल फिरून-फिरून लोकांचे मनोरंजनाचे कार्य करत यांना पाणर म्हटले जाई. 

सती प्रथेचे प्रचलन होते. कवयित्री स्त्रीचेही वर्णन मिळते जसे औबियेर, नच्चेलियर.

♦️आर्थिक जीवन

*सर्वाधिक विदेशी व्यापार युरोपातील रोम सोबत चालत होता.

*रोमशासक ऑगस्टस याच्या काळी तो सर्वाधिक होता.

*हा व्यापार भारतासाठी अनुकूल होता यावेळी अनेक सुवर्णमुद्रा भारतात आल्या.

*ऑगस्टस नंतर व्यापारात घसरण झाली. पांड्याचे बंदर कोरकई (कॉल्ची) हे मोत्यासाठी प्रसिद्ध होते.

*निर्यात वस्तू : गरम मसाले, हस्तीदंत, मोती, रेशीमवस्त्र, रत्न, पोपट, मोर.

*आयात वस्तू :घोडा, मदिरा, सोने, चांदी.

 चेर राज्यात काळे मिरे, हळद, ऊस, रागीचे उत्पादन घेतले जायचे.

*चोल शासक पेरूनेरल इरपोरई (इ.स. १९०)

*याने दक्षिण भारतात उसाची शेती सुरवात केली. ऊसापासून साखर बनविणे, पिक कापणे, खाद्यान्न वाळवणे याचे वर्णन मिळते. कृषी कार्य मुख्यरूपाने महिला करत होत्या.

*भूमीचे प्रमुख पाच प्रकार मिळतात. मरूदम (सुपिक) मुल (पशूचराई भूमी), कुरिंची (ज्वारी, भात, आंबा शेती), नेथल(किनारपट्टी क्षेत्र) जे मीठ व मासेमारीसाठी, पालै (वाळवंट भूमी) 

*व्यापार

 *यांचा रोम, युनान, इजिप्त, चीन, श्रीलंकेशी व्यापार चालत असे. अंतर्गत व्यापारही उन्नत होता.

*उद्योगात वस्त्र उद्योग सर्वाधिक प्रचलित होता सर्वाधिक व्यापार रोमशी होत होता.

• चोलांचे बंदर : पुहार, उजैन, अरिकामेडू.

• पांड्यांचे बंदर : शलियूर, कोरकई, भडौच (भृगकच्छ)

• चेरांचे बंदर : तोंडी, मुशिरी, तेल्सिंडा, वांजी मूजारिस यांचा उल्लेख आला आहे. 

• धर्म : उत्तर भारतीय धर्माचा दक्षिणेत प्रसार करण्याचे श्रेय अगस्त्य आणि कौंडिण्य ऋषी यांना दिले जाते.

 दक्षिण भारतात  प्रमुख देवता -  मुरूगन (सुब्रहमण्यम) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा