MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, २ मे, २०२२

Mughal Art and Architecture -मुघल स्थापत्य


मुघल स्थापत्य

मुघल शासक

 निर्माण

बाबर 

*पानीपतची काबुल मजिद.

*बाबरी मजिद, अयोध्या  (बाबरचा सेनापती वीर बाकी याने )

* नुर-ए-आफशान उद्यान.

हूमायूँ 

पाचवी दिल्ली ( दीनपनाह नगर) वसविले.

शेरशहा सुरी

* सहावी दिल्लीशेरगढ (दिल्ली शेरशाही) वसविली. 

* सासाराम मकबरा (बिहार) - एका तलावात बनवला. 

 अकबर

 अकबरच्या स्थापत्यामध्ये लाल वालुकाश्मचा विस्तृत प्रयोग 

 * हुमायूँचा मकबरा (हुमायूँची पत्नी हमीदा बानू बेगम हिने)

* आगऱ्याचा किल्ला.

* अकबर महाल.

* जहाँगीर महाल.

* फतेपुर सिकरी .

गुजरात (१५७२) विजयानंतर हिचे नाव फत्तेपुर सिकरी . 

प्रसिद्ध वास्तू -

* दीवान-ए आम.

* दीवान ए - खास,

* पंचमहाल.

* जोधाबाई महाल.

* जामी मजिद - रोमान्स इन द स्टोन' म्हणजे दगडात रुमानी कथा न्ह्टले जाते.अकबराने 'दीन-ए-इलाही' ची घोषणा येथूनच केली होती.

* बुलंद दरवाजा.

* शेख सलिम चिस्ती मकबरा .

 जहांगीर


* अकबराचा मकबरा

* एतमाद - उद - औला मकबरा (पीत्रदुरा किंवा जडाऊ काम शैलींत-पीत्रदुरा शैलीमध्ये संगमरवर व सोने, हिरे, अनमोल खडे, आभूषणांचे जडाऊ काम.)

* शालीमार बाग (कश्मीर).
* दिलकुशा बाग (लाहोर) 
* चश्मा शाही.
* निशांत बाग ( काश्मीर).

शाहजहाँ

 

* मुघल स्थापत्याचा सुवर्णकाळ 

* शाहजहाँ काळात लालवालुकाश्मा ऐवजी पांढरा संगमरवर अधिक मात्रेत वापर.

* ताजमहल (आगरा  यमुनाकाठी )

याचा स्थापत्यकार उस्ताद अहमद लाहोरी व गवंडी मुहम्मद इसा खाँन होता.

* दीवान-ए-आम.

* शीश महल.

* मोती मजिद.

* नगीना मजिद.

* जामा मजिद.

* लाल किल्ला (१६३८ ला - शाहजहाँबाद  सातव्या दिल्लीत -अष्टभूजाकृती )

हमीद व अहमद या शिल्पकारांनी .  

मुघलांकडून निर्मित हा अंतिम किल्ला . 

 औरंगजेब

* मोती मजिद (दिल्ली)

* राबिया उद दौरानी मकबरा (औरंगाबाद)

 बीवी का मकबरा - द्वितीय ताज १६७८ ला .

* बादशाही मजिद (लाहोर).

* पिंजोर उद्यान - (हरियाना)

मुघलकालीन चित्रकला

• चित्रकला शैली -

मुघलांची चित्रकला शैलीचा मुख्य विषय शाही दरबार, सांस्कृतिक दृश्य, युध्दाची दृश्य, पौराणिक कथा, प्राकृतिक जीवन हा होता.

अन्य प्रांतीय चित्रकला शैली 

दख्खनी चित्रकला

दख्खनी चित्रकलेची विशेषता ही रंग योजनेची दैदीप्यमानता व अलंकरन विस्तृतता आहे. 

या चित्रात नीळा, सोनेरी, लाल, गुलाबी, पिवळा रंगाच्या विलक्षण पट्टीकेत लांब राजशाही महिला रंगीत साडीमध्ये दाखवल्या आहेत. 

या चित्रकलेअंतर्गत बीजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर हे प्रमुख केंद्र होते.

मेवाड शैली

राजस्थानच्या या चित्रकला शैलीचा विकास राजा अमरसिंह, राणा सांगा, राणा कुंभा पासून राजा जगतसिंह काळात चरमोत्कर्षावर पोहचतो.

या चित्रकलेचे प्रमुख लक्षण म्हणजे नीळ्या, लाल, हिरव्या पृष्ठभूमीवर गडद व चमकदार रंगाचा प्रयोग होय. 

झाडांची एक विशेष आकृती अंकन, प्राकृतिक चिमण्या व फुले तसेच राजस्थानी वेशभूषेतील पुरुष- स्त्रिया यांच्या आकृत्या आहेत. 

बुंदी शैली

भारतीय चित्रकला शैली इतिहासात सर्वोत्तम शैली.

यातील चित्राची रंगव्यवस्था सामान्यतः समृद्ध आणि चुटूकदार आहे. 

स्त्री आकृती लांब, एकहाडी असून स्तन पुष्ठ व कटीक्षीण आहे. जी तंग छोटी चोळी व रंगीत घाघरा घालते. 

स्त्रीयांच्या मुखाकृती या सरळ टोकदार नाक, शरीराचा रंग हलका बादामी आहे.

या चित्रात दृश्य रहित पहाड, वाहणाऱ्या नद्या, रंगीबेरंगी फुलांची दाटझाडी युक्त चित्र .

उपवनात दाट झाडी दाखवण्यासाठी आंबा, पिंपळ, केळी, पुलित बेल व पशूपक्षांचे चित्रण .

कोटा शैली

कोटा चित्रकलेचे अनुपम उदाहरण शिकारी दृश्यांची चित्रे, हाथीवर बसून लढणाऱ्या राजा महाराजांची चित्र इ. यांच्या चित्रशैलीत नंतर लघुचित्रेही बनले. 

मारवाड (बीकानेरी)शैली

बीकानेरी चित्रशैलीत स्त्री आकृती, हडकुळ्या, मोठ्या डोळ्यांच्या व बारीक कमरेच्या सुंदरीचे चित्र प्रमुख आहे.

कांगडा शैली

कांगडा राज्याचा राजा संसारचंद याच्या संरक्षणामुळे कांगडा शैली पूर्व पहाडी क्षेत्राची प्रमुख शैली बनली. 

या शैलीतील प्रमुख चित्रसमूहात भागवत पुराण, गीतगोविंद, रागमाला प्रमुख . 

कांगडा शैलीतील रंगामध्ये जी चमक आहे ती अन्य कोणत्याही शैलीत नाही. 

या शैलीचे मुख्य विषय प्रकृति प्रेम आणि नारी सौंदर्य हे होते. 

यांच्या गढवाल स्कूल शैलीमध्ये प्राकृतिक दृश्यांचे मनोरम चित्रण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा