MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, २ एप्रिल, २०२२

Yadav Dynasty upsc mpsc notes- देवगिरीचे यादव

♦️देवगिरीचे यादव


*राजसत्ता इ.स. नवव्या शतकाच्या मध्यापासून १४व्या शतकापर्यंत होती.

कल्याणीच्या चालुक्यांच्या पाडावानंतर ज्या तीन सत्ता उदयाला 

1.द्वारसमुद्रचे होयसळ, (तेलंगानाचे) 

2.वारंगळचे काकतीय 

3. देवगिरीचे यादव 

*यादव शासकांचा इतिहास 'चतुर्वर्ग चिंतामणी' या हेमाद्रीच्या ग्रंथातून उपलब्ध .

*पाचवा भिल्लम (११७३-९२) 

यादव  घराण्याच्या सार्वभौम सत्तेचा संस्थापक .

* भिल्लमने दौलताबाद (देवगिरी) - राजधानी स्थापन केली.

• सिंघण दुसरा  (१२००-१२४७)

* दुसरा सिंघणच्या काळात यादवांचा साम्राज्यविस्तार .

*विदर्भ देखील त्यांच्या ताब्यात होता अमदापूर लेखावरून लक्षात येते.

*खोलेश्वर हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी दुसरा सिंघण याच्या दरबारात होता असे अमदापूर लेखावरून लक्षात येते.

* खोलेश्वर हा त्याच्या लोकविकासासाठी केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध .

* व-हाड प्रांतात खोलेश्वर याने अनेक पाणपोया, विहिरी व मंदिरे बांधली.

* पूर्णा नदीकाठी त्याने खोलपूर हे गाव वसविले आणि एलिचपूर येथे विष्णुचे मंदिर बांधले.

*दुसऱ्या सिंघणच्या काळातच मायणी (सातारा) येथे संगमेश्वर मंदिराचे शिखर व शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर बांधले गेले.

*सारंगदेव हा संगीततज्ञ सिंघणच्याच दरबारात होवून गेला. सारंगदेवाने - संगीतरत्नाकर हा ग्रंथ लिहीला.

* रामचंद्रदेव (१२७१-१३१२) 

याच्या काळात देवगिरीवर अलाउद्दीन खिलजीचे आक्रमण (१२९६).

अलाउद्दीनने रामचंद्रदेवाला 'रायरायन" उपाधी दिली.

* हरपालदेव

 याच्या काळात मुबारक खिलजीने देवगिरीच्या यादवांची सत्ता संपुष्टात आणली.

•यादवकालीन संस्कृती

प्रशासन

राष्ट्र (प्रांत)

     |

विषय

   |

खंड

   |

वेलित

   |

पूर (ग्राम)

•समाजव्यवस्था

*यादवकालीन समाज हा पुरूषसत्ताक व संयुक्त कुटंबव्यवस्थेचा होता.

*स्त्रियांच्या शोषणाचे वर्णन महिला संत - संत सोयराबाई, संत निर्मलाबाई यांच्या अभंगातून लक्षात येते..

•अर्थव्यवस्था

* राजधानी देवगिरी -जवाहिऱ्यासाठी  प्रसिद्ध 

*पैठण, नगर, चोल, ठाणे हि ठिकाणे कापड विणकामासाठी प्रसिद्ध .

*या काळात निष्क, गदाण, होन, वराह, फणम्, आसू हि सोन्याची नाणी होती. 

•धर्म

*यादव काळात वैदिक धर्माला अनुसरून शैव, वैष्णव धर्माचा प्रसार.

*पंढरपूर, रामटेक, त्र्यंबकेश्वर, औंढानागनाथ, नासिक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे.

•स्थापत्य

हेमाडपंथी शैली

* मंदिर निर्मितीची हेमाडपंथी ही नवीन शैली निर्माण.

* हेमाडपंथी शैलीचा जनक -  हेमाद्रि (यादवांचा प्रधान ).

* या मंदिराच्या बांधकामात चूना-गारा यांचा उपयोग करण्यात आला नाही. यामध्ये शिलाखंड हे त्यांच्या खाचाद्वारे सांधले गेले.

* मंदिराचा आधारातून गुरूत्वमध्य रेषा जात असल्याने या स्थापत्यात स्थिरता आहे.

साहित्य 

* गोरक्षगीता - गोरक्षनाथ ,

 * विवेकसिंधु - मुकुंदराज , 

*लीलाचरित्र - म्हाई भट्ट ,

 रुख्मिणी स्वयंवर - नरेन्द्र भट्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा